✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी बायको..

स — स्मिता चौगुले, Fri, 02/15/2013 - 15:53
ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक.. म्हणून म्हंटल हटके) माझी बायको.. प्रत्येक मुलाच एक स्वप्न असत माझी बायको हि वेगळी असावी सर्व रंग - गुणांचं मिश्रण अशी ती इंद्रधनूची छटा असावी आकाशातील नक्षत्राची चांदणी वाटावी सोज्वळ-सोबर तिची प्रतिमा असावी सगळ्यात उठून दिसणारी स्वप्नं मुग्धा अशी ती मोहिनी असावी सगुणांच प्रतिक जशी प्रेम– वास्तल्याची मूर्ती वाटावी माझ्या ओंजळीत सुख सांडणारी   अशी ती संपदा असावी शांत, गंभीर ,पोक्त अशी संस्कारांचा पुतळा असावी कधी बालिश,पोरकट भासणारी   अशी ती चंचला असावी चतुर, अभिमानी,काटकसरी अशी व्यवहार कुशल ती गृहिणी असावी प्रसन्न, हसतमुख, गरीब गाय अशी ती कल्याणी असावी   सुखदु:खात साथ देणारी संकटात आशेचा किरण  वाटणारी निराशेच्या प्रत्येक वाटेवर सोबत करणारी अशी ती प्रेरणा असावी क्लेशाला दूर सारणारी वेदनेवर फुंकर घालणारी माझ्या चुका पदरात घेणारी अशी ती हर्षदा असावी या सगळ्या गुणांचं मिश्रण अशी ती इंद्रधनूची छटा असावी कारण ..... प्रत्येकालाच वाटत माझी बायको हि सगळ्यात  वेगळी असावी  ... :) ....स्मिता चौगुले मिपाकरांनी या विषयीचे आपले अनुभव जरूर मांडावेत..:)

प्रतिक्रिया द्या
15445 वाचन

💬 प्रतिसाद (64)

अय्या ....

जेनी...
Fri, 02/15/2013 - 15:57 नवीन
अय्या .... :) म्हणजे अगदि माझ्यासारखीचकी गं :) :P :D
  • Log in or register to post comments

स्वयंघोषित ... अरे वा ...

स्मिता चौगुले
Fri, 02/15/2013 - 16:00 नवीन
स्वयंघोषित ... अरे वा ...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अय्या ...

जेनी...
Fri, 02/15/2013 - 16:02 नवीन
अय्या ... ते आणि काय असतं गं ?? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चौगुले

शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ

कवितानागेश
Fri, 02/15/2013 - 16:06 नवीन
शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ दे. सोडून दे. :P काळजी करु नकोस. तुझे कौतुकच करतायत त्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 16:09 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पूजे, तू लिही बरं

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 16:13 नवीन
स्व्यंगोशित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

जेनी...
Fri, 02/15/2013 - 16:14 नवीन
:-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मलापण

प्रसाद गोडबोले
Fri, 02/15/2013 - 16:19 नवीन
मला पण एक जाऊ हवी आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

जाऊ ??

जेनी...
Fri, 02/15/2013 - 16:26 नवीन
जाऊ ?? अय्या :) ... पण माझं ठरलय गं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अय्या ...ते आणि काय असतं गं ??

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 16:07 नवीन
कधी बालिश,पोरकट भासणारी अशी ती चंचला असावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अग स्वयंघोषित --- स्वत:च

स्मिता चौगुले
Fri, 02/15/2013 - 16:19 नवीन
अग स्वयंघोषित --- स्वत:च ठरवणे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नाही हो,

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 16:26 नवीन
ती मिपाघोषित :
संस्कारांचा पुतळा असावी कधी बालिश,पोरकट भासणारी अशी ती चंचला असावी
आहे.... बाकीचं फोटोत पाहा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चौगुले

एक जुनी म्हण आठवली...

शिद
Fri, 02/15/2013 - 16:13 नवीन
बायको चार जणांत ऊठुन दिसणारी असावी... चार जणांचा ***णारी नाही.
  • Log in or register to post comments

कविता चांगली आहे .

तर्री
Fri, 02/15/2013 - 16:21 नवीन
विडंबन करायला खूप स्कोप आहे.
  • Log in or register to post comments

एक राहिलं

पैसा
Fri, 02/15/2013 - 16:22 नवीन
मुक्ता बर्वेसारखी. :D :P
  • Log in or register to post comments

पण एक्झॅक्ट तशी नाही.

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 16:33 नवीन
पण एक्झॅक्ट तशी नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाही नाही !!

सूड
Fri, 02/15/2013 - 17:09 नवीन
मुक्ता बर्वे, उर्मिला कानिटकर, केतकी माटेगांवकर यांचं मिश्रण करुन जे काय तयार होईल तशी असावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गंगू चालती का?

अभ्या..
Fri, 02/15/2013 - 17:17 नवीन
मिश्र्णातून निर्मिती सावंत निघालीय. चालेल का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गूड वन...

स्मिता चौगुले
Fri, 02/15/2013 - 17:19 नवीन
गूड वन...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हिमालयात

सूड
Fri, 02/15/2013 - 18:03 नवीन
जायचा रस्ता माहित आहे का बे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हिहिहिहि

अभ्या..
Fri, 02/15/2013 - 18:08 नवीन
नेतीय कडेवर घेऊन =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हम्म...

दादा कोंडके
Fri, 02/15/2013 - 16:29 नवीन
कणेकरीमधलं, "तुमची बायको सुंदर, कलासक्त वगैरे वाटायला हवी असेल तर सर्वप्रथम तिचं तुमच्या शेजार्‍याशी लग्न करून द्या" हे आठवलं. :)
  • Log in or register to post comments

ते नाय जमलं तर जिजस म्हणतो तसं

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 16:31 नवीन
शेजार्‍याच्या बायकोवर प्रेम करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

छान....

सारे
Fri, 02/15/2013 - 16:29 नवीन
मस्तच सूचली आहे कविता..
  • Log in or register to post comments

नक्की किती बायका हव्यात?

प्यारे१
Fri, 02/15/2013 - 16:43 नवीन
नक्की किती बायका हव्यात? ;)
  • Log in or register to post comments

फक्त अजुन एक

प्रसाद गोडबोले
Fri, 02/15/2013 - 18:05 नवीन
"फक्त अजुन एक " असं उत्तर देतील ...चावट मेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नाही हो

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 18:08 नवीन
एकावर एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मस्त

bharti chandanshive१
Fri, 02/15/2013 - 16:48 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

वा! छान जमलीय कविता !

वेल्लाभट
Fri, 02/15/2013 - 17:16 नवीन
वा! छान जमलीय कविता ! आजकाल (अपवाद असतील, क्षमस्व) मुलींच्या चेकलिस्ट फार स्पष्ट व्हायला लागल्यात. १,००,००० महिना पगार हवा (मग दिसायला कसाही का असेना मुलगा).. अमूक अमूक शहरात घर असायला हवं... क्वालिफिकेशनहई सिलेक्टिव्हच चालतात... असो. मुलं आपली अजूनही त्यांची चेकलिस्ट स्वप्नातल्या परिशी टॅली करायचा प्रयत्न करत असतात. (अपवाद असतील अर्थातच, पुन्हा क्षमस्व) असो. गुड बन!
  • Log in or register to post comments

येनकेनप्रकारेण भरपूर पैसा आहे

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 17:18 नवीन
येनकेनप्रकारेण भरपूर पैसा आहे की नाही इतकेच हो, बाकी नुसत्या बातां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अशी ती मोहिनी असावी

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/15/2013 - 17:47 नवीन
अशी ती मोहिनी असावी अशी ती संपदा असावी अशी ती चंचला असावी अशी ती कल्याणी असावी अशी ती प्रेरणा असावी अशी ती हर्षदा असावी एव्हढ्या महागाइत्,इतक्या सार्या Image removed.
  • Log in or register to post comments

साउथ सुपरस्टार्स सिनेमातल्या हिरोइनची सर कोनाचाच बायकोला नय!

अग्निकोल्हा
Fri, 02/15/2013 - 18:31 नवीन
सकाळी भल्या पाहटे उठणारी देव दर्शनाला साडि चोळी वरुन देवळात जाउन पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी आचार विचार वागणुकिने भारतिय परंपरा जोपासणारी... नम्र विनयशील प्रसन्न प्रेमळ सात्विक ड्रिम सिक्वेस्न्स सॉगमधे तोटक्या कपड्यात मॅडोना लाजेल अशी कंबर झटकणारी रस्त्यावरच्या लहान मुलांना फुलं फळं वाटुन मग सिन्सीअरली मेडिकल कॉलेज अटेंड करणारी.
  • Log in or register to post comments

=))

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/15/2013 - 18:43 नवीन
देव दर्शनाला साडि चोळी वरुन देवळात जाउन पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी
'पेग मारुन' असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

:)

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 00:09 नवीन
पुजा मारुनच, पेग तर व्यवस्थित तयार केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

असो

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 00:15 नवीन
जर पेग मारणार्‍यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास "मारुन" च्या जागी "करुन" असे बिंधास्त समजावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

बाकी नेमके, पण

बॅटमॅन
Fri, 02/15/2013 - 19:22 नवीन
बाकी नेमके, पण
पुजा मारुन
पार फुटलो राव. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

एssssss,आमच्या "पूजा"

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/15/2013 - 20:14 नवीन
एssssss,आमच्या "पूजा" मारायच्या नाहित हं ! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पूजावाले गुर्जी

अभ्या..
Fri, 02/15/2013 - 21:26 नवीन
कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं :( गुर्जी सोडा आता पूजा. ;) लौकर लाडू द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पार फुटलो राव

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 00:21 नवीन
पार फुटलो राव
त्याच साठी तो शब्द योजला होता... एखादी गोश्ट किती एग्झॅगरेटेड असावी याचं साउथ सुपरस्टार्सच्या चित्रपटातिल होरिइन्स या एक उत्तम उदाहरण ठराव्यात. असलि अतिशयोक्ति दाखवण्यामागे ते पारंपारीक, आधुनिक, ग्रामिण व शहरी भागातिल प्रेक्षकवर्ग मात्र एकाच दमात सांभाळणे हा महत्वाचा हेतु मात्र ते साध्य करतात म्हणूनच त्यांच कौतुक.. नाय तर आपली मराठी मरतुकडी व्यावसायीक चित्रपट सृष्टी... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे बाकी खरंय. सौथचे पिच्चर

बॅटमॅन
Sat, 02/16/2013 - 00:27 नवीन
हे बाकी खरंय. सौथचे पिच्चर निव्वळ गल्लाभरू असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सौथच्या हिरोईनी पण गल्लाभरू

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/19/2013 - 10:32 नवीन
सौथच्या हिरोईनी पण गल्लाभरू असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अश्लील प्रतिसाद

बॅटमॅन
Tue, 02/19/2013 - 12:10 नवीन
अश्लील प्रतिसाद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

>> पुजा मारुन मुलांना

मराठे
Fri, 02/15/2013 - 22:57 नवीन
>> पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी नुसतं "मारून मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी" असं असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

पुजा मारून

रेवती
Fri, 02/15/2013 - 19:20 नवीन
पुजा मारून ओ साहेब, असं जर पूजेला मारायला लागलात तर ती बरी सोडेल?
  • Log in or register to post comments

बघ की

जेनी...
Sat, 02/16/2013 - 00:17 नवीन
बघ की :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ठिक आहे ठिक आहे...

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 00:24 नवीन
मग तिथं पुजा उरकुन असं समजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

असं नै गिल्फुकाका तुमी आधीच

जेनी...
Sat, 02/16/2013 - 00:30 नवीन
असं नै गिल्फुकाका :-/ तुमी आधीच असं नै बाबा लिवाय पाय्जेल हुतं :-/ आता मला कुणी मारुन गेलं म्ह्न्जे ?? :( :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

त्ये सम्द सौदात घडतं...

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 00:37 नवीन
अगं तु सौदी होरोइन्स थोडीच हैस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अय्या ... म्ह्न्जे मी सौदीत

जेनी...
Sat, 02/16/2013 - 00:43 नवीन
अय्या ... म्ह्न्जे मी सौदीत गेली तरच मला मारतिल काय ?? इकडे नै मारणार का मग ?? मन्ग ठिके गिल्फुकाका .... मारा सौदिच्या पूजाला :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

बोर मारु नकोस

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 00:56 नवीन
नाय तर इकडं पन मारतिल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा