✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

४८ तास भाग २

स
सुबोध खरे यांनी
Sat, 01/19/2013 - 13:18  ·  लेख
लेख
प्रिय मित्रहो, वरिल घटना १०० % सत्य आहे. एखादा सैनिक जर युद्धात व तत्सम परिस्थितीत जर हरवला गायब झाला तर त्याचे प्रेत सापडेपर्यंत त्याला (missing इन action ) जाहीर करतात. यानंतर पुढील ७ वर्षे त्याची वाट बघण्यात त्याच्या कुटुंबाची अवस्था गंभीर होते. ज्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त होते आणि कोसळते किंवा आग लागते अथवा पाणबुडी जर बुडाली आणि त्यात एखादा सैनिक वाचण्याची शक्यता नसेलच तर तेंव्हा त्याची न्यायालयीन चौकशी करून (missing in action, presumed dead)(आघाडीवर गहाळ बहुधा मृत) हे जाहीर करतात. त्यावर त्याच्या कुटुंबाची मान्यता स्वाक्षरी घेतात आणि मग त्या कुटुंबाला सर्व भरपाई विमा निवृत्तीवेतन इ. दिले जाते.या परिस्थितीत प्रेत मिळाले नाही तरी कुटुंबाला सर्व आर्थिक फायदे त्वरित मिळू शकतात. पण जर कोणताच ठावठिकाणा नसेल तर सात वर्षे थांबण्याशिवाय पर्याय नाही. युद्धकैदी समजून कुटुंबाला ७ वर्षे पर्यंत अर्धा पगार दिला जातो आणि त्यानंतर वरीलप्रमाणे पूर्ण आर्थिक फायदे दिले जातात परत विषयाकडे सर्वच सैनिक अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले होते.प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची चिंता होती. कुणाचे नुकतेच लग्न झाले होते त्याला आपल्या नव्या बायकोची चिंता होती कुणाची मुले अर्धवट वयाची होती.तर कुणाचे लग्नच झालेले नव्हते त्याला एव्ढ्या लवकर काहीच जग न बघता वर जायचे नव्हते कोणीच फारसे बोलत नव्हते.एखादा उत्तेजित होऊन जास्त बोलत होता.भावनांचा कल्लोळ म्हणावा तसा प्रकार चालू होता. केवळ बेंटरीवर कमीत कमी उपकरणे चालवीत असल्यामुळे इंजिनिअर लोकांना काही काम नव्हते. शिवा नायर लोकांना शांत ठेवण्याच्या नादात उपदेश करीत होता. त्याच्याच भाषेत(गावरान) सर्वांची इतकी फाटली होती कि तोंडापर्यंत आल्यामुळे लोक हसत असावेत असा भास होत होता.(अर्थात त्याच्या शब्दात -- हे सर्व आत्ता बोलणे सोपे आहे तेंव्हा सर्वांच्यातोंदाचे पाणी पाळले होते. सर्वाना आपले पूर्वायुष्य आठवत होते आणि आपण जगलो तर काय लय करता येईल अशी प्रत्येकाने उजळणी चालू ठेवली होती. पाणबुडीत दिवस आणि रात्र याला कोणताच अर्थ नसतो. पूर्ण वेळ अंधार आणि आतले दिवे चालू. बैटर्या वाचवण्यासाठी कमीत कमी दिवे चालू होते.ए सी पण अगदी कमी होता त्यामुळे लोक घामाघूम झालेले.असे २४ तास गेले.आजूबाजूला फिरणारी जहाजांची वर्दळ कमी झालेली होती. काही लोकांनी कॅप्टनला आता आपण निघूया म्हणून भुणभुण करण्यास सुरुवात केली. दोन तीन वेळा असे झाले कि कॅप्टन आता निघावे अशा विचारात होता तेवढ्यात पाकिस्त्नानी जहाजाची चाहूल लागली आणि हा बेत रहित करावा लागला. मुळात प्रत्येक जहाजाचा आपला एक विशिष्ट आवाज तयार होतो.त्याच्या जनरेटर, मोटार, पंखे इ मुळे. हा प्रत्येक आवाज आणि त्यात्या जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी (magnetic signature) हि गुपचूप रित्या गोल केलेली असते. त्या आवाजाच्या विशिष्ट प्रकारामुळे आणि त्या चुंबकीय स्वाक्षरी मुळे जहाज कोणते हे तुम्हाला ओळखता येते.हा अभ्यास नौदलाला शांततेच्या काळात करावा लागतो. तसेच आपल्या जहाजाची चुंबकीय आणि ध्वनी स्वाक्षरी (magnetic and sound signature) सुद्धा आपल्या पाणबुडीच्या संगणकात साठवायला लागते अन्यथा शत्रूची समजून आपलीच बोट बुडविली जाईल.आपल्या पाणबुडीची किंवा जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी कशी कमी होईल या साठी त्याचे चुंबकीय क्षेत्र जाणून घेऊन त्याच्या १८०अंश उलट क्षेत्र त्यावर टाकले कि हि स्वाक्षरी कमी होते. शिशुमार , शंकुश शल्कि या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुड्या अत्यंत शांत (silent )आणि अगदी कमी चुंबकीय स्वाक्षरी असणाऱ्या असल्यामुळे त्या SSK (submarine to submarine killer) म्हणून ओळखल्या जातात.या पाणबुड्या अतिशय कमी आवाज करीत पाण्याच्या खालून जातात आणि शत्रूच्या पाणबुडीतून केलेल्या आवाजाच्या वासावर जाऊन त्याचं नायनाट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.शेवटि ४४ तास झाल्यानंतर कोणताही आवाज आला नाही. पाकिस्तानच्या नौदलाच्या अपेक्षेत हि पाणबुडी एवढ्या काळात पळून गेली असेल असे असल्यामुळे ते आवाज क्षीण होत गेले. शेवटी ४४ तासानंतर पहाटे २ वाजता कॅप्टनने पाणबुडी च्या ballast tanks मध्ये हवा भरायला परवानगी दिली या tank च्या आत मध्ये पाणी भरून घेतले कि पाणबुडी जड होऊन पाण्याखाली जाते. जेंव्हा तुम्हाला वर यायचे असते तेंव्हा त्या टंक मध्ये दबावाखाली असलेली(compressed ) हवा भरून पाणी बाहेर टाकले जाते आणि पाणबुडी हळूहळू वर येते. जशी शंकुश पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ आली तेंव्हा पेरीस्कॉप बाहेर काढून परत एकदा बघितले कि आजूबाजूला कोणी नाही. त्यानंतर कॅप्टनने पाणबुडीला पृष्ठभागावरस्नोर्केल पातळीवर म्हणजे फक्त एक नळी बाहेर दिसते ज्यातून हवा घेतली जाते आणि धूर बाहेर सोडला जातो. पाणबुडी पाण्याच्या खालीच राहते आणण्याचे आदेश दिले आणि पूर्ण वेगात तिला भारताकडे कूच देण्याचे आदेश दिले.पुढील चार तास कोणीही काहीही बोलत नव्हते कारण एखादे पाकिस्तानी जहाज वाटेत भेटले तर काय घ्या? ४ तासात त्यांनी जवळ जवळ १००-१२० कि मी अंतर कापले आणि ते आन्तरराष्ट्रीय सागरी सीमेत पोहोचले. यानंतर उजळ माथ्याने सर्व जण एक एक करून पाण्याच्या पृष्ठभागावर आला आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. शिवा नायर म्हणाला कि कोणाला रडावेसे वाटत होते कोणाला ओरडावेसे वाटत होते. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत विभिन्न होत्या. डॉक्टर म्हणून मला आणि कॅप्टन ला सभ्यतेने वागावे लागत होते.माल तेथेच दारू प्यावीशी वाटत होती.(पण समुद्रावर गेल्यावर दारू पिण्याची परवानगी नाही.)कॅप्टनने GPS खराब झालयामुळे कमांडकडे मदत मागितली. मुळात ४८ तास कोणाशीच संपर्क नसल्यामुळे HQ हेड क्वार्टर चे लोक जरा काळजीत होते पण प्रत्यक्षात काय झाले होते ते त्यांना हि माहित नव्हते. कमांड ने त्यांना परत येण्यास सांगितलेअसा तर्हेने ४८ तास जीवाला लागलेला घोर शेवटी संपला. नंतर युध्द सराव संपल्यावर च्या विश्लेषणात पाकिस्तान नौदलाचे विचित्र वर्तन या वर चर्चा सुद्धा झाली. त्यांच्या बोटी एका विशिष्ट तऱ्हेने वर्तन का करीत होत्या ते नौदलाच्या इतर लोकांना कळले नाही. पाणबुडीच्या कॅप्टनने वरील गोष्ट FOSM ) flag officer submarines पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेली कारण त्या वेळेला राजनैतिक प्रतिक्रिया काय होतील हे सांगणे कठीण होते.(नौदल युद्धखोरी करीत आहे.शांततेच्या दूतांच्या हातात कोलीत मिळाले असते शिवा नायर च्या म्हणण्याप्रमाणे collective behaviour in crisis (संकटकाळातील माणसांची प्रतिक्रिया) हि इतर काळापेक्षा एकदम वेगळी असते. माणसे अतिशय मित्रत्वाने वागतात किंवा एकदम तिरसट पाने वागू लागतात. धन्यवाद

Book traversal links for ४८ तास भाग २

  • ‹ ४८ तास
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23680 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

धन्यवाद खरेकाका

अनिल मोरे
Mon, 09/01/2014 - 19:45 नवीन
धन्यवाद खरेकाका
  • Log in or register to post comments

शिशुमार जातीच्या पाणबुडीची टक्कर

गामा पैलवान
Wed, 11/15/2017 - 18:57 नवीन
रामदासकाका, शिशुमार जातीच्या त्या पाणबुडीचं नाव काय होतं? हा किस्सा केंव्हा घडला? औत्सुक्य असं की काही दिवसांपूर्वी अमेरिकी जहाजांची २०१७ मधली तिसरी टक्कर झाली. नक्की प्रकार काय आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

च्यायला आजूनेक टक्कर

गामा पैलवान
Tue, 11/21/2017 - 18:03 नवीन
अमेरिकी नौदलात नक्की काय समस्या आहे? एव्हढ्या टकरी का होताहेत? http://www.bbc.co.uk/news/world-asia-42041704 -गा.पै.
  • Log in or register to post comments

According to the UK

सुबोध खरे
Tue, 11/21/2017 - 20:25 नवीन
According to the UK government, there were around 58,000 vessels in the world trading fleet at the end of 2016. The size of the fleet, if measured by weight, has doubled since 2004.According to the UK government, there were around 58,000 vessels in the world trading fleet at the end of 2016. The size of the fleet, if measured by weight, has doubled since 2004. And on any large ship, a typical crew often comprises a mix of different languages, nationalities and safety cultures, he adds, making the job of keeping the vessel safe all the trickier. One rising worry is modern sailors’ reliance on technology, http://www.bbc.com/future/story/20170822-why-its-not-surprising-that-ship-collisions-still-happen
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लेख वाचला पण ....

गामा पैलवान
Wed, 11/22/2017 - 02:24 नवीन
खरे डॉक्टर, तो लेख वाचला होता. पण फक्त अमेरिकी नौदलाच्याच टकरी का होताहेत, हा प्रश्न उरतोच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा