✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र

श
शुचि यांनी
Fri, 02/08/2013 - 03:38  ·  लेख
लेख
डिसक्लेमर - कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. पण ते रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख असून ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा. ____________________________________________________________________ एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर. तू मला अरसिक म्हणणार मला माहीत आहे. कारण तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे कामधाम सोडून, कविता वाचणे, सूर्यास्त अनुभवणे व अन्य .... पण ते सर्व "इम्पल्सिव्ह" अगदी मनस्वी, कलंदरपणे. मलादेखील ते सर्व अनुभवायचे आहे रे पण मी पडले "कन्या रास आणि ६ व्या घरात शुक्र" पडलेली प्रेयसी. फारशी काव्यात जगणारी नाही. 'वहावत जाणं" तर मला माहीतच नाही. मी, आपल्या प्रियतम व्यक्तीच्या "उपयोगी" पडण्याकडे कल असलेली. म्हणजे बघ - कोणी मला २ पर्याय दिले की मी तुझी सर्वात लाडकी प्रेरणा बनू शकेन अथवा तुझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुझा आधार व तुझी सहचारी बनू शकेन तर २ रा पर्यायच अतिशय आनंदाने निवडणारी. नवरंग सिनेमातील "जमुना" याच अगदी याच पठडीतली. बरेचदा माझं असं वागणं तुला त्रासदायक होतं याचीही मला जाणीव आहे.म्हणजे सकाळी तू लाडात यावं आणि मी तुला आंघोळ, मुखपक्षालनाकरता पिटाळावं हाच आपला नॉर्म (नेहेमीचं). रात्री तुला एखादी गाण्याची अथवा कसेही मैफिल जागवण्याची हुक्की यावी पण माझ्या कर्तव्यदक्षतेमुळे , दुसर्‍या दिवशीच्या रुटीनच्या विवंचनेमुळे आपण तो बेत रद्द करावा हे अनेकदा घडतं. "यु आर नेव्हर इन द मोमेंट" ही तुझी नेहमीची तक्रार आणि त्यावर माझं उत्तर ठरलेलं - "कामंधामं सोडून कोण रमणार कलेत? चल सोड मला चिक्कार पसारा पडलाय" "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितीजाच्या पलीकडे ऊभे दिवसाचे दूत" अशा कर्तव्यपरायणताप्रधान ओळी कुसुमाग्रजांना आमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच सुचल्या असाव्यात. पण याचा अर्थ असा नाही की मला तुझ्याबरोबर सूर्यास्त अनुभवायचा नाही. मलाही एक कविता तुझ्याबरोबर अनुभवायची आहे, अगदी तुझ्याशी तादात्म्य पावून, त्या कवितेला तुझ्या डोळ्यांतून वाचत. मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
19669 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

अनपेक्षितपणे

शुचि
Fri, 02/08/2013 - 22:50 नवीन
बॉर्र :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

राहू-केतू

राही
Sat, 02/09/2013 - 00:20 नवीन
राहू केतू या दोन ग्रहांस (फलज्योतिषापुरते ग्रहच)६-१२ही स्थाने त्यातल्या त्यात बरी.ते ज्या स्थानी पडतात त्या स्थानाला हानी पोहचवतात.मग राहू रोगस्थानी पडलेला बरा. रोग पळवून लावतो, नोकरवर्गावर वचक ठेवतो. राहू सहामध्ये म्हणजे केतू बारामध्ये आलाच. कन्याराशीसंदर्भात माझे निरीक्षण असे आहे की या राशीच्या व्यक्ती चंचल,संशयी असतात.यांना सुपरमॅन किंवा वुमन व्हायचे असते म्हणून बरीचशी ओझी अंगावर घेतात पण धड कुठलेच काम पार पाडू शकत नाहीत. बघतात एकीकडे,चालतात दुसरीकडे आणि मनात विचार तिसरेच असतात.छोट्या छोट्या बॅटल्स जिंकतात पण वॉर जिंकणे इनके बसकी बात नहीं.अर्थात हे सरसकटीकरण झाले. स्पेसिफिक केसेस असतातच. टापटीप आणि सौंदर्यदृष्टी हे खास वृषभवाल्यांचे गुणविशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

खरे आहे केतु हा मीनेत उच्चीचा

शुचि
Sat, 02/09/2013 - 00:27 नवीन
खरे आहे केतु हा मीनेत उच्चीचा. त्याची अध्यात्मिकता मीनेशी व्यवस्थित रेझोनेट होते.
टापटीप आणि सौंदर्यदृष्टी हे खास वृषभवाल्यांचे गुणविशेष.
असावेत. वाचले आहे असे. शेवटी शुक्राची स्वरास व चंद्राची आवडती रास :) चंद्राची आवडती रास म्हणजे चंद्र आपले सर्वात सुंदर व मौल्यवान वस्त्रप्रावरण परीधान करुन या राशीत येतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

या गोष्टी शिकण्याचे लेसन्स

रेवती
Sat, 02/09/2013 - 00:31 नवीन
या गोष्टी शिकण्याचे लेसन्स कुठे घेतलेस शुचीतै? (ही चेष्टा नव्हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

रेवती छंद आहे.... नादच म्हण

शुचि
Sat, 02/09/2013 - 00:33 नवीन
रेवती छंद आहे.... नादच म्हण ना. नेटवर खूप वाचते. लायब्ररीतून पुस्तके आणते, विकत घेते. १२ वर्षापूर्वी दादरला एका ठीकाणी क्लास लावायला गेले होते पण जमले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पूर्वी मला खूप वाटायचे की

शुचि
Fri, 02/08/2013 - 22:18 नवीन
पूर्वी मला खूप वाटायचे की लॉटरी लागावी पण मग अनेक बातम्या वाचल्या - लॉटरीमुळे हर्षवायू, किडनॅपींग, खून :( बाबौ तेव्हापासून कधीच तिकीट खरेदी केले नाही. . . . पाहीलत ही ६ व्या घरातील स्टॅलिअमची अनाठायी चिंता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कन्या राशीवाल्यांना कसलेही

धन्या
Sat, 02/09/2013 - 00:35 नवीन
कन्या राशीवाल्यांना कसलेही प्रश्न पडतात म्हणे. "कुणाला कशाचं तर बोडकीला केसांचं" असा एकंदरीत प्रकार असतो. प्रेमाची गोष्ट चित्रपटात एक पावसाचं गाणं आहे ज्याच्यात तो अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगे दर्दभरं गीत गात भिजत असतात. आमचे कन्या राशीय मित्र म्हणे हे लोक पावसात भिजताना मोबाईल कुठे ठेवतात. :)
  • Log in or register to post comments

हाहा

शुचि
Sat, 02/09/2013 - 00:38 नवीन
टू गुड!!! मस्त!! येऊ द्या असे किस्से!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नवर्‍यावर मिथुनेचा बराचसा

शुचि
Sat, 02/09/2013 - 00:45 नवीन
नवर्‍यावर मिथुनेचा बराचसा प्रभाव आहे. एकदा माझी मुलगी लहान असताना बार्बी मागत होती. मी फणकार्‍याने म्हटले - "बार्बी बिर्बी काही नाही आणायची. बार्बी कल्चर नकोय आपल्या घरी." नवरा खवचटपणे खिदळत आणी मला नखशिखांत न्याहाळत म्हणे "नाही गं आपल्याकडे ते कल्चर नाही. डोंट वरी" :D मी रागाने लाल!!
  • Log in or register to post comments

मस्तंय किस्सा...

धन्या
Sat, 02/09/2013 - 00:52 नवीन
मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास आहे ना? बाकी थोडंसं मेष आणि वॄश्चिक बद्दल चर्चा करायला हरकत नाही. त्यानंतर शक्य असेल तर सिंह. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास

कवितानागेश
Sat, 02/09/2013 - 01:10 नवीन
मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास आहे ना?> होच्च मुळी! :)
  • Log in or register to post comments

ओके माऊताई.

रेवती
Sat, 02/09/2013 - 01:57 नवीन
ओके माऊताई. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कन्या राशीचे लोक सतत साशंक

श्रिया
Sat, 02/09/2013 - 09:43 नवीन
कन्या राशीचे लोक सतत साशंक असतात म्हणे. घरातलेच एक निरीक्षण म्हणजे उठसूठ हात धुवायचेच, पण हात धुताना प्रत्येक वेळी नळसुद्धा धुवून घ्यायचा.
  • Log in or register to post comments

पारख

निनाद
Sat, 02/09/2013 - 10:51 नवीन
कन्येचे लोक अतिशय पारखी असतात. यांचे व्यक्तींविषयीचे अंदाज कधीच चुकत नाहीत. कन्या रास उत्तम असलेल्या माणसाचा व्यक्तींविषयक सल्ला अवश्य घ्यावा. तत्क्षणी तो योग्य वाटला नाही तरी. प्रत्यक्षात त्यांनी म्हंटलेलेच खरे होते असा अनुभव आहे. यांचा संशयही अनाठाई असत नाही. त्यांना जेथे धूर दिसतो तेथे नक्की आग असते!
  • Log in or register to post comments

मला भेटलेल्या (जवळच्या) तीन

प्रसाद प्रसाद
Sat, 02/09/2013 - 13:08 नवीन
मला भेटलेल्या (जवळच्या) तीन कन्या राशीच्या व्यक्ती मात्र अगदी विरुद्ध. नवीन परिचय असताना कोणीही गोड बोलले की लगेच फसतात, मानापमानाच्या कल्पना जरा जास्त तीव्र असतात. स्वभावात बरेच वेळा संशयीपणा पण दिसून येतो. मला भेटलेल्या तीन व्यक्ती पैकी दोघांना बऱ्याच वेळा चेष्टा केलेली कळत नाही लगेच राग रुसवा वगैरे सुरु होतो. पण स्वभावाने कन्या राशीचे लोकं प्रेमळ असतात असा माझा जनरल अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

शुक्र विचार

रामदास
Sat, 02/09/2013 - 18:43 नवीन
काही वर्षांपूर्वी फलज्योतीषाचा अभ्यास करताना ह. ना.काटवे नावाच्या एका लेखकांची मंगळ विचार -रवि विचार अशी काही छोटी छोटी पुस्तके -पुस्तीका-वाचली होती . आता या नंतर जे काही लिहीतो आहे त्याचा काटव्यांचा काही संबंध नाही. शनीवारच्या निमीत्ताने काही निरीक्षणे आणि विचार ऑल माय ओन वर्क ) शुक्र हवा की नको असा काही पर्याय नसतो. बाकी ग्रह जसे आपोआप येतात तसा तोही असतोच पण बाकी ग्रह जन्मतः छळतात तसा हा लहानपणापासून छळत नाही.साधारणपणे वयाच्या चौदाव्या किंवा पंधराव्या वर्षापर्यंत शुक्राचे अस्तित्व जातकाला जाणवत नाही. त्याचा अंमल निद्रावस्थेत कधीकधी जाणवतो. ह्याला पौगंडवस्थेतला शुक्र असे म्हणतात. कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत हळूहळू त्या शुक्राचा चुलबुल पांडे होतो. ह्या अवस्थेला शुक्राचा उदय झाला असे म्हणतात.पण घरातील इतरांचे ग्रह या शुक्रावर नजर ठेवून असतात त्यामुळे त्याला नोकरी लागे पर्यंत स्तंभी याच अवस्थेत रहावे लागते.नोकरी लागल्यावर साधारण वर्ष दोन वर्षात घरातले इतरांचे ग्रह आपल्या शुक्राला सिरीयसली घ्यायचे म्हणतात पण मनावर घेत नाहीत. अशा वेळी जातकाने आपला शुक्र पंचमाच्या पंधरा अंशावर आलेला आहे असे जाणवून द्यावे.( तो पंधरा अंशावर आलेला नसतो पण तसे म्हणावे.) यानंतर शुक्राची दशा सुरु होते आणि विवाहसुखाची सुरुवात होते पण ही दशा जेमतेम वर्ष दिड वर्ष टिकते आणि चंद्राच्या अंतर्दशेत गुरुची प्रत्यंतर दशा सुरु होऊन अपत्यप्राप्ती होते. ह्यानंतर शुक्राला काही काळ वनवास सहन करावा लागतो. अशावेळी शुक्र वक्री मार्गाने जाण्याची शक्यता असल्याने त्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येते. (फार फार वर्षांपूर्वी "अमुक तमुकच्या डिलीव्हरीत धाकटी आली मदतीला आणि झाली सुरु थेरं अशा स्टोर्‍या वारंवार ऐकवण्यात येतात) यानंतर "अटी व शर्ते लागू "या नियमानी शुक्राला वाव देण्यात येतो पण बाळाची कन्या रास असल्यास बाळ झोपल्यासारखे दिसले तरी ते झोपलेले नसते याचा विचार करावा लागतो. (अधीक तपशील जाणून घेण्यास वपुंची बहुत दिन नच भेटलो ही कथा वाचावी.) पुढील काही वर्षात शुक्र फक्त शनीवारीच उगवतो आणि शनीवारीच मावळतो.यानंतर काय सांगावे जातकाच्या पन्नाशीच्या नंतरच्या वयात शुक्राला चोर शुक्र म्हणतात. काही राज्यात या वयात जातकाला कूपन सिस्टीमवर ठेवण्यात येते. ही कूपने जमा करता येत नाहीत आणि एकाच वेळी सगळी कूपने वापरण्याची क्षमता शुक्रात नसते त्यामुळे चोर शुक्राचा हिरमुसलेला शुक्र होतो. आणखी काय सांगावे शुक्राबद्दल ? साठीच्या नंतर तो शनीसोबत उर्ध्वदिशेनी प्रोस्टेट या ग्रंथीत ठाण मांडतो आणि त्याचे कारकत्व कायमचे संपुष्टात येते. आता थोडेसे गांभीर्याने : कन्या राशीप्रमाणे चंद्र कुंडली मांडली तर पंचमातील आणि ष्ष्ठातील राशी एकाच ग्रहाच्या मालकीच्या असतात. येथे जातकाचा विचार करताना दोन महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करावा . १ शुक्र हा सौंदर्याचा किंवा लैंगीक आयुष्याचा कारक म्हटला जात असला तरी त्याचा बिजगुण आसक्ती हा आहे. शनीच्या घरात या आसक्तीलाकिती वाव मिळेल ? २ सहावे स्थान हे पंचमाच्या सातत्याचे स्थान आहे.पंचमाची फळे किती सातत्यानी मिळतील असा विचार करताना सहाव्या घरातील शुक्र कितपत कामाला येईल ? शनीचा बिजगुण विरक्ती आहे हे लक्षात घेतल्यावर बाकीचे प्रश्न पडणार नाहीत . तूर्तास इतकेच
  • Log in or register to post comments

शुक्र ग्रह संबंधित विनोदी

शुचि
Sat, 02/09/2013 - 19:06 नवीन
शुक्र ग्रह संबंधित विनोदी ललीत अतिशय आवडले. ६० व्या वर्षानंतर शुक्राचा प्रभाव संपुष्टात येणे त्याआधी कुपन सिस्टीम हे मुद्दे अतोनात "वाईट वाटायला लावणारे" वाटले परंतु त्यांना दिलेली विनोदाची फोडणी फार आवडली. कन्या रास प्रबळ असलेले लोक = ६ व्या घरात शुक्र असलेले लोक असा काहीसा विचार माझ्या ललीतामध्ये मांडला आहे. मी कन्या लग्न+६ व्या घरात शुक्र असा विचार केला नव्हता. पुढचे घर हा आधीच्या घराचे सातत्य दर्शवितो (पक्षी आधीचे घर उदाहरणार्थ ५ घ्या ना हा पुढील म्हणजे ६ व्या घराचा पाया असतो) हा विचार आवडला. या संदर्भात फार अचूक व मुद्देसूद पुस्तक वाचल्याचे स्मरते. पण त्याला १५ वर्षे लोटली. ७ वे घर विवाह तर पुढील घर ८ वे हे विवाहाचे विस्तारीकरण अर्थात लैगिक सुख दर्शविते. १ ले घर व्यक्तीमत्त्व तर २ रे घर व्यक्तीमत्त्वाचेच विस्तारीकरण अर्थात "पझेशन्स्/वित्त" आदि दर्शविते. अशी बरीच सखोल सांगड त्या पुस्तकात वाचली होती. या विचारांचा मागोवा घेणारे लेख धांडोळून वाचेन म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

माझा लेख परत वाचला.कन्या

शुचि
Sat, 02/09/2013 - 19:51 नवीन
माझा लेख परत वाचला.
कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात.
या वाक्यावरुन चंद्र रास=कन्या आणि शुक्र ६ व्या घरात असा ग्रह होणे स्वाभाविक आहे. रामदास यांचा तसा ग्रह झाला याला माझ्या लेखनातील चूकच (मर्यादा) करणीभूत आहे. पण असा कन्येचा डबल व्यग्रपणा एनीवे शनिच्या घरात पडलेल्या शुक्राने दर्शविला जातोच आहे. तेव्हा वरील सर्व म्युझिंग लेखाशी रेझोनेट होते आहे. : ) या निमित्ताने एक चांगला प्रतिसाद वाचावयास मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मस्त निरिक्षण

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/10/2013 - 15:05 नवीन
काश आज ह ना काटवे जिवंत असते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ओह माय गुडनेस!

दादा कोंडके
Sat, 02/09/2013 - 23:59 नवीन
एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर.
बेशुद्ध पडल्यामुळे पुढचं वाचू शकलो नाही. स्वारी.
  • Log in or register to post comments

येक उत्सुकता

एस
Sun, 02/10/2013 - 00:14 नवीन
शुचिजी, कन्या आधिक सहाव्यातला शुक्र ह्ये काम्बिनिशन आसलेल्या पुल्लिंगी मनुष्यांचं बी आसंच आसतं काय? थोडा टार्च मारा की ह्या गहन टॉपिकवर... (अवांतर - मी जगातला सर्वात रोमॅंटिक पुरुष आहे असं माझं ठाम मत आहे, तर माझा आणि रोमान्सचा दूरदूरपर्यंत संबंध नाही असं त्यावर मी सोडून बाकी सगळ्यांचं उत्तर आहे. ह्यामागचं रहस्य आत्ता कळालं.)
  • Log in or register to post comments

हो असंच असावं असं वाटतं.

शुचि
Sun, 02/10/2013 - 03:56 नवीन
हो असंच असावं असं वाटतं. स्त्री काय अन पुरुष काय स्वभावात साम्य असू शकतं की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा

संजय क्षीरसागर
Sun, 02/10/2013 - 00:51 नवीन
मला ज्योति आणि आशा दोन्हींचे वावडे नाही म्हणून विचारतो : शुक्र हा शब्द नक्की काय दर्शवतो? ग्रह, आचार्य की जंतु? तो कशावरनं आला असावा? शुक्रिया शब्दावरनं आठवलं, शुक्र क्रिया असं काही आहे का?
  • Log in or register to post comments

इथे ग्रह म्हणून वापरला आहे.

शुचि
Sun, 02/10/2013 - 03:57 नवीन
इथे ग्रह म्हणून वापरला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण "दैत्यानाम परमम गुरुम" असा

शुचि
Sun, 02/10/2013 - 04:27 नवीन
पण "दैत्यानाम परमम गुरुम" असा उल्लेख आहे खरा शुक्राच्या मंत्रात. माझा फॉर्मल (विधीवत) अभ्यास नसल्याने थोडा संभ्रम आहेच याबद्दल. एक-दोनदा ही शंका आली होती की शुक्र ग्रह की राक्षस गुरु? ज्युपिटर = गुरु हे देवांचे गुरु की ग्रह? कारण गुरुच्या मंत्रात देवानाम च ऋषीनाम च गुरुं असा उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

शुक्राच्या मंत्रात?

संजय क्षीरसागर
Sun, 02/10/2013 - 07:36 नवीन
काय आहे मंत्र?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हिमकुन्दमृणालाभम दैत्यानाम

शुचि
Sun, 02/10/2013 - 07:40 नवीन
हिमकुन्दमृणालाभम दैत्यानाम परमम गुरुम सर्वशास्त्रप्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यहम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मस्त लिहिलय.

विजुभाऊ
Sun, 02/10/2013 - 18:45 नवीन
मस्त लिहिलय. शंका: वृषभ रास ही शुक्राची रास समजली जाते. सर्व वृशभ व्यक्ती कायम शुक्राच्या प्रभावाखालीच असतात का?
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाही.

शुचि
Mon, 02/11/2013 - 19:39 नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

घातक युती

चावटमेला
Sun, 02/10/2013 - 18:49 नवीन
माझा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नाही, पण जे थोडेफार पौराणिक कथांचे वाचन केले आहे, त्या आधारे कुतूहल म्हणून शंका विचारतो. बृहस्पती हा देवांचा गुरु आणि शुक्र हा राक्षसांचा, हे दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू, बुध हा चंद्राचा अनौरस पुत्र, तर रवि आणि शनि ह्या बाप्-लेकांमध्ये आडवा विस्तव जात नाही, मग माझ्या अंदाजाने गुरु-शुक्र, बुध्-चंद्र, रवि-शनि, अशा युती त्या त्या स्थानाची वाट लावत असतील ना? (लॉजिकल थिंकर ;)) चावटमेला
  • Log in or register to post comments

शक्य आहे. अशा टाइपचं काहीतरी

शुचि
Mon, 02/11/2013 - 19:38 नवीन
शक्य आहे. अशा टाइपचं काहीतरी वाचलेलं अंधुक आठवतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

लेख आवडला पण लेखाचे भाग्य की चर्चा ही भरकटलेली नाही.

तर्री
Tue, 02/12/2013 - 22:24 नवीन
वाचतो आहे. माझा हया लोकांचा अनुभव थोडक्यात असा - १. हे लोक वेळेला अती महत्व देतात . पॅरॅनोइड म्हणावे इतके. २. कोणतेही नवे काम करताना घडयाळ पाहून किती वेळ - अंतर - पैसे लागले ह्याचा ठाव अचूक घेतात - तो हिशोब डोक्यात इतका पक्का बसतो की पुढच्या वेळेस त्यांचे "वेळ - अंतर - पैसे" कसे वाचवायचे याचे आडाखे सुरु होतात. ३. सतत नाविन्याचा शोध घेतात - पण हे अगदी बेसिक नाविन्य असते. इन्क्रिमेंटल इनोव्हेशन एवढेच, भव्य दिव्य काही करणार नाहित. ४.ह्यांच्या साठी घडयाळ - वासरी - दिनदर्शिका - पैसे ( थोडक्यात रिसोर्सेस )= अन्न / वस्त्र / निवारा .
  • Log in or register to post comments

पण हे अगदी बेसिक नाविन्य असते

शुचि
Tue, 02/12/2013 - 22:30 नवीन
पण हे अगदी बेसिक नाविन्य असते. इन्क्रिमेंटल इनोव्हेशन एवढेच, भव्य दिव्य काही करणार नाहित. ४.ह्यांच्या साठी घडयाळ - वासरी - दिनदर्शिका - पैसे ( थोडक्यात रिसोर्सेस )= अन्न / वस्त्र / निवारा .
अतिशय लहान गोष्टींत आनंद सामावलेला अस्तो व लहान सहान गोष्तीत आनंद शोधण्याची वृत्ती. हे खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा