✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

व
विकास यांनी
Fri, 01/11/2013 - 21:14  ·  लेख
लेख
दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे. तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अ‍ॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अ‍ॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला. आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्‍यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली: Sagarika Ghose says sorry Chetan Bhagat apology Pierre Fitter of India Today Pierre Fitter of India Today मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे: Media misleads ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे. ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात... अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51201 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

अर्धवटराव ..

विटेकर
Sat, 01/19/2013 - 18:10 नवीन
सोडून द्या हो.. हे उगाच बाईट वाया घालवण्याचे अनुत्पादक काम आहे.. आपद्धर्म म्हणून करावे लागते एवढेच ! ते तुम्ही छान केले आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शब्द बापुडे ...

विकास
Wed, 01/16/2013 - 06:48 नवीन
सर्वप्रथम, ही चर्चा या चर्चेत अवांतर आहे, ह्या आपल्या मताशी सहमत :-) . कारण मुळ मुद्दा हा माध्यमांनी संदर्भहीन बातमी तयार करून कसे खोटे लिहीले ह्या संदर्भात होता आणि आजही माझ्या दृष्टीने तोच मुद्दा आहे. ते unequivocally मान्य करणे आपल्याला साहजिकच जड गेले आहे... त्यात देखील आपले प्रतिसाद वाचले आणि ३.१४ (अर्थात irrational) वाटले. मराठीत कधी कधी, "कवीला नक्की काय म्हणायचे आहे?" असे अशा लिखाणासंदर्भात म्हणतात, तीच काहीशी अवस्था "शब्द बापुडे केवळ वारा" वाचताना माझी देखील झाली. (पण दुर्लक्ष केले असे वाटायला नको म्हणून उत्तर देत आहे. नाहीतर उद्या ऐकायला वाचायला मिळायचे की फक्त पुरुषांनाच प्रतिसाद दिले म्हणून! ;) ह.घ्या.!!!) मोहनजींचे संपूर्ण भाषण लिखित स्वरूपात येथे वाचता येईल: डा. मोहन भागवत ने वास्तव में क्या कहा? प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है। या वाक्यात तुम्हाला नक्की विज्ञानद्वेष्टेपणा कसा दिसला? हे इतके प्रतिसाद दिले तरी मान्य होण्यासारखे एकही कारण नाही. असे (म्हणजे विज्ञानद्वेष्टे) म्हणण्यातच, माफ करा, वैचारीक वाद नाही तर अज्ञान दिसले अथवा अनाठायी द्वेष दिसला, जो तुमच्याकडून अपेक्षित नव्हता. >> प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही,... अर्थातच ते माहीत आहे. पण स्त्री ला "प्रकृति की निर्मात्री" अर्थात सांस्कृतिकरीत्या "माता" असे मानण्यात किमान "अदिती" हे नाव असलेल्या व्यक्तीस तरी आक्षेपार्ह वाटू नये असे वाटते. उद्या अगदी अमेरीकन लोकांना पण तुम्ही. "Mother Earth कसे काय म्हणता? मग वडलांचा शुक्राणु कुठला?" वगैरे प्रश्न विचारलात आणि मग पृथ्वीचा द्वेष करता असा अर्थ लावला तर "डं?" असा प्रतिसाद मिळेल. असो. काही संदर्भ हे सांस्कृतिक असतात. ते प्रत्येक ठिकाणी जसेच्या तसे मानायचे नसतात पण त्यातील मतितार्थ लक्षात आणि आचरणात ठेवण्याची अपेक्षा असते. "परस्त्रीला माते समान मानणे" हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. त्यात देखील तुम्ही संदर्भ दिलेल्या वाक्यात त्यांनी ""हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " (मातृशक्ती, माता असे नाही) असे सुस्पष्ट वाक्य म्हणले आहे. तरी देखील तुम्हाला सांस्कृतिक दृष्टीकोन पटत नसला तर तो तुमचा प्रश्न आहे. कोणी मागे लागलेले नाही... तुमचे देखील सांस्कृतिक अथवा सांस्कृतिक शब्दच मान्य नसला तर इतर दृष्टीकोन असतील जे इतरांना पटतीलच असे नाही. मात्र आपणच तेव्हढे खरे असे म्हणायचे असेल आणि इतरांना तुच्छ लेखायचे असेल तर मग असेच बोलणार्‍या इतर (लिबरल नसलेल्या आणि) radical वृत्तींपेक्षा वेगळे ते काय? ---------------------- समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे. आता निव्वळ या धाग्यात मिळालेल्या माहितीवरून तरी अंदाज आला असेल की मी कधी समितीत गेलो नसणार म्हणून. तरी देखील काही प्रश्नांबाबत: समिती हे प्रकरण लो - प्रोफाईल असणे म्हणजे त्यांच्याबद्दल बातम्या (त्या देखील वाटेल तशा) छापून न येणे असे म्हणायचे आहे का? कदाचीत प्रसिद्धी माध्यमे त्यांना केवळ एक स्त्री संघटना म्हणून दुर्लक्ष करत असावीत. भाजपा मधे समितीचे स्थान हा एक विनोदी प्रश्न झाला. कारण त्या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. हे म्हणजे एका संस्थळाचे दुसर्‍या संस्थळामधे काय स्थान असे विचारण्यासारखेच झाले. आता तुम्ही नंतरच्या प्रतिसादात स्वत:चा एक दिवसाचा अनुभव आहे आणि एका व्यक्तीने चेपूवर लिहीलेत म्हणून सांगितले. म्हणजे अशास्त्रीय अशा one-point extrapolation वर आधारीत आहे.. तरी देखील असे समजूयात की असतीलही ते खरे, पण त्या विरुद्ध अनुभव आलेले देखील असणारच ना, नाहीतर इतकी वर्षे ती संघटना कशी चालेल? एक संघटना काढून टिकवणे हे काही सगळ्यांना जमते अशातला भाग नाही. इतके वर्षे तर नाहीच नाही. पण त्यांना जमलेले आहे असे दिसतयं. आणि हो त्यातील ज्या काही महीला मी पाहील्या आहेत त्या प्रोफेशनल आहेत, विचारी आहेत, आणि स्वत:च्या घर आणि प्रोफेशनल कामाच्या बाहेर जाऊन समाजासाठी काम करणार्‍या देखील आहेत. नुसते इतरांना नावे ठेवत चकाट्या पिटणार्‍या, तुमच्या वरील प्रतिसादाच्या भाषेतच म्हणायचे तर गॉसिपमय नाहीत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पण स्त्री ला "प्रकृति की

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/17/2013 - 04:36 नवीन
पण स्त्री ला "प्रकृति की निर्मात्री" अर्थात सांस्कृतिकरीत्या "माता" असे मानण्यात किमान "अदिती" हे नाव असलेल्या व्यक्तीस तरी आक्षेपार्ह वाटू नये असे वाटते. उद्या अगदी अमेरीकन लोकांना पण तुम्ही. "Mother Earth कसे काय म्हणता? मग वडलांचा शुक्राणु कुठला?" वगैरे प्रश्न विचारलात आणि मग पृथ्वीचा द्वेष करता असा अर्थ लावला तर "डं?" असा प्रतिसाद मिळेल. असो.
दुर्दैवाने माझं नाव काय असावं यावर, बहुतांश लोकांचा नसतो तसा, माझाही ताबा नव्हता. घरचे, आजूबाजूच्यांनी ज्या नावाने हाक मारायला सुरूवात केली, तेच नाव चिकटलं, तेच इथेही डकवलं. प्रत्यक्ष कागदावरमात्र आमच्या मातोश्रींनी ठेवलेलं माझं नाव वेगळं आहे आणि ते 'कोणाचीतरी आई' यापेक्षा ते अधिक अर्थपूर्ण आहे. अर्थात त्यातही माझं काहीच कर्तृत्त्व नाही. पृथ्वीला माता म्हणण्यात अडचण नाही; बहुदा इथे पृथ्वीवर झालेल्या/होणार्‍या भीषण बलात्कारासंदर्भात चर्चा नसावी. पण त्याबद्दल बोलतोच आहोत तर सूर्याला मराठी, इंग्लिश खगोलीय लिखाणात जनक-तारा असं म्हणतात. पृथ्वी आई आणि सूर्य वडील असा विचार करून सूर्यमालेच्या निर्मितीचा प्रचलित सिद्धांत पाहिला तर सध्याच्या मूल्यांमधे फारच गडबड होईल. (शब्दकोषामधे देव हा शब्द आहे म्हणून नास्तिकांनी देवाचं अस्तित्व मान्य करावं का, असा एक हास्यास्पद प्रश्न पडला.) त्यामुळे कविकल्पना तेवढ्याच मर्यादित असलेल्या बर्‍या. भागवत अशाप्रकारची शेंडाबुडखा असणं आवश्यक नसणारी वक्तव्य करत होते असं सुचवत असेल तर पुन्हा माझा आक्षेप मागे. आणि नाही बुवा, मला नसता प्रतिसाद दिलात तरी चाललं असतं. माझ्या प्रतिसादावर आक्षेप घेणार्‍यांपैकी एकाने आधीच उत्तर दिलेलं आहे. तुमचा मूळ मुद्दा, खोट्यानाट्या बातम्या देण्याबद्दल प्रसारमाध्यमांचा निषेध, तो मला मान्यच आहे. आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला acknowledge करून तुम्ही प्रतिसादसंख्या निष्कारण फुगवत नाही हे एवढ्या वर्षांत माहित झालेलं आहे. त्यात लिंगभेद मी तरी नाही बघू शकत. अर्थात निषेधाची आपापली कारणं वेगवेगळी आहेत म्हणून माझा निषेध तुमच्या निषेधापेक्षा पातळ ठरवणार असाल तर खुश्शाल ठरवा. लिंगसमानतेप्रमाणेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्यही मी मानते.
... तरी देखील तुम्हाला सांस्कृतिक दृष्टीकोन पटत नसला तर तो तुमचा प्रश्न आहे.
आधुनिक स्त्रीवादी लेखक-लेखिका या प्रकारचं महत्त्व स्त्रियांना देण्याला विरोध करतात. याचं कारण असं की यात स्त्रीला उच्च दर्जा दिला जातो त्यामागे काहीही रॅशनेल नाही. आपला वंश/मनुष्यजात टिकवण्यामधे स्त्रियांचा किंचित जास्त वाटा आहे असं दिसतं, याचं कारण पुरुषांकडे गर्भाशय नाही. पण या प्रकारे उच्च दर्जा दिल्याचं भासवून स्त्रियांना खालचं सामाजिक स्थान देण्याचा प्रकार हजारो वर्ष सुरू आहे. "कागदोपत्री" उच्च दर्जा देऊन स्त्रियांवर केलेल्या या अन्यायाकडे भागवतांनी (आणि/किंवा त्यांच्या समर्थकांनी) डोळेझाकच करायची ठरवली असेल तर मग चालू द्या, एवढंच म्हणू शकते. दुसर्‍या बाजूने एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की लिंगाधारीत उच्चस्थान असो नीचस्थान, ते अमान्यच. ज्या संस्कृतीचे दाखले देऊन शोषण होतं, उच्चनीचत्त्व दिलं जातं, तो दृष्टीकोन मला अमान्य आहे. माझ्या प्रतिसादाचा अधिक अर्थ विचारेपर्यंत (संघ किंवा भागवतांच्या समर्थनाची अपेक्षा न ठेवता) मी फक्त प्रसारमाध्यमांचा निषेध करूनच थांबले होते. पुढच्या प्रतिसादांमधेही विचारसरणीचा विरोध आहे, त्यात व्यक्तींना हीन लेखण्याचा प्रयत्न दिसत असेल तर माझी शब्दनिवड चुकली असेल. माझा असा हेतू अजिबात नाही.
असे समजूयात की असतीलही ते खरे, पण त्या विरुद्ध अनुभव आलेले देखील असणारच ना, नाहीतर इतकी वर्षे ती संघटना कशी चालेल? एक संघटना काढून टिकवणे हे काही सगळ्यांना जमते अशातला भाग नाही. इतके वर्षे तर नाहीच नाही.
असा तर्क भरपूर वेळा ऐकला आहे. समितीने नक्की काय केलेलं आहे याची माहिती मिळाली तर आनंद होईल. ती कोणी देतच नाही. हळद-तिखट कुटून विकतात हे माहित्ये; आमच्या घरी अनेक वर्ष तिथूनच रतीब येत असे. समितीचं संस्थळ पाहिलं, समितीच्या कामाबद्दल काहीही भरीव माहिती मिळाली नाही. (त्यामानाने संघाचं संस्थळ बरंच भरगच्च आहे.) समितीच्या सदस्या किती उच्चशिक्षित आहेत याची फक्त आकडेवारी किंवा उदाहरणं मला नकोत. यात समितीचा सहभाग नक्की काय, किती? (आमच्या उच्चभ्रू शाळेतून दरवर्षी मुलं मेरिट लिस्टमधे यायची. पण त्यात शाळेचा नक्की वाटा किती होता? आम्हाला शिकवणारे शिक्षक किती थोर होते आणि या मुलांच्या पालकांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती यांचा संबंध किती असे प्रश्न या शाळेच्या पालकांमधे नेहेमी असायचे.) भाजप-प्रमुख कोण असावं यावर संघाचं काही मत असतं असं अधूनमधून काहीबाही वाचायला मिळतं. या बातम्यांचे तपशील खोटे, बनावट असतील पण भाजपमधे संघाचं मॅनिफेस्टेशन असतं किंवा असावं अशा प्रकारची इच्छा संघात नसते का? (असं असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज प्रतिसाद देऊन तसं सांगा.) अशा प्रकारच्या किती बातम्या समितीबद्दल येतात? बरं, तुम्ही म्हणता तशी प्रसारमाध्यमं स्त्रीद्वेष्टी असतील (ज्यावर माझा याबाबतीत विश्वास नाही,) तरीही गेली ७-८ वर्ष भारताच्या मध्यमवर्गात इंटरनेट, सोशल नेटवर्किंग चांगलंच पसरलेलं आहे. समितीचं अस्तित्त्वही माझ्या माहितीप्रमाणे याच मध्यमवर्गात आहे. मग समितीबद्दल काहीच चर्चा या मध्यमवर्गाकडून होत नाही याचं कारण काय? अगदी स्त्रियांची संख्या इंटरनेटवर आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे हे मान्य करूनही समितीच्या भरीव (किंवा बोगस) कामाबद्दल कोणीही, काहीही बोलत नाहीत याचं स्पष्टीकरण काय देणार? उलटपक्षी संघावर बोटं ठेवली की इंटरनेटवरच्या निदान काही स्त्रियाही (संघशाखेत त्यांना प्रवेश देत नाही तरीही) हिरीरीने संघाच्या बाजूने मुद्दे मांडताना दिसतात. अगदी वनवासी कल्याण आश्रमाचं नाव पुढे होतं, पण ते संघाचं कर्तृत्व आहे असं सांगण्यात येतं; समितीचं काय? माझ्याकडे तीनच (बाईमाणूस यांच्या प्रतिसादात त्यांना समितीचा अनुभव असण्याचा उल्लेख आहे, भरीव काम किंवा त्याबद्दल गौरवोद्गार दिसले नाहीत. उलट त्यांनी संघातल्या लिंग-असमानतेवर ओझरती टीका केली आहे.) डेटापॉईंट्स आहेत कारण उरलेला विद्याचा अभाव हा एक मोठा गोळा दिसत नाहीये किंवा आत्तापर्यंत मी तो दाखवण्यात अयशस्वी ठरले आहे. एकतर समितीकडे अधिक डेटापॉईंट्स नसावेत, किंवा असलेले डेटापॉईंट्स मांडायला त्यांच्याकडे प्रतिनिधित्त्व नाही (जे संघाकडे भरपूर आहे असं दिसतंच) किंवा दोन्ही. अगदी या धाग्यावरही संघाबद्दल प्रेम असणारे अनेक लोक आहेत, समितीचा मुद्दा काढला गेला आहे, पण कुठेही समितीच्या भरीव कामाबद्दल एकही प्रतिसाद नाही. ('अ‍ॅड होमिनेम'मुळे माझंही मनोरंजन होतं हो!) एवढी वर्ष टिकायला काय लागतं, डायनोसॉरची हाडंही लाखो वर्ष टिकलेली आहेत. फॉसिल्स म्हणून टिकून रहाण्यासाठी फार कर्तृत्व दाखवावं लागत नाही. ज्या गोष्टी नष्ट करण्यासाठी ठरवून, प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात त्याही तगून रहातात. (विश्व पृथ्वीकेंद्री नाही हा सिद्धांत, ज्यू धर्म, पोलिओचा व्हायरस अशी भरपूर उदाहरणं देता येतील.) पण फक्त टिकून रहाणं एवढंच महत्त्व असेल तर मग अधिक बोलत नाही. समितीच्या तीन आदर्शांपैकी एक झाशीची राणी आहे. समितीकडून लक्ष्मीबाईंचा वारसा कोण चालवतंय? मुलांसाठी उत्तम माता बनण्यासाठी (जे समितीचं एक ध्येय/आदर्श आहे) आजच्या जमान्यात फक्त हळद-तिखट विकण्यापलिकडे बायकांनी बरंच काही शिकण्याची, करण्याची आवश्यकता असते हे १०० वर्षांपूर्वी विठ्ठल रामजी शिंदे सांगायचे. ते तेव्हाही फार सफल झाले नाहीत. आजही हरलेच म्हणायचं. --- विमे, मी तुमचं मनोरंजन केल्याचं समितीमधे कळवू नका. स्त्रिया (म्हणजे त्यांच्या कृती, असा मला लागलेला अर्थ) मनोरंजनासाठी नाहीत असं समितीच्या पूर्वप्रमुखांनी म्हटलेलं आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मधे मधे करायची आमची सवय काहि जात नाहि...

अर्धवटराव
गुरुवार, 01/17/2013 - 05:06 नवीन
तुम्ही म्हणता तसं (अगदी) डायनासोरच्या हाडांप्रमाणे समिती (उगाच, काहि उपयोग नसताना) टिकुन राहिली... पण त्यात सरसंघचालकांचा स्त्रीद्वेष, अज्ञान, विज्ञानविरोध वगैरे कुठे दिसुन येतो? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

टाचण !

अर्धवटराव
गुरुवार, 01/17/2013 - 05:09 नवीन
विशेषतः भागवतांचा दुर्गुण कुठे दिसतो? (सध्याची चर्चा पर्टीक्युलरली त्यांच्याबद्दल चालली आहे म्हणुन हा मुद्दा...) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

माझे म्हणणे मला म्हणु द्या-

बाईमाणुस
गुरुवार, 01/24/2013 - 21:22 नवीन
>>बाईमाणूस यांच्या प्रतिसादात त्यांना समितीचा अनुभव असण्याचा उल्लेख आहे, भरीव काम किंवा त्याबद्दल गौरवोद्गार दिसले नाहीत. उलट त्यांनी संघातल्या लिंग-असमानतेवर ओझरती टीका केली आहे. माझ्या प्रतिसादाचा उल्लेख आला म्हणुन हे स्पष्टीकरण. समितीचेच काय पण इतरही कुठल्या परिवार-सन्घटनांचे काम हा माझ्या प्रतिसादाचा विषय नव्हता. निव्वळ महिलाविषयक सन्घाच्या धोरणाविषयी मला काही म्हणायचे होते. जे म्हणायचे होते ते मी स्पष्ट लिहिले होते. त्यावर पूर्णतः समाधान्कारक नसले तरी थोssssडेसे का होईना आशादायक उत्तर मला मिळाले आहे. अवान्तर - मी वयाच्या ज्या वळणावर आहे तिथे मला पूर्णतः काळी किन्वा पान्ढरी उत्तरे अपेक्षित नाहीत. ती जशी सन्घ-विचारातूनही मिळतील अशी अपेक्षा नाही. आणि इतरही विचारधारान्तूनही मिळतील इतके भाबडेपण माझ्यात नाही. (उदा. - आजचा स्त्रीवाद हा भान्डवलवादाच्या दावणिला बान्धला गेला आहे हा विचार मला पदोपदी येऊन भिडत असतो. त्याचे काय करायचे या विवनचनेतही असते मी अधून-मधून )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 01/17/2013 - 13:08 नवीन
त्यात देखील आपले प्रतिसाद वाचले आणि ३.१४ (अर्थात irrational) वाटले.
विकासराव, अर्धवटराव, विश्वनाथ मेहेंदळे, श्रीगुरूजी आणि इतरांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. एके काळी ही मिपा आय.डी धारण करणारी व्यक्ती बरीच संतुलित आहे असे वाटले होते पण कसलाच संबंध नसताना विनाकारण स्त्रीमुक्ती घुसडणे आणि प्रतिसादांमध्ये सतत लैंगिकतेशी ओढून ताणून संबंध लावायचा प्रयत्न करणे यावरून माझ्या जुन्या मतात बराच बदल झाला हे पण नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मी तो परिच्छेद परत परत वाचला.

मृत्युन्जय
Sat, 01/12/2013 - 10:57 नवीन
मी तो परिच्छेद परत परत वाचला. मला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळाले नाही. तुझे वक्तव्य थोडे औपरोधिक होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काश ये सच होता....

मन१
Sat, 01/12/2013 - 14:41 नवीन
आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत काश ये सच होता..... लोकशाहीतील lesser evil चा समर्थक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

४ वेळा वाचले. भागवतांच्या

कवितानागेश
Sun, 01/13/2013 - 01:37 नवीन
४ वेळा वाचले. भागवतांच्या वाक्यात निदान मला तरी कुठलाही द्वेष्टेपणा दिसला नाही. बाकीची सगळ्या केसची माहिती अजून पूर्ण वाचली नाही. वाचतेय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरळणे

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 01/17/2013 - 13:29 नवीन
आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत.
असे काहीतरी बरळले नाही तर आपला विचारवंतीपणा सिध्द होत नाही बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला

स्पा
Sat, 01/12/2013 - 10:52 नवीन
लेख आवडला विकास यांच्याशी तंतोतंत सहमत
  • Log in or register to post comments

लेख आवडला. विकास,अर्धवटराव

गणामास्तर
Sat, 01/12/2013 - 11:27 नवीन
लेख आवडला. विकास,अर्धवटराव आणि मृत्युन्जय यांच्याशी बाडीस.
  • Log in or register to post comments

दिल्लीतल्या घटनेनंतर बाष्कळ

श्रीगुरुजी
Sat, 01/12/2013 - 11:54 नवीन
दिल्लीतल्या घटनेनंतर बाष्कळ बडबड करणार्‍यांविरूद्ध उद्या रविवार सकाळच्या पुरवणीमध्ये हेमन्त देसाईंनी लेख लिहिला आहे. लेखाच्या सुरवातीलाच मोहन भागवतांचे प्रकाशचित्र आहे. म्हणजे लेखात इतरांबरोबर त्यांनाही या लेखात झोडपले असणारच. हेमन्त देसाईं हे कट्टर संघद्वेष्टे आहेत. त्यांनी भागवतांचे मूळ भाषण ऐकण्याचे कष्ट घेतले नसतीलच किंवा ऐकले असले तरी ते भागवतांविरूद्धच लिहिणार याची खात्री आहे. यावरून २००५ मधील अडवाणींचे जिनावरील वक्तव्य माध्यमांनी फिरवून कसा विपर्यास केला हे आठविले. २००५ साली पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून अडवाणी पाकिस्तानला गेले असताना ते असे म्हणाले होते की, "१९९४७ साली पाकिस्तान वेगळे राष्ट्र झाल्यावर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात जिनांनी जे भाषण केले त्यात निधर्मी राज्यव्यसस्था कशी असावी याबद्दलचे उत्कृष्ट विवेचन होते. जर पाकिस्तान त्या भाषणात सांगितलेल्या मार्गावर चालला असता तर पाकिस्तान आज एक सर्व धर्मियांना समान वागणूक देणारा निधर्मी राज्य बनला असता." यात गोंधळ माजण्यासारखे काहीही नव्हते. पण "भारताचे विभाजन करणार्‍या जिनाची अडवाणींनी स्तुती केली" असा माध्यमांनी गलबला करून अडवाणींना सर्वत्र झोडपून काढले गेले. प्रत्यक्षात अडवाणींनी पाकिस्तानच्या धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेला टोला हाणला होता. पण त्यावेळी त्यागदेवता सोनिया गांधींच्या तेजामुळे दिपलेल्या माध्यमांनी या वाक्यांचा संपूर्ण विपर्यास करून अडवाणींची छीथू करून टाकली.
  • Log in or register to post comments

देसाईंना पत्र पाठवण्यात आले आहे !

विटेकर
Mon, 01/14/2013 - 15:04 नवीन
---------- Forwarded message ---------- From: vitekar Date: 2013/1/14 Subject: Article in Sakal To: hemant.desai001@gmail.com, author@esakal.com नमस्कार श्री. देसाई , आपला सकाळ मधील लेख वाचला . लेख अजिबात पटला नाही आणि म्हणून ही मेल ! श्री मोहन भागवत यांच्यावर आपण केलेली टिका अत्यंत कलुषित बुद्धीने आणि पूर्वग्रहदूषित असून, पीत पत्रकारितेला देखील काळिमा फासणारी आहे. उत्तमॉत्तम पत्रकार आणि न्याय बुद्धीने चालवलेल्या मराठी वृत्तपत्रीय परंपरेस आपण गालबोट लावले आहे. आपला "बोलविता धनी" कोणीतरी वेगळाच असून केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण ही गरळ ओकली असून सत्याचा विपर्यास्त करण्याचा जाणून-बुजून प्रयत्न केला आहे अशी आम्हाला खात्री आहे . याबद्दल आपला निषेध व्यक्त करून ईश्वर आपल्याला सद् बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो.याचे प्रायश्चीत्त म्हणून आपण ताबडतोब जाहीर माफी मागून लेखन संन्यास घ्यावा . मा. संपादक , लोकशाहीमध्ये वृत्तपत्रे हा महत्वाचा स्तंभ मानला जातो आणि म्हणोन वृत्तपत्रांनी जबाबदारीने लेखन करणे अपेक्षित आहे.आपल्याकडून या संकेताची पायमल्ली झाली आहे असे आमचे नम्र सांगणे आहे. जाहीर माफी आणि पुन्हा असला अश्लाघ्यपणा न करण्याची जाहीर हमी याद्वारे आपण आपली चूक निस्तरू शकता. बाकी महाराष्ट्र टाईम्स च्या आव्हानापुढे आपले वृत्तपत्र लवकरच बंद पडणार असल्यामुळे तुमचे वृत्तपत्र बंद करा असे म्हणण्याचे आवश्यकता वाटत नाही. ईश्वेरेच्छा बलीयसी ! धन्यवाद सुहास क्षीरसागर ( विटेकर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा हा...

दादा कोंडके
Mon, 01/14/2013 - 15:17 नवीन
याचे प्रायश्चीत्त म्हणून आपण ताबडतोब जाहीर माफी मागून लेखन संन्यास घ्यावा .
जाहीर माफी आणि पुन्हा असला अश्लाघ्यपणा न करण्याची जाहीर हमी याद्वारे आपण आपली चूक निस्तरू शकता
या ओळी खत्राच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अहो कशाला मेलामेली कर्ताय?

अभ्या..
Mon, 01/14/2013 - 15:49 नवीन
अहो कशाला मेलामेली कर्ताय? ह्याच असल्या मेल्स त्यांना बढती मिळवून देतील. आणि पेपरला ट्यार्पी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

"भागवतांचा तर्कहीन

श्रीगुरुजी
Sat, 01/12/2013 - 12:06 नवीन
"भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा यावरून त्यांना व्यवस्थित कोंडीत पकडता आलं असतं. पण भागवत वाट्टेल ते बरळले तरीही वर पुन्हा त्यांचीच माफी मागण्याची वेळ आली. आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत. " भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा तुम्हाला कधी दिसला? दिसला असल्यास उदाहरणे/पुरावे/संदर्भ द्यावा ही नम्र विनंती. तसेच भागवत वाट्टेल ते बरळतात याची काही उदाहरणे/संदर्भ्/पुरावे असल्यास द्यावे. बहुतेक सर्व माध्यमे कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधली गेली आहेत यात शंका नाही. पण तथाकथित उजव्या पक्षांना विकली गेलेली माध्यमे फार थोडी आहेत. बहुसंख्य माध्यमे काँग्रेसची मुखपत्रे आहेत. टाईम्स ग्रुप, हिंदुस्तान टाईम्स इ. प्रमुख इंग्रजी वृत्तसंस्था गेली अनेक दशके काँग्रेसच्या बरोबर आहेत. "हिंदू" ग्रुप डाव्या पक्षांच्या बाजूने आहे. आऊटलुक सारखी सात्पाहिके काँग्रेसची मुखपत्रे आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर "सकाळ" ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने, "लोकमत" ग्रुप काँग्रेसच्या बाजूने आहे. "सामना" शिवसेनेचे मुखपत्र आहे. कुमार केतकरांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतरच "मटा", "लोकसत्ता" इं. चे काँग्रेसपुराण जरा कमी झाले आहे, परंतु दोन्हीकडे सुरेश भटेवरा, गिरीश कुबेर इ. सारखे कट्टर संघ/भाजपविरोधी आहेत. त्यातल्या "पुढारी" हे एकमेव वृत्तपत्र बर्‍याच प्रमाणात समतोल राखून आहे. "झी न्यूज", "एनडीटीव्ही", "आजतक", "आयबीएन" इ. वृत्तवाहिन्या उघडउघड काँग्रेसच्या समर्थक आहे. तथाकथित उजव्या पक्षांची समर्थक अशी एकही वृत्तवाहिनी नाही. त्यामुळे "आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत." हे वाक्य खरे नाही.
  • Log in or register to post comments

त्यातल्या

अँग्री बर्ड
Mon, 01/14/2013 - 09:19 नवीन
त्यातल्या "पुढारी" हे एकमेव वृत्तपत्र बर्‍याच प्रमाणात समतोल राखून आहे. -१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

छ्या.....

नाखु
Sat, 01/12/2013 - 12:08 नवीन
विकासराव्,श्री गुरुजी यांनी आमची संघाची "टिंगल-टवाळी (चिखलफेक)करण्याच्या हेतुलाच बाधा आणली कि राव. तुमच काय म्हणण कि आम्ही संघाचं देशकार्य (देशाच्या ईशान्य पुर्व भागतलं) कशाला बघायचय.
  • Log in or register to post comments

भविष्यात एखादी स्त्री संघ

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 18:13 नवीन
भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा.
  • Log in or register to post comments

रज्जूभैय्या आणि कुप्प सी सुदर्शन

मन१
Sat, 01/12/2013 - 18:47 नवीन
रज्जूभैय्या आणि कुप्प सी सुदर्शन हे कोकणस्थ आहेत्/होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

दोघेही महाराष्ट्रीयन नाहीत.

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 19:09 नवीन
दोघेही महाराष्ट्रीयन नाहीत. असो माझा मुद्दा पोहोंचला असावा ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

च्यायला थोडी टीका

निनाद मुक्काम …
Sun, 01/13/2013 - 00:53 नवीन
च्यायला थोडी टीका देशस्थांच्या वर सुद्धा करा की ह्या निमित्ताने ही पोट जात सुद्धा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ह्याची दखल घेतल्या जाईल. हे वाक्य जे प्रत्येक गोष्टीत ब्राह्मण द्वेष आणतात त्यांच्या साठी आहे/ विशेतः बिगर कोकणस्थ.... असे विधान करण्याच्या ऐवजी अभ्यास वाढवा सर्व मराठी बांधवांनी एकत्र ह्या यावे असे मला मनापासून वाटते , जात पात प्रत्येक गोष्टीत आणली पाहिजे का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

+१

ईन्टरफेल
Wed, 01/16/2013 - 21:08 नवीन
१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

ह्या निमित्ताने ही पोट जात

बॅटमॅन
Mon, 01/21/2013 - 14:49 नवीन
ह्या निमित्ताने ही पोट जात सुद्धा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ह्याची दखल घेतल्या जाईल.
अगदी अगदी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

...

विकास
Sat, 01/12/2013 - 19:46 नवीन
>>> भविष्यात एखादी स्त्री संघ संचालिका पाहायला मिळेल ही अपेक्षा. परत परत तेच. काही न वाचता टंकायचे... वरची चर्चा वाचा अथवा संघ आणि समितीवरील माहिती वाचा. बाकी काही नाही तर लोकसत्ता आयडीआ एक्सचेंजमधील सरसंघचालक मोहनजी भागवत यांची विस्तृत मुलाखत ऐका... >>> १९२५ पासून संघाला एकही बिगर कोकणस्थ संचालक नाही मिळाला हा योगायोग असावा. तुम्ही जाती मानता का? संघ मानत नाही आणि कधी विचारत देखील नाही. बाकी मुळ मुद्याबद्दल काय म्हणणे आहे ते लिहायचे विसरलात का? - प्रसार माध्यमांच्या खोटेपणाबद्दल काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 20:20 नवीन
तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला. एवढ्या मोठ्या संघटनेला गेल्या ८७ वर्षात एकही स्त्री किंवा गेला बाजार एका विशिष्ट जातीपलिकडे सरसंचालक मिळत नाही हे पटत नाही. आम्ही जात मानत नाही वैयागेरे युक्तिवाद भावनिक ठिकाणी ठीक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

=))

पैसा
Sat, 01/12/2013 - 20:30 नवीन
ओ साहेब, स्त्रियांबद्दल इथेच वर झालेली चर्चा वाचलीत का? ती आधी वाचा. तुम्हाला कशाबद्दलही काहीही माहिती नाही असे दिसतेय! कोकणस्थ सरसंघचालक Keshav Baliram Hedgewar (1925-1930 and 1931 to 1940) Dr. Laxman Vaman Paranjpe (1930-1931) (when Dr Hedgewar was in jail during Forest Satyagraha) Madhavrao Sadashivrao Golwalkar, called as Guruji (1940-1973) Madhukar Dattatraya Deoras, called as Balasaheb (1973-1994) Rajendra Singh, called as Rajjubhaiya (1994-2000) K. S. Sudarshan (2000-2009) Mohan Bhagawat (March 2009-present) यांच्यापैकी श्री परांजपे हे एकटे कोकणस्थ होते हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते. इतरांबद्दल माहिती दिलीत तर माझेही सामान्यज्ञान वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अहो बाईसाहेब एक तरी

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 20:35 नवीन
अहो बाईसाहेब एक तरी ब्राम्हणेतर आहे का या यादीत. बाकी देवरस हे कोकणस्थ नवते म्हंतल्यावर डोळे पानवले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

रज्जूभैय्या कोण होते ओ?

प्रचेतस
Sat, 01/12/2013 - 20:38 नवीन
रज्जूभैय्या कोण होते ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सांगा की तुम्हीच. वैश्या होते

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 20:44 नवीन
सांगा की तुम्हीच. वैश्या होते की क्षत्रीया.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

संघचालक कोणी का असेना,पण

श्री गावसेना प्रमुख
Sun, 01/13/2013 - 09:45 नवीन
संघचालक कोणी का असेना,पण त्यांच्या मदतकार्याच्या वृत्तीला तोड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हे मात्र लाखाच बोललात ; )

पिंपातला उंदीर
Sun, 01/13/2013 - 09:51 नवीन
हे मात्र लाखाच बोललात ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

मला माहित नाही

पैसा
Sat, 01/12/2013 - 20:44 नवीन
माझ्या आईवडिलांनी मला नावावरून जाती ओळखायला शिकच्वले नाही ही मोठी चूक झाली. इतर सरसंघचालक जातीने कोण हे मला माहिती नाही म्हणून तर तुम्हाला विचारतेय ना! तुम्हाला जातींबद्दल बरीच माहिती दिसतेय. म्हणून तर सांगा की. आम्ही तरी माणसाला त्याच्या कामावरून ओळखतो. जातीवरून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 20:49 नवीन
तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे तुमच्या बद्दल नाही बोलत आहोत. संघाबाद्दल बोलत आहोत. वैयक्तिक होणे इथेच थांबवुयात. आणि मुखया म्हणजे आती भावनिक ना होता जरा fact-based चर्चा करूयाात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नॉनसेन्स

चित्रा
Sat, 01/12/2013 - 20:58 नवीन
आत्तापर्यंत बोलले नाही. वाचते आहे. पण फॅ़क्टस तुम्हीच सांगा. संघावर जातीयतेचा आरोप तुम्ही करत आहात. प्रूफ तुम्ही द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

तेच तेच पुन्हा पुन्हा. वरची

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 21:03 नवीन
तेच तेच पुन्हा पुन्हा. वरची चर्चा वाचा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

कै च्या कै... चर्चेचा मूळ

आनन्दिता
Sat, 01/12/2013 - 21:42 नवीन
कै च्या कै... चर्चेचा मूळ मुद्दा कुठल्या कुठे सोडून जातिपाती चे फाटे फोडण्याला काय अर्थ आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

कोणी का असेना, फरक काय पडतो?

अन्या दातार
Sat, 01/12/2013 - 21:19 नवीन
कोणी का असेना, फरक काय पडतो? (तुम्हाला व मला, दोघानाही) या 'फॅक्ट' बदल बोलाल का जरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

आता परत मुद्दा बदलू नका

मैत्र
Sun, 01/13/2013 - 11:20 नवीन
आधी सर्व कोकणस्थ म्हणालात, मग दोन दक्षिण भारतीय म्हणून त्यांना वगळलं. मग जेव्हा बहुसंख्य कोकणस्थ नाहीतच हे लक्षात आणून दिल्यावर ब्राम्हणेतर नाहीत यावर वळलात. मग यादी माहीत नसताना कोकणस्थ हा मुद्दा इथे कशासाठी आणला होता आणि त्याचा वरील चर्चेशी - भागवत यांच्या वाक्याचा मीडियाने केलेला विपर्यास आणि संघविरोधकांनी मूळ भाषण न पाहताच चालवलेल्या लेखण्या हा होता. त्यातून श्री घासकडवी यांनी भागवत काहीही म्हटले असले तरी स्त्रियांचे संघातील स्थान हे दुय्यम आहे असा मुद्दा काढला. म्हणजे जो मूळ चर्चाविषय आहे की मीडिया हवा तसा विपर्यास करून mass (मराठी ?) मध्ये पाहिजे तो विरोधी विचार पसरवण्याचं काम करते हा बाजूलाच. (संघ समर्थक नसलेला पण जातीभेदविरहीत अनेक शाखा जवळून पाहिलेला) मैत्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हा हा

विकास
Sat, 01/12/2013 - 21:25 नवीन
अजून माध्यमांच्या संदर्भाच्या चर्चेत काही बोलता येत नाही.माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का? पण त्याबद्दल लिहायचे सोडून जे आडात नाही ते पोहर्‍यात आणायचा बाष्कळ प्रयत्न चाललाय. जिथे तिथे जाती बघण्यार्‍यांना आणि तरी स्वतःला सुधारकी दाखवण्याची धडपड करणार्‍यांना "जातीयवादी सुधारक" असे म्हणता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

बाकी भागवत यांच्या बलात्कार

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 21:36 नवीन
बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील. हा प्रतिसाद पाहावा. आणि एखाद्या संघटनेत एका जातीपलिकडे सरसंचालक होत नाः हे दाखवणे हा जातीयवाद कसा? माझा युक्तिवाद मान्य नसेल तर तो उदाहरण देऊन नाकारवा. बाकी भावनिक युक्तिवाद ला reply द्यायला खरेच वेळ नाही. फॅक्ट्स द्या आणि बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मूळ चर्चेस उत्तर

विकास
Sat, 01/12/2013 - 22:20 नवीन
अजून देखील मूल चर्चेतील प्रश्नाला बगल देत आहात. माध्यमे प्रामाणिक वाटतात का? ही चर्चा आहे... याचे उतर द्या. बाकी कोणाची जात काय बघणे आणि त्यावरून काँमेंट करणे याला जातीयवाद म्हणतात. तुम्ही कदाचीत स्वतःला सुधारक समजणार्‍या कंपुतले समजता असे दिसते , म्हणूनजातीयवादी सुधारक आहात असे म्हणले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

ह्या मुद्द्यावर भागवत

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 22:42 नवीन
ह्या मुद्द्यावर भागवत यांच्यावर खूप टीका केली होती मीडीया ने. करा प्रतिवाद. बाकी मी मांडलेले इतर मुद्दे खूप जड आहेत प्रतिवाद करायला. बाकी भागवत यांच्या बलात्कार इंडिया मध्ये होतात , भारतात नाही या विनोदी वक्तव्याबद्दल इथल्या संघ समर्थकांची मत जाणून घ्यायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

"आवडतीचा शेंबूड गोड आणि

चेतन
Sun, 01/13/2013 - 11:49 नवीन
"आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी" आणि "माकड म्हणतं माझीच लाल" या म्हणिंची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मांडलेले इतर मुद्दे खूप जड आहेत -;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हे हे

नर्मदेतला गोटा
Sat, 01/19/2013 - 14:31 नवीन
हे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

"अजून माध्यमांच्या

श्रीगुरुजी
Sun, 01/13/2013 - 12:56 नवीन
"अजून माध्यमांच्या संदर्भाच्या चर्चेत काही बोलता येत नाही.माध्यमांचा अप्रामाणिकपणा मान्य आहे का? " ८ जानेवारी २०१३ ला संध्याकाळी आयबीएन लोकमत पहात होतो. त्यादिवशी मुम्बई दंगलीला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निखिल वागळे एक "विशेष वृत्तांत" दाखवित होते. त्यांच्या प्रतिधिनिने त्या दंगलीत एकून ९०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असे सांगून त्यापैकी ६०० ते ६४० "मुस्लिम" होते व उरलेले "इतरधर्मीय" होते, असे सांगितले. ज्या व्यक्तीने ९०० तले एकूण मुस्लीम अगदी अचूक मोजले त्या व्यक्तीने उरलेल्यातले "हिंदू" किती हे मात्र सांगितले नाही. नंतर एकूण ४-५ जणांच्या मुलाखती दाखविल्या. त्यात दंगलीची झळ पोचलेल्या दोन मुस्लिम व्यक्ती होत्या, तिस्ता सेटलवाडची मुलाखत दाखविली व उरलेले दोघे दंगलीची झळ पोचलेल्या मुस्लिमांचे प्रातिनिधित्व करणारे मुस्लिम वकील होते. त्या दंगलीत किमान एक तृतीयांश हिंदू मृत्युमुखी पडलेले होते (यात राधाबाई चाळीत खोलीत कोंडून जाळलेले ८ जण, ६ जानेवारीला भोसकून मारलेल ६ माथाडी कामगार अशा अनेकांचा समावेश होता), पण "हिंदू" या शब्द वापरून आपली जीभ विटाळून घेण्यापेक्षा त्या प्रतिनिधिने "इतरधर्मीय" हा शब्द वापरला. तसेच दंगलीची झळ अनेक हिंदूंनादेखील पोचली होती. पण या "विशेष" वृत्तांतात त्याचा पुसटता देखील उल्लेख नव्हता. हा अत्यंत एकतर्फी व पक्षपाती वृत्तांत होता व असे करण्याची वागळे यांची व आयबीएन-लोकमतची ही पहिली वेळ नव्हती किंवा अखेरची देखील नसेल. वागळे, हेमंत देसाई, जतीन देसाई, गिरिष कुबेर, सुरेश भटेवरा इ. पत्रकार हे कट्टर संघ/भाजपविरोधी आहेत आणि ते वेळोवेळी पक्षपाती वृत्तांकन करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

जरा पिवळा चष्मा काढा की...

विटेकर
Mon, 01/14/2013 - 14:08 नवीन
किती बर ळाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हा आणि वरचा प्रतिसाद उदगीरकराना आहे.

विटेकर
Mon, 01/14/2013 - 14:13 नवीन
गिर्‍या तो भी टांग उप्पर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा