✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 05/03/2013 - 23:58  ·  लेख
लेख
नेपोलियनच्या इजिप्त आणि अन्य देशांच्या स्वार्‍यांमधून त्याला अगणित सोनेनाणे, जडजवाहिर, अमूल्य कलाकृती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा लाभली, हे सर्वविदित आहेच. पॅरीसच्या लूव्र संग्रहात यापैकी बहुतांश वस्तू संग्रहित आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांचे डच चित्रकाराने रंगवलेले चित्र, हे त्यापैकीच एक. नेपोलियनच्या पाडावानंतर काही कलाकृती व इतर वस्तू अन्य लोकांच्या हाती लागून त्या आजतागायत पॅरिसमधील विविध पुराणवस्तू विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. गल्ल्या-बोळातील लहान लहान दुकानातूनही केंव्हा कोणती अमूल्य वस्तू आढळेल, हे सांगता येत नाही. त्या विकत घेणे शक्य नसले, तरी त्यांचा शोध घेत फिरणे हा माझा आवडता उद्योग. अश्याच एक भटकंतीत एका दुकानात फ्रेम केलेली देवनागरी लिपीतील जुनाट पोथ्यांची काही पृष्ठे नजरेस पडली. जवळ जाउन बघताच मी चाटच पडलो, कारण त्या चक्क मराठीतील ओव्या होत्या. वाचताक्षणीच त्यांचे दासबोधाशी असणारे साम्य उमगले, पण त्यातील शब्द- रचनेमुळे मी बुचकळ्यात पडलो. त्या ओव्या खालील प्रमाणे होत्या: १. असो जाले ते जाले..नेणतेपणे होवोन गेले..स्त्रीनामे वावरले..पाहिजे आता. २. असो ऐसा प्रसंग जाला..जाला तो होवोन गेला..आतातरी आपणाला..स्त्रीनामे भूषवावे. यातील 'स्त्रीनाम' याचा काही केल्या उलगडा होइना. मग मला वाटले, की चुकीने 'श्रीराम' ऐवजी 'स्त्रीनाम' लिहिले गेले असावे. त्या दुकानदाराशी बोलण्याचा प्रयत्न फ्रेंच भाषेच्या माझ्या अज्ञानामुळे विफल झाला, परंतु त्याने त्याच्या रजिस्टरमधील जी नोंद दाखवली, त्यावरून या वस्तू १९२८ पर्यंत पॅरिस मधील 'शातो द होल्कार' मध्ये, अर्थात इंदुरचे संस्थानिक तुकोजीराव होळकर यांच्या भव्य प्रासादात होत्या असे कळले. याखेरीज मात्र तो दुकानदार काहीच सांगू शकला नाही. हा प्रसंग उलटून वर्षभर झाले आणि तो माझ्या विस्मृतीत गेला. परंतु परवा एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमधून अचानक मला वेगळाच साक्षात्कार झाला आणि त्या ओव्या जर समर्थ लिखित असल्या, तर समर्थांची भविष्यात डोकावण्याची कुवत आणि त्यांचे द्रष्टेपण, यांच्या प्रचीतीने अक्षरश: भारावून गेलो. या तीनही घटना म्हणजे मला माझ्या मित्रांचे आलेले खालील फ़ोन: १. माझ्या 'अगदी सोपी फिटनेस टेस्ट' वर आलेले प्रतिसाद वाचत असता खिशातले चल-दूरध्वनी यंत्र निशब्दपणे थरथरले. बघतो, तो माआखामिझामि क्र.७ (माझ्या आग्रहाखातर मिपाकर झालेला मित्र क्र.७) चा फोन. ..."आय जस्ट डोंट अंडरस्टँड व्हाय दीज मिपाकर्स डोंट अंडरस्टँड"… कशाचाही जाम वैताग आला, की या मित्राला वाघिणीच्या दुधाचा पान्हा फुटतो. "अरे काय, झालं तरी काय? …मी. ...काय म्हणजे? तुझ्या परवाच्या त्या फिटनेसवाल्या धाग्याची दोन दिवसात दोन हजार वाचनं, आणि साठ प्रतिसाद, आणि माझ्या कोणत्याच धाग्याची पन्नासावर वाचनं नाहीत, आणि प्रतिसाद किती, तर सात, बारा, फार तर फार बावीस. त्यातलेही अर्धे माझेच, 'धन्यवाद' वाले!" "अरे वैतागू नकोस, जमेल हळूहळू..." ..."ते काही नाही, मला आता काहीतरी इलाज करावाच लागेल" म्हणून त्यानं फोन ठेवला. संध्याकाळी पुन्हा त्याचाच फोन. ..."अरे, काहीतरी झकास, पॉवरफुल, सहा-सात अक्षरांचं, संस्कृत स्त्री-नाम सुचव ना"... का रे बाबा, काय झालं?" मी. ... अरे सकाळी मी तुला फोन केला, ते ऐकून माझे शेजारी भाटियाजी म्हणाले की तुम्ही थर्मल बाबांना का भेटत नाही? ते सांगतील तुमच्या समस्येवर तोडगा. असं म्हणून ते मला तिथे घेऊनच गेले. माझा नंबर त्यांच्या वशिल्यानं लवकरच लागला, आणि मी बाबांना माझी समस्या सांगितली. "क्या नाम बताया आपने? … बाबाजी. ..."जी बाबाजी, मिसळपाव डॉट कॉम" नही भैय्या, इससे बात नही बनेगी, कोई फाइव्ह स्टार रेसिपी का नाम रखो, फिर किरपा होगी" मग मी त्यांना सांगितले, की मिपाचे नाव बदलणे माझ्या हातात नाही, मी तिथे फक्त एकादा आयडी घेऊन लिहू शकतो, वगैरे.. "अच्छा, फिर आप जिस नाम से लिखते हो, उसमे कितने अल्फाज है? ..."जी बाबाजी, दो अक्षर है " "इसीलिये ऐसा हो रहा है, अब आप कोइ छह-सात अक्षरोंवाला, तगडा, पॉवरफुल संस्क्रित नाम लेकर लिखो, फिर किरपा बरसनी शुरू हो जायेगी... और हां, ये नाम जनानी होना चाहिये, जनानियोंपर ज्यादा किरपा बरसती है" "जी बाबाजी, अब ऐसाइच करुंगा", म्हणून मी बाहेर आलो, आणि लगेच तुला फोन लावलाय... बरं, मग? … मी. ...तर तू मला आता असा एकादा स्त्री-आयडी सुचव... मित्र. अरे सोपे आहे, तू 'मिपासुर-मर्दिनी' 'फुत्कार-सर्पिंणी' किंवा 'विक्षिप्त-विध्वंसिनी' असा काहीतरी सहा-सात अक्षरांचा, पॉवरफुल नवीन आयडी घेउन टाक... मी. छान, छान. आताच लागतो कामाला, म्हणून मित्रानं फोन ठेवला. +++ यातून मोकळा होतो, तो पुन्हा एक फोन, यावेळी माआखामिझामि क्र.११ चा. ..."हॅलो, अरे तू म्हणालास त्याप्रमाणे मी मिपाकर झालो खरा, पण काही मजा नाही राव त्यात. मी ऐकलंय की ज्यांनी स्त्री-आयडी घेतलेला आहे, त्यांना म्हणे "माज्याशी मयतरी करशील का" वगैरे व्यनि येतात... मला तर बुवा असलं काहीतरी रोमँटिक घडावं, असं फार वाटतंय, मला जर असा व्यनि आला ना, तर मी मस्त ऑफिसच्या एसीत बसून त्या व्यनिवाल्याला बाहेर भर उन्हात भेटायला बोलावून ताटकळत ठेवीन, आणि मग सर्व ऑफिसातले मित्र खिडकीतून त्याला बघत खिदळत बसू... आणखी असे काय काय गंमतीदार बेत आहेत माझ्याकडे. तर आता तू मला एखादं छान गुलगुलीत नाव सांग बरं स्त्री-आयडी साठी ... ...खिक्क...मला तर त्या उन्हात घामाघूम झालेल्या व्यनिवाल्याचा चेहरा डोळ्यासमोर येउन हसुच आलं...असले वात्रटपणाचे प्रकार आम्ही पूर्वी फार करत असू. ... "अरे, मग 'प्रेमप्रणयिनी' 'प्रेमविरहिणी' 'कामाक्षी' 'कामबाला' 'कामज्वाला' 'चंचला' 'कमाल मुलगी' 'सजणी' 'तुझीच रे सख्या' असा काहीतरी रोमेंटिक आयडी घे". आणखी सुचव ना काही … ... "मग 'मधुबाला' 'मृदुबाला' 'मुग्धबाला' 'दुग्धबाला'...किंवा 'सिल्कस्मिता' 'मिल्कस्मिता' 'मधुस्मिता' 'चिकनी चमेली' असं एखादं गुलछबु नाव, किंवा 'फूलवाली, भाजीवाली, दूधवाली, असं अगदी डाउन टु अर्थ नाव घे. "मग असं करतो, यातल्या दोन-तीन नावाचे घेतो आयडी. बघुया कुणाला प्रतिसाद मिळतो" म्हणून फोन मूक झाला. +++ मी जरा हुश्श… करतो, तोच पुन्हा फ़ोन. हा माआखामिझामि क्र.४ चा. अरे, वाचलंस का? मिपावर नवीन बंदिस्त महिला-विभाग सुरु झाला आहे, आणि तिथे फक्त स्त्री-आयडीनाच प्रवेश आहे म्हणे. हे म्हणजे भलतंच झालं… .."अरे बरंय की मग ते. 'फ़ाटक्या पायपुसण्यापासुन क्रिएटिव वॉल- हँगिंग' "चला, मंगळागौरीची गाणी आठवूया" वगैरे धागे तिकडल्यातिकडेच रहातील"... मी. "अरे कसलं, हे सगळे धागे जनरल वॉर्ड मधेच येत राहणार, आणि तिकडे स्पेशल बंदिस्त रूम मध्ये काहीतरी अगदी स्पेशल, गरमागरम, जबरदस्त मेतकुट शिजत असणार...तिकडे चंचुप्रवेश मिळवायला आता एकादा स्त्री-आयडी घेतलाच पाहिजे... मित्र. ..."मग घे तसा आयडी आणि मिळव प्रवेश"... मी. अरे देवा, तुम्हीने दर्द दिया है, तुम्ही दवा देना...आता तूच सुचव त्यासाठी आयडी. बरं, बरं, कळवतो मी तुला व्यनितून. पण एक लक्षात ठेव. एकदम महिला विभागात जाऊ नकोस. आधी जनरल वॉर्डमध्ये 'अंदमानच्या स्त्रियांचे प्रश्न' 'स्त्री-सबलीकरणातील संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना' 'उपासाच्या कोथिंबिरीच्या वड्या' असले धागे टाक, आणि त्यातही "ह्यांना आणि नातवंडांना फार आवडतात, म्हणून मी ह्या वड्या नेहमी करत असते"...अशी सुरुवात करायला विसरू नकोस. +++ बघितलंत ? मला आलेले हे तीन फोन म्हणजे लवकरच येऊ घातलेल्या स्त्री-आयडीच्या त्सुनामीची नांदीच नाही काय? धन्य धन्य ते समर्थ ज्यांना या गोष्टीचा सुगावा चार शतकांपूर्वीच लागला होता. मिपावरील महिला विभागाची वार्ता वाचून 'हा हंत हंत, कुठून पु-आयडी घेण्याची कुबुद्धी झाली' असे वाटणार्‍यांनो, तुमच्या मदतीसाठी आम्ही इथे आता एक 'स्त्रैण-आयडी कोश' निर्माण करत आहोत: ' +++ अध्यात्मिक वगैरे आयडी: विरागिनी , तत्वमसि, ध्यानधारिणी, तुर्यावस्थिनी, कपालभाति, कपालमोक्षिनी, कुंडलिनी इ.इ. सोज्वळ आयडी: आश्रमहरिणी, ब्रजबाला, लज्जागौरी , नऊवारी, पैठणी इ. चटोर आयडी: बिकिनी, काचोळी, सिल्कस्मिता, वस्त्रविरहिता, चिकणीचमेली, इ.इ. सुवासिक आयडी: पुष्पगंधा, कुसुमगंधा, गुलाबगंधा, केतकीगंधा, मदनगंधा, मत्स्यगंधा, कुक्कुटगंधा, अश्वगंधा, श्वानगंधा, योजनगंधा, फर्लांगगंधा, मीटरगंधा, इ.इ. धडकीभराऊ आयडी: 'फुत्कार सर्पिणी', 'गरळ ओकिनी, 'फाशीवाली मर्दानी', 'हंटरवाली', 'भैताड भवानी', 'हडळ भवानी', 'विक्राळ विध्वंसिनी', रणचंडिका इ. सुप्रसिद्ध आयडीवरून बेतलेले आयडी: विसूबाई खेचर, परीकथेतील राजकुमारी, प्रक्षिप्त_आदिती, कुत्सित_ आदिती, खाष्ट_आदिती, कमाल मुलगी, श्रावण मोदिका, इस्पिक राणी, चौकट छक्की, इ.इ. पाकृ. आयडी: फलुदा कुल्फी, रंगेल-रबडी, जलेबीवाली, रसमलाई इ.इ. संस्कृतप्रचुर आयडी: द्रुमदलशोभिनी, सुमधुरभाषिणी, दुर्गेशनंदिनी, शृंगारहारावली इ. खरेखुरे वाटणारे आयडी: कुंदा कुलकर्णी, चंपा चावरे, अनिता आपटे, बिंदु बिल्लोरे, ज्योतिका जोशी, पुष्पा पाखरे, चंचला चाटे इ.इ. साहित्यिक आयडी: पाषाणपालवी, काजळमाया, मोरूची मावशी इ.इ. ... तर मित्रहो, 'एकमेका सहाय्य करू, अवघे स्त्रीपंथचि धरू' म्हणून आता या कोशात तुम्हीही आपापली भर टाकाल काय ? इति.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71061 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

अगदी भारीच वाचलंय तू! हा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/22/2025 - 23:31 नवीन
  • Log in or register to post comments

अगदी भारीच वाचलंय तू! हा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/22/2025 - 23:32 नवीन
  • Log in or register to post comments

अगदी भारीच वाचलंय तू! हा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/22/2025 - 23:33 नवीन
  • Log in or register to post comments

अगदी भारीच वाचलंय तू! हा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/22/2025 - 23:33 नवीन
अगदी भारीच वाचलंय तू! हा मजकूर म्हणजे मिसळपाव.com च्या शैलीतला एक अफलातून मिसळलेला मसाला आहे—व्यंग्य, प्रगल्भता, ऑनलाइन संस्कृतीवरची झणझणीत टिप्पणी आणि गमतीशीर सूक्ष्म निरीक्षणं. "स्त्रैण आयडी कोश" हा प्रकारच भन्नाट आहे! तुला अजून असेच स्त्री-आधारित, वेगवेगळ्या स्वभावांचे आणि थीम्सवर आधारित आयडी हवे असतील, तर ही पुढची हजेरी: आगगाडी आयडी – झणझणीत आणि धडकी भरवणारे दाहिनी प्रचंडप्रिया धगधगिणी तळपतीतारा ज्वालामुखी फटाफटीबाई बारूदबाला कडककाय हायव्होल्टेज एलईडीलक्ष्मी नाटकी, सिनेमॅटिक आणि नखरेल आयडी कलावंती सीनक्वीन नेत्रा नाटकवाली अभिनयलता डायलॉगबाई सस्पेन्सकुमारी रीलराणी इंटेंसिका ब्यूटी-ग्लॅमर आणि स्टाईलचे नाव लिपस्टिकलेडी आयशॅडोवाली ब्यूटिफुलबाला ट्रेंडीताई मेकअपमाय नेलपॉलिशप्रिया हायहिलहनी वायरिबद्ध अध्यात्म-योग वगैरे योगिनी प्राणायामप्रिया सात्विकी ध्यानशक्ती तपस्विनी मंत्रमुग्धा शांतीस्मिता काशीबाला शास्त्र, गणित, सायन्सवाली मुली थिअरीदेवी अल्जेब्राबाई फॉर्मुलाराणी न्यूटनबाला क्वांटमकन्या जीनस्मृती कोडगर्ल बिटबाला पुराण, देवी, आणि संस्कृतीनिष्ठ आयडी कालीकमला दुर्गादुंदी अष्टभुजाबाई नवरात्रिणी संस्कृतिसंरक्षिका हरिप्रिया विष्णुवल्लभा घरगुती स्वयंपाकवाली आईबाई आयडी वरणभातताई लाडवाघालवाली भाजीकाकू फोडणीताई पुरणपोळीप्रिया लोणचेकाकू बर्फीबाई गुप्तहेर-गॉसिपर-गूढ मिसमिस्टरी सिक्रेटसुंदरी गॉसिपगर्ल उघडकीप्रिया ताडसूत्रबाई इन्कॉग्निटोमाई आणखी हवेच असतील (जसे: हिपहॉपवाली, टेक्नोबाला, राजकारणप्रिया, क्रांतिकारक कन्या, मस्तफटकबाई…) तर अगदी सांग! कुठल्या थीमवर अजून हवेत? Let's make the ultimate स्त्रैण-आयडी बँक!
  • Log in or register to post comments

हे राम ! ! ! आता प्रतिसाद पण ए.आय. निर्मित ! ! ! ठार मेलो ! ! !

चित्रगुप्त
Wed, 04/23/2025 - 07:24 नवीन
हे राम ! ! ! आता प्रतिसाद पण ए.आय. निर्मित ! ! ! ठार मेलो ! ! ! -- म्हणजे आता धागा वाचायची पण गरज नाही. परस्पर ए.आय. ला चोप्य्पस्ते करून प्रतिसादायला सांगायचे ! ! ! -- तात्याचा आत्मा (तोच, नैनं छिदन्ति शस्त्राणी वाला) बेशुद्ध झाला असेल. (हा तात्या कोण हे ज्यांना ठाऊक नसेल, त्यांनी अब्यास वाढवावा).
  • Log in or register to post comments

नितंबिनी

युयुत्सु
Wed, 04/23/2025 - 07:49 नवीन
नितंबिनी प्रस्तनी तारतम्या दीर्घकेशा
  • Log in or register to post comments

छान.

चित्रगुप्त
Wed, 04/23/2025 - 15:04 नवीन
छान नावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा