✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्रागा धागा... वैताग.....

म
मन यांनी
Tue, 02/19/2013 - 12:31  ·  लेख
लेख
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस. किंवा त्यानी बोलावल्यावर लागलिच जायची सवय मोडू नकोस.) धाग्याला प्रतिसाद नाही मिळाले, होउन बस खट्टू. बसम्ध्ये शेजारी जाड्या येउन बसला नि माझ्याही सीटचा ८०% भाग त्यानं व्यापला, करुन घे वैताग. . चीननं ग्वादार बंदर घेतलं, बांधलं ; घे टेन्शन. युरो कोसळणार, डॉलर कडाडणार असं ऐकलं, कर चिंता. डॉलराऐवजी रुपया कडाडला(नि डॉलर पडला!) अजूनच घाबर. कंपनीचा नफा कमी झाला हो. पैसा कमी मिळणार हो. अशी बोंब मारणं कर सुरु. . पाकड्यांची अण्वस्त्रं माथेफिरुंच्या हाती जाण्याचं ऐकलं कर त्रागा. जगातलं पेट्रोल एक न एक दिवस संपणार आहे हे पुन्हा जाणवलं, घे घाबरगुंडी उडवून स्वतःची. "अरे बाप रे , आभाळ कोसळणार, आता कसं होणार" हाच ह्या सगळ्यात आमचा टोन. . बस आता. हे जगाचं टेन्शन सोसवत नाही. "सारी दुनिया का बोझ मेरे ही कमजोर खंदो पे है" असं वाटून घेणं सोडीन म्हणतो. जsssरा मोकळ्या मनानं श्वास घ्यावा. मनापासून आवडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद देउन पहावी. पण आधी एकदा सगळा त्रागा लिहूनच काढायची तीव्र इच्छा आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या धाग्यांवर तोच तो वैताग डोकावयास नको. . . समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे पूर्वी ऊठसूट स्वच्छ चारित्र्यवाल्या जुन्या नेत्यांबद्दल, नि त्यांच्या उच्च मूल्य, साधी राहणी, परोपकार , निष्ठा, वगैरेबद्दल वर्तमानपत्रात वाचायचो आणि आपल्याला किती वाईट काळात रहावं लागतय त्याबद्दल हळहळायचो. आजही मराठी वृत्तप्त्रांतातील स्तंभलेखनात जुन्या काळच्या समाजवाद्यांचा प्रभाव आहेच. विनोबा भावे,साने गुरुजी,तर कधी नानाजी देशमुख, कधी राममनोहर लोहिया, एसेम, मृणाल गोरे किंवा उच्च मूल्ये जपणारे , अभ्यस्त असणारे आणि प्रागतिक विचाराअंचे म्हणून यशवंतराव चव्हाण अशी नावं पब्लिक घेते. मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता? ह्यांनी त्यात काय भर घातली? आज जे भिकारचोट, अप्पलपोटे आणि ढेर्‍या तुडुंब भरल्या तरी ढेकरही न देणारे असे जे नेते म्हणवले जातात,हे त्यांचीच सेकंड जनरेशन फळी आहेत ना? ह्या आज गणंग वाटणार्‍यांना त्यांनीच वर आणले/येउ दिले का? की ह्यांना ते थांबवायचे होते पण काळाच प्रवाह अडवण्यात हे माझ्याइतकेच दुर्बळ, हीन दीन दुबळे ठरले? म्हणजे चांगली वर्तणूक असणरे सज्जन पण दुर्बळ अशीच ही माणसे का? . सगळ्या भल्या म्हणवल्या जाणारे लोक नेहमी कांदा भाकरीच का खातात? चांगलं खाण्यावर असे ते खार खाउन का असतात?(स्पेशली विनोबा भावे).चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का? विनोबा भावे आणि गांधी ह्यांच्या "भलेपणानी वागा", "चांगला माणूस बना" असल्या कै च्या कैच उपदेशाला सिरियसली घेतल्यानं आम्ही किती खड्ड्यात गेलोय हे ह्यांना माहितीये का? माझ्या खड्ड्यात जाण्याची हे जिम्मेदारी घेतात का? चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का? समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का? सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो? . विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे नि पकाउ वाटते. उदात्त, पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली. खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे. उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाळी गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.आपली चूक कबूल करावी.दुसर्‍याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये. . दवणे :- चित्रपट रसिक म्हणवणार्‍यांनी "गुंडा" पाहिलं नसेल, वाचक म्हणवणार्‍यांनी "दवणे" वाचले नसतील तर त्यांनी आयुष्यात खूप मोठ्ठं काही मिस केलय. . (सर्व साने गुरुजी फ्यान ची क्षमा मागून) अधिकाधिक बाळबोध, सुगम, सुकर, तथाकथित "संस्कारक्षम" लिहिण्यात साने गुरुजींपेक्षाही दवणे कैकपट पुढे आहेत. ( त्याच्या लिखाणात साधेपण, सात्विकपणा, वागण्यातील शुचिर्भूतता वगैरे वगैरे टिप्पिकल मध्यमवर्गानं over hype करुन ठेवलेल्या संकल्पनांचा भडिमार आहे.) . कुणाला शिव्याशाप खरोखर लागत असतील असे वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील सर्व तळतळाट ह्या बकवास समाजवादी विचारांना लागतील. "साधे रहा. चांगले रहा. भले रहा. (स्वतःची चूक नसताना) थोबाडित खाउन घ्या. स्वतः कष्ट करूनही सुखासमाधानानं जगायची लाज वाटून घ्या. आपल्या कामाचं क्रेडिट घ्यायला संकोच करा नि स्वतःच्या पायावर धोंडा घालून घ्या; स्वतःचा न्याय्य हक्क विसरुन मन मारुन जगा. गुणी बाळ व्हा." असला बकवास सिरियसली घेतल्यानं माझं लै नुस्कान झालेलय. स्वतःवर विलक्षण अन्याय करायची नि न्यूनगंड बाळगायची , अनावश्यक समाजसेवा (स्वतःचे इतरांमार्फत शोषण होउ देण्यासाठी इतरांना उत्तेजित करण्याची!!) करण्याची मला असल्या कंपूच्या बालपणातील घेरावामुळे लागलेली सवय अजूनही धड गेलेली नाही. . थोडक्यात थिल्लरपणाचा विक्रम तो माणूस करतो. ह्या उथळपणात त्याला फक्त चेतन भगतच*टक्कर देउ शकतो. . . *भगत सोशालिस्ट बकवास करतो असे मी म्हणत नाही. पण तो त्याच तोडीचे भंकस्/थिल्लर/सवंग लिखाण करु शकतो असे मला म्हणायचे आहे. . स्वामी विवेकानंद :- "इच्छा असेल तर सद्गुरु मिळतोच" , तथाकथित "सन्मार्गस नि आध्यात्मिक उन्नतीस लागतोच" वगैरे वगैरे स्टाइल काही स्वामीअभ्यासक म्हणवणार्‍यांनी बिंबवले. आम्ही दिवसेंदिवस इच्छाच करीत बसलो. नंतर मात्र त्यांचेच इतरही विचार/quotes समजले ते बरे झाले. कष्ट करा. (चक्क भौतिक)उन्नती करुन घ्या. पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टी( मोकळेपणा, सचोटी, आत्मविश्वास) शिकण्यास संकोचू नका . बंधूभाव जपा. बलशाली व्हा. "तरुणांनो गीता पठण करण्यापेक्षा आधी सशक्त व्हा. भरपूर फुटबॉल खेळा" ह्या धर्तीवरचं बरच काही "स्वामी विवेकानंद म्हणतात" ह्या इवल्याशा पॉकेट बुक मध्ये मिळालं. स्वामीजींच्या नावानं जो डोक्याला शॉट्ट करुन घेतला त्यावर स्वमीजींनीच उतारा दिला. असो. . साने गुरुजी, विनोबांचे काही निबंध नि विचार आणि अशा महापुरुषांच्या गोष्टी ह्या नाही त्या वयात वाचल्या. निस्ते वाचून न थांबता वाचून सिरियसली घेतल्याने महाप्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. वागणूक विचित्र झालेली नि साइडलाइन झाल्याने होणारा त्रास व इतर वैताग नेमक्या शब्दांत इतरांसमोर मांडता न आल्यानं स्वतःचाच प्रदीर्घ काळ छळ करुन घेतला होता. झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये हे समजायला फार म्हणजे फारच उशीर झाला होता. . . मिपावरच ह्या चिडचिडीवर एका प्रतिसादात भारीच उपाय सुचवलेला :- सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते. विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा. शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे. काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला? नुकसान होणार नसेल तर दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे. . माझ्या रडगाण्यातून थोडा पॉझ घेतोय. अआथवतील तसे त्रागे ह्याच धाग्यावर करीत राहिन. तुम्हालाही ज्यांच्या नावानं बोंब ठोकायची असेल इथे ठोकून घ्या. कसं मोकळं मोकळं वाटेल. वरील सर्वकाही खरं तर माझ्या जालावरच्या खरडी, प्रतिसाद ह्यांचं संकलनच आहे; इतर काही नाही. तूर्तास कामास लागतो. बाय. तोवर तुम्ही तुमच्या चिडचिडीची ह्यात भर घालू शकता. --मनोबा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16599 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

+१००

५० फक्त
Sat, 02/23/2013 - 15:50 नवीन
आयुष्याच्या अशा टप्प्यावर मी उभा होतो कि सर्व दुनियेने पाठ फिरवली असताना फक्त माझा बाप माझ्या पाठीशी उभा राहिला होता. - अक्षरशः सेम अनुभव, आणि ऋणाबद्दल म्हणाल तर आईबापाचं कर्ज फेडणं हे इथल्या एका आयुष्यात तरी शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स्वतःच

राही
Sat, 02/23/2013 - 15:59 नवीन
आधी स्वतःला ओळखा.स्वतःतले गुणदोष जाणून घ्या. दोषांचा बाऊ करू नका पण गुणांच्या कैफातही मश्गूल राहू नका. मुख्य म्हणजे कधीही स्वतःचा तिरस्कार करू नका. आत्मश्लाघा वाईटच पण आत्मपीडन त्याहूनही वाईट. ते मानसिक असंतुलनाकडे नेते. तुमचा देह,तुमचा जीव हे तुमचे क्रिएशन नाही.ती दुसर्‍या कुणाची तरी निर्मिती आहे आणि त्या निर्मात्यांचाही त्यावर हक्क आहे. हे असे दुसर्‍याने निर्मून तुमच्या हाती सोपवलेले तनमन तुम्ही जपायचे आहे, मशागत करून वाढवायचे आहे. उद्धरेत आत्मानं आत्मा,नात्मानं अवसादयेत. तुम्ही आजूबाजूला पहाल तर प्रत्येकासमोर समस्या आहेत, पर्सनॅलिटी इशूझ आहेत,संकटे तर आहेतच आहेत.तुमच्या एकट्याच्याच नशिबी हे सर्व आलेय असे म्हणून तुम्ही स्वत:ला इतरांपासून अलग करताहांत,खास,स्पेशल मानता आहांत.स्वतःला खास मानू नका. समाजामध्ये विरून जा. समाज हे एक मोठे संरक्षक कवच आहे,त्याचा लाभ घ्या. हे सर्व फार उपदेशात्मक किंवा पेट्रनाय्झिंग वाटले तर क्षमा करा आणि सोडून द्या. दुर्लक्ष करा.
  • Log in or register to post comments

पन्नास, सुबोधराव आणि राही

आदूबाळ
Sat, 02/23/2013 - 20:57 नवीन
पन्नास, सुबोधराव आणि राही यांच्या प्रतिसादाला +१
  • Log in or register to post comments

हे सर्व फार उपदेशात्मक किंवा

फिरंगी
Sat, 02/23/2013 - 21:12 नवीन
हे सर्व फार उपदेशात्मक किंवा पेट्रनाय्झिंग वाटले तर क्षमा करा आणि सोडून द्या. दुर्लक्ष करा.. हे सर्वात उत्तम !!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

उर्वरित त्रागा भाग ४ : अध्यात्म, मनः शांती आणि ब्रँडिंग....

मन१
Tue, 02/26/2013 - 12:43 नवीन
इशारा :- धार्मिक म्हणवून घेणार्‍यांपैकी काहिंच्या भावना दुखावू शकतात. खालील ओळींतील भावार्थ लक्षात घ्यावा. जमल्यास शांतपणे एकदा वाचून पाहिलेत तर आभारी राहिन. . हल्ली अध्यात्म, "योगा" ह्याला ग्लॅमर आलेलं आहे. काही आध्यात्मिक व अधार्मिक किंवा निधर्मी संघटनांबद्दल आमचे हे मत आहे. "आम्ही धार्मिक नाही पण आध्यत्मिक आहोत" असेही म्हणणारी बरीच मंडळी आहेत. अनेकानेक ब्रँडचे ते ग्राहक आहेत. ह्यातले सर्वात जोरात चालणारे माझ्या माहितीतले पुण्यात मला दिसलेले ब्रँड सांगतो:- १.श्री श्री १००८ रविशंकर --Art of Living २.इगतपुरीचे विपश्यनावाले गोयंकाजी ३.सद्गुरु परिवाराचे आपले सद्गुरु वामनराव पै. ४.स्व पांडुरंगशास्त्री आठवल्यांचा स्वाध्याय परिवार ५.एका नामांकित वर्तमानपत्रात आयुर्वेदाच्या नावाने धुमाकूळ घालणारे एक महाराज आता अध्यात्मावर अन् गीतेवर भाषणे,चेहर्‍यावर अष्टसात्विक भाव आणून व्याख्याने,कथने व वैचारिक नर्तने करताना दिसतात. . ह्यापैकी क्र.१ वाल्याकडे जाउन आलेली माणसे उगीच "हमारे गुरुदेव्,जय गुरुदेव" म्हणत झीट येइस्तोवर त्यांच्या पंथात सामील व्हायचा आग्रह करत आर्जवी स्वरात पैसे मागत सुटतात(शिबिरात ये म्हणून).बरे, एकदा काहीतरी रौप्यमहोत्सवी वर्ष का काहितरी म्हणून शिबीर फुकट होते म्हणून तिकडे गेलो तर डोक्याल इतका शॉट्ट बसला की फुकटातलेही पूर्ण करवले नाही. बुद्धीवाद्यांचे, स्वातंत्रयाव्दी तर्ककर्कश विचारवंतांपेक्षाही त्यांचे बकणे अधिक वैतागवाणे होते. . क्रमांक दोनवाले पैसे मागत नाहित. पण गेल्यावर मानगुटीला धरुन १० दिवस १००% टक्के मौन करायला लावतात.हे झेपणेबल न वाटल्याने गेलो नाही.(तिथल्या सूतकी कळा घेउन वावरणार्‍यांशी बोलायचं नाही हे ठिक आहे हो, पण एखादा फोनही कधीमधी कुणाला करायचा नाही, गरज पडल्यास पानटपरीवरही अजिब्बात जायचं नाही, हे आमच्यासरख्या उतवळ्या माणसाला भयंकर क्रूर,अमानवी वगैरे वाटले.) जायला बिचकलो. शिवाय सलग दहा दिवस सुट्टी जॉबला लागल्यापासून आजतागायत कधीच घेतली नाही.(बॉसला कुठल्या तोंडाने सुट्टी मागायची? मग आम्हास दाखवल्या जाणार्‍या ऑनसाइटच्या गाजराचे काय होइल??) . क्रमांक तीनवाल्यांचे भक्त त्यांच्यकडे हरिपाठ वगैरे ठेउन जेवायला बोलावतात म्हणून जाम आवडतात.बाकी कर्मकांड वगैरे ह्यांच्यात फार आहे असे वाटले नाही, पण सतत उपदेशा देण्याच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या मंडळींकडे जाणे म्हणजे डोक्यावर आधीच विरळ झालेले केस स्वतःच्या हाताने संपवून घेणे, म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही. (प्रामाणिक् रहा, मेहनत् करा, स्त्रीचा आदर करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका,लोकांशी चांगले वागा ह्या आणि अशा (खरंतर कॉमनसेन्सच्या) गोष्टी ह्यांचे सद्गुरु सांगतात. पण ह्या "जगावेगळ्या शहाणपणाच्या", अद्भुत, असामान्य व "जीवनाचे सार" ह्या गोष्टी मीही सांगायला तयार् आहे हो. पण मला ह्यांच्यासारखे कुणी पैसे का देत नाही ह्या विचाराने नेहमीच उदास् होतो :-( ) . क्रमांक चार वाल्यांनी समाजोपयोगी बरीच कामे केल्याचे ऐकले आहे.(तळी खोदणे, श्रमदान वगैरे) पेप्रात त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या इस्टेटीवरुन काही वाद झाल्याचे वाचल्याचेही आठवते आहे. पण अजून त्यांचे कुणी (सुदैवाने?)बोलवायला आले नाही. . क्रमांक पाच हे पेप्रातूनच इतके भंडावून सोडतात की त्यांच्याकडच्या थंड हवेच्या ठिकाणी जायची हिम्मत होत नाही.(कधी हिम्मत झालीच तरी त्यांच्या पंचतारांकित सुविधा परवडणार नाहित हेही खरेच.) तेच ते. गीतेचे सार्. गीता, आध्यात्म ह्यावर ते आयुर्वेदाकडून् अचानकच् आलेत. त्यांचा प्रचंड उदोउदो वर्तमानपत्रातून काळजीपूर्वक् होतोय्."जीवन ह्यांना कळले हो" नावाने त्यांचा कुठलासा मुलाखतीचा का कसलातरी कार्यक्रम् होता. आता काही दिवसात ते योगाचीही (आतडी) फाडून ठेवणार असा डौट येतो. (म्हणजे, योगाचे अंतरंग् उघडे करणार, योगाच्या पोटात शिरून आपणास ज्ञान वगैरे देणार असे म्हणायचे आहे.) . तुम्ही सुशिक्षित म्हणवणारी माणसे प्रामुख्याने "मनाला उभारी यावी", "आत्मबळ मिळते" वगैरे कल्पना घेउन नवनवीन ठिकाणी जाता.(आर्ट् ऑफ लिव्हिंग गँगवाले).जरा साय-फाय्, तात्विक् व आध्यात्मिक पॉलिशचे आवरण असलेली ठिकाणे पसंत करता. सुशिक्षित व् त्यातही मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग ह्यात् अधिक. विशेषतः शहरी. हे ज्यांच्याकडे जातात त्या गुरुंकडे ह्यांच्याकडे अफाट शाब्दिक ताकत असते. समोरच्याला अजिबात् कळणार् नाही असे बोलण्याची एक अद्भुत सिद्धी ह्यांच्याकडे असते. "चित्तमात्रेतून समष्टी निर्माण होते. नासिकाग्रे ध्यान् करत त्राटक केल्याने मनोर्जा जागृतीने अष्टचक्रे फिरु लागतात" असे काहिसे हे बोलू लागले, की मराठीच बोलताहेत् असा भास होतो, पण् तासंतास ऐकूनही अजिब्बात समजत् नाही. . मरणोत्तर काही मागत सुटणारे काही अल्पसंख्यही आहेत;ते वेगळे . ते "अलौकिक् दर्शन" वगैरे घेउन् कृतकृत्य होतात. कुणी बापूंच्या अन् त्यांच्या पत्नी व् भावाच्या दर्शनाने होतो, कुणी अम्मा भगवानच्या अनुग्रहाने फलित होतो. आमच्यकडे काही लोक् आधीच अशा प्रकारे सातही जन्माची पापे धुवून् बसली आहेत. पुन्हा करणयसही तयार् आहेत्,आध्यात्मिक धोबी ती त्यांना धुवून देतीलच.एकाने तर निव्वळ दर्शनाने स्वतःची कुंडली व पर्यायाने नियती आख्खीच बदलून् मिळू शकते व तसे बदलायची त्यांच्या केंद्रात एक्स्चेंज ऑफर अजूनही सुरु असल्याचे सांगितले आहे. . जबरदस्त पैसा असल्यावर्/मिळाल्यावर मनुष्य् असा धास्तावल्यासारखा का करतो व कशाच्याही कच्छपी का लागतो ते न कळे. . तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्याकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला फारसे समजावू शकत नाही. "आम्हाला अनुभव आलाय्." हेच एक स्टिरिओअटाइप् सतत ऐकावे लागते.प्रामाणीक पणे मी वेगवेगळ्या मंडळींना भेटूनही मलाच कसा कधी कुठला "अनुभव" आला नाही हे कळत नाही. अजूनही जाण्यास तयार आहे. पण कुणी असे खरोखरीचे पावरफुल सापडतच नाहित. ते नेहमीच "कोणे एके काळी होउन गेले" , "आमच्या ह्याच्या त्याला भेटले" असेच किस्से असतात. भाविकांच्या गराड्यात राहणे म्हणजे म्हटले तर गंमम्तीशीर म्हटले तर् गोंधळवणारा व् म्हटले तर वैतागवाडी/क्रूर अनुभव असतो. ढोंगी,बिनडोक,प्रामाणिक,लबाड,समजूतदार ह्या सर्वच प्रकारचे श्रद्धावंत भेटलेत. पण बुद्धीवाद्यांत इतकी व्हरायटी नाही. बुद्धीवंत म्हणवून घेणारे बव्हंशी एकसुरी असतात. ते बहुतांशी प्रामाणिक असतात; पण समजूतदार तर फारच क्वचित असतात. . असो. खूप काही मनातून स्क्रीनवर सांडते आहे. आवरते घेतो.
  • Log in or register to post comments

उर्वरित त्रागा भाग ५ :- भारत आणि भारतीय आणि "महासत्ता" हा टॅग

मन१
Tue, 02/26/2013 - 12:58 नवीन
राष्ट्रिय पातळी, भारत महासत्ता वगैरे विषयाबद्दल आता बोंब ठोकणार आहे. ही बर्‍यापैकी गांभीर्याने ठोकत आहे. भारत महासत्ता होणार म्हणे. म्हणजे नक्की काय होणार आहे? समृद्ध होणार आहे का? जीवनमान सुधारणार आहे का? की लष्करी धाक आसपासच्या भागात अधिक निर्माण होणार आहे? रस्त्यातले खड्डे संपणार आहेत का? सुरळित वीजपुरवठा सर्वत्र(निदान बहुतांश ठिकाणी, शेतीपासून घरदारापर्यंत) मिळणार का? कधीही बॉम्ब फुटू शकतो हे गृहित धरणं सामान्य भारतीय सोडणार का? समान नागरी कायदा आणायची हिम्मत येणार का?(तो कायदा येणं योग्यच आहे; ह्यावर खूपदा एकमत दिसतं; पण ते आणणं व्यवहार्य नाही; तो आणला तर आपली वाट लगेल अशी भीती आहे.तर ती भीती जाणार का?) . बेसिकली आपण बहुसंख्य लोक हिप्पोक्रेट्स आहोत; अप्पलपोटे आहोत. धडधडित राँग साइडने येउन धडक दिल्यावरही याला प्रत्युत्तर देताना " मी कसा बरोबर आहे" हे आर्ग्युमेंट कुणीच का करत नाही? "मी किती मोठ्ठा आहे. मेरि कितनी पैचान हय" असले सडेल आर्ग्युमेंट करताना आपल्याला काहिच कसं वाटत नाही. "जाउ दे; मोठी असामी आहे" असं म्हणून प्रभावशाली व्यक्तींचे गुन्हे इतक्या भयावह प्रमाणावर माफ होणार्‍या देशात जे चाललय त्याला आलबेल म्हणता येइल का?(बाहेर पंतप्रधान आणि प्रेसिडेंटांच्या सख्ख्या मुलींनाही तुरुम्गवास झालेला ऐकण्यात येतो( अमेरिका :- प्रेसिडेंट बुशच्या पोरिला तुरुंगवास झालेला; इंग्लंड :- पंतप्रधान टोनी ब्लेअरच्या पत्नीला विनातिकीट पकडल्यावर रेल्वेबाहेर काढलेलं.).किरकोळ मद्यपान वगैरेसाठी. खरेतर हे गुन्हे तर सहज दाबता येण्यासारखे आहेत; भारतात तरी.) . भारतत काय वाईट आहे असं म्हणणं म्हणजे डम्पिंग ग्राउंड मध्ये उभं राहून "दाखव बघू इथला कचरा" असं म्हणण्यासारखं आहे. इथं जे आहे ते बाय डिफॉल्ट चूकच आहे. चांगल्या गोष्टी अपवाद आहेत. मिडिया आणि त्याची भूमिका ह्यावर इथेच जालावर शेकडो पाने खर्ची पडलित. नेत्यांना निवडून द्यायचे स्वात्म्त्र्य तुम्हास आहे असे सांगण्यात येते. त्यातून काय अवस्था आहे हे दिसतेच. न्यायव्यवस्था बाय डिफॉल्ट होलि काउ आहे; त्याला चांगले म्हणणे कंपलसरी आहे. लष्कराकडे काय दारुगोळा आहे; किती शस्त्रसाठा आहे; ही झाकली मूठच बरी.(अगदि अधिकृत अहवालातही चीनकडे सातेकशे पाणबुड्या असतील तर आपल्या पन्नस्-साठ अशा धर्तीची आकडे वारी दिसते. जस्ट कम्पेअर चीन्-भारत्-पाक :- ७५०-१५०-९० असली ती आकडेवारी असते. पाकपेक्षा आपली ताकद थोदीशी जास्तच असते. २०-२५ टक्क्यांनी. पण चीनची सरळसरळ आपल्यापेक्षा ५०० टक्क्यांनी जास्तच असते. संरक्षण सामुग्री किती आयात होते; त्याचे पुढे काय होते देवच जाणे. इतका मोठा देश आजही काहिच धड युद्धसामुग्री निर्मित करु शकत नसेल तर अवघड आहे. . ८०%च्या वर कैदी कच्चे कैदी आहेत. ते जेलात गुरासरखे भरले जातात; मॅजिस्ट्रेटसमोर उभे न करताही वर्षानुवर्षे तसेच दाबले जातात. . मनोरुग्णांबद्दल समाजाचा दृष्टीकोन काय आहे ह्याची जाणत्यांना कल्पना आहेच. त्यांच्या हॉस्पिटल्सची अवस्था बघून नॉर्मल माणूसही मानसिक धक्क्याने रोगी होइल. काहीही धड दर्जेदार निर्मिती कुठे होताना दिसत नाही. brand india असं काही उत्पादन क्षेत्रात किम्वा फॉर द्याट म्याटर सेवा क्षेत्रात आहे का?( भारतीय आय टी हा बकवास आहे हे इथे गृहितक आहे.) शेतीबद्दल बोलावयास नको. हेक्टरी उत्पादन पाश्चात्त्यांचे एकरी ४० च्या घरात असेल, तर चीनचे ३३-३५ पर्यंत आहे. भारताचे १५-१८च्या घरात रेंगाळते. तुम्ही म्हणे शेतीप्रधान देश. चीनचे लागवडीखालील क्षेत्र भारतातील लागवडीखालच्या क्षेत्राच्या फक्त निम्मे आहे. तरीही त्यांचे उत्पादन भारताहून बरेच अधिक आहे. . भारत एकाच वेळी तीनेक शतकात वावरतो. सुखी आणि नशीबवान लोक,आभिजन वर्ग सध्याच्या युगात आहे. बाकेचे कित्येक मागच्या शतकात आहेत. त्याहून बुरसटलेले ल ओक बुरसटलेल्या टाळक्यानिशी नि सडलेले जीवनमान घेउन त्याही मागच्या शतकात रेंगाळताहेत.(स्लमडॉग पाहिल्यावर सगळे कसे चिडले होते. पण खरच तसं काही नाहिये का इथे?उगा "आमच्याकडे ताजमहाल आहे; चकचकित मॉल्सही आहेत" असे म्हणत वाळूत तोंड का खुपसतात देव जाणे.) आर्थिक राजधाने मुंबै म्हणे. ५५%हून अधिक पब्लिक झोप्डपट्टीत राहते. जवळपास मुंबैच्या आसपास जाणारीच लोकसंख्या असणारी शहरे म्हणजे शांघाय, तेहरान आणि तोकियो. ह्या प्रत्येकावर एकदा नजर टाका. तिथलं जीवनमान पहा. नुसता आकार पाहिलात तरी समजेल. ही सर्व शहरे मुंबैच्या सात्-आठ पट मोठी आहेत; पण तितकीच लोक्संख्या वागवून आहेत. तिथे मोकळ्यानी श्वास घेता येतो. . (मेळघाट वगैरे सारखे गंभीर)कुपोषण, उपोषण, बालमृत्यू हे शब्द नक्की कुठल्या महासत्तेच्या डिक्शन्रीत असतात ते एकदा तरी दाखवून द्या बुवा. . कित्येक लोकांचा व्यवसाय अजूनही स्मशानात जाउन मेलेली मढी उकरून त्याच्या अंगावरून जे काय मिळेल ते हिसकावून उदरनिर्वाह करणे हा आहे. . कितीही स्फोट झाले तरी कुणाला काहीच वाटत नाही. आता काल आणि आज काहिच झाले नाही. म्हणून सगळे एकदम थट्तामस्करी वगैरे करताहेत. जणू काही झालेलेच नाही. अचनाक ह्यांच्या बुडाखाली एखादा स्फोट होतो; हे बावचळल्यासारखे करतात; तेवढ्यापुरतं "कापून काढलं पाहिजे. एकदा धडा शिकवला पाहिजे" वगैरे रागाच्या ओकार्‍या बाहेर काढतात. आणि पुन्हा? पुन्हा काहिच नाही. सगळं कसं आलबेल! काही झालेलच नाही. नंदनवनात जणू सारे वावरताहेत्.थट्टा मस्करी सुरु. अरे काय हे? मग एकदम स्फोटानंतर निर्वाणीची भाषा वगैरे व्यर्थ अभिनिवेशी बडबड तरी करु नका ना. स्फोट झाला उचक. बलात्कार झाला; एकाएकी "फार झालं. काहीतरी करा. त्याचं कापून काढलं पाहिजे " वगैरे वगैरे. आणि लागलिच पुढच्याच दिवशी पुन्हा? पुन्हा काहिच नाही. अरे बातम्या येत नाहित तेव्हा काहिच होत नसतं का? भारतात दर मिनिटाला दहाच्यावर तरी जोर-ज्बरदस्तीचे किस्से होत असतात. तुम्हाला सुधारायचे असेल तर मग नियमित दबाव का टाकत नही? नाहितर बोंब मारणे तरी सोडा ना मिडियानं कळ लावल्यावर; पिन मारल्यावर. तोच प्रकार तो थिल्लर/वाह्यात अण्णा-केंद्रित भ्रष्टाचार विरोधी शंखाचा. "भ्रष्टाचारानं बरबटलेलो आहोत" हे एकदम तो म्हातारा काका ओरडायला लागल्यावर तुम्हाला कळलं का? म्हतारा काका गपचिप गावात जाउन पडल्यावर तुमची हवा कुठे गेली? तुम्ही नक्की बोंबा का मारत होतात? तुमचे उद्दिष्ट तुम्हाला तरी माहित होते का? . रेसिझम्-सेक्सिझम( लिंगाधारित भेदभाव) आणि कास्टिझम हे भारतातून आधी संपतील का भारतच आधी संपेल हे (असलाच तर)देवच जाणे. त्याची हिडिस रुपे मी सांगण्याची गरज नाही. . "माझ्यावर अन्य्यय होउ नये" ही कुणाचीच भूमिका का नाही? "मला इतरांना दाबता येइल इतपत सामर्थय्वशाली व्हायचय" अशीच सगळ्यांची सुप्त इच्छा का आहे? ("जानता है मै कौन हूं" मागचा गर्भितार्थ तोच आहे. "मी बडे बाप की औलाद आहे. मी वाटेल ते करीन.अनिर्बंध राहिन" हा तो आवेश आहे.) . दाद मागावयास गेल्यास तक्रारकर्त्यास कायम झोडपण्यात येणे कधी थाम्बणार? पोलिसांना सामान्य पब्लिक विशेषतः फारसे गुन्हे न करणारे वचकून का असतात? पोलिसांची भीती सामान्य नागरिकाला वाटावी कि गुंडाला वाटावी? भारतात बाहुबली राजकारणी, इतर गुंड, स्थानिक प्रभावशाली व्यक्ती(अगदि इमाम बुखारी पासून कडवे हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे हिंस्त्र गुंडही; हे सारेच) हे पोलिसांना खरच घाबरतात का? भारत हे पिसाळलेल्या कुत्र्यांचं अभयारण्य नाहिये का? तुम्हाला कुणी लुबाडून गेला तर तुम्हाला न्याय मिळेल ह्याची किती खात्री वाटते?(काही लाख केसेस ह्या कित्येक दशके अपिलात पडून आहे. न्यायव्यव्स्था जबरदस्त अपयशी आहे.(उदात हेतू; कुचकामी अंमलबजावणी)) . किती टक्के लोकसंख्येला पुरेसं चांगलं पाणी प्यायला मिळतं? महासत्ता झाल्यावर त्यांना मिळणार आहे का?sanitationची अवस्था काय आहे? पब्लिक युरिनल्सची काय अवस्था आहे? . स्त्रिया एकट्या फिरताना बिंदास फिरु शकतात का?(अपवाद सोडून) . भारताच्या लष्कराचा धाक किती आहे हे दशकभरापूर्वीच दिसले. बांग्लादेशी सैनिकांनी सहा भारतीय जवानांना मारले. त्यातील एक दोघांच्या प्रेतांची मिरवणूक काधली त्यांचय सीमेवरील गावाअतून(टाइम्स मध्ये फोटो होता. शिकारीत मारलेल्या डुकराला आडव्या काढीला बांधतात; नि त्याचे प्रेत मिरवतात तसे फिरवत होते.) वाजपेयींना शेख हसिना का खालेदा झिया कोण होती तेव्हा तिथे तिला फोन करुन निषेध केला. बस्स. इतकेच. हाच तुमचा धाक. धन्य धन्य. . भारत नावाचं डम्पिंग ग्राउंड इतके मोठे आहे की अजून पाच पन्नास हजार प्रतिसाद लागतिल सगळं सांगायला. तरी खूप काही शिल्लक राहिल."आम्ही आफ्रिकन देशांपेक्षा बरे आहोत" ह्यात खुश राहणे बरोबर आहे क ह्याचा जरूर विचार व्हावा. . थोडक्यात भारताची एक जबरदस्त गटार बनलेली आहे. आर्थिक प्रगतीचे ढोल बड्वणार्‍यांस्साठी :- http://articles.economictimes.indiatimes.com/2012-12-21/news/35953405_1_russia-and-china-gdp-demographic-dividend . http://articles.economictimes.indiatimes.com/2013-01-02/news/36111402_1_external-debt-indicators-oil-import-bill-gold-imports . तुमच्या नाकाखाली काय चाल्लय तेही पहा जरा:- http://www.economist.com/blogs/banyan/2013/02/spending-bangladesh
  • Log in or register to post comments

_/\_

दादा कोंडके
Tue, 02/26/2013 - 18:35 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हम्म

पैसा
Tue, 02/26/2013 - 16:18 नवीन
यावेळचा त्रागा जरा डोक्याला त्रास देणारा आहे खरा. धार्मिक गुरू वगैरे पटले तर घ्या नायतर सोडून द्या. बाकी लोक त्यांच्यामागे का जातात म्हणून स्वतःला अज्जिबात त्रास करून घ्यायचा नै. आंतर्राष्ट्रीय राजकारणाबद्दल त्रागा करून विसरून जायचा असतो. बाकी कच्चे कैदी, गरिबी, सैन्याची दुर्दशा, पाण्याचे आणि इतर प्रॉब्लेम यावर त्रास करून काही फायदा नाही कारण एकट्या दुकट्याने हे बदलता येणार नाही. उलट जाब विचारणार्‍याला गप्प करायचे प्रयोग केले जातील. http://www.dnaindia.com/india/report_case-filed-after-abusive-comments-against-congress-leader-posted-on-facebook_1804385 हे बघा. सैन्याचे यावर्षीचे बजेट १४००० कोटी रुपयांनी कमी केले आहे म्हणे. आणि हे कमी केलेले पैसे कुठून कमी होणार? तर कारगिलसारख्या ठिकाणी जी खास साधनसामुग्री लागते त्यात, नव्या शस्त्रांमधे आणि सैनिकांच्या पगारातून कमी करणार. :( सैनिकांना निदान पैसे तरी पुरेसे द्या मेल्यांनो! सैनिकांच्या नावाचा फायदा घेऊन 'आदर्श' घोटाळे होणार. शी: :!
  • Log in or register to post comments

उर्वरित त्रागा भाग ६ : दळभद्री प्रार्थना नि हिणकस दुबळेपणा..

मन१
Wed, 03/06/2013 - 14:05 नवीन
लहानपणापासूनच शाळेत काय नि घरात काय अतिरेकी लीन्-दीन होण्याचं गौरवीकरण केलेलं. कल्पना करा आधीच लहान पोराला काही धड समजत नाही; खूप सरे प्रश्न ,शंका डोक्यात असतात त्याबद्दल ठाउक असेल तर उत्तर देउन मोकळे व्हावे किम्वा ठाउक नसेल "ठाउक नाही रे बाबा" असे म्हणून मोकळे व्हावे. ज्या त्या "गोष्टीवर त्या सर्वशक्तीमान प्राण्याला शरण जा, त्याच्या चरणी लीन हो. दीन हो. त्याच्यापुढे आपण सर्व यःक्श्चित आहोत. आपला हीन दीन दुबळेपणा मान्य करणे म्हणजे मोठेच पुण्य. " अशी गलिच्छ शिकवण रोज बोळ्याबोळ्याने दूध पाजावी तशी गळ्यात मारण्याची काय गरज? . लाइफ ऑफ पाय पाहिल्यावर त्यातला कथानाय्क सुरुवातीच्या भागात बर्‍यापैकी वेडझवा दाखवलाय. "thank you lord vishnu for introducing me to jesus" असे काहीतरी तो म्हणत जीझस च्या नादी लागतो. "असंही कधी असू शकतं का? इतकं कुणी बिन्डोक राहतं का भाउ" अशा प्रतिक्रिया त्या दृश्याबद्दल नंतर ऐकू आल्या.believe me, मी अगदि बराचसा असाच होतो. रादर, तसं असणं हेच कसं भला असल्याचं लक्षण आहे; सतत "ईश्वरी राज्यात जगण्यासठी" आपण "ईश्वरी दयेवर" कसे लाचार असतो; सज्जन माणूस म्हणजेच अधिकाधिक लाचार असे नकळतपणे ही माणसे ठसवित होती. आता पुन्हा "आम्ही कुठे काय शिक्वीत होतो रे बाबा" असे म्हणत हात वर करायला हे मोकळे आहेतच. म्हणजेच ह्यांना त्यावेळी सिरियसली घेणे ही आमची घोडचूक ठरली. आपल्या शाळा नि तथाकथित संस्कार हे असा दुबळेपणा संसर्गित करण्याचे कारखाने बनवून ठेवलेत. तुम्ही जर टगे असाल ; तर ह्यास सहज पुरून उराल. पण तुम्ही ह्यांच्यावर विश्वास ठेवलात तर मराल. उलट तुम्ही मेल्यावर "मी तर असे म्हटलोच नव्हतो रे बाबा", "धर्म तर असे सांगतच नाही", "तुला खरा अर्थच कळला नाही" असे हे वर तोंड करुन बोलणार. . तुम्हाला पोरात्यक्षिक हवं असलयस कुठल्याही नावाजलेल्या मुलांच्या "मराठी " शाळेत जा.तिथे प्रार्थना म्हणताना कसा "आर्त, व्याकूळ" भाव कसा थबथबून ओथंबून जात असतो ते बघा. लीन ,दीनवाणे शब्द आणि त्याहून केविलवाणा स्वर म्हणजे ह्या पादर्‍या प्रार्थना. . ही प्रार्थना पहा :- "तुम ही हो माता पिता तुम्ही हो तुम ही हो बंधू सखा तुम ही हो तुम ही हो साथी तुम ही सहारे कोइ न अपना सिवा तुम्हारे" . "तुम ही हो नैया तुम ही खिवय्या तुम ही हो बंधू सखा तुम ही हो " . ही प्रार्थना म्हणताना आख्ख वर्ग/शाळा खाली उभा राही, समोर माइक घेउन तीन चर सुरेल पोरं उभी रहात नि आम्हास सुरात सूर मिळवून म्हणावं लागे.(नाहीतर कानफटात मिळे)हे म्हणताना चेहर्‍यावर आणी सुरात भक्तीभाव नावाच्या प्रकाराखाली जी किळसवाणी लाचारी टपटप्ती होइ; त्यास तोड नाही. . फार मागे टीव्हीवर एकदा जुनं हिंदी गाणं पाहिलं होतं "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" त्याच्या शेवटी ते पोरगं अगदि भक्तीभावाच्या अतिरेकानं पार र्‍अडायला वगैरे लागतं. कसला हा बुळचटपणा. आणी हाच्च प्रकार अगदि असाच शाळांत ठाकून ठोकून शिकवला जातो. पोरांचं भलं करायचच असेल तर आधी शाळेतील सर्व दीनवाणी गाणी बंद करा. प्रार्थना ह्या शब्दाला आग लावा. चांगुलपणाचे पाय चाटायला शिकवण्यापेक्षा वाईटपणावर थुंकायला शिकवा. पोरांना निर्भय बनवा. नाहीतर हीच पोट्टी पुढं जाउन नागरिक बनतात नि देवाला घाबरल्यागत विचित्र वागतात; ते नेहमीचच उपास तापास वगैरे. तो प्रकार आटोक्यात आणायचा तर ह्याही भागाकडं लक्ष द्या. अजून काही प्रार्थना :- "तू ही राम हय तू रहीम हय तू करीम कृष्ण खुदा हुवा" wtf? वरील दोन ओळींत जेवढ्या व्यक्तींची/प्रकारांची नावं आहेत त्यांना व्यावहारिक जीवनात खिजगणतीत तरी धरायची गरज आहे का? उठसूट आपलं तेच भंकस "सगळेच चांगले आहेत. सगळ्याच ग्रंथात सगळच चांगलं सांगितलय." (हे म्हणजे गांधींच्या "गीता हे मानसिक द्वंद्वाचं वर्णन आहे. त्यातही खरा उपदेश अहिंसेचाच आहे." ह्या छापाच्या तत्वज्ञानाच्या वर झालं राव. "हतो वा प्राप्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महीम" काय गंमत म्हणून लिहिलं होतं का तिच्यायला?) . "हमको मन की शक्ती देना मन विजय करे दूसरो की जय से पेहले खुद को जय करे" (आधी स्वतःवर विजय मिळवा, मग दुसर्‍यांवर. स्वतःला थोबाडित मारुन घ्यायला शिका. टिपिकल बकवास.) . असो. घाईत आहे. सध्या इतकेच.
  • Log in or register to post comments

टोकाचा निराशावाद. सतत

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/07/2013 - 00:31 नवीन
टोकाचा निराशावाद. सतत आंतरजालावर वावरल्याने किंवा बैठे काम केल्याने कदाचित असे होत असावे. इथे धागे काढून कुंथत बसण्यापेक्षा इन्फीच्या फुटबॉल ग्राउंडवर जाऊन घाम गाळला असता तर जरा कूल वाटले असते आणि कदाचित काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली असती. पंचतारांकित नोकरी आहे,पुरेसे पैसे आहेत,स्वतःचे घर आहे,पोरगीसुद्धा आहे तरीसुद्धा इतका निगेटिव्ह विचार करणे पटले नाही. गेट वेल सून.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा