नामांतर

अभ्या..'s picture
अभ्या.. in कलादालन
25 Jan 2013 - 4:32 pm

n

सर्व मिपाकरांना नमस्कार.
सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.

समाज

प्रतिक्रिया

व्वा अभ्या लैच क्रिएटिव्हगीरी चाल्लिये आजकाल ;)

बाकी एमएएलएलबी अशी काही पदवी आहे असे आमच्या वाचनात नाही. बोगस पदवी धारण करुन वकिली करत आहे म्हणून तुमच्या वकिलाला कोर्टात का खेचू नये?

अभ्या..'s picture

25 Jan 2013 - 5:25 pm | अभ्या..

वकीलसाहेब तर कोर्टातच असतेत हो. त्यांना कशाला परत खेचताय?
पण त्याच्या आधी या प्रतिसादाबद्दल तुम्हाला अ‍ॅट्रॉसिटी लावावी का? असे विचारतायत वकीलसाहेब.

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 4:52 pm | संजय क्षीरसागर

`मी नाही' हे रायलंच पायजेल असा दावा दाखल केला आहे. सबब पूजादेवींच्या संमतीशिवाय बारसे ग्राह्य धरले जाणार नाही.

जेनी...'s picture

25 Jan 2013 - 9:28 pm | जेनी...

हो कि नै संजय काका :-/

नोटिशीचा गंभीरपणे विनोदी विचार केल्या जाईल.

किसन शिंदे's picture

25 Jan 2013 - 5:23 pm | किसन शिंदे

:)

(अभिजीतला इथून पुढे अभ्या ढब्या असेच म्हणणारा) किसना ;)

जेनी...'s picture

25 Jan 2013 - 9:10 pm | जेनी...

अभ्या ढब्या नाय रे :-/

अब्या डब्या म्हणायचं असतय ...

पैसा's picture

25 Jan 2013 - 5:31 pm | पैसा

आणि वकिलाची पदवी बनावट आहे. यम ये यल यल बे अशी असते ती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2013 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाहीर नोटीस आवडली. लेकाच्या हातात भारी कारागिरी आहे. पेपरचा लूक तर असा आवडला की पुछो मत.
वकिलांच्या अशा किरकोळी नोटीशी आपण पाहातही नाही. पण अशा नोटीशींनी जे पेपरं खपत नाहीत तिथे अशा नोटीशी नेहमीच दिसतात. पण, जमलंय भन्नाट. लगे रहो.

शुद्धलेखन : अभ्या जाहिर की जाहीर रे.... ;)
[आता म्हणू नको, आशयाशी मतलब ठेवा ना भो]

-दिलीप बिरुटे

छ्या राव, जी मज्जा 'अमिना'मध्ये होती ती अभ्यात नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2013 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकाटाआ.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2013 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा

@ती अभ्यात नाही.>>> +१

थोड्याश्या असहमतीने पहिले नाव फुंकुन http://www.sherv.net/cm/emoticons/birthday/birthday-cake-candle.gifनविन स्विकारण्यात येत हायhttp://www.sherv.net/cm/emoticons/birthday/birthday-dancer.gif

नामांतर/बारश्याच्या शुभेच्छाhttp://www.sherv.net/cm/emoticons/birthday/happy-birthday-fireworks.gif

प्रशांत's picture

26 Jan 2013 - 12:50 pm | प्रशांत

अमिनाच बेस्ट...

तर्री's picture

25 Jan 2013 - 6:16 pm | तर्री

मौजे मि.पा , तालुका ? जिल्हा ? ? - पत्ता अपुर्ण वाटला.
अन्यथा , सुपर क्रिएटिव्ह !

मी-सौरभ's picture

25 Jan 2013 - 6:29 pm | मी-सौरभ

आमच्याकडून काय बारसं (पुन्हा) झाल्याबद्दल अभिनंदन करणे अपेक्षित आहे का???

जोशी 'ले''s picture

25 Jan 2013 - 8:28 pm | जोशी 'ले'

जाम भारी मानलं तुमच्या क्रिएटीविटीला पन अब्ब्या ची सर अभ्या ला नाहि :-)

धमाल मुलगा's picture

25 Jan 2013 - 8:33 pm | धमाल मुलगा

चला, बारशानिमित्त बसु या! :-P

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Jan 2013 - 10:46 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयुष्यात दुसरे काही नाहीच का ??

मी-सौरभ's picture

1 Feb 2013 - 11:18 am | मी-सौरभ

पूनम का प्यासा???

श्रीरंग_जोशी's picture

25 Jan 2013 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी

अरे नाव बदलायचच होतं तर जरा भारदस्त नाव घ्यायचं होतं जसे - अभिजीतदादा, अभिजीतकुमार वगैरे...

अवांतर - धाग्याचे शीर्षक वाचून महाराष्ट्राच्या राजकारणाचे जुने संदर्भ आठवले...

जेनी...'s picture

25 Jan 2013 - 9:14 pm | जेनी...

च्छ्या :-/

अब्यात जो गोडवा आहे तो अभ्यात नै :-/

राठ जुनाट वाटत ते अभ्या ... :-/

त्यापेक्षा अब्या झ्याक होतं :-/

खुप सारे :-/ :-/ :-/ :-/ टू बी कन्टिनुड :-/

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2013 - 11:05 am | अत्रुप्त आत्मा

अगं बालिके......... कित्ती त्या जिभ्ल्या दाखवतेस... http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

तू मला जिभ्लिमातेची आरती http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt013.gif ल्याहायला भाग पाडणार बहुतेक http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif

जेनी...'s picture

26 Jan 2013 - 10:29 pm | जेनी...

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jan 2013 - 9:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नामांतराबद्द्ल जोरदार "अभि"नंदन...बाकी पार्टी चा मेनु ठरवुन ठेवा...!! ;) ;)..!!

बाकी कुठ्ल्याही अभिजित ला अभ्या म्हणण्यात जी मजा आहे ती अभि ऑर अ.मि.ना. मधे नक्कीचं नाही.

Nile's picture

25 Jan 2013 - 9:39 pm | Nile

मिपा संस्कृतीत हे जे काही कारतलेले नाव लावण्याची फॅशन आलेली आहे त्याने मिपा संस्कृतीचा र्‍हास होत आहे असे आमचे ठाम मत आहे.

मागच्या पिढीतल्या विसोबा खेचर, केशवसुमार, पिवळा डँबिस अशा प्रकारच्या नावांचा आम्हाला सार्थ अभिनाम आहे. तस्मात या नामांतराचा निषेध करतो. ;-)

मी-सौरभ's picture

1 Feb 2013 - 11:21 am | मी-सौरभ

मिपा संस्कृतीत हे जे काही कारतलेले नाव लावण्याची फॅशन आलेली आहे

आपल नाव पण कातरलेले + आंग्लाळ्लेले असल्याने आपण हा प्रतिसाद द्यावा हे पटले नाही ब्वॉ!!

अभ्या..'s picture

1 Feb 2013 - 3:09 pm | अभ्या..

+१ रे सौरभ
पण पटत नसले तरी बोलायचे नाही बाबा. थोड्या वर्षांनी आपल्याला पण हेच करायचेय.
मुद्दे दोनच. आमच्या वेळी असे नव्हते बाबा नायतर आमच्यावेळी काय मौज होती राव.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Feb 2013 - 12:28 am | विश्वनाथ मेहेंदळे

आणि अजून एक आहे..

तुम्ही कसले कट्टे करता ?? कट्टे आम्ही केले होते. तुमचे कट्टे हे मिपा कट्टे नव्हेतच.. ई ई... (हे वाक्य जड, अडखळत्या जिभेने बोलले गेले पाहिजे)

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 12:31 am | अभ्या..

=)) =)) =))

Nile's picture

6 Feb 2013 - 12:40 am | Nile

आजकालच्या लोकांना काय हलकं घ्यायचं काय नाही हे सुद्धा समजत नाही कंसात (ह. घे.) असं लिहल्याशिवाय. मग आहेच सुतकी प्रतिसादांची रांग त्यामागे. (ह. घे.)

'आमचे अशील अभिजीत मी नाही' हा शब्दसंग्रह लिखाणात काही चूक तर नाही ना हे तपासायला दोनदोनदा वाचावा लागला. बाकी, लोकांनी आपल्याला नावं ठेवायच्या आधी स्वत:च ठेवणं केव्हाही बरं. ;)

कवितानागेश's picture

25 Jan 2013 - 11:11 pm | कवितानागेश

:)
'अब्या मी नाही' असे नाव का नाही घेतले?

स्पंदना's picture

26 Jan 2013 - 10:06 am | स्पंदना

एकाच या जन्मी पुन्हा
फिरुनी नवी जन्मेन मी.

मदनबाण's picture

26 Jan 2013 - 9:52 pm | मदनबाण

कठीण आहे रे बाबा... हल्ली कोणा कोणाच काय काय लक्षात ठेवावं लागेल ते सांगता येत नाही ! ;)
बाकी माउला पडलेला प्रश्न मलाही पडला ! ;)
'अब्या मी नाही' असे नाव का नाही घेतले?

अभ्या..'s picture

1 Feb 2013 - 3:05 pm | अभ्या..

सध्या मलाही पडलेला एकमेव प्रश्न आहे.
'अब्या मी नाही' असे नाव का नाही घेतले? :(
निदान लक्षात तरी ठेवता आले असते.

आदूबाळ's picture

26 Jan 2013 - 11:50 pm | आदूबाळ

पण कारण काय नाव बदलायचं??

अभ्या..'s picture

27 Jan 2013 - 12:00 am | अभ्या..

अरे तू ते 'थांब कमांडो' चे चित्र नाही का इथून नेऊन चेपुवर टाकले.
आता एफ्बीआय आन पोलीसं दोघेही मला हुडकताहेत.
आता सांगू नको बर्का कुणाला. अभिजीत मी नाहीच आता, :)

आदूबाळ's picture

27 Jan 2013 - 1:57 am | आदूबाळ

ते चित्र लय हिट्ट झालं! काही लोकांनी ते उचलून त्यावर रीतसर वॉटरमार्क वगैरे उठवले...

अग्निकोल्हा's picture

27 Jan 2013 - 12:34 am | अग्निकोल्हा

अन ते पन एव्हड्या सहज ? कुठे दंगा नाय जाळपोळ नाय कोर्टकचेरी नाय, डारेक्ट नामांतर ? चायला ह्या २०१३ मधे काय चाल्लय काय ?

II श्रीमंत पेशवे II's picture

1 Feb 2013 - 3:22 pm | II श्रीमंत पेशवे II

जाहीर नोटीस आवडली ,कौशल्य......

लई भारी रे, आता मिपावरच्या सा-या नोटिसा तुमीच देत चला.

बाकी मिपावर माझ्या माहितीप्रमाणे मिपाआयडी बदलल्याबद्दल आलेले दोन्ही लेख सोलापुरच्या व्यक्तींनी लिहिल्यामुळे आम्ही सोलापुरी जास्त प्रामाणिक आहोत हे पुन्हा एकदा सिद्धा झालं.

सस्नेह's picture

3 Feb 2013 - 9:07 pm | सस्नेह

'अभ्या..'
ती शेवटची दोन टिंबे म्हणजे छुपे 'मी नाही' तर नव्हे ?

बॅटमॅन's picture

3 Feb 2013 - 11:32 pm | बॅटमॅन

अभिजीत मी नाही चे लोकांनी चक्क अमिना करून टाकले. कुठलीतर इस्माईलभाईची अमिनाबेगम डोळ्यासंबूर आली.

"क्या कर्तैं ते अब्बी के अब्बी जाकू भाजी, बटाटा, कांदा वो सब लेकू आरे जल्दी, खाना खाते कते."

अमिनीकरण कैच्याकै झालंय हां =))

अभ्या..'s picture

3 Feb 2013 - 11:45 pm | अभ्या..

च्यामारी बॅट्या, इसरायचं इसरायचं म्हणतोय तर अशी आठवण करुन देतोयस व्हय. ;)
याचसाठी केला सारा उपद्व्याप आन तू म्हण्जे........ नीट कमानवेशीत नेतोस बघ ;)

बॅटमॅन's picture

3 Feb 2013 - 11:51 pm | बॅटमॅन

अर्र स्वारी बर्का अब्या ;) ब्राह्मणपुरीतल्यांसाठी कमानवेस तशी आम्हाला गुर्वार पेठ बघ :D

ते गाणं ऐकलय का कुणी आय थिंक शिंदे कंपणीचं आहे ..
" सुन मेरे अमिना दिदि " असेल तर टाकाकि ...
सुरुवात काहितरि अशी आहे
" ममय्वाले के लागुन नादी ..
माझी उरकुन टाकली शादी ..
काय सांगु मेरी बरबादी गे
सुन मेरे अमिना दिदि " =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2013 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा

ते असू दे ...बालिके... तू १दा मी नाही...मी नाही =)) म्हण ना...! रे तुझ्याकडून लिहिलेलं वाचायला लै मज्जा येते....

मी नाही ..मी नाही...मी नाही ..मी नाही...मी नाही ..मी नाही...मी नाही ..मी नाही... http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif

जेनी...'s picture

4 Feb 2013 - 1:18 am | जेनी...

मी नाहि मी नाहि मी नाहि :-/

अधिराज's picture

4 Feb 2013 - 12:27 am | अधिराज

नाव बदललाय व्हय तुमचं ,चांगली कारगिरी केलीये. मला आधी नाही व्हय सांगायाच, निवेदनाचं काम तुम्हालाच दिलं असत.

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 12:33 am | अभ्या..

इथलं निवेदनाचं काम मीच बघतो. तुमचं काय हाय काय इतक्यात?

जाऊ द्या आता शेट ,कालच नाही का दिलं निवेदन पूजाबाइंना ख.फ. वर. पुन्हा काय निवेदन फिवेदन देण्याची येळ आली की तुमचीच मदत घेतो.

तिमा's picture

4 Feb 2013 - 8:19 pm | तिमा

तुमच्या नामांतराच्या बारशात माझंही उरकून टाकतो.
आजपासून आम्ही 'तिरशिंगराव माणूसघाणे' नसून 'तिमा' झालो आहोत.

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 9:38 pm | अभ्या..

तिमाजीपंत अभिनंदन
अगदी शिवकाळातले नाव वाटते नै. तिमाजीपंत.

श्रिया's picture

4 Feb 2013 - 9:39 pm | श्रिया

सृजनशीलता आवडली.

इरसाल's picture

5 Feb 2013 - 4:22 pm | इरसाल

आम्हाला आधीचे नाव माहित आहे नाहीतर ते तिमाचे तिच्या मायला न होवो म्हणजे मिळवली.

अजुन कोणी हाय काय एक्दोन डाव नाव बदलुनशिनी घेनारे आनी हिठं न सांगलेले.

मराठी आंतरजालावर अश्या जाहिर नोटिसा देण्यात कस्ली हिंमत लागते.. नाहितर मंडली आधीचा आयडी तसाच ठेऊन नव्या नावाचा दुसरा आयडी घेतात तरी बी नोटिशा द्येत न्हाईत! ;)

बाकी 'अभि'नंदन!

खटपट्या's picture

9 Feb 2013 - 6:49 am | खटपट्या

आर आर आब्या !