कोस्टर्स

जयवी's picture
जयवी in कलादालन
11 Mar 2013 - 1:03 pm

नेटवर ही दोन अगदी वेगळी डिझाईन्स मिळाली. ह्या लिंक्सवर

http://idealdelusions.blogspot.com/p/kitchen-kolors-trivet.html

आणि

http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...

झाल्यावर इथे शेअर केल्याशिवाय राहवेना ;)

Trivet

C1

C2

C3

C4

कला

प्रतिक्रिया

धनुअमिता's picture

11 Mar 2013 - 1:38 pm | धनुअमिता

खुप छान

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2013 - 2:39 pm | सानिकास्वप्निल

रंगसंगती पण मस्तं :)

अक्षया's picture

11 Mar 2013 - 3:09 pm | अक्षया

सुंदर :)

प्रभाकर पेठकर's picture

11 Mar 2013 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर

कोस्टर्सची छायाचित्रे, रंगसंगती आणि नक्षी इ. अतिशय सुंदर आहे परंतू छायाचित्रांचा आकार प्रमाणात ठेवला असता, विशेषतः छायाचित्र क्रमांक ३ आणि ४, तर अधिक योग्य वाटले असते. छायाचित्रे बाजूच्या, सदस्य नामावलीत आणि इतर सदरांत आक्रमण करीत आहेत. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) अतिशय सुंदर/रुबाबदार असावी पण त्या व्यक्तीस एखादे, डोळ्यात भरणारे, व्यंग असावे असे वाटते आहे.

जयवी's picture

11 Mar 2013 - 4:55 pm | जयवी

पेठकर काका.......अहो तो माझा नेहेमीचा त्रासदायक प्रॉब्लेम झालाय.......... ते कसं दुरुस्त करायचं हे माहिती नाहीये. हे असं का होतं ते पण माहिती नाही :(

घ्या जयवीताई मी फोटोजचा साइझ व्यवस्थीत केलाय.
अन हो हे कोस्टर्स अगदी सुरेख झालेत. मी म्हणेन तुम्ही छॉट्या स्केलवर विकत जा हे अस काही केलेलं.

तहे दिल से शुक्रिया अपर्णा :)
पण हे कसं टाळता येईल.....सांग ना मला.

अपर्णा खरं तर तू माझ्या खरडवहीत हे सगळं आधीच लिहून कळवलं आहेस. मी आधी फ्लीकर वापरायचे पण आता पिकासा वापरतेय त्यामुळे ते साईझ चं डोक्यात आलंच नाही. बहुतेक यापुढे असा प्रॉब्लेम होणार नाही.......धन्यु :)

इन्दुसुता's picture

12 Mar 2013 - 6:19 am | इन्दुसुता

नेहमी प्रमाणेच उत्तम. अर्थातच लवकरच करून बघण्यात येईल. :)

रश्मि दाते's picture

12 Mar 2013 - 8:16 am | रश्मि दाते

........

मदनबाण's picture

12 Mar 2013 - 8:29 am | मदनबाण

लयं भारी ! :)

पैसा's picture

12 Mar 2013 - 7:37 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

अनन्न्या's picture

12 Mar 2013 - 8:26 pm | अनन्न्या

मी कॉलेज करत असताना असे छोटे स्वेटर सेट, तोरणे, रूमाल अशा अनेक गोष्टी करून विकत असे, अर्थात गरज म्हणून!! खूपच हातभार मिळाला त्या पैशांचा! अपर्णाताईने ह्या गोष्टी विकण्याचा सल्ला दिल्यावर सहज आठवले. आता मी ज्या गोष्टी तयार करते त्या सर्व भेट म्हणून दिल्यात अनेकांना!

जयवी's picture

12 Mar 2013 - 8:53 pm | जयवी

मनापासून धन्यवाद :)
अपर्णा मला का कोण जाणे विकायला आवडत नाही. भेट म्हणून द्यायला जास्त आवडतं :)

स्पंदना's picture

13 Mar 2013 - 5:54 am | स्पंदना

विकण्यामुळे काय होइल की घेणार्‍याला चॉइस राहिल, खुप आवडीने घेतलं जाइल, अन वापरल जाइल तेव्हढ्याच आवडीने. भेट प्रेमाने दिली जाते हे मला मान्य पण मग अश्या अनेक भेटी असतात. अन तरीही लोक जाउन आपल्या चॉइसच विकत घेतात.
दुसरा मुद्दा. ते पुर्वी केलेलं घरात आहे आता नविन कशाला करते अस वाटण्याऐवजी पुन्ह नव्याने काही करायचा उत्साह वाढेल.

अपर्णा तुझं म्हणणं अगदी मान्य :)
पण विकण्याइतकं मटेरियल तयार करणं म्हणजे सुद्धा एक फार मोठं काम होतं गं. हे कसं आपल्या हौशीचं असतं त्यामुळे वेळ मिळाला की केलं कंटाळा आला की ठेवून दिलं अशी मनमानी करता येते :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2013 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मला का कोण जाणे विकायला आवडत नाही. भेट म्हणून द्यायला जास्त आवडतं

बरं...! भारतात आल्यावर कळवायला विसरु नका. टपालाचा पत्ता कळविण्यात येईल. :)

-दिलीप बिरुटे

जयवी's picture

16 Mar 2013 - 1:29 am | जयवी

अगदी अगदी :)

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Mar 2013 - 9:16 am | श्री गावसेना प्रमुख

जयवी ताई हे तुम्ही तयार केलय का?

हो हे मीच तयार केलंय.............कोई शक ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

16 Mar 2013 - 12:37 pm | श्री गावसेना प्रमुख

ना बाबा हम हात पाय आवर के रहते .

दिपक.कुवेत's picture

14 Mar 2013 - 1:03 pm | दिपक.कुवेत

काय एक एक कला आहेत गं तुझ्यात? मंडळात एक सेशन ठेव....खच्चुन प्रतीसाद मिळेल!

जयवी's picture

16 Mar 2013 - 1:26 am | जयवी

:)

प्राकृत's picture

15 Mar 2013 - 12:38 pm | प्राकृत

जयवी ताई, खरेच खुप मस्त झाले आहेत.... मला पण असे प्रकार करायला आवड्तात.. ताई मला जरा sc, dc, ch चा अर्थ सांगता का? मला ते कळाले नाही आहे.

प्राकृत, तुला पण हे आवडतं हे वाचून छान वाटलं :)
sc म्हणजे सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब.
dc म्हणजे डबल क्रोशे म्हणजे खांब
ch म्हणजे चेन

प्राकृत's picture

19 Mar 2013 - 2:44 pm | प्राकृत

धन्यवाद ताई.. आता नक्कि करुन पाहिन... :)

bharti chandanshive१'s picture

15 Mar 2013 - 5:02 pm | bharti chandanshive१

सुन्दर

ब्लॉग हाफिसातून बॅन आहेत. हे क्रोशा आहे का नेटिंग?

जयवी's picture

20 Mar 2013 - 7:09 pm | जयवी

क्रोशा :)

आरति २३'s picture

10 Apr 2013 - 3:04 pm | आरति २३

खुप छान