Skip to main content

शेतकर्‍याची आत्मह्त्या (फाशी)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 03/04/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
आला सोसाट्याचा वारा गेले छ्प्पर ऊडुन। मातीच्या चार भिंती गेल्या पाण्यात बुडून॥ गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥ आली सरकारी फौज गेली पहाणी करुन। झालेले नुकसान म्हणे देऊया भरुन॥ पूर्ण झाले वर्ष एक नाही मदत पोह्चली। सावकाराच्या कर्जापाई त्याची कंबर खचली॥ झाला कर्जाचा डोंगर चिंता मनाला वाटली। खचले आत्मबळ त्याचे "फाशी" झाडाला घेतली॥
लेखनविषय:

वाचने 1936
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥
वाचून चर्रर्रर्रर्रर्रर्र झालं मनात.

कवितेतील आशय उत्तमपणे कवितेत उतरला आहे. पण शीर्षक काही पटलं नाही. म्हणजे माझ्या कवितेत शेतकरी आत्महत्त्या करतो हे वाचा अशा हेतूचे शीर्षक वाटले. पुढील कवितेसाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

:(

सुन्न!!