Skip to main content

बिनपाण्याची.......

लेखक केदारविदिवेकर यांनी शनिवार, 23/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बिनपाण्याची होळी कशी खेळायची हो ?... कितीही काही झालं तरी पाणी लागणारच की !! मग एवढा गवगवा कशाला ? आधी कृतीत उतरवून दाखवा म्हणावं.. आले आहेत मोठे म्हणे 'waterless होळी'....बोळक्याचं ते नुसतं.. उचलली जीभ अन लावली टाळूला...त्या बापूला रोखून दाखवा आधी !! आहे का दमडीची हिम्मत आपल्यात ?..... अहो असेलही.. पण इथे वेळ का काय म्हणतात तो नाहीये कोणाला, असूनही वेळ नाही बिझी आहे, वेळच मिळत नाही अशी उत्तर आजकालच्या पिढीची... 'आपण भलं आपला काम बरं', बाकी गेले तेल लावत.... कसं सावरणार आपण यातून ? हा एक यक्ष प्रश्न आहे आपल्या समोर आज !! कितीसे उपाय आले यावर समाजाकडून पाणी वाचवण्यासाठी १. शरद रावांची आय. पी. एल.. बंद करा अशी सिंहगर्जना ऐकू आली.. २. बिनपाण्याची होळी करा असा संदेश (प्लीज समजावा मला, म्हणजे नेमकी कशी खेळायची ?)... ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. आहेत का उत्तरं ? त्वरा करा... जागा लवकर जागा... काळ झोपण्याआधी जागा.... -- के डी (केदार दिवेकर)

वाचने 2625
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

होळीची गाणी बघा.. ते गुलालाचे बॉम्ब वगैरे फोडा, गुलाल फासा. अगदीच गावरान करायची असेल तर चिखल, वार्निश आहे, तो वापरा..

मराठी माणसे होळी खेळत नाहीत.. त्या दिवशी होळी पेटवतात..बोंबा मारतात..पुरणपोळी करून खातात .. या सर्वा मध्ये पाणी कुठे खेळतात ??

In reply to by कपिलमुनी

सहमत! - (होळीला बोंबलायला आवडणारा) सोकाजी

In reply to by कपिलमुनी

+१११११११११११११११११११११११. मराठी होळीचा बर्‍याच जणांना विसरच पडलेला दिसतो आजकाल. (मराठी हुताशनीचा कट्टर समर्थक) बॅटमॅन.

पाणी कश्याला हवे आमच्या गावात बुआ धुळवड अशी साजरी करतात. ह्या वर्षी मी पण जाणार आहे , पाण्याशिवाय होळी खेळायला रंगात नाहून निघायला , पाण्यापेक्षा बियर समवेत होळी साजरी होणार. सगळ्यांना खुले आमंत्रण आहे ,