मिपाची काळी बाजू!
काही तासांपूर्वी अग्नेयैशान्येतील कुठल्या तरी संस्थळावर संपादकीय लिहिण्यास भाग पडलेल्या निवाशावर लेख होता. आज तसाच एक लेख मिपावर सापडला.
वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारे हे संस्थळ खरे तर नवोदित सदस्यांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेले आहे. ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का मिपावर उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपले संस्थळ आणि तिथली कंपुबाजी परवडली अशी त्यांची परवड होते.
अगदी उच्चपदस्थ परदेशी सदस्यही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते. मात्र स्थानिक कंपूबाज लोक ऐषारामात जगत असतात. संपादकांची तंबी, संपादन, अपमान वगैरे वाईट गोष्टीची त्यांना कुठलीही झळ लागत नाही. मिपावर प्रचंड कॉपी पेस्ट, वर्तमानपत्रातल्या बातम्या घेऊन मोठमोठे काथ्याकूट, भटकंत्या आणि अन्य चमकदार लेखनप्रकल्प सुरु केले पण त्यातले कित्येक बुडवले गेले आहेत. आंतरजालीय हलकटपणा, कंपूबाजीची झळ ह्या सगळ्या लेखनप्रकल्पांना लागली आहे. आणि किंमत ही ह्या नवोदितांना चुकवावी लागत आहे.
http://article.chinalawinfo.com/Article_Detail.asp?ArticleID=53426
लेखाची लांबी मोठी आहे पण अस्वस्थ करणारा लेख आहे.
निदान आपल्या ओळखीच्या कुणी ह्या सापळ्यात अडकू नये. खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्या संस्थळाविरुद्ध खटले भरले पाहिजेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हुम्म्म्म
खुप खुप दिवसांनी भयानक मजा
हो ना