नियतीने केलेला आयुष्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुंचा माग शोधला मी
एका परिचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी
त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी
सर्व दु:खे "प्याल्यात" बुडवली मी
व्यसनाच्या अंधःकारात स्वत:ला लोटले मी
मनाच्या तगमगीत आयुष्याचा अंत पाहिला मी
त्याच अंताची निरंतर अपेक्षा करणार मी...
प्रतिक्रिया
7 Feb 2013 - 5:46 pm | सुयशतात्या
मराथी लीहने अजुन जमत नाही क्शमा...
9 Feb 2013 - 2:34 am | प्रसाद गोडबोले
केली.
३ अपराध माफ आहेत आमच्या कडुन ... =))
मराठी लिहिणे जास्त अवघड नाही , किमान ९९% शुध्द लिहायाला शिकायला फक्त १० मिनिटे लागतील ...सोप्पं आहे फोनेटीक लिहायचं :)
maraaThee lihiNe jaasta avaghaDa naahee , kimaan 99% shudhda lihaayalaa fakt 10 miniTe laagateela ...soppaM aahe foneTeek lihaayachM :)
सदैव मदतीस तत्पर
- राष्ट्रकाकु गिरीजा
7 Feb 2013 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा
आईईईईईईईईईईईईईईई.......................................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ????????????????????????
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
दु:ख्खाच्या तेलात जिलब्या सोडल्या मी,
तरि कळे ना घाणा
कसा आला क मी....
7 Feb 2013 - 5:55 pm | तिमा
काल्जी करु नाका, तुमाले पन 'मोकलाया दाई दिसा' सापदतील आनि स्म्बरी गाताल!
8 Feb 2013 - 8:33 pm | अग्निकोल्हा
तुमच्या कडुन अजुन सुरेख कवितांच्या/लेखांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढिल लिखाणाच्या प्रतिक्षेत.
8 Feb 2013 - 10:34 pm | आनन्दिता
आमच्या शेजारचा बोबडा राजू पण असच काहीस अगम्य बोलतो..
9 Feb 2013 - 12:22 am | संजय क्षीरसागर
मदिरेच्या अतिरेकानं जीभ जड झालीये त्यामुळे असं होतय :
बोबड्या राजूनं दुसरं कडवं असं म्हटलं असतं :
एका पलिते त्वप्न आयुत्याच्या तुकद वलनावल पायले मी
त्यात त्वप्नाता विलत दानाला दुक्कद अन्भव गेतला मी
9 Feb 2013 - 5:28 am | आनन्दिता
व्वा संक्षी काका तुम्ही किती छान बोबडं बोलता!!!=)) =))
9 Feb 2013 - 8:04 am | लीलाधर
टु अँडी शंबल टाके शहमट :))
9 Feb 2013 - 9:20 am | संजय क्षीरसागर
मनात्या तगम्गीत आयुत्याता येंsद पायला मी
त्या येंदाती तालकीताल्की अपेत्का कलनाल मी...
8 Feb 2013 - 11:01 pm | लीलाधर
उघदला दागा अता करुण बशलोय तरागा :))
9 Feb 2013 - 6:22 pm | अधिराज
"कुथुन", "कु" वर अनुस्वार द्यायचा रहिला वाटतं.
8 Feb 2013 - 11:11 pm | पैसा
अशाच आणखी कविता लिहीत चला. हळूहळू सवय होईल आणि या सगळ्या चावट लोकांकडे लक्ष देऊ नका बरं. त्यांना असं लिहायला कधीही जमायचं नाही!
8 Feb 2013 - 11:19 pm | आनन्दिता
अस लिवय्ल अम्हाल जमत नस्ल त्री गुनि बाळाणा चावट म्हटल्या बद्दल पैसा तै चा णिशेढ!!
9 Feb 2013 - 9:38 am | संजय क्षीरसागर
लोकांकडे दुर्हल्क्श्य कर स्वतहाला सांगीत्ले मी
दुख्हे "प्याल्यात" बुदवलि आता त्यावर लोलतो मी
9 Feb 2013 - 2:15 pm | सुयशतात्या
धन्यवाद
9 Feb 2013 - 2:07 am | मराठे
कविता चांगली (असावी. कारण मला पद्यातलं काही कळत नाही) पण मोकलाया दाही दिश्याची सर नाही.
9 Feb 2013 - 6:57 am | खटपट्या
अरे बस करा रे ! पोराचा जीव घेनार का तुमी लोक, अशूद्ध लीवल्याबद्द्ल
9 Feb 2013 - 2:12 pm | सुयशतात्या
शुध्दलेखन चान्गल आहे माझ , टाईप करण जमत नाही अजुन
नियतिने केलेला आयुश्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुन्चा माग शोधला मी
एका परिचे स्वप्न आयुश्याच्या सुखद वलणावर पाहिले मी
त्याच स्वप्नाचा विरत जानारा दुखद अनुभव घेतला मी
सर्व दुख्हे "प्याल्यात" बुडवलि मी
व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोटले मी
मनाच्या तगमगीत आयुश्याचा अन्त पाहिला मी
त्याच अन्ताची निरन्तर अपेक्शा करणार मी...
9 Feb 2013 - 2:36 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/1312 हे बघून कविता इथेच परत दुरुस्त करून द्या. आणखी एक धागा काढू नका! :)
9 Feb 2013 - 2:54 pm | सुयशतात्या
परत दुरुस्त कशी करायची? व प्रकाशीत कशी करायची?
9 Feb 2013 - 2:59 pm | पैसा
स्वतंत्र प्रतिसाद म्हणून परत टाका.
9 Feb 2013 - 2:59 pm | अभ्या..
करा आता मदत. ;)
9 Feb 2013 - 3:19 pm | संजय क्षीरसागर
तोपर्यंत सुयशतात्याला वेळ आहे का?
9 Feb 2013 - 3:07 pm | संजय क्षीरसागर
कविता करायला कल्पना अत्यंत प्रभावी हवी. तुमच्या थीममधे विषेश दम नाही त्यामुळे शुद्धलेखन तर दोन मिनीटात करून देईन पण कविता अर्थपूर्ण कशी होणार? तुम्ही थोडं वाचन करा, सराव करा, सुरेख कल्पना सुचायची वाट पाहा मग एकदम जमून जाईल.
9 Feb 2013 - 3:29 pm | सुयशतात्या
मी स्वताहाशी प्रामाणिक आहे ...
9 Feb 2013 - 3:32 pm | अभ्या..
ह्याच गुणामुळे मला तुमची कविता अगदी मनापासून आवडली.
9 Feb 2013 - 3:43 pm | संजय क्षीरसागर
आयला प्रामाणिकपणाचा कल्पना सुचण्याशी काय संबंध? तसं असतं तर बायकोशी प्रामाणिक असणारेच फक्त कवि झाले असते!
कविता सुचणं वेगळी फॅकल्टी आहे.
9 Feb 2013 - 6:29 pm | अभ्या..
असो. मी तर सगळ्यांच्याच कविता वाचतो. :)
माझी फक्त कविता (काही काही) आवडणार्याची कॅटेगरी आहे एवढे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.
9 Feb 2013 - 7:32 pm | सुयशतात्या
"बायकोशी प्रामाणिक आणि कविता करणे " अहो काय पण काय बोलता...
तुम्हि कविता सुचण्याच्या फॅकल्टी मध्ये मोडता ना!!! मग करा की उगाच समिक्शक का बनता...आवडली तर आवडली म्हणा नाही तर नाही म्हणा ...
9 Feb 2013 - 7:40 pm | संजय क्षीरसागर
आता तुम्ही : प्रत्येकाला मत असते - मी स्वताहाशी प्रामाणिक आहे ...
म्हटल्यावर काय बोलणार?
9 Feb 2013 - 8:09 pm | दादा कोंडके
उद्या तुम्ही प्रामाणिकपणे काहिही कराल. :))
9 Feb 2013 - 9:23 pm | अधिराज
बरोबर आहे तात्यांचं, कविता ही विचार करून, प्रॅक्टीस करून करायची गोष्ट नसते. कवीला कविता आपोआप होत असते.ती कधीही, कुठेही, कशीही, कशावरही होऊ शकते.
9 Feb 2013 - 9:44 pm | शुचि
राजहंसाची चाल डौलदार पण म्हणून इतरांनी काय चालूच नये काय?
10 Feb 2013 - 12:32 am | दादा कोंडके
पण घरात चालावं, रँपवर का?
9 Feb 2013 - 10:36 pm | संजय क्षीरसागर
तुझी कविता तुला हवी तशी करून दिलीये. सं.मं.ला विनंती करून अपडेट करायला सांग
नियतीने केलेला आयुष्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुंचा माग शोधला मी
एका परिचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी
त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी
सर्व दु:खे "प्याल्यात" बुडवली मी
व्यसनाच्या अंधःकारात स्वत:ला लोटले मी
मनाच्या तगमगीत आयुष्याचा अंत पाहिला मी
त्याच अंताची निरंतर अपेक्षा करणार मी...
10 Feb 2013 - 12:20 am | संजय क्षीरसागर
एका परीचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी
आता वरचा प्रतिसाद आणि ही करेक्टेड ओळ तुमच्या व्य. नि. मधे पेस्ट करून सं. मं. ला पोस्ट अपडेट करायला सांगा
11 Feb 2013 - 1:34 am | सुयशतात्या
सं.मं.ला विनंती करून अपडेट करायला सांग ? ते कसे? समजून सान्गा?
11 Feb 2013 - 1:51 am | किसन शिंदे
अपडेट केलीय.
11 Feb 2013 - 12:04 pm | सुयशतात्या
धन्यवाद!!
11 Feb 2013 - 12:29 pm | संजय क्षीरसागर
परि ची तेवढी परी करा.