✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Gunjasa hai koi Iktara...!

प
प्राजक्ता.. यांनी
Mon, 03/18/2013 - 18:29  ·  लेख
लेख
रविवारचा दिवस आणि सकाळी ७ ची वेळ ..एरवी capacity पेक्षा हि जास्त लोकांना सामावून घेणारा रेल्वे चा डबा आज तेवढाच रिकामा होता..दररोज २ इंच सुद्धा पाय मागे पुढे करता न येणाऱ्या ठिकाणी आज चक्क कुणीही उभे नव्हते ..एरवी reservation च्या डब्यात ही Illegally चढणारे तर नाहीच पण चक्क काही seats ही रिकामे होते . दररोज up -down करणार्यांच्या सुट्टी मुळे त्या निर्जीव entity ला ही थोडा relief मिळाला असावा .. मोठ्या अथक प्रयत्नानंतर execute होणाऱ्या मुंबई प्लान चा entry point - सुटता सुटता पकडलेली Deccan Queen .. :-) ट्रेनच्या प्रवासात काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात हा अनुभव ह्या वेळी मला आला .. जसे कि २० पानांचा newspaper आपण संपूर्ण पणे वाचून काढू शकतो अगदी worldwide news पासून तर छोट्या छोट्या sales /services च्या जाहिरातींपर्यंत ..दुसरं म्हणजे आजू बाजूच्या लोकांचं निरीक्षण ..आणि तिसरं असं कि headphones कानात टाकून निवांत झोपू शकतो ..पण सुदैवाने (for a change) तिसरा option ह्या वेळी माझ्या वाटयास आला नाही .. Train सुरु होताच पुढच्या दहा मिनिटांत breakfast चा मेनू ओरडत , हातात कागद पेन घेऊन एक माणूस आला . समोरच्या seats वर बसलेल्या २ पुणेरी बायकांनी अगदी मेनूत असलेले सगळे options order केलेत Toast ,Bread omelet, वडा पाव etc .. ट्रेन मधील food न खायचं ठरवल्याने आम्ही काही order केली नाही .. गप्पांसोबत च newspaper वाचणं चालू होत .. अर्ध्या बातम्या तर rape cases आणि crimes वर होत्या ..पेपर बाजूला ठेवावं म्हटलं तेवढ्यात, कानातले आणि इतर बायकी छोट सामान विकणारा आला ..ताई सोबत असल्याने त्यात मला ही डोक घालणं साहजिक होतं आणि depressing news वाचण्यापेक्षा तो time pass फार better होता .."कोणताही जोड घ्या १० रुपये.." तो आम्ही किंमत न विचारताच, स्वत:हून म्हणाला .. ३-४ pair खरेदी केल्यानंतर सहजंच मी rates च comparison केलं म्हणजे same type ची कानातली मी जळगावला ५ रु जोड आणि FC रोडला २५-३५ रु जोड प्रमाणे पहिली होती .. तो salesman पुढे जाऊ लागल्यावर समोरच्या बाईंपैकी एकीने त्याला "शुक शुक.." शब्द नाही तर आवाज काढत त्याला हाक मारली ..बाहेरून सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या लोकांच्या अशा 'असभ्य ' हरकती बघितल्या वर कळून चुकतं कि 'का आपला देश manners /etiquette ह्या बाबतीत मागे असावा ? ' , 'का 'समानते' सारख्या terms फक्त पुस्तकीच वाटतात?' ..प्रसंग छोटासाच पण जसा "One cause of many problems " statement, satisfy करणारा .असो . एक विशेष गोष्ट म्हणजे मी स्वत:हून माझं cell phone switched off केलं आणि पुन्हा पेपर वाचायला घेतला ..काही चांगले लेख हि होते.. Govt वर्षाकाठी Indian Rail वर हजारो कोटी खर्च करणार ह्या वर editorial होतं .. त्यात इंग्रजांच्या काळात अगदी राजेशाही पद्धतीने food service उपलब्ध असलेल्या Calcutta Mail आणि Deccan Queen चं फार कौतुक केलेलं होतं .आणि त्याच सोबत सध्याची परिस्थिती compare केलेली होती..महत्वाचा मुद्दा असा होता कि , जर सरकार एवढा खर्च रेल्वे वर करणार आहे तर त्याचं proper utilization व्हावं आणि प्रवाश्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दयाव्यात . त्यावर लगेच टिपणी होती की ,फक्त पैसा खर्च करून उपयोग नाही तर Administration ,Check and Quality Control असावा; अन्यथा पैसा वाया जाणार . खरंय ,According to wikipedia content दररोज जवळपास १०,००० रेल्वे देशभरात धावतात, २४ दशलक्ष लोक रोज रेल्वेचा प्रवास करतात आणि २.८ दशलक्ष टन्स मालवाहतूक होते ती वेगळी ..एवढ्या सगळ्या गोष्टीं fluently चालण्यासाठी १.४ दशलक्ष लोक Indian Railway Services मध्ये काम करतात . एवढा मोठा पसारा शिस्तीत manage करण्यासाठी कडक Administration हवंच .. दरवर्षी हजारो candidates , MBA च्या degree सोबत लोखोंची packages घेऊन private सेक्टर मध्ये किंवा देशाबाहेर नोकरीस जातात . Indian Railway Services मध्ये उच्च पदावर नोकरी पत्करली आणि त्यांना ज्ञात असलेले Classic Management Fundas इथे apply केलेत तर आपण २४ दशलक्ष लोकांना World Class Services provide करण्यापासून वंचित राहणार नाही .जसे की Pantry प्रमाणे एक डबा shops चा असेल .. म्हणजे पुढील station ची वाट न बघता गरजेच्या वस्तू Passengers ना railway तच मिळतील . Medical Services देखील long journey च्या trains मध्ये उपलब्ध असतील. आपल्या देशात कोणतंही Administration आणि Development क्षेत्र घेतलं तरी पहिला मुद्दा "problem " च्या रुपात येतो तो-- "Population" चा! आणि Govt. ची नोकरी रटाळ आणि पैसा कमी म्हणून 'bright students' इकडे वळत नाहीत , पण त्यांनी ह्यात शिरून तेच काम challenging आणि innovative पद्धतीने केलं तर personal आणि social दोन्ही फायदे होतील .पुढे जाऊन system मध्ये बदल आणून ते पुढील पिढी साठी हे jobs well paid आणि Interesting बनवता येतील. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे...असो, विषय भरकटण्याच्या आत पुढे सरकते .. थोड्या वेळाने परत एक salesman मोठ -मोठ्याने ओरडत आला ; "१० रु.मे २ , देखने के लिये पैसे नही .." . त्याचं बोलणं लक्ष वेधाण्यासारखं होतं ( पोटाची गरज भागवण्यासाठी जेव्हा एखादा 'अशिक्षित ' कोणतही छोटं - मोठं साधन अवलंबवतो तेव्हा असली वाक्य 'आतून' च येत असावी , त्यासाठी MBA च्या degree ची आवश्यकता नाही ..) तरीही मी विशेष attention दिलं नाही पण समोरची बाई माझ्यासाठी 'model under observation' बनली होती .. ह्या वेळी देखील तिने त्याला त्याच पद्धतीने हाक मारली आणि वस्तू खरेदी केली .. बायका आणि shopping वरून उगीचच नाही लिहिलं जातं .. :-D पुढे दादर ला उतरल्यावर कांदिवली पर्यंत local चा प्रवास adventurous होता . रविवार असल्याने तशी गर्दी कमी होती . काही कारण नसताना मुंबई ची craze असणाऱ्या मला local नि pass होणारं एक एक स्टेशनचं नाव ही fascinating वाटत होतं .. आत जागा असतांनाही hero गिरी करत मुलं दारात उभे राहतात हे थोडं वेडपट वाटलं. 'गोराई'.वरून Essel World साठी बोटी सुटतात . रस्त्यापासून बोट board करण्यासाठी १०० एक मीटर चा pathway आहे . दोन्ही बाजूंना मासे , खेकडे विकणारे बसलेले असतात . माश्यांच्या वासाने स्वत:च्या नाकाचा बचाव करत पटपट चालत असताना देखील पाण्याबाहेर वळवळ करणारा जिवंत खेकडा बघण्याचा chance मी सोडला नाही . बोटीतून जात असताना संथ पाण्यात अचानक च वर येउन परत पाण्यात शिरणाऱ्या माशांकडे लक्ष गेल्यावाचून राहत नाही. पुढे आत गेल्यावर भन्नाट मजा आली ...३६० degree फिरणारा पाळणा जेव्हा १८० ला जाऊन काही सेकंद थांबतो तेव्हा 'आपल्याला आपला जीव किती प्यारा आहे ', जाणीव होते . परतीच्या वेळी pathway वरचे सगळे मच्छीवाले निघून गेले होते .. खराब किंवा उरलेले garbage रस्त्याच्या कडेला कुठे कुठे फेकलेले होते .प्रचंड नाका -डोक्यात जाणारा वास त्याची साक्ष होता . दिवसाच्या शेवटी परत निघतांना marine drive ला जाणं possible न झाल्याने थोडा मूड off होता ,fast local असल्याने अगदी लिमिटेड stations ना train थांबत होती ; तेवढ्यात मागून "परदेसी परदेसी जाना नही .." गाण्याचा आवाज आला ; आवाजावरून कुणी मुलगी असावी, कळून येत होतं., उत्सुकतेने मी वळून मागे पाहिलं तर एक १०-१२ वर्ष वयाची मुलगी होती..चेहऱ्याने दिसायला ठीक-ठाक पण ,पण केस विस्कटलेले ; अंगावर फाटके कपडे आणि हातात बरंच काही सामान..तिच्या एकंदरीत पेहराव ती भिकारी असल्याची कबुली देत होता . संगीताच्या कोणत्याही criteria satisfy न करणाऱ्या तिच्या गाण्यात "हीच माझी duty आहे आणि ती केल्यावर माझं काम पैसे गोळा करणं असं आहे ", हा attitude मात्र स्पष्टपणे दिसून येत होता . समोर कोण लोकं आहेत वगैरे गोष्टी तिच्या खिजगिणतीत हि नसाव्यात ..गाणं संपल्यावर तिने पैश्यांसाठी हात पुढे केला , मी विचारांत असल्याने हातात आलेले सुट्टेच फक्त ठेवले,त्या कोवळ्या हातावर ..! आजूबाजूच्या सर्वच लोकांनी तिला झिडकारलं .पुढच्या स्टेशनला ती उतरली तेव्हा " बड़ा है कोई छोटा, नहीं मायूस लौटा । अमीरों का सहारा, गरीबो का गुजारा ।" हे तिचे बोल कानावर आले ..त्याच station ला उतरायचं हे तिला कुणी शिकवलं होतं कि, मग इतरांच्या अशा वागणुकीमुळे ती उतरली असणार ...? ती तश्या अवस्थेत खुश होती की, इतरांचा हेवा वाटत असावा तिला..? 'चांगल्याच्या' definition पासून अगदीच अज्ञात असावी की, माहित असावं आपण काय आहोत ते...? मनात आलं , आपण नशीबवान आहोत चांगले पालक , चांगली नोकरी , चांगले कपडे , अत्याधुनिक सूखसिविधा ही हाकेच्या अंतरावर ..पण मग त्या मुलीसारख्या अनेकांचं काय ..? एवढयाशा जीवाला काय काळात असावी -- दुनियादारी..,श्रीमंती आणि गरिबी ..?? अनेक प्रश्न निरुत्तरित राहिलेत..अजूनही आहेत .. अशा वेळी पैशाचं महत्व फार प्रकर्षाने जाणवतं. भ्रष्टाचारात गुंतलेल्या १०% रकमेत ही संपूर्ण देशातल्या भिकार्यांची पोटं भरतील आजच्या स्थितीला..हे गणित समजण्यास कठीण नाही . "Population आणि Awareness " मुद्द्यावर येउन विचारांची गाडी थांबली आणि लोकल देखील ..!!! दादर ला उतरल्यावर शिवनेरीचं स्थानक शोधून १ तास वेळ रिकामा होता , स्टेशन वर बूट पॉलिश करण्यासाठी लोक पायातून तो काढून का देत नाही ..? कुणी आपल्या हातासमोर पाय धरून उभा आहे ,किती छोटेपणाची feeling येत असावी ..? पण लगेचच बूट पॉलिश करणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून बरं वाटलं . तरीही उच्च-नीच भेद मिटवण्यासाठी आपण हून अशा लोकांना आदराने वागवणं मला अधिक महत्वाचं वाटतं .. पुढे दादर ला करोडो किंमती असलेल्या flats पैकी आपला हि एक असावा असा हेवा वाटला ..street food पुण्यापेक्षा छान वाटलं आणि स्वस्त पण . " कोणतंही काम छोटं नसतं ", हे मुंबई च्या छोट्या व्यवसायिकांकडून शिकण्यासारखं आहे ., पुण्यातल्या लोकांप्रमाणे त्यांच्यात so-called " माज / extra चा अभिमान " दिसून येत नाही .. शिवनेरी स्थानकावरची वातानुकुलित प्रतीक्षा घर मुंबई च्या गरमीत फार आरामदायी वाटलं ..परतीचा प्रवास सुरु झाला.. पुढील वेळी marine drive for sure म्हणत .. कानात headphones टाकले आणि "Gunjasa hai koi iktara" ऐकत बाहेरची रोषणाई बघण्यात मन गुंग झालं .. एव्हाना फोन on झालं होतं ....! -प्राजक्ता...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
11771 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

आयला प्यारे त्यापेक्षा तुमचा

मृत्युन्जय
गुरुवार, 03/21/2013 - 16:35 नवीन
आयला प्यारे त्यापेक्षा तुमचा पुढचा आयडी काय असेल ते विचार की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो प्राजक्ता बाई, मिसळपावचं

नानबा
Mon, 03/25/2013 - 15:12 नवीन
अहो प्राजक्ता बाई, मिसळपावचं धोरणच मुळात "मराठी अंतरंग, मराठी अभिव्यक्ती" असं आहे. मग लोकांनी मराठीला जास्त महत्व दिलं तर यात त्यांचं काय चुकलं? की आता सगळ्यांनी मिपाला सुद्धा इंग्रजाळलेल्या मराठीने नासवून टाकायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजक्ता..

जर हा लेख डु-आयडी ने लिहिला असेल तर...

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/21/2013 - 16:47 नवीन
ए आता बस ना राव.. मजा गेली.. आणि नसेल तर.. ताई / दादा (आजकाल काळजी घ्यावी लगते फार...) तुम्ही मराठी आहात.. म्हणजे जेवढे इंग्रजी शब्द तुम्ही वापरले आहेत त्याचे बहुतांश मराठी प्रतिशब्द तुम्हाला माहिती असणार.. मग तुम्ही ते का नाही वापरत? मराठी माणुस असे करु लागला तर मग मराठी भाषेला काय किंमत राहणारे? तुम्ही अशुद्ध.. चुकीचे व्याकरण असलेले पण लिहिलं असतं ना तरी लोकांनी कौतुकच केलं असतं.. पण मराठी संस्थळावर येऊन इतकं इंग्रजाळलेलं लिहीता आणि वर तिकडे दुर्लक्ष करुन लोकांनी तुमच्या "विचारांचे" कौतुक करावे अशी अपेक्षा ठेवता? तुम्हाला तरी हे योग्य वाटते का? अशी भाषा दुर्लक्षुन चालत नसतं.. तिच्या मुळेच तुम्ही तुमचे "विचार" मांडु शकलात ना?
  • Log in or register to post comments

वेगळा दॄष्टिकोन

तुषार काळभोर
गुरुवार, 03/21/2013 - 17:12 नवीन
हा लेख वाचल्यावर माझ्याही कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. पण नंतर जेव्हा त्याविषयी विचार करत होतो, तेव्हा उगाच असे वाटले की, लेखिकेने मुद्दाम पात्रांमधील व स्वतःमधील सामाजिक अंतर अधोरेखित करण्यासाठी अशी भाषा वापरली असावी. म्हणजे लेखिकेला भेटणारी सर्व पात्रं ही समाजाच्या सर्वात खालच्या थरातीला आहेत. उदा. रेल्वेतला विक्रेता, मासेविक्रेते आणि शेवटी ती गाणी गाऊन पैसे मागणारी मुलगी. तर लेखिका ही उच्चभ्रू, इंग्रजीवर प्रभुत्व असणारी (किंवा इंग्रजीचं तिच्यावर प्रभुत्व असणारी), एक्सेल वर्ल्ड वगैरे मध्ये जाणारी, डेक्कन क्वीनच्या खानपान सेवेला नाकं मुरडणारी, विविध क्षेत्रांमध्ये (उदा. रेल्वे)कशा सुधारणा व्हायला हव्यात हे सुचवणारी, इत्यादी आहे. हा जीवनशैलीतील परस्परविरोध अधोरेखित करण्यासाठी लेखिकेने अशी भाषा वापरली असावी. बाकी चालू द्या...
  • Log in or register to post comments

तत्वतः असे म्हण्ण्यात अडचण

बॅटमॅन
गुरुवार, 03/21/2013 - 17:14 नवीन
तत्वतः असे म्हण्ण्यात अडचण दिसत नसली तरी लेखिकेस स्वतःला तसे म्हणायचे होते काय याबद्दल खुद्द लेखिकेकडूनच काही स्पष्टीकरण आल्यास आवडेल. अन्यथा बेनेफिट ऑफ डौट अनाठायी तर जाणार नै ना अशी आपली एक शंका आली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

काय म्हणालात?

अभ्या..
गुरुवार, 03/21/2013 - 17:19 नवीन
एक्सेल वर्ल्ड
पैलवानबुवा, एस्सेल वर्ल्ड म्हणा नायतर एक्सेल वर्ड तरी म्हणा. ;) प्राजक्तातैना सगळे म्हाईत आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

स्लीप ऑफ टोन्ग्यु....

तुषार काळभोर
गुरुवार, 03/21/2013 - 17:36 नवीन
त्याचं काये नं ... आताच मोदकबुआंचं एक्सेल वाचून आलो होतो...म्हणुन जरा माझी tongue slip झाली. रच्याकने.. एक शब्द इंग्लिश आन् एक मराठीत टाईपनं लई औघड है..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुरेख रीतीने भावना व्यक्त

अधिराज
गुरुवार, 03/21/2013 - 18:39 नवीन
सुरेख रीतीने भावना व्यक्त केल्या आहेत या लेखात. By the Way, तुमची mother tongue कोणती हो ताई?
  • Log in or register to post comments

हम्म.. कोणतीही भाषा वापरली

नाना चेंगट
गुरुवार, 03/21/2013 - 19:26 नवीन
हम्म.. कोणतीही भाषा वापरली तरी संपादक लक्ष देत नाहीत हेच खरं
  • Log in or register to post comments

आँ?

पैसा
Sat, 03/23/2013 - 21:06 नवीन
म्हणजे हे article तुम्ही लिहिलंत की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

मिपा करांनो विंग्रजी येत नसेल तर ....

jaypal
Fri, 03/22/2013 - 22:13 नवीन
फिकर नाट. आमच्या सोकाजीरावांकडे त्याच औशध आहे. ३० मिनीटात फाडफाड ईंग्रजी. :-)
  • Log in or register to post comments

फक्त अं! (किंवा भावना दुखावू नयेत म्हणून "हे राऽऽम")

धमाल मुलगा
Sun, 03/24/2013 - 07:22 नवीन
आयशपथ सांगतो, आख्खा लेख वाचला. हो हो..आख्खा! मग मला प्रश्न पडला की च्यायला मी नेमका मिपावरच आलोय ना? कारण मिपाचं ब्रिदवाक्य काय? तर "मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती" .. मिसळपाव डॉट कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे. सदरहू लेख वाचताना नक्की कळेना की मी मराठी अभिव्यक्तीसाठी जन्माला आलेल्या अस्सल मराठी संकेतस्थळावर आलोय की की फेसबुक/ऑरकुटाच्या कुठल्या तद्दत धेडगुजरी चिंधोट्या पानावर आलोय. अरे, मराठीत लिहायचंय, मत्/विचार मांडांयचेत तर मिपावर यावं, एव्हढं इंग्रजी फिस्कटायचंय तर अनादर सबकॉन्टिनेट पडलंय की उताणं. बरं, सदरहू लेखाची लेखिकेचं म्हणणं काय तर म्हणे, "लब्जों में क्या रख्खा है, भावनाओं को समझो" आयला, लेख वाचल्यानंतर डोक्यात उभी राहिलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे, ह्या लेखाची लेखिका "सेंट अ‍ॅन्ड्यु'ज किंवा सेंट हेलिना'ज" सारख्या तत्सम मिशनरी शाळेतली यत्ता सहावी मध्ये शिकत असावी, अन नुकतीच तिच्या शाळेची सहल एस्सेल वर्ल्डला जाऊन आली असावी. त्याचसंबंधीचा हा निबंध, "यु नो, विथ राज ठाकरे, इव्हन आय ऑल्सो सपोर्ट्स मराठी' पठडीतून चुकून माकून मायमराठीत लिहिण्याच्या प्रयत्न असावा असं वाटायला लागलंय. (वाटायला काय जातंय हो, ना पाटा माझ्या मालकीचा, ना वरवंटा!) बाकी, प्राजक्ताबाईंचा भाषेविषयीचा अ-लवचिकतापुर्ण नूर पाहता त्यांच्याआधी मिपाचे सदस्य झालेले एकूणएक २२०१२ (अक्षरी:बावीस हजार बारा ) सदस्य एक नंबरचे बिनडोक असावेत म्हणून ते फेसबुक, ट्विटर, ऑरकुट आणि तत्सम काय काय 'ग्लोबल एक्सपोजर' असणार्‍या सायटी सोडून इथं मराठीत आपली मतं मांडायला झक मारत आलं असं वाटायला लागलंय. असो! कालाय तस्मै नमः! एकतर माझे माझेच विचार चुकतायत, किंवा मी आता पक्का म्हातारा तरी झालोय. :D
  • Log in or register to post comments

दोन्हीही बरोबर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/24/2013 - 09:48 नवीन
>>> एकतर माझे माझेच विचार चुकतायत, आपले विचार चुकत आहेत. आपण खंडोबाच्या यात्रेत भेटलो होतो तेव्हा आपलं काय ठरलं होतं की लिहिणार्‍याला प्रोत्साहान द्यायचं आणि एखादा चूकत असेल तर थेट टीका न करता व्य.नि.किंवा खरड करायची, विसरला वाटतं. >>> किंवा मी आता पक्का म्हातारा तरी झालोय. माणूस तरुण तरी किती वर्ष राहू शकतो. ;) (पळा आता) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ठ्या!!!

धमाल मुलगा
Sun, 03/24/2013 - 10:08 नवीन
मेलो तिच्यायला! आय माय स्वारी गुर्जी! बरं झालं आठवण करुन दिलीत. बेलभंडारा उचललेला त्याची यादच नाही राहिली. ;) पण आपण सहिष्णू आहेत हे जरी खरं असलं तरी सहनशक्तीची काही सीमा तरी असली पाहिजे की नाही? भाचुत, आपण सगळ्यांनी 'मोकलाया दाहि दिशा' स्विकारलं...अगदी जिंदादिलीनं स्विकारलं! पण इथं मुजोरपणा नडतोय हो. म्हणोन. बाकी, अजवर आपण कुण्या नवख्याला कधी टोचलंय? :) म्हातारपणाविषयी नि:संशय सहमत! अमरपट्टा घेऊन आलंयच कोण? :) आमचे गुर्देव दादा कोंडके म्हणायचे, : हैस तरुन तोवर घ्ये करुन" तोच प्रयत्न चाललाय म्हना की. आजून गडबड उडतिय खरं, पण घिऊ की सांभाळून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/24/2013 - 10:17 नवीन
>>>> आपण सहिष्णू आहेत हे जरी खरं असलं तरी सहनशक्तीची काही सीमा तरी असली पाहिजे की नाही? भाचुत, आपण सगळ्यांनी 'मोकलाया दाहि दिशा' स्विकारलं...अगदी जिंदादिलीनं स्विकारलं! पण इथं मुजोरपणा नडतोय हो. म्हणोन. बाकी, अजवर आपण कुण्या नवख्याला कधी टोचलंय? स्सही रे स्सही. -दिलीप बिरुटे (धमाल मुलाच्या जिंदादिलीचा फ्यान असलेला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

तुम्हा दोघांमुळेच

इरसाल
Mon, 03/25/2013 - 09:11 नवीन
हिंदु धर्म तर राहीला नाही वर नव्या* सदस्याला चार शांत क्षण जगु देवु नका तुम्ही .......काय्य ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लेखापेक्षा त्यावरच्या

नानबा
Sun, 03/24/2013 - 09:43 नवीन
लेखापेक्षा त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून ह.ह.पु. :)) :)) लेख उत्तम, पण प्रांजळ(इंग्रजीत फ्रँकली कि काय ते) मत, की इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी शब्द वापरले असते तर जास्त मजा आली असती.. असो.. लेखिका बॉम्बे स्कॉटिश किंवा तत्सम फाडफाड इंग्लिश फाडणार्‍या शाळेत शिकलेल्या असाव्यात...
  • Log in or register to post comments

त्या

तिमा
Sun, 03/24/2013 - 17:37 नवीन
कवियत्री प्राजुताई वायल्या का ? क्षणभर गोंधळ झाला.
  • Log in or register to post comments

हो, हो प्राजू वेगळी.

यशोधरा
Sun, 03/24/2013 - 17:41 नवीन
हो, हो प्राजू वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

प्रांजळ मत

तुमचा अभिषेक
Sun, 03/24/2013 - 18:44 नवीन
जर ईंग्लिश शब्द रोमन लिपित न लिहिता देवनागरी लिपित लिहिले असते तर कदाचित तितकेसे जाणवलेही नसते. मुंबईकरांना तरी नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

असले लेख यायला लागले तर

५० फक्त
Mon, 03/25/2013 - 09:02 नवीन
असले लेख यायला लागले तर मिपाचं मुक्तपीठ व्हायला वेळ लागणार नाही, मा. संपादक मंडळ ' म्हातारी मेल्याचं दुखः नाही, काळ सोकावतो आह' थोडं लक्ष घालावं ही नम्र विनंती लुनावाले ब्रम्हे....
  • Log in or register to post comments

हा हा.

दादा कोंडके
Mon, 03/25/2013 - 13:44 नवीन
असले लेख यायला लागले तर मिपाचं मुक्तपीठ व्हायला वेळ लागणार नाही
मुक्तपीठ नाही हो. मुतपीठ. :) -भटासी भट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

Exactly

प्रसाद गोडबोले
Mon, 03/25/2013 - 14:51 नवीन
हेच म्हणतो ! वैसे लेख मैने वाच्याच नै , और वाचता तोभी प्रतिसाद हाच देत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

च्यामारी

अद्द्या
Mon, 03/25/2013 - 13:38 नवीन
च्यामारी आम्ही इथे मराठी चांगलं नाही म्हणून लिहित नाही आणि हे . . असो . . काही विषय नवता . वाटलं तरी नाही बाकी गाणं चांगलं आहे ते
  • Log in or register to post comments

:)

छोटा डॉन
Mon, 03/25/2013 - 14:20 नवीन
लेख खरोखर ओके ओके (ठिकठाक हा पर्यायी शब्द आहे पण तो थोडासा अतिरंजित वाटतो, म्हणजे असं की मोजपट्टीवर ठिकठाकपेक्षा थोडासा वारचाच आहे, अगदी अचूक पर्यायी मराठी शब्द तूर्तास सुचत नाही, असो) आहे. बहुसंख्य प्रतिसाद हे इंग्रजीच्या अतिवापराबद्दल आहेत, बहुसंख्य वेळी आपण ज्या भाषेत विचार करतो तीच भाषा कागदावर किंवा बोलण्यातुन अगदी सुलभतेने येते, त्यात अपराधी वाटण्यासारखे खास सिरियस असे काही नाही, चलता है. मात्र हे प्रतिसाद आपण सकारात्मक दृष्टीने घेऊन पुढील लेखात योग्य तो बदल दाखवल्यास परस्पर फिट्टंफाट होईल, कसे ! पुलेशु ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

यापेक्षा त्या कंजुष

शिल्पा ब
Mon, 03/25/2013 - 22:37 नवीन
यापेक्षा त्या कंजुष आजोबांच्या भटकंतीचे लेख बरे !
  • Log in or register to post comments

असाच उचक पाचक करत असतांना राज

निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/28/2013 - 18:42 नवीन
असाच उचक पाचक करत असतांना राज कुमारांच्या खरड वहीत पोहोचलो तेथे एका धाग्यावर त्यांना आमंत्रण धाडण्यात आले होते , व लिंक दिली होती. मी पूर्वाश्रमीच्या अनुभवाने ह्या धाग्यापेक्षा प्रतिसाद वाचणे मस्ट म्हणजे must आहे अशी खात्री झाली , व धागा न वाचता पहिले प्रतिसाद वाचले , अपेक्षा भंग झाला नाही , मिपाकरांच्या मिपावर लेखन करतांना असणार्‍या अपेक्षा रास्तच आहेत , लेखिकेने त्यावर निर्णय घेऊन आपले लिखाण करण्याचा तिचा हक्क सुद्धा रास्तच आहे , लक्षवेधी पदार्पण एवढेच ह्या लेखा विषयी मी मत व्यक्त करतो लेखिकेने तिच्या लेखनाच्या शैलीचा तिचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे , आता त्यांचे प्रतिसाद तिच्या लेखनावर तिने जर तिची लेखनाची शैली बदलली नाही तर गृहीत धरावेत ,
  • Log in or register to post comments

कॉलिन्ग प्यारे१.

कवितानागेश
Fri, 03/29/2013 - 00:47 नवीन
कॉलिन्ग प्यारे१. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा