जपानी कलात्मकता

neeta's picture
neeta in कलादालन
18 Dec 2012 - 2:39 pm

जपानी लोक कलात्मकता (creativity) साटी प्रसिध्द आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी कला असतेच, आपण त्याच्याकडे लक्श देत नाही , संलग्न केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील काही नवीन युक्त्या सुचतील ज्या तुमच्या घरासाठी धंद्यासाठी उपयोगी पड्तील. अवश्य बघा.

a

b

c

d

e

f

कला

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

18 Dec 2012 - 3:11 pm | ५० फक्त

मिपाचं फेसबुक करु नये ही प्रामाणिक विनंती.

मा. संपादक मंडळानं नविन सदस्यांना मिपाची धोरणं व्यवस्थित समजतील अशी काहीतरी व्यवस्था करावी ही नम्र विनंती.

तुम्ही अपलोड केलेल्या प्रतिमा मूळ पोस्टमधे टाकल्या आहेत. शक्यतो इमेजेस कुठेतरी अपलोड करुन>> तिथल्या इमेज फाईलचं यूआरएल कॉपी करुन >> इथल्या पोस्ट लिहीण्याच्या बॉक्सवरच्या "इन्सर्ट इमेज"च्या चिन्हावर क्लिक करुन ते यूआरएल (आल्टर्नेट टेक्स्ट एंटर करुन) पेस्ट करा.

जे चांगल आहे ते ईतरांबरोबर शेअर केल तर कुठे बिघडल? अश्लील फोटो तर नाही ना टाकलेत.

५० फक्त's picture

18 Dec 2012 - 3:34 pm | ५० फक्त

मुळात तुमचा कलात्मकता आणि क्रिएटिव्हीटि या दोन्हीत गोंधळ आहे, मग त्यानंतर दिलेल्या फोटोंमध्ये आणि वर उल्लेखलेल्या दोन शब्दांमध्ये गोंधळ आहे, आणि त्यानंतर या सगळ्यांच्या घरी किंवा उद्योगधंद्यात होणा-या उपयुक्ततेबद्दल गोंधळ आहे.

१.ते कमोडवर काढलेलं चित्र, खरंच त्याचा उपयोग समजावुन सांगाल का. म्हणजे ते पाहुन सकाळी सकाळी होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो असा काही समज आहे का जपानमध्ये.?

२. बेसिन मध्ये लावलेल्या एखाद्याच्या चेह-यावर थुंकणे हे किळसवाणे वाटणार नाही का ? यात तिन्ही पैकी काहीच नाही.
३. भारतात वाढीस लागलेल्या न्युक्लिअर कुटुंब पद्धतीत ह्या तीन नातवंडांना एकत्र घेउन बसायच्या खुर्चीचा काय उपयोग ?
४.कलात्मकता आहे, क्रिएटिव्हिटि देखील आहे पण उपयुक्तता काय समजावाल का?
५ आणि ६ - हा चिनी मातीच्या भांड्यात उपयुक्तता आहे, थोडीफार कला आहे, पण ती कशी केली, कुणी केली, मिळतात कुठं, घरात लावायची कशी, किमत काय, असे उपयोगी पडतील असे तपशील न देता का शेअर करताय उगाच.?

कला आणि क्रिएटिव्हिती याबद्दल मी अंमळ अज्ञानी आहेच पण उपयुक्तता मात्र समजते मला, आणि हो हि चित्रं तुम्ही स्वत काढलेली नाहीत हे तर स्पष्ट आहे, मग निदान आंतरजालावरुन साभार एवढं तरी लिहायचं. म्हणुन लिहिलं होतं, प्रामाणिक विनंती मिपाचं फेसबुक करु नका.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Dec 2012 - 4:06 pm | श्री गावसेना प्रमुख

जाउ द्या हो नवीन आहेत होइल त्यांचही समाधान बसतील गुपचुप्,आज काल कुणालाही चांगल सांगीतलेल आवडत नाही1हे तेव्हढ चांगल आहे नदीत घेउन जायला.

अरे मला देखील असंच वाटलं होत, पण नंतर लक्षात आलं ते फळ ठेवायचं चाक आहे. मेडिकलच्या दुकानात नाय का व्हिक्सच्या डब्या ठेवायला असतं उभं तसं.

अनाम's picture

18 Dec 2012 - 4:25 pm | अनाम

झुरळं मारण्याच जपानी यंत्र.
.

मि पा करांकडून ही अपेक्शा केली नव्हती. असा प्रतिसाद मिळेल असे वाट्ले नव्हते. सगळ्यांनाच तुम्ही असेच प्रतिसाद देता का?

नीताताई, गैरसमज नकोत. तुम्ही इथे कोणाच्या धाग्यांवर जाऊन प्रतिसाद दिलेत का? तसे नसल्यास आपल्यालाही चांगले प्रतिसाद मिळावेत ही अपेक्षा करणे तुम्हाला तरी पटते का? आधी प्रतिसाद द्या. त्यातून ओळखी होतात. मग तुमचा धागा हा छायाचित्र व वर्णन यांचा येऊ द्या. त्यावेळी तुम्हाला प्रतिसाद मिळतील अशी आशा आहे. गेल्या अनेक दिवसांत सदस्य नवे, जुने (पण नव्याने लिहायला लागलेले) येऊन फक्त छायाचित्रांचे धागे, मदत हवी असल्याचे धागे टाकून, कौतुक करून घेऊन जातात व नंतर फिरकत नाहीत. इथे असलेल्यांच्या लेखनाला, छायाचित्रांना कोणी प्रतिसाद द्यायचे? हा धागा खरेतर अप्रकाशित व्हायला हवा होता तरीही संपादक मंडळाने तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता ठेवला आहे.

त्रिवेणी's picture

19 Dec 2012 - 9:00 am | त्रिवेणी

मला भाज्या ठेवायचे व फळ ठेवायचे स्टँड खूप आवडले पण आपल्या देशात धूळ खूप निदान पुण्यात तरी त्यामुळे अश्या पांढर्‍या स्वछ गोष्टी मी फक्त चित्रात बघते, पण घ्यायची कधी हिम्मत नाही करणार.

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Dec 2012 - 9:09 am | श्री गावसेना प्रमुख

आपल्या देशात धूळ खूप निदान पुण्यात

धुळ फक्त पुण्यातच होते वाटते,बाकीकडे चकाचक वॉव,

जेव्हा माणूस नवीन असतो, तेव्हा असे प्रतिसाद पाहून तो लिहायचे बंद करेल. चांगल्या शब्दात पण लिहिता येऊ शकले असते.संपादक मंडळाला विनंती आहे त्यांनी असले प्रतिसाद छापू नयेत. त्यामुळे चांगले साहित्य लोकांना वाचायला मिळणार नाहीत. हे जे लिहील आहे त्याला टिंगल म्हणणे योग्य होईल. ही टीका नव्हे. रेवतींना मी अस सांगेन नवीन असल्यामुळे मी एक दोनच प्रतिसाद दिले आहेत. थोडे प्रतिसाद वाईट येणारच हे लिहिणार्‍याला ही अपेक्शित असतं. पण शब्द चांगले वापरण तर आपल्याच हातात असतं.

नीतातै, हा लेख त्रयस्थ नजरेतून पाहा. यात जपानी लोकांची तुम्ही म्हणता तशी क्रिएटिव्हीटी दिसतही असेल. पण तुमचं असं काय आहे यात? नुसते फोटो शोधून डकवण्यापेक्षा प्रत्येक फोटोला चारेक ओळींची माहिती लिहीली असतीत तर आणखी चांगलं नसतं का झालं ? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय मिळतात ते बघा.

५० फक्त's picture

20 Dec 2012 - 10:26 am | ५० फक्त

जा.क्र. ००१/ दि.२०१२२०१२

मा. निताताई,

सादर विनंती कारणे की,

१. तुमच्या प्रतिसादात उल्लेख केलेला प्रतिसाद वर मी दिलेले असतील तर, त्यामध्ये वाईट शब्द काय आहेत ही बाब समजावुन सांगाल काय, आपल्या मार्गदर्शनानुसार यापुढे त्या वाईट शब्दांचा उपयोग प्रतिसाद देताना टाळणे शक्य होईल.

२.तसेच सदर माझ्या दुस-या प्रतिसादात काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे कधी मिळतील याबाबत काही सांगणे शक्य झाल्यास बरे वाटेल.

धन्यवाद.

प्रति :- मा. संपाद्क मंडळ, मिसळपाव्.कॉम, वर क्रमांक १. मध्ये केलेल्या विचारणीचे उत्तर आपणांकडुन मिळाले तरी पुन्हा अशा प्रकारची शब्दरचना टाळणे शक्य होईल.

यशोधरा's picture

20 Dec 2012 - 9:25 am | यशोधरा

नीता, माफ करा पण ह्यात कलात्मक काय आहे?

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Dec 2012 - 9:30 am | श्री गावसेना प्रमुख

संपादक मंडळाला विनंती आहे त्यांनी असले प्रतिसाद छापू नयेत

ताईसाहेब असे कसे चालायचे हो तुमच ते चांगल लोकांच ते वांगल

चांगले साहित्य लोकांना वाचायला मिळणार नाहीत

1हे चांगले साहित्य ?आहे का.

कोथिंबिरीचे स्टँड आवडले !पण ते वापरायचे कसे हो?टेबलवरती थेवायचे की टागुन तेच कळ्त नाहि.आणि कुथे मिळेल?
बाकी कलात्मकता म्हणाल तर तसे कहिच वाटत नाही.
माणसाचा चेहरा कमोडवर काय दुरदैव ......!

दादा कोंडके's picture

20 Dec 2012 - 3:38 pm | दादा कोंडके

माणसाचा चेहरा कमोडवर काय दुरदैव ......!

अँस्टरडॅम मधल्या बार मधे निसर्गाच्या हाकेला 'ओ' देण्यासाठी गेलो होतो. तीथंही अशीच कलात्मकता की काय दाखवली होती. हॅश ब्राउनीचा अंमल असल्यामुळे क्षणभर ते खरंच वाटल्यामुळे (नंतर गुदगुल्या झाल्या तरीही) दोन सेकंद हृदय थांबलं होतं. :)

मृत्युन्जय's picture

20 Dec 2012 - 11:25 am | मृत्युन्जय

मिसळपाव नक्की कशाप्रकारचे संकेतस्थळ आहे हा प्रश्न मला नेह्मीच पडतो. इथे साहित्य असते तश्याच पाकृ असतात, फोटो असतात, मदत करा हो मदत असल्या आरोळ्या ठोकणारे (आणि कधीकधीच खर्‍या मदतीची गरज किंवा योग्यता असणारे) धागे असतात, दुनियाभरचे काथ्याकूट असतात. यातले ८०% पांढर्‍यावरचे काळे प्रामाणिक असते. जे नसते त्याला योग्य त्या ठिकाणी मारले जाते किंवा पब्लिक त्यातुन दंगा करुन आनंद मिळवते.

हे यापैकी काहिही असले तरीही ते येथील सभासदांचे स्वतःचे कर्तुत्व असते. म्हणजे साहित्य असेल तर त्यांचे असते, फोटो असतील त त्यांनी काढलेले असतात. काकू असेल तर तो त्यांच्या मनातली खळबळ ओकण्यासाठी असतो.

नीतातैंचा धागा यातल्या नक्की कुठल्या प्रकारात बसतो याचा विचार मी करतो आहे. शेकड्यांनी फॉरवर्ड होणार्‍या प्रपत्रात आणि याच्यातला नक्की फरक समजत नव्हता. थोडा विचार केल्यावर कळाले की फरक असा नाहिच. दोन्ही एकच आहे.

तर नीतातैंनी हे जाणुन घ्यावे की मिपा यासाठी नव्हे. आता हे जर मिपाच्या धोरणार कुठे लिहिले नसेल तर त्यांचे बरोबर आहे म्हणा की त्यांनी हा धागा काढला. पण मग मिपाची लिखित अलिखित धोरणे माहिती असणार्‍या जणकारांनी जर टिंगल केली तर वाईट वाटुन घेउ नये. जेव्हा एखाद्या फोरमचा आपण उपयोग करतो तेव्हा पुर्ण माहिती करुन घेउन मगच तो तसा करणे हे योग्य ठरेल. अन्यथा हसेच होइल.

इथे प्रस्थापित झालेल्या काही सभासदांनी सुरुवातीस चुका नक्की केल्या. पण त्यातुन बोध घेउन त्यांनी त्यांचे स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. नीतातैंनी देखील स्वतःच्या चुकीतुन बोध घेउन इतर सभासदांना अक्कल शिकवण्यापेक्षा आणि संमंला व्य्वस्थापनेचे धडे देण्यापेक्षा पुढचा धागा सेन्सिबल काढावा ही नम्र विनंती.

असो. मिपावर नीतातैंचे स्वागतच आहे.

>>पुढचा धागा सेन्सिबल काढावा ही नम्र विनंती.

तुमच्या विनंतीला तात्काळ मान देऊन त्यांनी उखाण्यातून स्वतःची क्रिएटीव्हिटी दाखवणारा आणि मिपाकरांची क्रिएटिव्हिटी तपासू पाहणारा धागा काढलाय.