✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आवडती जाहिरात

स
समयांत यांनी
गुरुवार, 12/20/2012 - 00:17  ·  लेख
लेख
प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो. त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं. पण त्याऐवजी ती त्याच्या कडे बघत पुढे जाऊन त्याने आपला पेन खिश्यात ठेवला आहे कि नाही बघते, मग तोच चुकीचा का आवडता शर्ट पाहून तिचा ताण सौम्य होतो. याहीपुढे नवीन शर्ट असल्याने कॉलरची पुठ्ठ्याची टेप तशीच राहते, असा काहीही करून त्याचा निष्काळजीपणा अखेरी तिच्या नजरेस पडतो. तो मात्र डोळे माफक झुकवून दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी ती मागे वळून पुढे जात असता, तेव्हा तो उभा असतो असा कि हताश त्याच्या प्रेमाशिवाय तो तिथे अपूर्ण आहे...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
27152 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

.....

गवि
Wed, 12/26/2012 - 18:04 नवीन
-फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी. -लाडा लाडा सबमर्सिबल पंप -महाबीज बियाणे- संकरित बियाणे.. -दो बकेट पानी अब बचाना है रोजाना. -टायगर कडक पत्ती चहा.. वाघासारख्या मर्दांसाठी.. -पनामा.. मला जे हवं ते मी मिळवतोच.. -मला काहीतरी घ्यायचंय, मलाही काहीतरी घ्यायचंय.. काय घ्यायचंय? रेडिओ.. कोणता? फिलिप्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लाडा पंप पाहून गतजन्मीच्या

बॅटमॅन
Wed, 12/26/2012 - 19:02 नवीन
लाडा पंप पाहून गतजन्मीच्या आठवणींनी डोळे पाणावले. मगदूम चहा, जीएस चहा ताजा/माझा चहा, राधिका हायस्कूल रोड मिरज, इ.इ.इ. एवंगुणविशिष्ट अनेकोत्तम झैराती आठवल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नोगी बंदर छाप दंत मंजन...

मदनबाण
Wed, 12/26/2012 - 19:08 नवीन
Image removed. हे पण आठवल ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ब्याटम्यानः

गवि
Wed, 12/26/2012 - 19:18 नवीन
@ब्याटम्यानः महाद्वार रोड कोल्हापूर इथली साडी शोरूम कुठली तेच आठवेना तेजायला. डिंपल साडी हाऊस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एग्झॅक्टलि गविशेठ!!! सप्तरंगी

बॅटमॅन
Wed, 12/26/2012 - 20:48 नवीन
एग्झॅक्टलि गविशेठ!!! सप्तरंगी साड्यांचा, साड्यांचा खजिना पहा, डिंपऽल साडी हौस, डिंपऽल होऽओऽऽ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:)

ह भ प
Wed, 12/26/2012 - 18:20 नवीन
मनातलं बोललात प.रा. शेठ!! अगदी अगदी हिच टाकणार होतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बघता बघता

तिमा
Wed, 12/26/2012 - 18:13 नवीन
बघता बघता मिपाचे 'चेपु' कधी झाले कळलेच नाही. चान चाललंय !
  • Log in or register to post comments

तिमा

समयांत
Sun, 12/30/2012 - 14:32 नवीन
काय जाहिरात आहे, मिपाची कि चेपुची हो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अजुन १

प्रियाकूल
Wed, 12/26/2012 - 18:19 नवीन
"पोरीsssss,ए पोरी,पावनं आलं बग." भाऊ लोक चिडवायचे..तुला पण असचं बोलवतो आम्ही तू मोठी झाली कि. त्यामुळे चांगली लक्षात आहे.
  • Log in or register to post comments

फेविकोल

मी-सौरभ
Wed, 12/26/2012 - 19:08 नवीन
च्या सगल्या झैराति भारी असतात, स्पेशली ति पकडे रहना छोडना नही वाली तर भारीच :)
  • Log in or register to post comments

- स्कूल चले हम

मालोजीराव
Wed, 12/26/2012 - 20:20 नवीन
- स्कूल चले हम - स्वच्छतेतून समृद्धीकडे (संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान) - पप्पू डोंट बी शाय
  • Log in or register to post comments

:)

सुजित पवार
Wed, 12/26/2012 - 20:31 नवीन
सपट चहा चि जाहिराति रेडिओ वरचि.. फेविकोल च्या सर्व जाहिराति हमारा बजाज...ये जमि ये आसमान... http://www.youtube.com/watch?v=vP8pzgPvGIs पुरब से सुर्य उगा.... http://www.youtube.com/watch?v=Va_ml6k7_Fk जरासि हसि प्यार जरासा..अमुल टेस्ट ऑफ इन्डीआ...http://www.youtube.com/watch?v=RW9DSUbZX34
  • Log in or register to post comments

समस्त पुरुष जातीला आवडेल अशी

इष्टुर फाकडा
Wed, 12/26/2012 - 20:38 नवीन
समस्त पुरुष जातीला आवडेल अशी जाहिरात :
  • Log in or register to post comments

अर्र मुद्याचं राहिलंच की,

इष्टुर फाकडा
Wed, 12/26/2012 - 20:40 नवीन
अर्र मुद्याचं राहिलंच की, हि घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

अजुन एक

मी-सौरभ
गुरुवार, 12/27/2012 - 16:08 नवीन
हमदर्द का टॉनिक सिंकारा :)
  • Log in or register to post comments

कसला विचार करतोस रामैय्या ?

चैदजा
गुरुवार, 12/27/2012 - 21:43 नवीन
कसला विचार करतोस रामैय्या ? . . पुढ्च्या ओळी मी सांगायला नको. जुनी रडिओ वरची जाहिरात आहे, सिमेंटच्या पत्र्याची.
  • Log in or register to post comments

पुढ्च्या ओळी मी सांगायला नको.

किसन शिंदे
गुरुवार, 12/27/2012 - 23:08 नवीन
पुढ्च्या ओळी मी सांगायला नको. जुनी रडिओ वरची जाहिरात आहे, सिमेंटच्या पत्र्याची.
दुरदर्शनवर सातच्या बातम्यांआधी हि जाहिरात बर्‍याच वेळा पाहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

यावरून आठवले...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 12/27/2012 - 23:18 नवीन
एव्हरेस्ट सीमेंट की चादरे.... एव्हरेस्ट बडी मजबूत, एव्हरेस्ट बरसों चले... स्व दारासिंग हे त्यात अ‍ॅस्बेस्टॉसचा पत्रा डोक्यावर घेऊन उभे राहायचे मग त्यावर माकडे उड्या मारायची, जोराचा पाऊसही पडायचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

आयपीएल/सामाजिक

नंदन
Sun, 12/30/2012 - 15:23 नवीन
आयपीएल - मनुरंजन का बाप : http://www.youtube.com/watch?v=UaJEnnvfVEY ऋषिकेशच्या सर्वेक्षणावरून आठवलेली ही जाहिरातः http://www.youtube.com/watch?v=B8RuO2564hE
  • Log in or register to post comments

केचप

नंदन
Sun, 12/30/2012 - 15:25 नवीन
ही अजून एक - http://www.youtube.com/watch?v=lE38MxQLYwo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

काऽऽय झालं???

बॅटमॅन
Mon, 12/31/2012 - 14:30 नवीन
काऽऽय झालं??? बाळ रडत होतं. वुड्वर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला. तू लहान असताना मीही तुला हेच देत होते. ही झैरात लै आवडायची-पार पणजीपर्यंत कॅरॅक्टर्स दाखवली असल्यामुळे. मी माझ्या पणजीला पाहिले असल्यामुळे ती जाहिरात विशेष आवडायची. नंतर आम्ही कैकदा त्या जाहिरातीमधील "वुड्वर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला." ऐवजी "दोन लाथा घाल त्याला" हे वाक्य घालून पुढे मग "तू लहान असताना मीही तुला हेच देत होते" अशी पुस्ती जोडत असू.
  • Log in or register to post comments

चला.. या निमित्ताने मग,

गवि
Mon, 12/31/2012 - 14:34 नवीन
चला.. या निमित्ताने मग, -बाळाला द्या बॉन बॉन बाळ होईल गुटगुटीत छान.. -डाबर जनम घूंटी (की घुट्टी) -जीपला ग्राईप वॉटर -जीवदया नेत्रप्रभा नेत्रप्रभा.. (जीवद्या असा वाचायचो मी जाहिरातीतला शब्द) -पोरवाल नेत्रांजन. बहुधा यापैकी बर्‍याचशा जाहिराती एसटी बसच्या सर्वात पुढच्या लांब सीटच्या वरती मध्यभागी पत्र्याच्या प्लेटवर असायच्या का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

"बाळाला द्या बॉन बॉन बाळ होईल

टवाळ कार्टा
Mon, 12/31/2012 - 14:39 नवीन
"बाळाला द्या बॉन बॉन बाळ होईल गुटगुटीत छान.." याची २ विडंबने आठवली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कापावी लागतील, त्यामुळे मनातच

गवि
Mon, 12/31/2012 - 14:41 नवीन
कापावी लागतील, त्यामुळे मनातच असूदेत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बहुधा यापैकी बर्‍याचशा

बॅटमॅन
Mon, 12/31/2012 - 14:52 नवीन
बहुधा यापैकी बर्‍याचशा जाहिराती एसटी बसच्या सर्वात पुढच्या लांब सीटच्या वरती मध्यभागी पत्र्याच्या प्लेटवर असायच्या का?
हो अगदी अगदी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बेबी क्रिम......http://www

दिव्यश्री
Mon, 01/07/2013 - 23:13 नवीन
बेबी क्रिम...... http://www.youtube.com/watch?v=GNVeKJj8roU बेबी शाम्पू.... http://www.youtube.com/watch?v=5jVPEJQI52s वाह ताज..... http://www.youtube.com/watch?v=6vV92WYS2Mk कॅड्बरी जेम्स-रन्गीन पान्डा..... http://www.youtube.com/watch?v=iE1-FIZMy3s हमारा बजाज.....:) http://www.youtube.com/watch?v=xEV8MWd1p3M
  • Log in or register to post comments

आवडती जाहिरात

सन्जयखान्डेकर
Wed, 01/09/2013 - 11:11 नवीन
कॅड्बरी ची जाहिरात ज्यात एक मुलगी क्रिकेट मैदानात नाचत जाते, अमुलच्या सर्व आणि फेव्हिकोलच्या सर्व जाहिराती प्रेक्शणिय.
  • Log in or register to post comments

कुकर ची

नि३सोलपुरकर
Wed, 01/09/2013 - 12:17 नवीन
कुकर ची जाहीरात (बहुतेक प्रेस्टीज ची असेल) बेगग्राउंड ला गाण वाजायचं "चंदन सा बदन..चंचल ... @इष्टुर फाकडा साहेब : मस्त जाहीरात आहे धन्स. आणी वर तिमा यांच्या प्रतिसादाशी १०१% बाडीस.
  • Log in or register to post comments

सध्या माझी आवडती जाहिरात

मदनबाण
Sun, 08/25/2013 - 16:58 नवीन
सध्या माझी आवडती जाहिरात टाटाच्या नॅनो कारची आहे Celebrate Awesomeness {With Lyrical }
  • Log in or register to post comments

फार उच्च भारतीय जाहिराती !

जॅक डनियल्स
Sun, 08/25/2013 - 22:01 नवीन
मला सगळ्या जगातल्या जाहिराती बघायला खूप आवडतात. म्हणजे लोकं जशी सिनेमाची गाणी बघतात तश्या मी तूनळी वर जाहिराती बघतो. माझा स्पष्ट मत आहे की, भारतात ज्या जाहिराती आहेत त्यांची लोकांपर्यंत पोहोचायची क्षमता खूप जास्त आहे. त्या खूप डोकं लावून केलेल्या कलाकृती आहेत. इकडच्या अमेरिकेतील जाहिरीती फार गरीब असतात, फक्त चांगल्या बायका आणि गाड्या दाखवतात, बाकी कलाकृती सारखे काही नसते. ही खालची जाहिरात बघा, वेदर पेंट ची जाहितात आहे, वेदर पेंट जाहिरात
  • Log in or register to post comments

सध्या आवडल्या गेलेल्या

मदनबाण
Sat, 05/31/2014 - 11:16 नवीन
सध्या आवडल्या गेलेल्या जाहिराती देतो :- Imperial Blue ची Men will be Men ची नविन जाहिरात :- आता OLX ची O Womaniya आणि याचाच सिक्वेल. जाता जाता :- OLX च्या O Womaniya चे वरिजनल गाणं.
  • Log in or register to post comments

बाभुभाई जगजीवनदास

आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 17:19 नवीन
कोणाला आठवते काय ?
  • Log in or register to post comments

काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी

मदनबाण
Sun, 07/20/2014 - 17:45 नवीन
काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवलेली ही सुंदर जाहिरात... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- EnUchimandai... :- Vettaikaran
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा