लहान मुलांचे उपद्व्याप

मनस्वी's picture
मनस्वी in जनातलं, मनातलं
4 Jul 2008 - 6:00 pm

लहान मुले करमणूक तर करतातच, पण कधीकधी भयंकर उपद्व्याप करून सळो की पळो करून सोडतात.

माझा भाचा आहे. तो घरात कोणी नसताना ब्लेडने बाहुलीचं नाक कापत होता. नाकावरून ब्लेड सटकून त्याच्या तळहाताला कापलं आणि रक्त यायला लागलं. मग त्याची आई रागवेल म्हणून त्यानी जखमेत फेविकॉल भरला. मग दुसर्‍या दिवशी पस होउन ठणकायला लागल्यावर बोंबलला आणि त्याच्या आईला सगळा प्रकार कळला! आता बोला!

तुम्हीपण तुमच्या घरातील / ओळखीतील पाहिलेले / ऐकलेले / अनुभवलेले लहान मुलांचे उपद्व्याप इथे सांगा!

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

4 Jul 2008 - 6:30 pm | विजुभाऊ

माझा मुलगा डाळिंब खाताना नेहमी त्याच्या नाकात डाळिम्बाचे दाणे अडकायचे. आणि मला डॉक्टर कडे धावायला लागायचे. ते दर वेळेस व्हायचे.
असे तीन चार वेळेस झाल्यावर दाणे नाकात का जातात हे मी शोधुन काढले. तो डाळिम्बाचे दाणे ओंजळीत घेउन आणि ओंजळीने तोंड कव्हर करुन मग खायचा. असे करताना नाकासमोर आलेले डाळिम्बाचादाणानाकात अडकायचा.
आम्ही त्यानन्तर तीन वर्षे डाळिम्ब सोलुन देणे बंद केले.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋचा's picture

4 Jul 2008 - 6:33 pm | ऋचा

माझा भाचा काहीही खात असला की त्यात पाणी घालुन खातो. आणि ते ओलं झालं की रडत बसतो.
एक दीवशी जांभुळ खाताना बी गिळली आणि ती घशात अडकली. मग डॉक्टर कडे धावाधाव.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

4 Jul 2008 - 6:43 pm | विजुभाऊ

पाणी घालुन खातो. आणि ते ओलं झालं की रडत बसतो.
=))

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बाबांना डोकेदुखी झाली की ते नेहमी झेंडू बाम लावायचे ज्याची बाटली ते गादीखाली ठेवायचे. मला ( वय वर्षे ५ ) बामचा वास खूपच आवडायचा.. आणि ती अंगावर लावायची गोष्ट असते कळताच मी बाबा झोपल्यावर हळूच जाऊन ती बामची बाटली हस्तगत करून त्यात होतानव्हता तो सगळा बाम अंगाला चोपडून घेतला माझ्या ! बामचा इतका कसा काय वास येतोय असं म्हणत आई आली आणि बघते तर काय आगडोंब उसळल्याने मी भोकाड पसरले होते आणि माझे सर्वांग लालभडक झालेले. आईने ते बघताच पदराने पटापट सगळा बाम पुसून काढला आणि मग आंघोळ घालून थंड मलम लावले होते.

कोणाची उडी सगळ्यात लांब जाते वरून आम्हा गल्लीतल्या पोरापोरींची शर्यत लागलेली आणि त्यात मी ( वय वर्षे ६ की ७ )सगळ्यात लांब उडी मारून नाल्यात पडले होते.. चालले होते वाहून तर मधल्या पाईपवरून कसरत करत येत आईने धरले ( आईचे धाडस सर्वांनी वाखाणले होते तेव्हा ! ). नाल्यात वाहून जाताना एक टोकदार दगड लागून हे भलीमोठ्ठी खोक पडलेली ! घरात जाऊन मूठभर हळद ठुसली होती त्या खोकेत आणि तरी मी आपली पोरांना म्हणतेय,"मीच मारली शेवटी सर्वात लांब उडी !" !!!

आई नेहमी इतर भावंडांचीच काळजी घेते ते आजारी पडले की ( कारण त्यांची आजारपणं लगेच लक्ष दिली नाहीत तर लांबायची ) पण माझ्या दुखण्याखुपण्याकडे मात्र लक्ष देत नाही ( कारण लगेच बरी व्हायचे ना ! ) याचा मला ( दुसरीत होते ) फारच राग. यावर उपाय म्हणून लगेच बरे होणार नाही असे हुकुमी आजारी पडायचे. झाले ! त्याच दिवशी संध्याकाळी मला ताप यायला सुरूवात झाली. हवामान बदलले नाही की काही नाही.. अचानक असे कसे झाले म्हणून आईला चिंता वाटली. आईने हलकेच घेतले नेहमीप्रमाणे पण रात्रीतून माझा ताप जो सण्णकन चढला की दुसर्‍या दिवशी ती सॉल्लिड घाबरली. त्यादिवशी मला उठण्याचीही ताकद उरली नव्हती इतका ताप होता. आईने मला उचलले डॉक्टरकडे न्यायला म्हणून आणि माझे हात लुळे पडल्यागत झाल्याने खाली लोंबकळले आणि कांद्याचे दोन भाग खाली पडले ! माझ्या पूर्ण अंगाला कांद्याचा वास येत होता. हे नक्की काय गौडबंगाल आहे ते बघण्यापेक्षा तिने सरळ डॉक्टरांकडे नेले.. पण तिथवर जाईतो माझा ताप ( जो मी कांद्यायोगे मुद्दाम आणवला होता ! ) उतरला होता !!! खूप बोलणी पडली मला आईकरवी पण मग थोड्यावेळाने तिने रडत मला कुशीत घेतले होते. इट वॉज जस्ट अम्मेझिंग.. मेरा ताप रंग लाया था ! :)

यशोधरा's picture

4 Jul 2008 - 10:25 pm | यशोधरा

>>>जो मी कांद्यायोगे मुद्दाम आणवला होता !

कांद्याने ताप कसा आणायचा गं वेदश्री?? हापिसमधे सुट्टी घ्यायला तरी उपयोग होईल!! सांग बघू?? व्य. नि. कर गं!! ;)

महेश हतोळकर's picture

7 Jul 2008 - 11:55 am | महेश हतोळकर

अहो सगळ्यांना कळूदेत की!!!

ऍडीजोशी's picture

7 Jul 2008 - 4:03 pm | ऍडीजोशी (not verified)

काखेत कांदे धरून ठेवले की शरीराचं तापमान वाढतं :D

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

आनंदयात्री's picture

7 Jul 2008 - 11:37 am | आनंदयात्री

लहान लहान कार्टी भारीच असतात .. त्या शितलचे पोरगे तर इपितर आहे एकदम, ती टाकेलच किस्से त्याचे !

अरुण वडुलेकर's picture

7 Jul 2008 - 11:49 am | अरुण वडुलेकर

मा़झ्या नातवाने ( वय १५ महिने) निरांजनाची ज्योत चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला. अर्थात्‌ अंगठा आणि तर्जनी दोन्ही बोटे भाजली. पण रडला मात्र नाही. अ़जूनही त्याला तोच प्रयोग पुन्हा पुन्हा करून बघावासा वटतोच आहे.

मनिष's picture

7 Jul 2008 - 12:54 pm | मनिष

स्मिता तळवलकरांनी सांगितलेली 'कळत नकळत' ची आठवण - वपुंची नात, मॄणयी हिने त्यात काम केलेल. ती कुठल्यातरी पुरस्कारासाठी दिल्लीला गेली होती स्मिता तळवलकरांबरोबर. त्याच हॉटेल मधे लता मंगेशकर पण होत्या. हि गेली त्यांच्याशी गप्पा मारायला....

मॄणयी - तुम्ही काय करता..तुम्हाला कशाबद्द्ल बक्षीस मिळाले?
लता - मी गाणं म्हणते.
मॄणयी - फक्त गाणं? मी तर अभिनय करते!!!! :)
मॄणयी - माझ्या घरी बाबा बँकेत जातो आणि पैसे आणतो(हिची कल्पना फक्त बँकेत पैसे मिळतात), तुमच्याकडे कोण आणत?
लता - जातो ड्रायव्हर वगैरे...
मॄणयी - पण मग तुमच भागतं कस?
!!!!!!!!!!!!

मी ऐकूनच गडाबडा लोळत होतो.....लता मंगेशकरला 'तुमच भागतं कस'???????????
असे प्रताप लहान मुलंच करू जाणे!

शितल's picture

7 Jul 2008 - 5:01 pm | शितल

आ॑द्याने आता सा॑गितले म्हणजे मला मा़झ्या लेकाचे किस्से सा॑गायला पाहिजेतच.
मा़झा मुलगा हा पहिल्यापासुन हायपर आहे, त्याला पेडाट्रीक कडे घेऊन गेले डॉ. तेथोस्कोप त्याला लावुन पहात होते मग त्यानी तो खाली सोडला, मग मा़झा मुलगा टेबलच्या खाली गेला आणि त्याच तेथोस्कोप ने त्याचे पाय तपासु लागला. डॉ. खुर्चीवरून उठुन हसु लागले. मी त्या॑च्याकडे त्याला जेव्हा जेव्हा घेऊन जाते तेव्हा तेव्हा ते त्याला पाहिल्यावर निम्मे चेअर वरून उठलेलेच असतात.
आणी त्याच्या तो॑डी वाक्य असते व्हेरी डीफिल्ट टु मॅनेज हिम.
एकदा मी स्वय॑पाक करत होते आणी हा लुडबुड करत होता त्याला काही तरी लागले, मग मी त्याला सा॑गितले तु आईचे एकत नाहीस म्हणुनतुला देव बाप्पाने शिक्षा दिली आहे, त्याला काय राग आला काय माहित, देवार्यातील देवाना मारले, बाळकृष्णाला तर तो॑डात घेऊन फु॑कुन टाकले, त्याने दोन पिशव्या आणल्या त्याच्यात सगळे देव ठेवले, सायकलला लावुन एका बेडरूम मध्ये नेवुन आणि मारून
पिशव्या तेथे ठेवल्या, आणी म्हणे मी देवाला कोडु॑न ठेवले आहे.
आम्ही घरातले तर नेहमी सकाळी घरभरातील देव जमवुन आणुन त्याची पुजा करायचे आणि त्याची माफी मागायचे, हा उटला की परत देवाच्या मागे.
पुण्यात आम्ही सेक॑ड फ्लोअर वर राहतो , घरातील वस्तु लाटणे, लायटर, सेल फोन, उशी, जे काही शक्य आहे ते सगळे तो त्या खिडकीतुन टाकतो आणि म्हणे कबुतला घे तुला.
आंम्ही घरात वस्तु मिळत नसेल तर खाली जाऊन बघुन येतो तेथे मिळतेच, आणि अशाही दिवसातुन दोन फेर्‍या मारतोच वस्तु जमा करून आणायला.
प्ले ग्रुप ला गेला तर तेथे एक दिवस बेडकीने खेळत बसला, दुस_या दिवशी मला शाळेत बोलावणे आले, ५ त्याचे वर्तन ह्या वर मला कान सुख मिळाले.
एकदा त्याच्या प्ले ग्रुप ला गेले होते १० मि. होते फोटो पहात होते सगळ्या छोट्या॑चे, तर १० मि. मला दोन टिचरच्या तो॑डुन फक्त यशराज, यशराज, हे नाव ६ ते ७ वेळा एकायला मिळाले, मी त्या॑ना सा॑गितले आय एम यशराजस ममा, तर त्या एकमेकी॑कडे पहात हूश यशराजस ममा करून पहात होत्या.
गावी गेल्यावर घरातील कुत्र्यावर बसुन इकडे तिकडे फिरत असतो, त्याच्या कानात काय आहे ह्याचे त्याची त्याला खुप क्युरॅसिटी आहे.
त्याला गाड्याचा खुप शैक आहे, जाईल तेथे गाडी घेऊन जातो. झोपतानाही गाडी असते शेजारी.
घरी कोणी आले तरी तो दारातच प्रश्न विचारतो तुमच्याकडे कार आहे का?
येथे अमेरिकेत ही आम्हाला दोन वेळा नॉइस क्मप्ले॑ट आली आहे बहुधा खालचे घर सोडुन गेले असतील.
मेडागास्कर ही मुव्ही पाहुन तर प्राणी ज्॑गलात रहात नसुन टी.व्हीत. राहतात असे त्याचे मत आहे
आणि घरी आम्हाला मुव्हीतील प्राण्याच्या नावाने हाक्क मारत असतो.
येथे कॅरीडोअर मधील्ल फायर अलाराम ही वाजवुन झालाय त्याचा.
पुण्यात आमच्या घरा शेजारी गणपती म॑दीर आहे, तेथे हा खेळायला आला की बाकीचे गायब होतात, त्याला वाघ आला म्हणतात.
येथे ही हा घराचे दार उघडला की कॅरीडोअर मधुन जे पळत सुटतो, त्यामुळे बाकीच्याच्या घरातील बरीच कुत्र्याचे भु॑कणे एकावे लागते.
खुपजण तर त्याचे कारणामामुळे त्याला पहायला येतात.

झकासराव's picture

8 Jul 2008 - 11:28 am | झकासराव

=))
धमाल किस्से आहेत यशराजचे.
बाकीचे किस्से देखील मस्त. वाचता वाचता मला अचानकच झंकार बीट्स मधला शेवटचा प्रसंग आठवला. :))
माझा बाळ अजुन लहान आहे पण तोहि बराच ऍक्टिव्ह आहे. रोज सकाळी मला त्याच्या थपडा खावु उठाव लागत. (अर्थात त्याला माझ्या जवळ आणुन सोडण्याच पुण्यकर्म बायकोच करते)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा's picture

9 Jul 2008 - 9:14 pm | वरदा

शितल सॉलीड किस्से आहेत गं यशराज चे.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 12:05 pm | मनस्वी

शितल.. यशराज एकदम अफलातून दिसतोय! सॉलिड किस्से आहेत. :D

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल's picture

9 Jul 2008 - 9:56 pm | शितल

अग हो ना तो प्रच्॑ड उपद्व्यापी आहे.
अग त्याच्या किस्स्याचे पुस्तक होईल नेहमी नविन काही तरी करामत असतेच
त्याच्या बायसिकलवर बसतो आणि म्हनतो बस तुला पपा कसे नेतात तसे फिलवुन आणतो. :)

वरदा's picture

9 Jul 2008 - 10:00 pm | वरदा

माझ्या समोर एक छोटी मुलगी रहायची ती अशी सगळं तिचे आई बाबा तिला करतील ते तिच्या बाहुलीला करायची...हळूहळू मलाही करायला लागली...एक दिवस मला जेवायचा कंटाळा आला होता आणि मी वाचत होते, तर आली आणि म्हणते ' लवकर वरण भात खा सांगितलेलं कळ्ळं नाही वाट्टं' आणि एक मस्तपैकी ठेवून दिली चापट जोरात...जशी तिची आई तिला द्यायची तशी..:)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल's picture

9 Jul 2008 - 10:03 pm | शितल

हा हा हा वरदे, तुला मा़झ्या लेकाला १ तास तरी साभा॑ळायचे आहे
मनाची आणि शरीराची तयारी ठेव.
तुला हवा तो खाऊ देईन.:)

वरदा's picture

9 Jul 2008 - 10:06 pm | वरदा

बघ हं चॅलेंज्...मी नक्की सांभाळीन्...पण मग खाऊ ची लिस्ट मोठी असेल तू पण तयारी ठेव....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल's picture

9 Jul 2008 - 10:07 pm | शितल

हो नक्की.
:)

प्राजु's picture

10 Jul 2008 - 1:18 am | प्राजु

आम्ही इकडे परत येताना, फ्लाईटमध्ये बोर्डिंग केलं. विमान जेव्हा रन वे आलं.. तेव्हा बहुतेक टेक ऑफ साठी ट्रॅफिक असावं. कारण विमानाचं इंजिन चालू झालं , सगळे लाईट्स लागले आणि साधारण २-४ मिनिटांनी इंजिन बंद झालं आणि लाईट्स सुद्धा बंद झाले. माझ्या लेकाने काय विचारावं??? कल्पना करू शकाला?? म्हणाला, " विमानाचे सेल संपलेत का?".. :) नवर्‍याने त्याला सांगितलं, " या विमानात सेल नसतात, हे पेट्रोलवर चालतं" तर लगेच पुढचा प्रश्न , " मग आता पेट्रोल पंपावर जाणार का?".. आम्ही दोघेही शांतपणे बसून राहिलो.. काय सांगणार याला आता?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

11 Jul 2008 - 5:17 pm | शितल

अग प्राजु मा़झा लेक तर काय बोलला असेल गेस कर,
अग त्याने मला पुण्या पासुनच त्रास द्यायला सुरूवात केली एअर पोर्टच्या बाहेर रस्त्यावर मस्त कुत्र्यामा॑जारासारखे लोळला,
घरातल्या कपड्यावर एअर पोर्ट वर होता, नविन घालायलच तयार नाही, न॑तर आत गेल्यावर तर बॅग जाते तेथुन सारखा जात होता,
कार्ट चे गाडी गाडी करून सगळ्याना धडका दिल्या,
न॑तर मात्र त्याने जे रडायला सुरूवात केली अगदी एमिग्रेशनला जे सगळे होते आणी ते थे बॅग चेकीग साठी त्याचे सगळ्याचे लक्ष ह्याच्या मोठ्या रडण्याकडे, मग सुक्युरीटीच्या एका माणसाने ह्याला उचलले, मा़झे फॉर्म ही त्याच्याच लोका॑नी भरले, मला कोठे ही न लाईन मध्ये था॑बवता, सगळ्या फॉर्मॉलीट ह्याच्या रडण्यामुळे नाममात्र झाल्या,
मग ह्याला फ्रुटीच हवी झाली ती ही मोठी बॉटल मग माझीसहनशीलता स॑पली टॉयलेट मध्ये नेऊन यथोच्छ मार दिला, कपडे सगळे कचर्‍यात टाकले मग
त्याचे आवरून विमानत चढले तर सगळे पॅसे॑जर मला त्याच्या बद्दल विचारत होते,
आणी कसे वागवाय्चे ह्याच्या चा॑गल्या सुचना देत होते,
आणि विमानात तर हा शु करायला चल म्हटल की मला बाहेर करायची आहे, मी त्याला म्हणाले विमान कोठुन जाते आकाशातुन मग तु बाहेर कसा जाणार तर म्हणे हवे करून येतो.:)
अनुराग नावाच्या एका मुलाने मला अमर मला दिसेस पर्य्॑त मदत केली कारण त्याने यश चे रूद्र रूप पाहिले होते त्यामुळे तो मध्ये हा काही त्रास देतो का हे पहात होता त्याला घेऊन फिरवत होता.

मग ह्याला फ्रुटीच हवी झाली ती ही मोठी बॉटल मग माझीसहनशीलता स॑पली टॉयलेट मध्ये नेऊन यथोच्छ मार दिला, कपडे सगळे कचर्‍यात टाकले मग

बापरे!

आणी कसे वागवाय्चे ह्याच्या चा॑गल्या सुचना देत होते,

प्रत्येकाकडे द्यायचा १-१ तास सांभाळायला.

हवे करून येतो.

:)

काही त्रास देतो का हे पहात होता त्याला घेऊन फिरवत होता.

अनुराग देवासारखा धावून आला म्हणजे!

मनस्वी
"केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

शितल's picture

11 Jul 2008 - 5:43 pm | शितल

अग मी मा़झ्या नव-याला सा॑गितले आहे,
जाताना मी ह्याला घेऊन एकटी जाणार नाही, बरोबर हवे कोणी तरी.
अग मला सतत ह्याच्या मुळे तो॑डात एकच शब्द असतो समाजात गेल्यावर सॉरी, सॉरी आणी सॉरी........
आणि येथे मारायची, ओरडायची ही सोय नाही
अग असे एकदा येथे
त्याने ऍम्बुलन्स सर्व्हिस वाल्या॑ना ही फोन लावुन झालाय.
मी वैतागुन म्हणाले होते (फोन ब॑द केल्यावर) न्या मलाच एकदा आता.

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 5:48 pm | मनस्वी

शितल, आत्ता थोडं शांततेत घे. अशी खोडकर मुलं मोठेपणी एकदम शांत होतात म्हणे!

मनस्वी
"केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

शितल's picture

11 Jul 2008 - 5:59 pm | शितल

अग मला ह्याची शा॑ती करायला सा॑गितली आहे घरातल्या॑नी
अशी खोडकर मुलं मोठेपणी एकदम शांत होतात म्हणे!

आणि तसे झाले तर चा॑गले आहे तु़झ्या तोडा॑त साखर पडो,
अग हा बोलतो कमी प़ण कृती मात्र कैच्या कै
अग १ मि. हा शा॑त नाही ग
फक्त ऍनिमेटेड मुव्ही बघताना फुल कॉन्सनट्रेशन देतो

वरदा's picture

10 Jul 2008 - 2:03 am | वरदा

विमानाचे सेल संपलेत का?
=))

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग's picture

10 Jul 2008 - 2:31 am | चतुरंग

तीन-चार वर्षांचा असेन. आंघोळीनंतर आई मला काजळ घालायची एवढे माहीत होते. काजळाची डबी हाताळायला मला फार आवडे. आई डबी कुठे ठेवते हेही मी बघून ठेवले होते. एका दुपारी त्या डबीचा विषय डोक्यात आला नेमकी आई कुठेतरी बाहेर गेली होती आणि मला संधी मिळाली.
स्टूल घेऊन चढलो. पोपटी हिरव्या रंगाची ती चपटी डबी काढली. काय आनंद झाला होता अजून आठवतोय!
डबी उघडून काजळ लावायला सुरुवात केली. काजळ नेमकं कुठे आणि कसं लावतात हे कुठे माहीत होतं. झालं, आरशात पाहून-पाहून सगळ्या चेहेर्‍यावर काजळ माखून घेतले एकही जागा मोकळी ठेवली नाही.
त्यावरही कडी म्हणजे आमच्या वाड्यात एक बिर्‍हाडकरु होते त्यांच्या ताईला सांगायला गेलो (बहुदा मीना नाव होतं तिचं) "मीनाताई, मीनाताई बघ मी काजळ लावलंय!" ती मला बघून एकदम ओरडलीच कारण संपूर्ण काळाठिक्कर चेहेरा आणि त्यातून लुकलुकणारी पांढरी बुबुळे बघून ती चाट पडली!
तेवढ्यात मातोश्री आल्या. मला बघून तिला काय बोलावे ते सुचेना. तिला जाम राग आला होता पण माझा अवतार बघून हसूही येत असावे. हातातल्या पिशव्या खाली टाकल्या आणि पदर खोचून मला न्हाणीघरात घेऊन गेली. एकीकडे तिचा तोंडाचा पट्टा चालूच होता, "काय कार्टं आहे पण वा वा! कुठं जायची म्हणून सोय नाही!" "जरा पाठ वळली की केलंच काहीतरी." "कुणी सांगितलंय नसते उपद्व्याप?" असं भरपूर बोलून घेत घेत चेहेर्‍यावर रॉकेल, साबण, घोसाळ्याची जाळी असं काय काय चोळत आंघोळच घातलीन. संपूर्ण चेहेरा लालबुंद होऊन हुळहुळत होता. मग त्यावर आईने अफगाण स्नो लावला. पुढे कितीतरी दिवस ती सुरस कथा लोकांना सांगितली गेली. त्यावेळी त्यात एवढा गाजावाजा करण्यासारखे काय आहे हे न कळल्याने मला राग येत असे.

चतुरंग

शिप्रा's picture

11 Jul 2008 - 11:49 am | शिप्रा

माझा मॅत्रिणीची भाच्ची ....एक्दा तिच्या आजोबांबरोबर बाहेर चालली होती...म्हणून तिचि आजी तिला म्हणाली मनु पापी दे...तर मनु कसची ..देणार नाहि म्हणाली....म्हणुन आजोबां म्हणाले आसे नाहि करायचे ...दे पटकन पापी...
तर चिडुन म्हणाली ....तुम्हीच द्या..... =))
मनुचे आइ वडिल गारच पडले..आणि आम्हाला हासावे का रडावे कळेना....

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

आनंदयात्री's picture

11 Jul 2008 - 11:53 am | आनंदयात्री

=)) =)) =))

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 12:03 pm | मनस्वी

जबरदस्त!
:D

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

तर चिडुन म्हणाली ....तुम्हीच द्या..... >>>>>>>>>.

=)) =)) =))

मग आजोबानी काय केले?? :D
*** म्हणजे कपाळावर हात मारुन घेतला का अस विचारतोय मी. *** ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रम्या's picture

11 Jul 2008 - 1:26 pm | रम्या

एक दिवस शेजारी आमच्या घरी गप्पा मारत बसले होते. थोड्यावेळाने त्यांचा चार वर्षाचा मुलगा भावेश आमच्या कडे आला आणि मला म्हणाला,
"एक गम्मत सांगू, आई आणि पप्पांचं भांडण चाललं होतं. आईने पप्पांना खूप मारलं. आणि पप्पा घाबरले!".
बाजूला बसलेल्या पप्पांनी त्याला आमच्या समोरच बदडायला सुरवात केली. आणि आम्ही खाली मान घालून हसू दबून ठेवयला पाहत होतो. :D

रम्या

आनंदयात्री's picture

11 Jul 2008 - 2:17 pm | आनंदयात्री

ठ्ठोsss ठ्ठोsss ठ्ठोsss

=)) =)) =))

लै भारी रम्या !! हाण हाण तिचायला .. लैच इपितर कार्ट .. ख्या ख्या ख्या !

डोमकावळा's picture

11 Jul 2008 - 2:54 pm | डोमकावळा

आमच्या शेजारचे दोघं मुलं, सत्यजीत आणि सुबोध खेळत होती. त्यांचे घरचे बाहेर गेले होते. खेळता खेळता त्यांनी कात्र्या आणि कंगवे घेऊन एकमेकांचे केस कापले. त्यांचे वडील घरी आल्यावर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनी सुबोधला फटके मारायला सुरुवात केली. एकदोन फटके पडल्यावर तो रडक्या आवाजात बोलला, "पप्पा, मला शू लागली आहे. मी करून येतो तोपर्यंत तुम्ही सत्यजीतला मारा". बस्स... त्याचे वडील मारायचं सोडून हसायला लागले आणि आम्ही सुद्धा.... :D

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 3:25 pm | मनस्वी

मी नवीन गाडी आणली आणि सकाळी हार वगैरे घालून बहिणीने आणि मी पूजा केली. माझा भाचा येईल त्याला सांगत सुटला, मावशीच्या गाडीचं सकाळी लग्न केलं म्हणून! :D

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

अन्या दातार's picture

11 Jul 2008 - 4:13 pm | अन्या दातार

मावशीच्या गाडीचं लग्न

=)) =)) =)) =))

लई भारी!

अनामिक's picture

11 Jul 2008 - 6:08 pm | अनामिक

अहो माझ्या चुलत मामाच्या मोठ्या मुलाने भगत सिंग कि मंगल पांडे बघून आल्यावर त्याच्या ४ वर्षाच्या लहान भावाला आपण "फाशी -फाशी" खेळू म्हणाला. त्याच्या गळ्यात टावेलचा फास घालून मामीला म्हणतो "आई याला त्या खुंटीवर लाव, आम्ही फाशी-फाशी खेळतोय"....आता बोला...!!

शितल's picture

11 Jul 2008 - 6:13 pm | शितल

बाप रे
फाशी फाशी...
लईच डेन्जर आहे हे.

रम्या's picture

14 Jul 2008 - 12:59 pm | रम्या

माझ्या विभागात राहणार्‍या एका गॄहस्थाच्या ४ वर्षाच्या मुलीने तर कहर केला.
दिवाळीला फटाक्यांमधली दारू काढून घेतली. ती सगळी एका कागदावर ठेवून त्याची सुरळी केली आणि सिगरेट ओढायची म्हणून एक बाजू तो़डात ठेवून दुसरी आगकाडीने पेटवून दिली!! गोबरे गोबरे गाल, लालचुटूक ओठ पोळले गेले. बापाची सिगरेट ओढायची सवय लेकीला भारी पडली.

रम्या