पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो..
बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे..
अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..!
अतिशय सुरेख गरमगरम पुर्या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?!
पुर्या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. पुर्यांसोबत खायला आलुमटर, आलूमेथी, छोले असे मोजकेच परंतु चवदार पदार्थ...
राईसप्लेटचीही व्यवस्था आहे. साधी राईसप्लेट मागवलीत तर साधारण ५० रुपायांमध्ये पोटभर जेवण होतं..गरमागरम ५ पुर्या, एक कोणतीतरी आपल्या आवडीची पातळ भाजी, चांगल्या तांदळाचा भात, सोबत कढी आणि वरण..अगदी ताजं आणि गरमागरम आणि मुख्य म्हणजे सोडा न मारलेलं जेवण असतं..!
दहीही अगदी मधूर असतं..
डीलक्स थाळी ७० रुपायांपर्यंत मिळते.
तुम्ही नुसती गरमगरम पुरीप्लेट मागवलीत तर सोबत तोंडी लावायला बटाट्याचा रस्सा फुकट..! - : )
हा काँप्लिमेटरी मिळणारा बटाट्याचा रस्साही चवीला अगदी सुरेख असतो.. साधी जिर्याची फोडणी..चवीपुरती मीठमिरची.. अगदी साधा असा हा रस्सा गरमागरम पुरीसोबत तुम्हाला खाता येईल..
तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम.. कधी कुठल्या पुरीला तेलाचा खराब वास आलाय किंवा कधी मैद्याची पुरी दिली गेल्ये असं मला तरी आजतागायत आठवत नाही..
त्याशिवाय मसालापुरी, भटुरे हे देखील पदार्थ अतिशय उत्तम मिळतात..
पंचमचा जगनसेठ.. (मी त्याला जगनसेठ म्हणतो.. त्याचं खरं नांव मला माहीत नाही.. ) जग्नसेठचे कुणी आजोबा की पणजोबा त्याकाळी मुंबैत आले आणि एका लाकडी फळीवजा टेबलावर रस्त्यावरच उभं राहून त्यांनी पुर्या तळण्याचा व्यवसाय सुरू केला..तो यज्ञ आजही अव्याहत सुरू आहे..फक्त अलीकडे दोनेक वर्षांपूर्वी काही दिवस पंचमपुरीचं दुकान नुतनिकरणाकरता बंद होतं..
आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी,
'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. "
असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल..
सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..!
असो...
तात्या.
आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..

आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
तुला़ काय अडच ण रे स्पावड्या?
जाव द्या ओ प्यारेकाका!!
मौ भात
मौ भात न मेतकुट खाणार्या
अच्छा अस आहे होय? म्हणुनच
(No subject)
बैलाचा डॉळाच फोडलात की हो
@बैलाचा डॉळाच फोडलात की हो>>>
काय हे !!
अच्छा अस आहे होय? म्हणुनच
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.......
धमुशेठच्या नरड्यात कॉफी
शॉर्ट कट
खराय. काळ मोठा कठीण आहे.
या ब्याट्या ला कोणी तरी आधी
एक सुधारणा सुचिवतो बगा फकस्त.
हाहाहा
ऑ....
कसली विनोदी प्रतिक्रिया
पुणेरी नान्या,
अन ते
खेडशिवापूरची भेळीचे दुकान्ं?
मुंबैकर
उस्मान....
्अरे अरे
पाणीपुरी
हे तातुडी, एक लेख "जिलबी"वर
तुम्ही
अग्गं म्माऽय!
पण
माझा प्रतिसाद हा उपरोध आहे हे
कळले हो
खासच दिसतोय
छन
अरेरे!
ठ्ठो
त्यांच्या पहिल्या नावाकडे पहा
बोरीबंदर..
जगनसेठचे व्यक्तीचित्र कधी येईल?
उतार्याखालचे व्याकरण:
हे आवडले...लई भारी !!!
सहजराव,
खेद आहे
सहजराव
वाह
लेख तात्या स्टाईल
सहमत
प्रयत्न तर करा
ह्याट्ट मर्दा!