Skip to main content

पावसा!

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 05/07/2008 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4476
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

अतिशय सुंदर कविता रे हृषिकेशा! एकेक ओळ आवडली! :) औरभी लिख्खो...जियो...! तात्या.

फारच सुंदर कविता.. वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा हे फार आवडल.. (ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

हृषिकेश, खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे. खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा, सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वावावावा! फार आवडले. (बालक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सुरेख कविता.

छान झाली आहे रे काव्य रचना.

हृषिकेश, केवळ अप्रतीम गझल!

प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश