✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्ही जात मानता का: एक सर्वेक्षण

ऋ
ऋषिकेश यांनी
Tue, 12/18/2012 - 12:16  ·  लेख
लेख
मिसळपाववरील बढतीमध्ये आरक्षणावरील चर्चेत अनेकांनी जाती-पातींच्या निराकरण करण्यावर भर दिला आहे, जे स्तुत्य आहेच. यातून आपण जाती किती मानतो याबद्दल एक सर्वेक्षण करायचे मनात आले. त्यासाठी प्रतिसाद-गट म्हणून ऐसीअक्षरे आणि मिसळपाव.कॉम या दोन संस्थळांवरच्या सदस्यांमध्ये एकत्रितपणे हे सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा असेल तर पुढील नियम पाळावेतः १. पुढे जे प्रश्न विचारले आहेत, त्यात तुम्हाला योग्य वाटणारा एकच पर्याय निवडायचा आहे. शक्य होईल तितके प्रामाणिक उत्तर द्यावे २. 'इतर' हा पर्याय निवडल्यास समर्पक स्पष्टीकरण द्यावे ३. सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे व्यनीतून कळवायची आहेत. उत्तरे माझ्या म्हणजे 'ऋषिकेश' या सदस्याला व्यनीतून पाठवावीत. आपली उत्तरे प्रतिसादातून जाहिरपणे देऊ नयेत ही विनंती. ४. सर्वेक्षणाचा कालावधी एक आठवडा आहे. सदर सर्वेक्षण २५ डिसेंबर रोजी भाप्रवे रात्री १२:०० वाजता संपेल. त्यानंतर (मला :) ) उपलब्ध वेळेनुसार निष्कर्ष जाहिर केले जातील. ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा नाही, त्यांनी हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावेत आणि स्वतःपुरता काय तो आरसा धरावा. मात्र कृपया २५ डिसेंबरच्या आधी याप्रश्नांवर अशी जाहीर चर्चा करू नये ज्यामुळे लोकांना प्रामाणिक उत्तरे देणे कठीण जाईल किंवा त्यांच्या उत्तरांवर प्रभाव पडेल. चला तर सुरू करूया! ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायचा आहे त्यांनी यापुढील प्रश्नांची उत्तरे मला व्यनीतून कळवायची आहेत =============== सर्वेक्षणपूर्व समज: तुम्ही 'जात' अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का? अ. होय ब. नाही बेटी व्यवहारः १. तुम्ही विविहीत असल्यास तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे काय? अ. होय ब. नाही क. गैरलागू (अविवाहीत) २. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडीदाराला प्राधान्य द्याल का? अ. होय ब. नाही क. सांगता येत नाही ड. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे) ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल ३. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का? अ. होय ब. नाही क. सांगता येत नाही क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे) ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल ४. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. तुमच्या कुटुंबाच्या एकत्रित निर्णयावर लग्न ठरेल अशी परिस्थिती असल्यास तुम्ही जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का? अ. होय ब. नाही क. सांगता येत नाही क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे) ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल ५. जर ३/४/५ प्रश्नांपैकी एकाचे उत्तर जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार करणार नाही / काही अटींसहीत करू असे असेल तर तसे का? अ. रोजच्या व्यवहारातील सवयी प्रत्येक जातीत वेगळ्या असतात. ब. खाण्याच्या सवयी जातीनुसार बदलतात. क. आम्हाला शेवटी याच समाजात रहायचे आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो पण मग लोक आम्हाला बाजूला सारतील ड. इतर ई. गैरलागू ६. जर तुमच्या अपत्याने अ. स्वेच्छेने आंतरजातीय विवाह करायची इच्छा व्यक्त केली ब. अरेन्ज्ड मॅरेज करायचे असेल तर तुम्ही आंतरजातीय जोडीदार शोधायला परवानगी देऊन त्या प्रक्रियेत स्वतः सहभागी व्हाल का? अ. होय, आनंदाने ब. होय पण नाखुशीने क. परवानगी देऊ पण स्वतः प्रक्रीयेत सहभागी होणार नाही ड. नाही ७. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार दोघांपैकी एक जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींपैकी असेल तर अपत्यास आरक्षण मिळू शकते. या कारणास्तव तुम्ही स्वतः अनुसूचित जातीपैकी नसूनही जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींचा असला तर चालेल का? अ. नाही ब. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंध नाही, तसेही चालेल क. असा जोडीदार शोधायला जाणार नाही पण या निकालामुळे आता मिळाला तर चालेल असे वाटते ड. गैरलागू (स्वतः त्या जातीतला असल्याने) ई. इतर ८. जातीच्या उतरंडीवर स्वतःच्या जातीपेक्षा वरच्या जातीचा जोडिदार चालेल का? अ. होय ब. नाही क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे) रोटी व्यवहार ९. तुम्ही घरी जेवण करायला एखादी व्यक्ती ठेवलीत तर त्या व्यक्तीची जात / धर्म विचारात घेता का? अ. होय ब. अजिबात नाही क. जात नाही पण धर्म घेतो ड. धर्म नाही पण जात घेतो १०. जर प्र क्रं ९ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का? अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत. ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे क. माझ्या कुटुंबियांपैकी काहिंचा अजूनही जातींच्या उतरंडीवर / शिवाशिवीवर विश्वास आहे. त्यांची मने दुखवायची माझी इच्छा नाही ड. जेवणातून 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे ई. इतर फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब) ११. हॉटेलात जाताना तुम्ही मालकाची जात बघता का? अ. होय. ब. नाही. क. सहसा नाही. ड. सहसा होय. १२. तुम्ही तुमच्या लहान अपत्याला सांभाळायला एखाद्या पाळणाघरात ठेवत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी ठेवत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीची जात/धर्म बघता का? अ. होय ब. अजिबात नाही क. जात नाही पण धर्म घेतो ड. धर्म नाही पण जात घेतो १३. जर प्र क्रं १२ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का? अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत. ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे. त्याव्यक्तीने माझ्या अपरोक्ष माझ्या अपत्याला तसे भोजन दिलेले मला चालणार नाही. क. सतत सोबत असणार्‍या व्यक्तीकडून काही 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे. मला इतर धर्माचे किंवा जातीचे विचार माझ्या अपत्यावर झालेले नको आहेत. ई. इतर फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब) इतर व्यवहार १४. समजा तुमचे एखाद्या व्यक्तीशी भांडण झाले तर तुम्ही त्या व्यक्तीला जातीवरून हिणवता किंवा शिव्या देता का? अ. होय, बहुतांश वेळा ब. क्वचित पण होय क. अजिबात नाही १५. एखाद्या व्यक्तीची वर्तणूक खटकली किंवा तुमच्यापेक्षा वेगळी वाटली तर तुम्ही त्याचा संबंध (किमान मनातल्या मनात) त्या व्यक्तीच्या जातीशी लावता का? अ. होय, बहुतांश वेळा ब. क्वचित पण होय क. अजिबात नाही १६. जातींचा आणि आर्थिक परिस्थितीचा, शिक्षणाचा संबंध आहे असे तुम्ही मानता का? अ. होय, बहुतांश वेळा ब. क्वचित पण होय क. अजिबात नाही १७. जातींमुळे काही व्यक्तींना शिक्षणापासून, नोकर्‍यांपासून, बढतीपासून वंचीत रहावे लागते असे तुम्हाला वाटते का? अ. होय, काही वेळा ब. होय, अनेकदा क. अजिबात नाही ड. बढतीमध्ये नाही, बाकी होय ई. शिक्षणात नाही, बाकी होय फ. इतर सर्वेक्षणानंतर आरसा: तुम्ही जात अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का? अ. होय ब. नाही ===============
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10914 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

आंतरजातीय लग्नाला विरोध नसल्याचे लक्षात येते

पंकज
Wed, 12/19/2012 - 09:33 नवीन
लग्नाच्या जाहिराती पाहिल्या तर समाजाचा आंतरजातीय लग्नाला विरोध नसल्याचे लक्षात येते. http://epaper.loksatta.com/75525/indian-express/16-12-2012#page/4/3
  • Log in or register to post comments

असे वाटत नाही

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/19/2012 - 09:47 नवीन
उलट आंतरजातीय विवाह हे खूप कमी प्रमाणात आहेत (जातीय विवाहांच्या तुलनेने) हेच जाणवते. फक्त ब्राह्मण वधू वरांसाठी अशा विवाहमंडळांच्या जाहिराती आढळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

शाळाप्रवेशापासून

सस्नेह
Wed, 12/19/2012 - 10:35 नवीन
शाळाप्रवेशापासून रेशनकार्ड्पर्यंत सर्व प्रकारच्या सरकारी/खाजगी अर्जांमध्ये जोपर्यंत 'जात' हा क्लॉज भरणे कंपल्सरी आहे, तोपर्यंत 'जात' जाईलसं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

'जात' हा क्लॉज काढला की

पंकज
Wed, 12/19/2012 - 11:19 नवीन
'जात' हा क्लॉज काढला की सरकारी कागदपत्रातून जात नक्की जाईल. पण लग्नाच्या जाहिरातीतील "SC/ST क्षमस्व" ही ओळ काढण्यासाठी बाराच वेळा जावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

जोपर्यंत बौध्दिक, आर्थिक,

दीपा माने
Fri, 12/21/2012 - 03:54 नवीन
जोपर्यंत बौध्दिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय फायदे मिळतात तोपर्यंत जात जगातुन जाणार नाही.इथे अमेरिकेत माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाच्या बाबतीत तो मुलगा प्राथमिक शाळेत असताना घडलेली वस्तुस्थिती सांगितली. ती म्हणाली, एक दिवस शाळेतून घरी आल्यावर आईला विचारत होता की त्याच्या वर्गातला ब्राम्हण मुलगा टीचरला सांगत होता की तो मुलगा जातीने मैत्रिणीच्या मुलापे़क्षा सुपेरियर आहे.तिचा मुलगा हिरमुसला होवुन आईला विचारत होता की मी काय म्हणुन त्याच्यापेक्षा इन्फेरियर आहे. ज्या घरांमधुन सात समुद्र ओलांडुन जातपातीचा असा बाऊ पुढील पिढ्यांना शिकवला जात असेल तेथे भारतात फोफावलेल्या जातीचा वृक्ष लगेचच कसा उन्मळुन पडेल?
  • Log in or register to post comments

मला थोडे अधिक सांगायचे

दीपा माने
Fri, 12/21/2012 - 04:14 नवीन
मला थोडे अधिक सांगायचे एवढ्याचसाठी की मैत्रिण जेव्हा दुसर्‍या दिवशी शाळेत गेली तेव्हा वर्ग टिचरकडुन तो मुलगा कोण आहे ते कळले. माझ्या मैत्रिणीच्या मुलाला त्याचा वर्गबंधु 'ब्राम्हण' जातीचा आहे म्हणजे काय ते माहीत नव्हते. हे त्याची आई वर्गात गेल्यावर सर्व प्रकार त्याच्या टिचर कडून समजला. पण दुसर्‍या मुलाने त्याचा उल्लेख inferior to him असा केल्याने हे महाशय हिरमुसले. हा मैत्रिणीचा मुलगा पुढे त्याच्या बुध्दिबळाने अति बुध्दिवान मुलांसाठीच्या हायस्कुलमध्ये सिलेक्ट होऊन प्रसिध्द युनिव्ह्र्र्सिटीतुन पदविधर झाला.
  • Log in or register to post comments

इतिहास

विकास
Fri, 12/21/2012 - 19:53 नवीन
दुर्दैवी उदाहरण आहे. आणि त्याला माझ्या लेखी त्या मुलाचे आईवडील जबाबदार आहेत. आता हा मुलगा प्दवीधर झाला आहे म्हणजे गतकाळातील उदाहरण वाटत आहे. आमच्या शाळकरी मुलीस आणि तिच्या सभोवतालच्या इतर भारतीय (हिंदू) मुला-मुलींना त्यांच्या जाती माहीत असल्याचे दिसत नाही. त्यावरून बोलणे तर लांबच राहूंदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

मुलाला माहित नसलेली जात शाळेत कळ्ली.

अनन्न्या
Fri, 12/21/2012 - 11:41 नवीन
लहान मुलांना जात वगैरे काही कळत नाही. एकदा माझ्या मुलाने शाळेतून आल्यावर विचारले, आई आपली जात कोणती गं? बाईंनी छात्रबोधिनीत लिहून आणायला सांगितलय! जात अशी कळते. ती आधी सरकारी कागद्पत्रातून काढावी लागेल.
  • Log in or register to post comments

..शिर्के..

गवि
Fri, 12/21/2012 - 12:48 नवीन
रा.भा. शिर्के प्रशाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

हो..

अनन्न्या
Fri, 12/21/2012 - 18:55 नवीन
छात्रबोधिनीवरून ओळखलत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो.. आठवण आली शाळेची खूप त्या

गवि
Sat, 12/22/2012 - 08:07 नवीन
हो.. आठवण आली शाळेची खूप त्या शब्दाने..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

नावावरुन धर्म अन आडनावावरुन जात..

यसवायजी
Sat, 12/22/2012 - 12:36 नवीन
"नावावरुन धर्म आणी आडनावावरुन जात कळते" म्हणुन कदाचित मिपा वर सुद्धा आय्-डी घेतले जातात.. सहमत?
  • Log in or register to post comments

आभार!

ऋषिकेश
Tue, 12/25/2012 - 10:40 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आणि सर्वेक्षणात भाग घेणार्‍यांचे आभार. ज्यांना या सर्वेक्षणात अजूनही भाग घ्यायची इच्छा आहे त्यांनी आज भाप्रवे रात्री १२ च्या आत आपली उत्तरे पाठवावीत. यानंतर सर्व उत्तरांचा अभ्यास आणि वर्गीकरण करून निष्कर्ष इथे जाहिर करेन
  • Log in or register to post comments

निकालातूर

आनंदी गोपाळ
Tue, 12/25/2012 - 13:58 नवीन
-आ.गो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा