✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दार का लावतात ?

च
चौकटराजा यांनी
Fri, 01/18/2013 - 18:34  ·  लेख
लेख
इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्‍या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "मग दिवसा ढवळ्या सगळे सतत फ्लॅटचे दार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात. मग त्यांना सविस्तर सांगतो की वास्तू शास्त्राच्या ( प्राचीन असे म्हणायचे आहे मला की मग त्याचा इफेक्ट वाढतो ) तत्वज्ञानानुसार, दार लावताना आपल्या हातातील उर्जाचक्र कार्यान्वित होते . ( बरोबर अगदी कुन्डलिनी जागृत झाल्याप्रमाणेच ! ) व त्यातल्या उर्जास्रोतामुळे हात बळकट होतात व चकाकतात देखील. काहीजणांना दार लावल्यावर जोरदार पेंग कोचावरच येते आणि वेगळ्या स्वप्नात ते वावरतात . विशेषतः विद्यार्थ्यांना दार लावल्यावर प्रायव्हसी मिळत असल्याने असल्याने अभ्यास चांगला होतो. काही जणांना दार लावल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. म्हणजे नकळत दारस्पर्श जीवनक्रियेला मदत करतो. "दारा"ला "कवाड " हेदेखील नाव आहे. काहीजणांना काळा दरवाजा ( सीसमचा ) लागतो तर काही जणांचे पिवळ्या रंगाचे ( हळदू या लाकडाचे ) दारा शिवाय चालत नाही. दारा च्या या बहुगुणी उपयुक्ततेमुळे अनेक जण दार लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का? विसू - उत्तर माहीत असून न दिल्यास परिणाम - डोक्याची शम्भर छकले होऊन ........
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13182 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

मन सुद्ध तुझं...

योगप्रभू
Fri, 01/18/2013 - 23:41 नवीन
मन सुद्धं तुजं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू लाव रं गड्या दार तुला भीती कशाची पर्वाबी कुनाची.... :)
  • Log in or register to post comments

कं हाणलंय कं हाणलंय!!!!! जबरा

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 23:52 नवीन
कं हाणलंय कं हाणलंय!!!!! जबरा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

'द्वारका' शब्दाचा अर्थ हवा

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 23:42 नवीन
'द्वारका' शब्दाचा अर्थ हवा आहे
  • Log in or register to post comments

१.तिथे द्वार लावण्याची गरज

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 23:54 नवीन
१.तिथे द्वार लावण्याची गरज नव्हती, त्यामुळे कोणी द्वार लावू लागले, की लोक विचारायचे- द्वार का(हून)? २. ना घर का ना घाट का अशी स्थिती झाल्यावर कृष्णाने स्थापन केलेली नगरी, त्यामुळे लोक म्हणायचे - मैं द्वार का. सध्या इतकेच सुचते आहे, जाणकारांनी अजून अग्न्यस्त्रे टाकून अज्ञान जाळोन टाकावे हे विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

वो दादा..

मोदक
Sat, 01/19/2013 - 06:51 नवीन
वो दादा.. इडंबनाची आर्डर द्येयच्या आधी लेखकाचे नाव तपाशून पघा. चौराकाकां बरूबर स्कोर शेटल करायचा हाये का? न्हा ऽ ऽ ऽ ई. मग इडंबन न्हा ऽ ऽ ऽ ई. ;-) बाकी तुम्ही चुकीच्या दुकानात आडर दिली. इडंबन करावे तर आम्च्या बुवांनीच! (- असे वल्लीदा म्हन्तो.) (सर्व संबंधितांनी हलके घ्यावे - न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील :-D)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

न घेतल्यास फाट्यावर मारण्यात

५० फक्त
Sat, 01/19/2013 - 08:10 नवीन
न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील - धायरी का वडगाव का संतोष हॉल्,कोणत्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

न घेतल्यास फाट्यावर मारण्यात

किसन शिंदे
Sat, 01/19/2013 - 08:20 नवीन
न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील - धायरी का वडगाव का संतोष हॉल्,कोणत्या ?
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वारज्याच्या फाट्यावर मारू..

मोदक
Sat, 01/19/2013 - 08:31 नवीन
आमी वारज्याच्या फाट्यावर मारू न्हायतर ठाण्यातल्या. येणी पिराब्लेम..? ;-) (रोखठोक) मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

@आमी वारज्याच्या फाट्यावर

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 18:39 नवीन
@आमी वारज्याच्या फाट्यावर मारू न्हायतर ठाण्यातल्या. येणी पिराब्लेम..? smiley>>> =)) =)) =)) (रोखठोक) मोदक>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बुवा...

मोदक
Sun, 01/20/2013 - 19:07 नवीन
बुवा... गडबडून लोळण्याइतका काय ज्योक झाला ते आम्हाला पण कळूद्यात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वडगाव बु. फाट्याचा उल्लेख

प्रचेतस
Sun, 01/20/2013 - 19:14 नवीन
वडगाव बु. फाट्याचा उल्लेख नसल्याने हायसे वाटल्याच्या भावनेतून झालेला हा परमानंद असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

@हायसे वाटल्याच्या भावनेतून

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 22:54 नवीन
@हायसे वाटल्याच्या भावनेतून झालेला हा परमानंद असावा.>>> आं............दु...दु...हलकट :-p अगोबा-बॉक्सिंग आत्मा ...Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगोबा-बॉक्सिंग आत्मा

पियुशा
Tue, 01/22/2013 - 16:55 नवीन
अगोबा-बॉक्सिंग आत्मा __/\___ क ह र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बहूदा

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/25/2013 - 18:47 नवीन
दार का लावतात ?
'दार उघडे का ठेवतात' असले प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून बहूदा.
  • Log in or register to post comments

छान !

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/26/2013 - 15:01 नवीन
माझा प्रतिसाद का संपादित झाला ब्वॉ ? नक्की 'तो' शब्द खटकला, का पराचा आहे म्हणून प्रतिसाद खटकला ? मिपावर शोध घेता तो विशिष्ठ शब्द मलातरी २९४ ठिकाणी सध्यातरी दिसतो आहे. असो.. शेवटी मिपाचे रुपांतर 'पुरुषांची मंगळागौर' ह्या सदरातच करायचे म्हणल्यावरती काय करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा