✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डार्विन च्या माकडांचा नंगानाच

ज
जहीर सय्यद यांनी
गुरुवार, 01/03/2013 - 22:47  ·  लेख
लेख
प्रिय वाचकांनो, वाक्य रचनेच्या व्याकरणाच्या व इतर चुका पदरात पाडून घेणे हि नम्र विनंती.

वैज्ञानिक परिकल्पना आणि मानवतेने चुकवलेली किंमत

डार्विन चा जवळ चा मित्र Professor Adam Sedgwick त्या थोड्या लोकांपैकी होता ज्याने डार्विन च्या सिद्धांताचे भयानक स्वरूप ओळखले होते. The Origin of Species वाचल्या नंतर तो म्हणाला होता "If this book were to find general public acceptance, it would bring with it a brutalisation of the human race such as it had never seen before." A.E. Wilder-Smith, Man's Origin Man's Destiny, The Word for Today Publishing, 1993, p.166 डार्विन ने आपल्या परीकल्पनेत असे सांगितले कि सजीवाची प्रगती हि त्याच्या अस्तित्वाच्या लढाई वर अवलंबून आहे. Fight for survival. आणि या संघर्षात फक्त शक्ती शाली चा विजय होणार आणि कमजोर नष्ट होणार. या अवैज्ञानिक परीकल्पने नुसार निसर्गात अस्तित्वासाठी एक निरंतर असे क्रूर संघर्ष आहे ज्या मध्ये शक्तीशाली नेहमी कमजोर वर काबीज होणार आणि अश्या तर्हेने विकासाची एक पायरी चढली जाते. पुढे जाऊन तो सांगतो कि हाच नियम मनुष्य प्राण्याला देखील लागू पडतो. त्याच्या म्हण्या नुसार तो शक्तिशाली आणि लायक "युरोपिअन गोरा" हा वौंश आहे, आणि या व्यतिरिक्त एशियन आफ्रिकन व इतर हे कमजोर आणि नालायक आहेत कालांतराने हे वंश नष्ट होतील व युरोपिअन वंशाचा विजय होईल. Sidney Fox, Klaus Dose, Molecular Evolution and The Origin of Life, New York: Marcel Dekker, 1977, s. थोडक्यात या रानटी विचारांना युरोपातील वैज्ञानिकांनी मान्यता देवून टाकली आणि त्याला विज्ञानाची जोड देवून त्याला योग्य कायदेशीर नैसर्गिक असे सम्भोदित करण्यात आले. खरे म्हणजे डार्विन ने हे विचार माल्थस कडून घेतले होते हा एक ब्रिटीश इकोनॉमीस्ट होता. ह्याने एक पुस्तक लिहले होते An Essay on the Principle of Population त्याचे असे म्हणणे होते कि जागील लोकसंख्या जेंव्हा वाढते तेंव्हा युद्धे, रोगराई, दुष्काळ ह्या नैसर्गिक आपत्ती त्याला काबूत ठेवतात. त्याच्या या रानटी परीकथेनुसार काही लोकांना जगण्या साठी दुसर्या काही लोकांना मरणे आवश्यक आहे. १९ शतकात युरोमधील उच्च वर्गातील बुद्धीवाद्यांनी ह्या बेगड्या तत्वज्ञानाला मान्यता दिली. Theodore D. Hall चा एक लेख "The Scientific Background of the Nazi "Race Purification" Programme मध्ये मानवतेच्या दुर्दैवाचे सत्य अश्या प्रकारे सांगतो: “In the opening half of the nineteenth century, throughout Europe, members of the ruling classes gathered to discuss the newly discovered "Population problem" and to devise ways of implementing the Malthusian mandate, to increase the mortality rate of the poor: "Instead of recommending cleanliness to the poor, we should encourage contrary habits. In our towns we should make the streets narrower, crowd more people into the houses, and court the return of the plague. In the country we should build our villages near stagnant pools, and particularly encourage settlements in all marshy and unwholesome situations," and so forth and so on.” New Evidence on Evolution of Early Atmosphere and Life, Bulletin of the American Meteorological Society, cilt 74, Kasım 1982, s. 1328-1330 १९ व्या शतकाच्या पूर्व अर्ध्या मध्ये संपूर्ण युरोपातील साशक वर्गातील सदस्य ह्या लोकसंख्या वाढीच्या नवीन प्रश्नाचे समाधान शोधण्या साठी एकत्र जमले आणि काय काय उपाय योजना करता येईल ह्या साठी चिंतन सुरुकेले. जास्तीत जास्त गरीब लोक मेले पाहिजे त्यासाठी काही ठराव केले गेले ते असे होते: गरीब लोकांसाठी रस्ते अरुंद ठेवा, त्यांना छोट्या घरात जास्त लोकांना राहणे/जगणे भाग पाडा, त्यांना अस्वच्छ, घाणेरडे राहण्यची सवय घाला, छोटे छोटे खेडे पाण्याच्या डबक्या जवळ वसावा. प्लेग सारखे रोग पसरेल यासाठी प्रयत्न करा. Thomas R. Malthus, An Essay on the principle of population as it affects the future improvement of society, Reprint, London: Reeves and Turner, (1798) 1878, p. 412. (emphasis added) विज्ञानाच्या नावावर किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे तथाकथित बुद्धीवादी. मानवतेच्या दुर्दैवाने हि उपाय योजना इंग्लंड मध्ये अमलात आणली गेली. औद्योगिक संस्था स्थापून गरीब मुलांना कोळश्याच्या खाणीत दिवसातून १६/१६ तास काम करवून घेतले. अतिशय विपरीत भयानक अश्या परीस्थित काम करून हजारो लोक आपल्या जीवास मुकले. माल्थस च्या सिद्धांत "जगण्यासाठी संघर्ष" च्या मागणी नुसार लाखो गरिबांना अत्यंत विपरीत परिस्थितीत जगावे लागले. अश्या या माल्थस च्या कार्याने प्रभावित होऊन डार्विन ने सुद्धा आपले "मोलाचे योगदान" दिले. माल्थस च्या ह्या संघर्ष च्या सिद्धांत ला त्याने संपूर्ण निसर्गावर लागू केले आणि सांगितले कि सशक्त आणि योग्य/लायक फक्त ह्या संघर्षात टिकतात बाकी नष्ट होतात आणि हे एक उचित आणि न टाळता येणारे नैसर्गिक नियम आहे. ह्या अश्या रानटी विचारांच्या प्रचार प्रसाराने २० शतकतिल मानवतेला निर्दयता आणि क्रूरते कडे घेवून गेले. आणि मानवतेला त्याची भारी किंमत चुकवावी लागली. युरोप वर डार्विनवादाने आपली पकड मजबूत केलेली होती. हळू हळू Struggle for survival ह्या भ्रमाचा प्रभाव दिसुलागला आणि विशेषतः सत्तापिपासू साम्राज्यवादी युरोपीय शक्ती त्यांच्या अधिपत्यखालील गुलाम देशांना "Evolutionary backward nations" म्हणून तर्कसंगतते साठी डार्विन कडे बघू लागली.

डार्विन वादाचा भयानक राजकीय प्रभाव म्हणजे पहिल्या महायुद्धाचा भडका...

पहिल्या महायुधासाठी डार्विनवाद कसा कारणीभूत आहे हे समजावून सांगताना इतिहासाचे प्रख्यात प्रोफेसर James Joll असे म्हणतात: “…it is important to realise how literally the doctrine of the struggle for existence and of the survival of the fittest was taken by the majority of the leaders of Europe in the years preceding the First World War. The Austro-Hungarian chief of staff for example, Franz Baron Conrad von Hoetzendorff, wrote in his memoirs after the war: Philanthropic religions, moral teachings and philosophical doctrines may certainly sometimes serve to weaken mankind's struggle for existence in its crudest form, but they will never succeed in removing it as a driving motive of the world… It is in accordance with this great principle that the catastrophe of the world war came about as the result of the motive forces in the lives of states and peoples, like a thunderstorm which must by its nature discharge itself.” Stanley Miller, Molecular Evolution of Life: Current Status of the Prebiotic Synthesis of Small Molecules, 1986, s. 7 हे समजून घेणे महत्वाचे आहे कि कश्या प्रकारे युरोप च्या राजकीय नेत्यांनी डार्विन चे सिधात्न्त Struggle for existence आणि Survival of the fittest ह्यांना शब्दशा घेतले होते. Friedrich von Bernhardi, पहिल्या महायुद्धातील एक जनरल युद्ध आणि युद्धाचे नियम बद्दल असे काही सांगतो "War, is a biological necessity"; it "is as necessary as the struggle of the elements of nature"; it "gives a biologically just decision, since its decisions rest on the very nature of things." Leslie E. Orgel, "The Origin of Life on Earth", Scientific American, cilt 271, Ekim 1994, s. 78 ह्या व इतर अनेक उदाहरण वरून अनुमान काढू शकतो कि पहिल्या महायुध्याच्या भडका होण्यात डार्विन च्या सिद्धांताचा किती मोठा वाट आहे.

दुसरे महायुद्ध:

डार्विन च्या प्रभावा खालील फसिस्ट भक्तांनी युद्धाला एक आवश्यक घटक मानले आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आणि जगातील इतर मानव जातीला अनन्वित छळ आणि मानवी संहाराला कारणीभूत ठरविणारे दुसरे महायुद्धाची मुहूर्त पेढ रोवली. त्यांच्याच युकीवादावरून किंवा कबुली जबाबावरून निघणारा निष्कर्ष ऐकून एक सर्व साधारण मनुष्याला आश्चर्य युक्त दुखद धक्का बसतो कि या सर्व ऐतिहासिक दुर्दैवाला डार्विन चे विचार, युक्तिवाद जबाबदार आहेत. डॉ. जेरी बर्गमन डार्विन वादाच्या प्रभावाचे विश्लेषण करताना असे म्हणतात. “The evidence is very clear that Darwinian ideas had a tremendous impact on German thought and practice… In fact, Darwinian ideas had a tremendous influence on causing World War II, the loss of 40 million lives, and the waste of about 6 trillion dollars. Firmly convinced that evolution was true, Hitler saw himself as the modern savior of mankind… By breeding a superior race, the world would look upon him as the man who pulled humanity up to a higher level of evolution.” http://www.fixedearth.com/hlsm.html तो अगदी स्पष्ट आणि सरळ भाषेत सांगतो कि “जर्मनी च्या विचारात आणि आचारात डार्विनच्या विचारांचा प्रभाव होता आणि एवढेच नव्हे तर दुसरे महायुद्ध घडून येण्या मागे डार्विनवादी विचारांचा प्रत्यक्ष सहभाग होता. ४० लाख लोकांचे जीवन, ६ ट्रीलीयन डॉलर चा चुराडा, डार्विन च्या परीकल्पनेने भारावून हिटलर एक नवीन आर्यवंशा चे निर्माण करून स्वतःला मानवतेचा रक्षक समजत होता कि ज्याने मानवतेला उत्क्रांतीच्या एका उच्च पायरीवर नेहले आहे”. याच्यात वाद नाही कि आधी देखील इतिहासात अनेक युद्धे झाली मानव संहार झाला परंतु डार्विन च्या परीकल्पनेच्या प्रभाव खाली इतिहासात पहिल्यांदा युद्धातला विज्ञानाच्या संमतीने कायदेशीर करण्यात आले. एका लेखाने अमेरिकेत बरेच वादळ उठले होते, त्या मध्ये लेखक मॅक्स नॉरडाउ दुसर्या महायुद्धसाठी किंवा नरसंहारासाठी डार्विन वादी विचार कशे जबाबदार होते ते अगदी स्पष्ट भाषेत सांगतो... “The greatest authority of all the advocates of war is Darwin. Since the theory of evolution has been promulgated, they can cover their natural barbarism with the name of Darwin and proclaim the sanguinary instincts of their inmost hearts as the last word of science”. Max Nordau, The Philosophy and Morals of War, North American Review 169 (1889):794, cited in Hofstadter, Social Darwinism, p. 171.

हिटलर:

हिटलर वर डार्विनवादाचा खोलवर प्रभाव होता. आणि याचे प्रतीबिंब त्याचे पुस्तक माझा लढा या मध्ये अगदी स्पष्टपणे जाणवते. तो काबुल करतो कि तो डार्विन च्या Struggle for survival या युक्तीवादाने कश्या प्रकारे प्रभावित झालेला आहे. तो म्हणत असे कि जगाच्या इतिहासातून उत्तर जर्नामिच्या युरोपियन समाजाला काढून टाकले तर खाली काय शिल्लक राहील ...फक्त माकडांचा नाच. या वाक्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो कि तो किती पक्का डार्विन भक्त होता. १९३३ मधील न्युरेम्बर्ग पार्टी ऱ्याली मध्ये तो म्हणतो... "Higher race subjects a lower race to itself… a right which we see in nature and which can be regarded as the sole conceivable right…" www.trueorigin.org/holocaust.asp हे वाचून लक्षात येते कि डार्विनच्या विचारांचा तो फक्त समर्थकच नव्हता, तर त्याने केलेल्या जुलूम अत्त्याचार आणि हत्याकांडाला जणू काही ह्या डार्विनच्या तथाकथित वैज्ञानिक विचारांचा आधार घेतला होता.. हिटलर चा आर्य वंश च्या तथाकथित उच्च असण्याच्या मतावर ठाम विश्वास होता. त्याचे मानने होते कि आर्य वंशाला हि देणगी निसर्गाने दिली आहे. आणि हेच नाझी पार्टी चे तत्व होते कि ज्या मुळे जगाने ऐतिहासिक हत्याकांड पहिले. आणि हि गोष्ट एखादा शालेय विद्यार्थी देखील सांगू शकेल कि हि तत्वे डार्विनच्या Natural selection आणि Survival for the fittest चा अर्क आहे म्हणून.

कम्युनिस्ट जग :

डार्विनवादाचे कम्युनिइज्म इतके महत्व होते कि जेंव्हा डार्विन चे पुस्तक पहिल्यांदा छापले गेले, Engels आपला मित्र Marx ला पत्र द्वारे लिहतो... “Darwin, whom I am just now reading, is splendid." Conway Zirkle, Evolution, Marxian Biology and the Social Scene, Philadelphia: The University of Pennsylvania Press, 1959, p . 527. १९ डिसेंबर १८६० मध्ये या पत्राच्या प्रती उत्तरात Marx असे लिहतो... "…This book contains the basis in nature for our view." …ह्या पुस्तकात आपल्या विचारांना निसर्ग देखील पुस्ती जोडतो असे सांगितले आहे (थोडक्यात कम्युनिजम ला डार्विनवादाचा संपूर्ण (वैज्ञानिक) पाठींबा आहे.) J. D. Bernal, Marx & Science, New York, International Publishers, 1952, p. 17. १६ जानेवारी १८६१ मध्ये Marx त्याचा अजून एक सोशालीस्ट मित्र Ferdinand Lassalle ला एका पत्रा द्वारे असे सांगतो कि… “डार्विन चे हे पुस्तक माझ्या साठी खूप महत्वाचे आणि माझ्या विचारांचे समर्थन करणारे आहे कारण हे ऐतिहासिक वर्ग संघर्ष या तत्वज्ञानाला नैसर्गिक विज्ञानाचे समर्थन मिळवून देणारे आहे”. "Darwin's work is most important and suits my purpose in that it provides a basis in natural science for the historical class struggle" http://www.marxists.org/archive/marx/works/1861/letters/61_01_16.htm इतकेच नव्हे तर Marx डार्विन च्या कार्याने इतका प्रभावित झाला होता कि त्याने स्वतःच्या सर्वात उल्लेखनीय प्रसिद्ध पुस्तक Das Kapital डार्विनला समर्पित करताना पुस्तकाच्या जर्मन आवृत्तीवर स्वतःच्या हस्ताक्षरात असे लिहिले होते. "To Charles Darwin, from Karl Marx, a true admirer." Conway Zirkle, Evolution, Marxian Biology, and the Social Scene, Philadelphia: University of Pennsylvania Press, 1959, p. 85-87. Engels देखील डार्विन ची स्तुती करतांना एका ठिकाणी असे म्हणतो… "Nature operates not as metaphysics, but as dialectic. In that regard, the name of Charles Darwin must be remembered above all others." Engels, Utopik Sosyalizm-Bilimsel Sosyalizm (Utopian Socialism-Scientific Socialism), Sol Publishing, 1990, p. 85. आणि एका दुसर्या ठिकाणी Engels डार्विन आणि Marx ची तुलना करताना त्यांच्यातील साधर्म्य अश्या रीतीने अधोरीखीत करतो... "In the same way that Darwin discovered the universal law in organic nature, so Marx discovered the universal law in the history of mankind." 28 Gertrude Himmelfarb, Darwin and the Darwinian Revolution, London: Chatto & Windus, 1959, p. 348. खरे तर डार्विनिज्म आणि कम्युनिज्म ह्यांच्यातील घनिष्ट नाते हे सर्वमान्य आहे. इतकेच काय तर Marx च्या अनेक आत्मचरित्र मध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अश्याच एका आत्म चरित्र मध्ये लेखक डार्विनिज्म आणि कम्युनिज्म यांच्या तील घनिष्ट संबंध अश्या प्रकारे उलघडून दाखवतो... "Darwinism presented a whole string of truths supporting Marxism and proving and developing the truth of it. The spread of Darwinist evolutionary ideas created a fertile ground for Marxist ideas as a whole to be taken on board by the working class… Marx, Engels, and Lenin attached great value to the ideas of Darwin and pointed to their scientific importance, and in this way the spread of these ideas was accelerated." Karl Marx Biography, Ankara: Oncu Publishing, p.368 थोडक्यात डार्विनच्या परिकल्पना मुळे कम्युनिजम विचारांना तथाकथित वैज्ञानिक पाठींबा मिळाला आणि त्यामुळे कम्युनिजम विचारांचा प्रसार जोरात झाला.

माओ, चायना:

माओ, जगातील मोजक्या भयानक मानव संहार पैकी एक, मानवतेला काळिमा फसवणारे कार्य करणारा कट्टर कम्युनिस्ट कि ज्याच्या प्रत्यक्ष आदेशानुसार १० लाख लोक मारून टाकण्यात आले. आणि इतर २० लाख लोक तुरुंगात सडत, किंवा गायब केले गेले, अगदी सरळ आणि स्पष्टपणे सांगतो चीन चा सोशियालीज्म हा डार्विनिजम वर आणि त्याच्या थेरी ऑफ ईवोल्युशन वर उभा केला गेला आहे… "The foundation of Chinese socialism rests upon Darwin and the Theory of Evolution." 30 K. Mehnert, Kampf um Mao's Erbe, (War about Mao's Legacy), Stuttgart: Deutsche Verlags-Anstalt, 1977. एक पक्का Marxist निधर्मी आणि ईवोल्युशनिजम चा सच्चा भक्त होण्याच्या नात्याने त्याने डार्विन चे पुस्तके व त्याला पूरक असे वाचन साहित्य प्रचाराचे आदेश दिले... http://www.fixedearth.com/hlsm.html १९५० च्या दशका मध्ये जेंव्हा कम्युनिस्ट शक्तींनी चीन काबीज केले आणि थेरी ऑफ ईवोल्युशन विचारांचा तत्वांचा पाया बनविला परंतु त्याच्या बर्याच आधी साधारणता १८९८ मध्ये Thomas Huxley's चे पुस्तक Evolution and Ethics छापले गेले होते त्याच काळात चीनी बुद्धिवाद्यांनी डार्विन च्या परीकाल्पनांचा स्वीकार केला होता. Robert Milner, Encyclopedia of Evolution, NY: Facts on File, 1990 p. 81. Latin America: . . . . . . . . . . . . . . . . .150,000 dead Eastern Europe: . . . . . . . . . . . . . .1 million dead Vietnam: . . . . . . . . . . . . . . . . . . . .1 million dead Afghanistan: . . . . . . . . . . . . . . . .1.5 million dead Africa: . . . . . . . . . . . . . . . . . . . . .1.7 million dead Cambodia: . . . . . . . . . . . . . . . . . . .2 million dead North Korea: . . . . . . . . . . . . . . . . .2 million dead USSR: . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .20 million dead China: . . . . . . . . . . . . . . . . . . . . .65 million dead डार्विन ने प्रेरित कम्युनिस्ट राजवटीत एकूण १०० मिलियन पेक्षा जास्त लोकांना प्राणास मुकावे लागले. Andrzej Paczkowski, Cenk Odakan, Engin Sunar, Isil Ozcan, Jean-Louis Panne, Karel Bartosek, Kolektif, Nicolas Werth, Stephane Courtois,Yavuz Topoyan, Komunizmin Kara Kitabi, (The Black Book of Communism), Istanbul: Dogan Publishing,p.17.

युजेनिक्स

युजेनिक्स हा एक सोशल डार्विनिजम चा प्रकार आहे. Sir Francis Galton हा चार्ल्स डार्विन चा चुलत भाऊ होता. त्याने १८८३ मध्ये एउजेनिक्स हि शाखा निर्माण केली. मानव जाती मध्ये हेरफेर करून, बदल घडवून त्यांची अनुवांशिक संरचनेत सुधारण घडवून आणणे ह्यालाच एउजेनिक्स असे म्हणतात. चार्ल्स डार्विन च्या Origin of Species हे पुस्तक वाचून त्याने ह्या विषयाचा पाया रचला. Galton, Francis (1883). Inquiries into Human Faculty and its Development. London: Macmillan. p. 199. "Correspondence between Francis Galton and Charles Darwin". Galton.org. http://galton.org/letters/darwin/correspondence.htm. Retrieved 2011-11-28. सोप्याशब्दात युजेनिक्स म्हणजे मानववंशाची सफाई, स्वच्छता करणे. त्यासाठी वेग वेगळ्या पद्धतीचा अवलंबत करण्यात येतो. जसे सुधृढ पिढी जन्माला येण्यासाठी फक्त सुधृढ, तपासून घेतलेल्या स्त्री पुरुषांच्या संबंधातून नवीन पिढी जन्माला घालणे किंवा जे लोक कमजोर, आजारी, व्यंग असलेले किंवा समाजावर ओझे असलेल्या सर्व स्त्री, पुरुषांची नसबंदी करून टाकणे, किंवा अश्या लोकांना अमानुष पणे मारून टाकणे. अश्या या विज्ञानाशी प्रभावित होवून हिटलर ने जर्मन वंशाची सफाई करण्या हेतू १९३० ते १९४० च्या दरम्यान ४ लाख पेक्षा जास्त लोकांची नसबंदी करून टाकली होती. आणि याही पेक्षा भयंकर म्हणजे जे लोक असाध्य रोगी किंवा संपूर्ण ठार वेडे अश्या लोकांना तर सरळ सरळ निर्दयी पणे मारून टाकण्यात आले होते. "Euthanasia programme" च्या अंतर्गत Action - T4 म्हणून एक प्रकल्प राबविला गेला ज्या मध्ये सप्टेबर १९३९ ते ऑगस्ट १९४१ पर्यंत ७०२७३ आणि पुढे १९४५ पर्यंत असे संपूर्ण मिळून २७५००० निर्दयी पणे मारून टाकण्यात आले. Proctor, Robert N. (1988). Racial Hygiene: Medicine under the Nazis. Library of Congress: Harvard College p.191 Estimated by objective evidence and condemned by the Nuremberg Military Tribunal and subsequently ratified many times, for example, recently by Ryan, Donna & Schuchman, John S. : p.62. परंतु याहि पेक्षा आधी म्हणजे १९ व्या शतकाच्या पूर्व अर्धेत अमेरिकेत देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार युजेनिक्स च्या नावाने १९०७ ते १९६३ दरम्यान ६४,००० लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती ज्या मध्ये ६०% स्त्रियांची नसबंदी करण्यात आली. Lombardo, Paul; "Eugenic Sterilization Laws", Eugenics Archive http://www.eugenicsarchive.org/html/eugenics/essay8text.html.

आधुनिक साम्राज्यवाद आणि सामाजिक डार्विनवाद:

डार्विनच्या हि बर्याच आधी म्हणजे १६ व्या शतकात युरोप मध्ये वसाहतवादाला सुरुवात झाली होती. परंतु डार्विन च्या सिद्धांत मुळे वसाहत वादाला एक नवीन शक्ती मिळाली आणि एक नवीन लक्ष्य मिळाले. विशेषता औद्योगिक क्रांती नंतर आर्थिक उद्देशाने युरोपियन देशांना इतर खंडात, इतर देशावर नवीन बाजारपेठ आणि कच्या मालासाठी आक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी इतर खंडा मध्ये शोषण चालू ठेवले परंतु या १९ व्या शतकातील या शोषणाची प्रेरणा वेगळी होती. आणि म्हणूनच याला आधुनिक साम्राज्यवाद या नावाने ओळखले जाते. सामाजिक डार्विन वादाचा प्रभाव या नवीन साम्राज्यवादा च्या उगमामध्ये होता. डार्विनवादि करणा पैकी एक कारण वंशाची श्रेष्ठता चा सिद्धांत होता जो कि ह्या आधुनिक साम्राज्यावादासाठी कारणीभूत ठरला. ब्रिटीश, फ्रेंच, जर्मन आणि इतर साम्राज्ये असा विचार करत होती कि सर्व श्रेष्ठ वंश सिद्ध होण्यासाठी नवनवीन जमिनीवर कब्जा करून सर्वाशाक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयास येणे गरजेचे आहे. Encyclopedia Britannica च्या १९४६ च्या प्रकशन मधे स्पष्टपणे सांगितले आहे की डार्विनवाद त्याचे सिधांत वंशवाद आणि साम्राज्यवादासाठी काश्य प्रकारे जबाबदार आहेत: “This new period of imperialism at the end of the 19th century found its spiritual support in Bismarckism and social Darwinism, in all the theories glorifying power and success, which had swept over Europe... Racial theories seemed to give to this new attitude, which was in opposition to all traditional [i.e. Christian] values of morality, a justification by “science” and “nature,” the belief in which was almost becoming the dominant faith of the period.” Encyclopedia Britannica, 1946 edition, vol. 12, p. 122A जिम नॅप आपल्या एका लेखात म्हणतो: “They were also driven by the mistaken goal of proving their superiority over other races. The Anglo-Saxons and Aryans regarded it was their natural right to assume control over the Africans, Asians and native Australians, whom they regarded as “inferior races,” and to exploit their workforces and natural resources. Thus 19th-century imperialism developed more as a result of Darwinist aims than out of any economic concerns” “ते लोक आपण दुसर्या पेक्षा श्रेष्ठ वंशाचे आहोत हे सिद्ध करण्याच्या (चुकीच्या) धेयाने प्रेरित होते. अंग्लो सॅक्सन आणि आर्य वंशीय यांचा असा समाज होता की अफ्रीकन, एशियन आणि मूळ ऑस्ट्रेलीयन लोकांवर त्यांच्या कार्यशक्ती आणि नैसर्गिक संपत्तीवर देखील आमचा तर नैसर्गिकरित्या अधिकार आहे कि ज्यांना ते कनिष्ट वौंशाचे मानत. आणि अश्या प्रकारे १९ व्या शतकातील साम्राज्यवाद हा आर्थिक कारण पेक्षा डार्विनवादी उद्देश मुळे उगम पावला. Jim Knapp, Imperialism: The Struggle to Be Superior, http://www-personal.umich.edu/~jimknapp/papers/Imperialism.html वरील संदर्भ वाचून आपल्या लक्षात येते कि युरोपियन साम्राज्य विस्तार आणि वसाहतवाद त्यांनी केलेले दमन, अत्याचार, जुलूम. हजारो मानव जाती/जमाती समूळ नष्ट केल्या. लाखो लोकांना गुलाम बनवून जनावरानपेक्षा वाईट दुर्दश करून त्यांना नष्ट केले. एकूण किती मनुष्य त्यांचा ह्या साम्राज्य वादाचे बळी पडले याची गणती करणे शक्य नाही. सध्या तो माझा विषय हि नाही. इथे मी फक्त हे दाखवू इच्छितो कि कश्या प्रकारे डार्विनच्या "वैज्ञानिक" सिद्धांत मुळे मानवजातीला नुकसान झाले.

सामाजिक डार्विनवाद आणि वौंशिक संघर्ष:

जागे अभावी मी इथे वौंशिक वादामुळे मागच्या शतकात किंवा आजही देखील ह्या जगाने काय भोगले आहे आणि भोगत आहे याचे तपशील देवू शकत नाही परंतु एकवाक्यत सांगायचे झाले तर २० व्या शतकात सर्वात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली असेल तर त्या पैकी वौंशिकवादाचा प्रश्न हा एक आहे. ह्या लेखात मला फक्त वौंशिक वादाला सामाजिक डार्विनवाद कसे जबाबदार होते हेच सांगायचे आहे. डार्विन च्या सिद्धांतामुळे वौंशिक संघर्षाला कसा "वैज्ञानिक" पाठींबा मिळाला आणि डार्विनच्या भक्तांनी, वैज्ञानिकांनी, बुद्धिवाद्यांनी, राजकीय नेत्यांनी पूर्ण पाठींबा देत आप आपले हेतू सध्या करून घेतले. ईश्वराने विभिन्न वंश, काबिले, राष्ट्रे हे सौन्कृतिक देवान घेवानासाठी बनविले आहे. एकमेकांना समजुन घेण्यासाठी/ओळखन्यासाठी बनविले आहे असे कुरान सांगतो (सुरे हुजरात : १३ ) परन्तु सामाजिक डार्विनवादा नुसार मानव एकमेकाला समजुन घेण्यासाठी नव्हे तर एकमेकांशी लढ़न्यासाठी जन्माला आला आहे. आणि त्यानुसार मानवजातीच्या प्रगतिला गति मिळन्या साठी विभिन्न वंशात जमाती मधे संघर्ष होणे गरजेचे आहे. ह्या अतर्कसंगत सिधानतानुसार विविध वंशाच्या संघर्षात जिंकन्यासाठी नवनवीन शोध लावले जातील त्या मुळे सभ्य आणि प्रगत वंश वर येतील अश्या तर्हेने मानवतेची प्रगति होइल. थोडक्यात सांगायचेतर मानवाची प्रगति जर लोकांना मारून किंवा हत्याकांड करून अथवा उत्पीडन आणि दमन करून होते तर हे रानटी, जंगलीपणेचे लक्षन होय. वादविवाद आणि समस्या तर नेहमी होतील परंतु ह्याचे समाधान शांततापूर्ण पद्धतीने काढता येते. आज काल काही डार्विनवादी डार्विनचा बचाव करण्याचा केविलवाणी प्रयत्न करात कि तो वंशवादी नव्हता वगैरे वगैरे परंतु त्याच्या The Descent of Man ह्या पुस्तकतील हे वाक्य सत्य लपवूशकत नाही “When civilised nations come into contact with barbarians the struggle is short, except where a deadly climate gives its aid to the native race... The grade of their civilisation seems to be a most important element in the success of competing nations.” Darwin, The Descent of Man, p. 297 डार्विन नंतर अनेकांनी ह्या वौंशिक संघर्षाच्या परीकाल्पनेला विज्ञान समजून तिचा प्रचार आणि प्रसार केला. डार्विन च्या अश्या अनेक भक्ता पैकी एक कार्ल पीयर्सन. National Life from the Standpoint of Science ह्या पुस्तकात प्रसिद्ध वैज्ञानिक Karl Pearson सांगतो: “There is a struggle of race against race and of nation against nation. In the early days of that struggle it was a blind, unconscious struggle of barbaric tribes. At the present day, in the case of the civilized white man, it has become more and more the conscious, carefully directed attempt of the nation to fit itself to a continuously changing environment. The nation has to foresee how and where the struggle will be carried on... I have asked you to look upon the nation as an organized whole in continual struggle with other nations, whether by force of arms or by force of trade and economic processes. I have asked you to look upon this struggle of either kind as a not wholly bad thing; it is the source of human progress throughout the world's history” Karl Pearson, National Life from the Standpoint of Science, Cambridge: Cambridge University Press, 1900, pp. 11-16, 20-23 किंवा “What I have said about bad stock seems to me to hold for the lower races of man. How many centuries, how many thousand of years, have the Kaffir or the negro held large districts in Africa undisturbed by the white man? Yet their intertribal struggles have not yet produced a civilization in the least comparable with the Aryan. Educate and nurture them as you will, I do not believe that you will succeed in modifying the stock. History shows me one way, and one way only, in which a high state of civilization has been produced, namely, the struggle of race with race, and the survival of the physically and mentally fitter race.” Karl Pearson, National Life from the Standpoint of Science, Cambridge: Cambridge University Press, 1900, pp. 36-37, 43-44. प्रसिद्ध भारतीय Anthropologist ललिता विद्यार्थी सांगतात कि डार्विनच्या या युक्तिवादामुळे वंशवाद कश्या प्रकारे सामाजिक विज्ञानाशी जोडला गेला... "His (Darwin's) theory of the survival of the fittest was warmly welcomed by the social scientists of the day, and they believed mankind had achieved various levels of evolution culminating in the white man's civilization. By the second half of the nineteenth century racism was accepted as fact by the vast majority of Western scientists. " Alexander I. Oparin, Origin of Life, (1936) New York, Dover Publications, 1953 (Reprint), s.196 वरील परिच्छेदावरून आपण अंदाज बांधु शकतो कि डार्विनच्या सिद्धांताला, वौंशिक संघर्षाला नैसर्गिक, वैज्ञानिक, काळाची गरज समजून काळ्या दगडावरची रेघ मानून बुद्धिवाद्यांनी पाठींबा दिला आणि मानवीय इतिहासाला काळिमा फासणारे घटना २० व्या शतकाने बघितल्या.

मनुष्याच्या मानसिकतेवरील परिणाम:

प्रख्यात Geneticist, Evolutionary Biologist, आणि Evolutionary Biology मधील एक नामवंत वैज्ञानिक Theodosius Dobzhansky डार्विन वादामुळे समाजावर काय दुष्परिणाम झाला याची माहिती देताना सांगतात कि… “हा सिद्धांत मानव समाजात अहंकार, भौतिकवाद, भित्रेपणा, फसवणूक / दगाबाजी आणि शोषण ची शिकवण देतो या उलट जगातील सर्व समाज सामुहिक नैतिकतेची शिकवण देत ह्या सर्व "नैसर्गिक" व्यवहार च्या उलट गोष्टींची शिकवण देतात. जसे दया, उदारता, बलिदान ज्या कि कोणत्याही कबिल्या साठी, राष्ट्र साठी किंवा संपूर्ण मानवजाती साठी चांगली गोष्ट आहे.” “Natural selection can favor egotism, hedonism, cowardice instead of bravery, cheating and exploitation, while group ethics in virtually all societies tend to counteract or forbid such "natural" behavior, and to glorify their opposites: kindness, generosity, and even self-sacrifice for the good of others of one's tribe or nation and finally of mankind.” Theodosius Dobzhansky, "Ethics and Values in Biological and Cultural Evolution," in Los Angeles Times, June 16, 1974, p. 6. Ken Ham, author of The Lie: Evolution. draws attention to the irreligiousness to which Darwinism leads: "If you reject God and replace Him with another belief that puts chance, random processes in the place of God, there is no basis for right or wrong. Rules become whatever you want to make them. There are no absolutes–no principles that must be adhered to. People will write their own rules..." जर तुम्ही परमेश्वराचा अस्वीकार करून त्याच्या ऐवजी अश्या गोष्टीन वर आस्था ठेवता कि ती परमेश्वरा च्या जागी तुम्हाला शक्यता, संभावना आणि उद्धेश नसलेली प्रक्रिया यांना बसवते, अश्या वेळेस मग चांगले आणि वाईट ला काही आधार राहत नाही. मग तुम्ही बनवताल तसे कायदे बनतील. तेथे कोणत्याही गोष्टीची निरपेक्षता अथवा नितीतत्व राहणार नाही. लोक त्यांचे नियम स्वतः लिहतील. Ken Ham, The Lie: Evolution, Master Books, 15th ed. April 1997, p. 84.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48838 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

व्यक्तिस्वातंत्र्य उच्च

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/08/2013 - 00:51 नवीन
मी व्यक्तिस्वातंत्र्य हे फार उच्च मूल्य मानत असल्यामुळे मी केलेल्या विधानांची जबाबदारी माझ्यावर आहे. मी न केलेल्या विधानांची, किंवा माझ्या बोलण्यातून काढलेल्या विपर्यस्त अर्थाची जबाबदारी माझ्यावर नाही. तरीही हा प्रतिसादः
हे असे उदात्त विचार व्यक्त करायला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ...आणि ते फार थोड्या देशात आहे. ते कोणत्या देशात आहे त्या पेक्षा कोणत्या देशात नाही आणि त्यामध्ये काही समानधर्म सापडतो का ते पहावे.
ज्या देशांमधे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे (उदा: भारत, (पश्चिम) युरोपातले सर्व देश, यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मोरोक्को*, मॉरिशस इ.**) तिथे धर्मनिरपेक्षताही आहे. थोडक्यात तुम्ही तुमचा धर्म कोणता आणि त्याचं पालन कसं करायचं ते ठरवा. दुसर्‍या शब्दांत सांगायचं झालं तर भारतात राहून तुम्हाला कोणताही धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही पालन करत असलेल्या धर्माचा इतर कोणत्याही गोष्टीशी संदर्भ जोडला जाणार नाही. ज्या देशांमधे आपण कोणी रहातच नाही आणि/किंवा जिथले कायदे आपल्याला बंधनकारकच नाहीत तिथे काय चालतं किंवा काय सोय नाही याबद्दल तक्रार करून काय फरक पडतो? किंवा का पडावा? सौदी अरेबियामधे स्त्रियांना कार चालवता येत नाही, इरानमधे स्त्रियांना डोकं झाकावंच लागतं याचा राग भारतीय स्त्रियांनी भारतीय पुरुषांवर काढावा का? समजा शरद पवारांनी काहीतरी घपला केला तर त्याचा राग शरद कोर्डे किंवा इंद्रराज पवार यांच्यावर काढणं कितपत रास्त आहे? एवढं सांगितल्यानंतरही हा अस्थानी राग व्यक्त करायचा असेल तर तो कायदेशीर शब्दांमधे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. अशा illogical प्रकारांचा निषेध करण्याचं स्वातंत्र्यही घटनेने दिलेलं आहे. *हा मुस्लिमबहुल, अरब देश अशा प्रकारचं स्वातंत्र्य देतो याची नोंद विकीपिडीयावर आहे. ** असं स्वातंत्र्य देणारे देश आणि न देणारे देश यात स्वातंत्र्य देणार्‍या देशांची संख्या अधिक भरेल असा अंदाज आहे. लोकसंख्येचा विचार करता चीनमुळे पारडं उलट दिशेला झुकण्याची शक्यता वाटते. यासाठी माहिती गोळा केलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

दक्षिण अफ्रिका

हुप्प्या
Tue, 01/08/2013 - 07:49 नवीन
अनेक देशांनी ज्यात भारतही होता, त्यांनी दक्षिण अफ्रिकेच्या वर्णद्वेषाविरुध्द निषेध म्हणून त्या देशावर, त्या देशातील मालावर बहिष्कार घातला होता. तेव्हा भारत वा अन्य देशांनी, आपण तिथे रहात नाही, जिथले कायदे आपल्याला बंधनकारकच नाहीत, तिथे काय चालते वा नाही त्याबद्दल तक्रार करुन काय फरक पडतो वगैरे छापाचे विचार केले नाहीत. त्यांनी त्याचा निषेध केला आणि ते योग्य होते. आमच्या देशात काळ्या वंशाचे लोक नाहीत आणि आमच्या देशात तसा वर्णद्वेषी अन्याय होत नाही म्हणून दक्षिण अफ्रिकेतील अन्यायाकडे तटस्थ, स्थितप्रज्ञ दृष्टीने बघत रहावे असा बिनडोक विचार भारताने केला नाही. तोच नियम स्त्रियांना नीच दर्जा देणार्‍या अरबी देशाना, इराणला लावला पाहिजे. केवळ काळ्या वंशात जन्माला आला म्हणून अन्याय करणे जितके चूक तितकेच स्त्री म्हणून जन्माला आली म्हणून अन्याय करणेही. आणि भारतातील लोक प्रचंड संख्येने, कामासाठी, स्वेच्छेने त्या अरबी देशात काम करत आहेत. त्यामुळे आम्ही कुणाच्या अध्यात ना मध्यात छापाचे धोरण फारसे हिताचे नाही. पण काय करणार? त्या लोकांची तेलाने बरबटलेली श्रीमंती आड येते ना! आणि काही लोकांचे पुरोगामीत्वही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सिलेक्टीव्ह रीडींगबद्दल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/11/2013 - 02:21 नवीन
आधीच्या प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे सौदी अरेबियात स्त्रियांना गाडी चालवता येत नाही आणि इरानमधे स्त्रियांना डोकं झाकावं लागतं या नियमांचा निषेध म्हणून मी तुमचा द्वेष करायला सुरूवात केलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

"अल्लाहू अकबर" म्हणजे काय?

वामन देशमुख
Tue, 01/08/2013 - 10:40 नवीन
इस्लाम हा इस्लामेतरांचे अस्तित्व नाकारतो. म्हणून इस्लामने जगाची दार-उल-हरब आणि दार-उल-इस्लाम अशी विभागणी केलेली आहे. इस्लामी तत्वानुसार माणूस एकतर मुस्लिम असतो किंवा मुस्लिमांचा शत्रू. अल्लाह हा पुजनिय इश्वर आहे हे मान्य करतानाच इतर सर्व इश्वर हे इश्वर नहितच हेही मान्य करावेच लागते. الله اكبر "अल्लाहू अकबर" म्हणजे काय हे मुस्लिमेतर (विशेषतः हिन्दू) समजून घेऊन त्यानुसार वागतील तो सुदीन. अन्यथा शे-दीड्शे वर्षांत हिन्दू समाज-धर्म-सन्स्क्रुती नामशेष होइल हे नक्की.
  • Log in or register to post comments

बळच काहितरी

अर्धवटराव
Tue, 01/08/2013 - 11:13 नवीन
>>अन्यथा शे-दीड्शे वर्षांत हिन्दू समाज-धर्म-सन्स्क्रुती नामशेष होइल हे नक्की. हिंदु जर यदाकदाचीत संपलाच तर तो स्वदुर्गुणांनी संपेल... असली फालतु बाह्य कारणे हुंदुत्वाचं शष्प वाकडं करु शकत नाहित. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अप्रतिम लेख !

प्रसाद गोडबोले
Tue, 01/08/2013 - 14:50 नवीन
लेख प्रचंड आवडला जहीरमियां !! आपले अभिनंदन !
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Sun, 07/17/2016 - 12:50 नवीन
+१ जहरभाईंच्या नवीन लेखाच्या निमित्ताने हा लेख आठवला , ह्यावरही परत एकदा चर्चा व्हाव्ही म्हणुन धागा वर आणत आहे . बाकी जहर भाई , तुर्तास दुसर्‍या कोणा माकडांचा नंगानाच चालु आहे जगभर त्यावरही इतका अभ्यासपुर्ण लेख लिहिलात तर मानले तुम्हाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हम्म्म

वाहीदा
Wed, 01/09/2013 - 15:15 नवीन
लेख काही काही बाबतीत पटला काही काही बाबतीत नाही पण काही नमुद करावेसे वाटले @ जहीर सय्यद : मैं चाहता भी यहीं था वो बेवकुफ निकले , उसे समझाने का कोई तो सिलसिला निकलें :-) संपादित @ जहीर सय्यद , हारुन शेख : जो देखनेमें बहोत ही करीब लगता हैं, उसीके बारेमें सोचो तो फासला निकलें :-) औराक : pages --- शब्द : वसीम वरेलवी असो अल-कुरआने चे नाव या लेखात यायला नको होते. आशा आहे की तुम्हाला मतितार्थ समजेल :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

हा शंभराव्वा!

अरुण मनोहर
गुरुवार, 01/10/2013 - 16:54 नवीन
हा शंभराव्वा!
  • Log in or register to post comments

सध्याच्या सत्तेने काही

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/10/2013 - 17:43 नवीन
सध्याच्या सत्तेने काही घटकांना अमर्याद अधिकार दिले आहेत्, सामाजीक आरक्षण,लढण्याचे आरक्षण्,शिकण्यात आरक्षण्,नोकरीत आरक्षण्,नुसतेच हातपाय हलवुन जर एव्हढे का मिळते,तर विचार अश्या बाजुने वळतात. पण आरक्षणाने मुळ प्रश्न सुटतच नाही,तो जसाच्या तसाच असतो,नाहीतर फरक पडलेला दिसतोय कुठे, आज ६५ वर्ष झाली आहेत स्वातंत्र्य मिळुन तेव्हाही जिथे होते आजही तिथेच आहेत्,आणी राहणार.
  • Log in or register to post comments

रोचक

चेतन
Sun, 01/13/2013 - 12:48 नवीन
लेख रोचक
  • Log in or register to post comments

कोणी कितिही आदळापट केली तरीही

बापू मामा
Mon, 01/14/2013 - 17:51 नवीन
कोणी कितिही आदळापट केली तरीही या देशात हिंदु व मुसलमान या दोघांचेही अस्तित्व रहाणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जर जहिर भाउंनी एका वाक्यास कुराणाचा आधार दिला तर त्यात मला काही गैर वाटत नाही. आम्ही हिंदूही अनेक लेखात धार्मिक संदर्भ देतो. ऊलट मुसलमान मातृभाषेचा ( राज भाषेचा) वापर करित नाहीत हा आक्षेप मराठीत लेखन करुन जहिर भाऊंनी खोडून काढला या बद्दल त्यांचे अभिनंदन. जहिर , हारुन आगे बढो. आपल्या लेखनाने मराठीतील एक नविन वाट रुळणार आहे. त्यात आपले इस्लामी संदर्भ आले तरी त्याने मराठी समृद्धच होईल. जाता जाता : मराठीतील कुराणाची आवृत्ती इंटरनेट वर उपलब्ध असल्यास मला कळवा.
  • Log in or register to post comments

ही घ्या कुरआनची मराठी एडिशन.

बॅटमॅन
Mon, 01/14/2013 - 18:55 नवीन
ही घ्या कुरआनची मराठी एडिशन. http://www.alislam.org/quran/tafseer/?region=MT
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

धन्यवाद!

अरुण मनोहर
Wed, 01/16/2013 - 19:09 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आवडले! अतिशय संयत विचार. आधी

अरुण मनोहर
Wed, 01/16/2013 - 19:09 नवीन
आवडले! अतिशय संयत विचार. आधी मी दिलेला प्रतिसाद, लेखातील एकान्गी उदाहरणे वाचून दिला होता. त्यात जरा घाईच झाली. कुठल्याही वादाचे किंवा संशयाचे निवारण संवादानेच होण्याची शक्यता असते. आणि संवाद साधण्यासाठी आपली भाषा केव्हाही सर्वोत्तम असते. जहीर भाऊंनी मराठीत आणखी लेखन करून दोन समाजांतील दूरी दूर करण्यास हातभार लावावा असा आग्रह करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

मूळ मुद्दा साधा आहे

चलत मुसाफिर
Sun, 07/17/2016 - 16:59 नवीन
1. डार्विनच्या संशोधनाचा वाकडा अर्थ काढून हिंसा केली गेली तर त्याला डार्विन जबाबदार असे सदर लेखकाचे म्हणणे. मग कुराणाचा वाकडा अर्थ काढून घाऊक खून पाडले गेले तर त्याला कुराण/ मोहम्मद जबाबदार या तर्काशी ते सहमत आहेत का? 2. देव मानावा की नाही, अथवा किती मानावा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. पण देव न मानणाऱ्यांना सरळ जनावर ठरवणे हे थोतांड आहे. 3. देव मानणे आणि धर्म मानणे यातही फरक आहे. सदर लेखक जर झाकीर नाईक पंथाचे यात्रेकरू असतील (आहेतच असे मला वाटते) तर 'धर्म न मानणारा तो माणूस नसून जनावर आहे' ही यांच्या युक्तिवादाची पुढची पायरी असेल. तिथून मग 'माझा धर्म न स्वीकारणारा तो माणूस नसून जनावर' हा अगदी जवळचा टप्पा आहे. मुडदे पाडणारे अतिरेकी यातूनच जन्माला येतात हे मी सदर लेखकास सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments

सहमत,सदर लेखक हे मुस्लिम

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 07/17/2016 - 18:20 नवीन
सहमत,सदर लेखक हे मुस्लिम मुलतत्ववादाचे पाईक आहेत.बहुधा ते सुद्धा ७२ हुर मिळवण्याच्या फंदात असावेत.
  • Log in or register to post comments

नन्गा नाच च वाट्तोय

जोन
Sun, 07/17/2016 - 23:40 नवीन
पन कुणाचा?
  • Log in or register to post comments

ह्या लेखाच्या पंथाचे संभाव्य उगमस्थान - १

माहितगार
Mon, 07/18/2016 - 07:36 नवीन
लेखाच्या स्वरुपावरून काही प्रतिसादक लेखकाच्या पंथाचा शोध घेण्याचा प्रयत्न करु पहात असतील, तर दिशा अंशतः तरी चुकू शकण्याची किमान अंधूक शक्यता वाटते. हा लेख प्रचंड लांब असल्यामूळे एका झटक्यात पूर्ण वाचून व्हावा आणि परिक्षण करून व्हावा असा नाही. मी लेखाचा सरळ शेवटचा परिच्छेद वाचण्यास घेतला ज्यात Theodosius Dobzhansky या आमेरीकन उत्क्रांतीवाद्याच्या वाक्याचा संदर्भ खालील "Ethics and Values in Biological and Cultural Evolution," in Los Angeles Times, June 16, 1974, p. 6. येथून घेतल्याचे नोंदवले आहे. या संदर्भावर तुम्ही राईटक्लीकरून गूगल सर्च घेतला तर तूमचा तूर्कस्थानचा प्रवास चालु होऊ शकेल कारण तुम्ही हरुन याह्या नावाच्या व्यक्तीच्या पुस्तकावर जाऊन पोहोचण्याची दाट शक्यता असू शकेल. सदर धागा लेखकाने लेखाचा मूळ स्रोत अथवा हरुन याह्याचा संदर्भ उपरोक्त लेखात केला आहेत का किंवा हरुन याह्या त्यांना माहितही आहेत का हे माहित नाही. हरुन याह्या हे सुद्धा झकीर नाईकांप्रमाणेच टेलेव्हेंजलीस्ट पण कदाचित झकीर नाईकांच्या एखाद आधीच्या पिढीतले असावेत. या दोघांच्या धार्मीक प्रचाराच्या मार्केटींग टेकनीकमध्ये काही साम्ये आहेत जसे पाश्चात्य वळण लागलेल्या पिढीशी जुळवून घेण्यासाठी नवीन आधूनिक पोषाख, मार्केटींग मध्ये वापरल्या जाणार्‍या ऑब्जेक्शन हँडलींग पद्धती ज्यातील उत्तरे फॅक्टशी जुळतातच असे नसले तरी समोरच्या समुहाला तसे भासवले गेले पाहीजे हे महत्वाचे. प्रारंभीचा टार्गेट ऑडीअन्स उच्चमध्यमवर्गीय तरुण असणे हेही एक साम्य या पाश्चात्य वळणावर जाऊ लागलेल्या उच्चमध्यमवर्गीयांचे अध्यात्मीक वाचन/माहिती अर्धवट असते काय सांगितले जाते आहे ते कुठे आणि कसे तपासायचे आणि का तपासायचे याची भ्रांत यातील बर्‍याच जणांना नसते. अर्थात हरुन याह्या आणि झकीर हुसेन यांच्या विचार प्रणालीत उल्लेखनीय फरक असावेत, हरुन याह्यांसमोरचे तूर्कस्थानातील सेक्युलरांना वळवण्याचे मोठे आव्हान होते कदाचित त्यामुळे असेल की स्त्रीयांच्या पब्लिक लाईफ मधील सहभागा बद्दल काही अंशानी इतर कट्टर धर्म प्रचारकांपेक्षा काही अंशानी किमान प्रचारासाठी मॉडरेट असावेत. मार्केटींग टेक्नीक मधला अजून महत्वाचा फरक झकीर हुसेन धार्मांतरणाच डायरेक्ट आव्हान देऊन उद्देश सरळ सरळ पूढे ठेवतात, हरुन याह्या बहूधा पूर्ण उलट्या दिशेने सुरवात करतात म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवतात. संदर्भ तुमच्या दारावर सेल्समन अमुक विकायला आला आहे असे कळले की तुम्ही लगेच नको म्हणायची शक्यता असते, सर्वे करायला आलो आहे असे म्हटले की कशाचा हे माहीत नसते म्हणून तुम्ही एंटरटेन करता तसेच काहीसे हरुन याह्या करतात. इस्लाम बद्दल सरळ बोलण्यापेक्षा आधी क्रिएशनीस्ट (निर्मीकवाद) मांडायचा त्याही आधी डार्वीनवर टिका करायची, वरच्या धागा लेखात तुम्हाला क्रिएशनीस्ट (निर्मीकवाद) किंवा इस्लामचे उल्लेख आढळण्याची शक्यता कमी असेल कारण त्यामुळे तुमचे विचार काही वेगळे असतील तर तुम्हाला संधीच न मिळाल्याने धार आधीच बोथट होते. यात अगदी उत्क्रांतीवादालाही सरळ आव्हान नाही त्याशिवाय उत्क्रांतींवादाचे सर्व बारकावे समजण्यास वेळ लागतो उलटपक्षी डार्वीनच्या एकाच तत्वाला पकडून बादरायण संबंध लावून केलेली टिका लगेच डोळ्यात भरते. त्या शिवाय भरमसाठ डाटा दिला की परिक्षणासाठी आणि तार्कीक उणीवा शोधण्यास कुणी वेळ देईनासे होते आणि प्रतिपक्षाचे मुद्देसूद समिक्षण आली नाही अथवा उशीरा आलीकी तोपर्यंत बराच मोठा श्रोतावर्ग भाष्यकाराला संशयाचा फायदा देऊन स्विकारु आणि समर्थन लागतो. हे झाले मार्केटींग टेक्नीक आणि संभाव्य उगमाबद्दल भाग पहिला. (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments

ह्या लेखाच्या पंथाचे संभाव्य उगमस्थान - २

माहितगार
Mon, 07/18/2016 - 08:03 नवीन
माझ्या वरच्या प्रतिसादाचा (भाग १) लक्षात घेतला आणि थोडक्यात सांगायचे झाले तर उत्क्रांतीवादाच्या बारकाव्यांची माहिती देणारे अधिक लेखन आणि माहिती जीवशास्त्र, अँथ्रॉपॉलॉजी ज्या अभ्यासकांनी विवीधलेख आणि माध्यमातून द्यावयास हवी. म्हणजे Theodosius Dobzhansky ला आऊट ऑफ काँटेक्सट सोईने क्वोट करण्याचा प्रथमदर्शनी प्रयत्न दिसतो तसे प्रयत्न अयशस्वी होण्यास हातभार लागू शकेल. Theodosius Dobzhansky हा उत्क्रांतीवादी संशोधकच आहे पण इश्वरालाही मानतो, म्हणजे इश्वराच्याच इच्छेने उत्क्रांती होत आली आहे असे काहीसे असावे. त्यांची इंग्रजी विकिपीडिया लेखातली दोन वाक्ये उधृत करतो जी पुरेशी बोलकी आहेत. पण तत्पुर्वी Theodosius Dobzhansky हे १९७५ मध्येच निर्वतले हे हि लक्षात घेतले पाहीजे विज्ञान संशोधनाचा वेग पाहता गेल्या चाळीस वर्षात बरीच प्रगती झाली असली पाहीजे. Nothing in Biology Makes Sense Except in the Light of Evolution हे त्यांच्या निबंधाच नावच बोलक आहे.
I am a creationist and an evolutionist. Evolution is God's, or Nature's method of creation. Creation is not an event that happened in 4004 BC; it is a process that began some 10 billion years ago and is still under way. — Theodosius Dobzhansky, "Nothing in Biology Makes Sense Except in the Light of Evolution" (1973)
Does the evolutionary doctrine clash with religious faith? It does not. It is a blunder to mistake the Holy Scriptures for elementary textbooks of astronomy, geology, biology, and anthropology. Only if symbols are construed to mean what they are not intended to mean can there arise imaginary, insoluble conflicts.... the blunder leads to blasphemy: the Creator is accused of systematic deceitfulness. — Theodosius Dobzhansky, "Nothing in Biology Makes Sense Except in the Light of Evolution" (1973)
तर एकुण कायतर Theodosius Dobzhansky उत्क्रांतीवादाचे इतपत कट्टर समर्थक आहेत की धार्मीक ग्रंथांना पाठ्यपुस्तक समजण्याची चूक करू नका, उत्क्रांतीवादा शिवाय जीवशास्त्राचा अनन्य आधार आहे हे ते सुस्पष्ट बजावतात. याचा उल्लेख तुम्हाला धागा लेखकाच्या लेखात कुठेही आढळणार नाही. एका उत्क्रांतीवादा सोबतच इश्वरावरही विश्वास ठेवणार्‍या संशोधकाच्या वयाच्या ७४ व्या (मृत्यूच्या एखादवर्ष आधी) लिहिलेल्या पडताळण्यास अवघड असलेल्या वृत्तपत्रीय लेखचा संदर्भ देणारे वाक्य Theodosius Dobzhansky यांचे पूर्ण मत न नोंदवता हवा तो भाग सोईस्कर क्वोट केला जात असण्याची शक्यता प्रथमदर्शनी वाटावी किंवा कसे. आणि वर म्हटल्या प्रमाणे १९७५ ते २०१६ विज्ञानाने बरीच प्रगती केली असणार आहे त्या प्रगतीची लेखाच्या एकांगी स्वरुपावरून धागालेखकाने कितपत दखल घेतली असेल याची प्रथमदर्शनी सांशंकता वाटते किंवा कसे. (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments

"उत्क्रांतीवाद जीवशास्त्राचा

माहितगार
Mon, 07/18/2016 - 08:07 नवीन
"उत्क्रांतीवाद जीवशास्त्राचा अनन्य आधार आहे" असे वाचावे. @ संपादक वरील परिच्छेद वाक्यातून 'शिवाय' हा शब्द वगळण्यात मदत करावी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अंशतः संदर्भ

माहितगार
Mon, 07/18/2016 - 08:12 नवीन
अंशतः संदर्भ * Theodosius Dobzhansky * Nothing in Biology Makes Sense Except in the Light of Evolution * Adnan Oktar * Harun Yahya’s Islamic Creationism: What It Is and Isn’t * An Analysis of the Harun Yahya Enterprise -Anne Ross Solberg हे ऑनलाईन पिडीएफ डॉक्यूमेंट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा