जग बदलण्याची जिद्ध तुझी,
कुठेतरी मनातच आहे खोल.
आधी स्वतःला बदल मित्रा,
घडवून आण मग बोल.
विचारांच्या गर्दीत वाहून जाताना,
तुझे कोणते, तुलाच कळेनात.
तुलाच बदलावं लागणार आहे राजा
कळून देखील का बर वळेना
निर्धाराचे शीड प्रयत्नांची नाव
आणि नावाड्या तूच अनमोल
पैलपार जाणे आहे
घडवून आण मग बोल
पायाभरणी कल्पनेची क्रियेचा कळस
मग देईलच यश तुला देव
पण आळसाच्या दलदलीतून वाट आहे
पाय जमिनीवर जपून ठेव
प्रत्येक तुझ्या कृत्यामागे
विचार तुझे असोत सखोल
अरे पूर्ण होईल, तू सुरु तरी कर
घडवून आण मग बोल
तुझ्यासारख्यांनी इथे कल्पनेतच रमायचं
त्यात हरवून, त्या साकारण्या आधीच दमायच
न केलेल्या प्रयत्नातून न मिळालेलं यश I2I
मग काय, दैवाला कोसुन त्याच्यासमोरच नामयाच
पाठीचा कणा आहे न तुला
मग कशाला भरतोस दैवाचा टोल
जा जाऊन जिंकून ये
घडवून आण मग बोल...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1493
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> मग कशाला भरतोस दैवाचा टोल
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे |
चांगला विचार
धन्यवाद
सुंदर
छान ! आवडली ! !