Skip to main content

देहाला चोळून घेता...(एक लांबड)

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 29/01/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
देहाला चोळून घेता मालिशवाला वदला ढेरी वाढली मालक! लाईफस्टाईल बदला देहाला चोळून घेता नेते सुखाने म्हणले सत्तेच्या कृपेने मी बख्खळ पैसे आणले देहाला चोळून घेता रोमिओही तणतणले बायका वाघिणी झाल्या आम्हा चप्पलने हाणले देहाला चोळून घेता ते विकलतेने कण्हले लवकर ये मृत्यू मन रोगाला शीणले...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2869
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

तेल मालीऽऽऽश म्हणणारा जॉनी वॉकर आठवला. पण शेवटच्या ओळी गंभीर करून गेल्या.

चार ओळींमुळे ते विडंबन राहिले नाही. का हो, आम्हा म्हातार्‍यांना संध्याछाया दाखवता ?

देहाला चोळून घेता.. या ओळी अन्य एका कवितेत वाचल्या आणि वाटले, की देहाला चोळून घेण्याच्या विविध अवस्थांतील काही व्यक्तींचे मनोभाव कसे असतील? त्यातून सुचली ती कडवी टाकली. त्यात सुखासीनता, माज, निलाजरेपणा आणि अखेर विकलता या भावना आल्या. राहून गेलेल्या आणखी दोन अवस्था म्हणजे १) आई/बहीण/पत्नी यांनी मायेने घातलेली अंघोळ २) 'चेतवून अंग अंग' टाईपचा शृंगार. शेवटच्या कडव्यामुळे उदासीनतेची छाया रेंगाळतेय खरी, पण तसंच तर जीवन आहे ना. कवी ना. धों. महानोरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर 'जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे'

संता-बंताच्या बँकॉक प्रवासातः देहाला चोळून घेता परमानंद जाहला स्वगृही परतल्यावर: आनंद सगळा ओसरला परमा तेवढा राहिला