✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुका म्हणे बरवे जाण...!

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 06/30/2008 - 19:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15525 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

म
मानस Mon, 06/30/2008 - 19:46 नवीन

महापूरे झाडे जाती

तात्या, खुप दिवसांनी कुमारजींचा हा अभंग ऐकला. मजा आया. क्या केहेने!! महापूरे झाडे जाती ह्यात "जाती" खास कुमारजीच म्हणू शकतात. जीव ओवाळून टाकावा. तूम्ही म्हण्टल्याप्रमाणे खरोखरच हातातली सगळी कामं बाजूला टाकली आणि ही चीज ऐकली. धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/30/2008 - 19:50 नवीन

किती

किती सुंदर रसग्रहण केलं आहे. खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं आणि त्याच्या मधाळ रचनेमध्ये मी अडकून पडले. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं हे बडबडगीत, तो मऊ गुरगुट्या वरणभात, आज्जीने हातावर ठेवलेली बेसनाची वडी, सर्दीपडसं झाल्यावर सुंठ उगाळून त्याचा अंमळ कढत लेप नाका-कपाळावर थापणारी ती प्रेमळ आई!, आज्जी, आत्या, काकू, मावशी, आईने घेतलेला तो गोड पापा! हेच सगळं हवं आहे ना आपल्याला? अगदी खरंय. माझ्या लेकाला पहाते तेव्हा असं वाटतं की आपलं बालपण खूप लवकर संपलं. त्याच्या खेळण्यात मी स्वतःचं बालपण शोधते. हातातली सगळी कामं टाकून अगदी ऐकत रहावसं वाटतं, आणि मन पुन्हा एकदा आज्जीने दुधाच्या पातलेल्यातील काढलेल्या सायसाखरेच्या खरवडीत बुडतं! या तुमच्या वाक्यावर जीव ओवाळून टाकावा वाटतो...(मला साय अजिबात आवडत नाही तरीही) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/30/2008 - 19:52 नवीन

वाह तात्या ....

आजच माझ्या मनात एकंदरीत वारकरी संप्रदाय व तुकोबामाउली विषयी थोडी उर्मी दाटून आली होती ... कालच "पालख्यांनी" पुणे सोडून पंढरीच्या दिशेने कुच केले व त्याच मुहुर्तावर तुमचा लेख आला .... मस्त निरुपण केले आहे. मला तर एकदम लहानपणाची आठवण आली. मी लहानपणी [ पंढरपुरी] असताना वारीच्या वेळी "विठ्ठलमय" झालेल्या "अवघ्या पंढरीत" किर्तनांची चांगलीच रेलचेल असायची. सारखे कानावर "विठुनाम" यायचे व रात्री हा "किर्तनांचा व प्रवचनाचा फड" रंगायचा. ते ऐकताना अगदी त्यात एकरुप होऊन जायचो ... त्यात असेच "तुकोबा व माउलींच्या अभंगाचे निरुपण" केले असायचे व ते सांगणारे बाबा/महाराज अगदी सर्वसामान्यांच्या भाषेत त्याची उकल करायचे. आज अगदी तसेच वाटले तुमचा लेख वाचुन. अजुन काही आवडणारे व भावणारे अभंग म्हणजे ... " हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा " " याची साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा ..." कुठल्याही अभंगाच्या निरुपणानंतर किर्तनाच्या वेळी "टाळ व मॄदुंग" घेऊन उभारलेले "विठुभक्त" शेवटी जो सुरात व तालात "विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल" हा जयघोष करीत त्याची आठवण आल्यावर आत्तासुद्धा अंगावर काटा आला.... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/30/2008 - 20:00 नवीन

व्वा.....

तात्यानु धन्यवाद,,,, हे गाणं ऐकत ऐकतच हा लेख वाचला फारच प्रसन्न वाटले.. (कुमार प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 06/30/2008 - 20:19 नवीन

निरुपण आवडले!

तात्या निरुपण आवडले. कुमार गंधर्व हे माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत;तरीही हे गाणे कुमारांनी गायलेलं मला कधीच आवडलेले नाही. इथे नेहमीचे कुमार गंधर्व न वाटता उगाचच 'कुमार'(बाल) वाटावे म्हणून त्यांनी जो चोरटा आवाज लावलाय तो कानाला खटकतो. गाण्यात तुकोबारायांचे अर्थपूर्ण शब्द आहेत म्हणूनच ऐकणे सुसह्य वाटते इतकेच. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/30/2008 - 20:33 नवीन

कुमारांचे हे गाणे फार आवडते..

अर्थातच मूळ अभंग पण छान आहे व आवडतो पण कुमारजींनी गायलेला हा अभंग देखील फार आवडतो. माझ्या मते हे येथे तुकाराम महाराजाना अभिप्रेत लहानपण म्हणजे बालपण नव्हे तर अहंकार सोडणे आहे असे मला वाटते. त्यात्याचा लेख उत्तम. कुमारजीनी गायलेले 'कोणा कशी कळावी' हे पण गाणे एकदम छान मला फार आवडते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/30/2008 - 21:05 नवीन

निरुपण आवडले.

आमच्या तुक्याचा कोणताही अभंग देहभान विसरायला लावणारा असाच आहे. आपले निरुपण आवडले मात्र कुमारांनी गायलेले आवडले नाही. ( संगीतातले काही कळत नाही म्हणुन तसे असेल, पण लैच धीम्या सुरात गाताहेत असे वाटते. संगिताच्या जाणकारांनो क्षमा करा , पण जे वाटले ते लिहिले. ) संत तुकारामांची रचना आणि श्रीनिवास खळ्यांचे स्वर...'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ......... चा आनंदही घ्याच.....इथे आमचे देहभान हरपते !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 07/01/2008 - 05:37 नवीन

+१

आमच्या तुक्याचा कोणताही अभंग देहभान विसरायला लावणारा असाच आहे. असेच म्हणते. तात्यांसाठी - गाण्याच्या निरूपणात यावेळी गंधार आणि न्यास खेरीज जास्त माहिती नाही - असे का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप चित्रे Mon, 06/30/2008 - 21:15 नवीन

रसग्रहण

खूपच सुरेल रसग्रहण तात्या .. जियो !! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/30/2008 - 22:14 नवीन

सहीच!!

सहीच!! तात्या, अभंगाच्या दुव्याबद्दल खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/01/2008 - 00:33 नवीन

उत्तम

लेख, अतिशय आवडला. >>> किती हळवेपणाने गाताहेत पाहा. त्यांचा तो स्वर ऐकून असं वाटतं की कुमारांची गाण्यातली सगळी विद्वत्ता गळून पडली आहे आणि तेही तुकोबांसारखेच देवाकडे लहानपण मागताहेत. अगदी लहान होऊन! ही जादू आहे तुकोबांच्या शब्दांची! -- सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 07/01/2008 - 01:50 नवीन

हेच म्हणतो

बालपण देगा देवा! (बालक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चतुरंग Tue, 07/01/2008 - 01:29 नवीन

मस्त निरुपण तात्या!

गाणंही छान म्हटले आहे. (हे रेकॉर्डिंग कुमारांच्या बर्‍याच आधीच्या काळातले आहे का? आवाज खूप तरुण वाटतोय.) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/01/2008 - 01:50 नवीन

उच्च.... कुमा

उच्च.... कुमारजी आणि तात्या .... दोघेही.... बिपिन.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 07/01/2008 - 03:58 नवीन

तुकोबा

तुकोबा म्हणजे रसाळता. तुकोबा म्हणजे परम ज्ञान. असे विविध आयाम असणार्‍या तुकोबांच्या अभंगावर खूप सखोल निरूपण केले तात्या तुम्ही. मानलं तुम्हाला. जरा ते विजेट कसे चिकटावयचे ते सांगाल का?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 07/01/2008 - 04:06 नवीन

ह.भ. प. तात्यामहाराज,

एकदम बेष्ट!! आम्हाला कुमारांच्या अभंगापेक्षा तुमचं निरूपण जास्त आवडलं. कुमारांच्या या अभंगाबाबत आम्ही प्रमोदकाकांशी सहमत आहोत. माझ्या मते हे येथे तुकाराम महाराजाना अभिप्रेत लहानपण म्हणजे बालपण नव्हे तर अहंकार सोडणे आहे असे मला वाटते. सहमत! इथे लहानपण म्हणजे शारिरीक अवस्था नसून अंगी लहानपण, स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती अभिप्रेत असावी असेच मलाही वाटते. तात्याराव, या सरपंचगिरीच्या लफड्यात तुमच्यातला लेखक हरवत चाललाय की काय असं वाटायला लागलं होत.... आम्हाला बुवा लेखक तात्याच जास्त आवडतो!!! स्पष्टोक्तिबद्द्ल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/01/2008 - 06:12 नवीन

साजुक तुपातला शिरा

गाणे व लेख केवळ अगग!! तात्यानी वर लिहल्याप्रमाणे, हे गाणे म्हणजे साजुक तुपातील शीरा व रसग्रहण हे तात्याचे आपल्याला ममतेने भरवणे. अक्षरशः एकेक वाक्य घेउन खरच मस्त भरवले. अवांतर - कुमारांचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कोमल वाटतोय का? तुकारामांना अपेक्षीत भक्तीरस ओतप्रोत भरल्यासारखे?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 07/01/2008 - 06:31 नवीन

+१

काय तात्या, तुम्ही जितक्या मार्मिकतेने लिहीलेय तितके मिपाकरांनी रसिकतेने वाचून , विचक्षणपणे प्रश्नसुद्धा विचारलेत की नाही ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धनंजय Tue, 07/01/2008 - 06:57 नवीन

मस्त निरूपण

अभंग तर फारच अर्थपूर्ण आहे. प्रथम ऐकताना प्रमोदकाकांसारखेच वाटले - की हा एका प्रकारे लहान मुलाचा आवाज आहे. पण कुमार गंधर्वांनी मार्दवासाठी तसा आवाज मुद्दामून लावला असेल. "ल्हानाहून ल्हान" असे म्हटल्यामुळे मात्र वयाचे लहानपण आणि त्याची गोडी जास्त अधोरेखित होते. (काळ्यावर पांढरे शब्द वाचताना अहंभाव लहान करावा हा अर्थ जास्त जाणवतो.) चाल मधुर आहे. ऐकून छान वाटले.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 07/01/2008 - 08:53 नवीन

उत्तम

तात्या, खुप छान लिहिले आहे. विशेषत: मला लेखातील खालील वाक्य फार सुंदर वाटले. उद्या मी भले भारतभर, जगभर प्रवास करून एकापेक्षा एक अश्या उत्तमोत्तम पाकृ खाईन पण आईने ताटात कालवलेल्या वरणभाताच्या काऊच्या अन् चिऊच्या घासाची सर कशालाच नाही! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 07/01/2008 - 09:16 नवीन

वाचनाचा

वाचनाचा आनंद घेत आहे. बस ! आणखी काही लिहु शकत नाही
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 07/01/2008 - 09:42 नवीन

वा वा

वा वा तात्या, सुंदर लेख आणि अभंग यांचा अजोड मिलाफ. फार छान लिहिले आहे. आणि गाण तर काय? लाजवाब. तुका आकाशाएवढा| हे खरेच. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 07/01/2008 - 13:51 नवीन

असेच!

सुंदर लेख आणि अभंग यांचा अजोड मिलाफ. साती
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Tue, 07/01/2008 - 20:20 नवीन

अप्रतिम...

हे लईच भारी... आता उड जायेगा हंस अकेला ऐकवा आणि त्याबद्दल ही काही लिहा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 07/01/2008 - 20:36 नवीन

वा

वा तात्या ! छान लेख आणि छान गाण्याची आठवण. मी हे गाणे वारंवार ऐकत असतो. मला कुमारांचा आवाज फार आवडतो. आणि या गाण्याला ठेका फारच उत्तम आहे. सुरुवातीचा तबला एकताच मन त्यात अडकून पडते. अवांतर : यातील लहानपण हे वयाचे नसून वृत्तीचे असावे या मताशी सहमत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Tue, 07/01/2008 - 22:23 नवीन

व्वा!

वा, तात्या, लेख सुंदर.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/03/2008 - 18:08 नवीन

आभार/उत्तरे...

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे मनापासून आभार... छोटा डॉन, " याची साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा ..." कालनिर्णयकार जयंत साळगावकरांच्या घरी एकदा अण्णांच्या गाण्याचे मैफल होती तेव्हा मी अण्णांना हा अभंग म्हणायची विनंतीवजा फर्माईश केली होती. अण्णांनी कुठलेही आढेवेढे न घेता माझी फर्माईश मान्य केली आणि अतिशय सुरेख गायले. अगदी रंगून, देहभान हरपून अण्णांनी हा अभंग गायला होता त्याची आठवण आजही ताजी आहे. साक्षात विठोबाही तेथे अवतरला असेल आणि त्यानेही अगदी तल्लीनतेने कर कटावरी ठेवून अण्णांचं ते गाणं ऐकलं असेल! गणपती उत्सवातली ही घटना. गणपतीच्या दिवसात साळगावकरांकडच्या गणपतीत त्यांच्या घरी अण्णांचं गाणं हा गेला कित्येक वर्षांचा पायंडा! त्यामुळे दरवर्षी गणपतीत आम्हालाही मेजवानी! गणपती आले की आम्ही दरवर्षी अण्णांना फोन करायचा आणि "अण्णा, साळगावकरांकडे गाण्याला येतो आहे!" असं म्हणायचं. त्यावर अण्णाचंही, "अरे ये ये. अगदी अवश्य ये" हे ठरलेलं उत्तर! :) गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र अण्णांची प्रकृती बरी नसल्यामुळे यात खंड पडला आहे! असो.. देवकाका, इथे नेहमीचे कुमार गंधर्व न वाटता उगाचच 'कुमार'(बाल) वाटावे म्हणून त्यांनी जो चोरटा आवाज लावलाय तो कानाला खटकतो. आपल्याला कुमारांचा त्या गाण्यातील आवज आवडला नसेल हे मान्य, परंतु कृपया त्याला 'चोरटा आवाज' असं म्हणू नका, ते माझ्या मते योग्य होणार नाही! व्हॉईस मॉड्युलेशन या विषयावर प्रभूत्व असलेला कुमारांसारखा गवई चोरटा आवाज लावेल असं वाटत नाही! व्हॉईस कल्चरच्या परिभाषेत याला काही वेळा फॉल्स व्हॉईस असंही म्हटलं जातं. परंतु इथे फॉल्स व्हॉईसचा अर्थ 'चोरटा आवाज' असा नव्हे हे लक्षात घ्या. फॉल्स व्हॉईस लावण्याकरता स्वरांची अन् श्रुतींची बरीच जाण लागते, जी कुमारांकडे होती. चोरटा आवाज हा गाण्यातला चक्क दोष मानला गेलेला आहे आणि तो बरोबर आहे! किराणा गायकीतले रहिमतखासाहेब, अब्दुल करीमखासाहेब या मंड़ळींचीदेखील फॉल्स व्हॉईस वर खूप प्रभूत्व होते. कुमारांचा अर्थातच किराणा गायकीचा बराच अभ्यास असल्यामुळे, तसेच स्वरांवर, श्रुतींवर प्तभूत्व असल्यामुळे कुमारांनी या गाण्यात अगदी जाणीवपूर्वक फॉल्स व्हॉईसचा उपयोग केला आहे, ही गोष्ट मला तरी खूप प्रशंसनीय वाटते! असो, तरीही कुमारांनी चोरटा आवाज लावलाय असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर त्याचा मी आदर करतो. प्रत्येकाची मतं! पुण्याचे पेशवे, माझ्या मते हे येथे तुकाराम महाराजाना अभिप्रेत लहानपण म्हणजे बालपण नव्हे तर अहंकार सोडणे आहे असे मला वाटते. शक्य आहे. तुकोबांच्या अभंगाला अनेक पैलू असतात. मला मात्र त्या अभंगातले लहानपण, बालपणच अधिक दिसले. चित्रा, गाण्याच्या निरूपणात यावेळी गंधार आणि न्यास खेरीज जास्त माहिती नाही - असे का बरे? खास असं कारण नाही, परंतु त्या बाबतीत मुद्दामूनच थोडे कमी लिहिले. असो, आता लवकरच या गाण्याच्या सांगितिक बाजूवरदेखील इथेच वेगळा प्रतिसाद टाकून लिहिण्याचा प्रयत्न करेन! :) डांबिसराव, सहमत! इथे लहानपण म्हणजे शारिरीक अवस्था नसून अंगी लहानपण, स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती अभिप्रेत असावी असेच मलाही वाटते. हम्म! मला मात्र त्यात काऊचिऊवालं बालपणंच अधिक दिसलं! असो, प्रत्येकाची इंटरप्रिटेशन्स वेगळी! तात्याराव, या सरपंचगिरीच्या लफड्यात तुमच्यातला लेखक हरवत चाललाय की काय असं वाटायला लागलं होत.... अरे नाही रे, अजून तरी तात्यातल्या लेखकाला जपायचा प्रयत्न मी करतो आहे! :) आम्हाला बुवा लेखक तात्याच जास्त आवडतो!!! धन्यवाद रे डांबिसा! :) पण काय करणार, आता संस्थळ काढलंय त्यामुळे मध्येमध्ये थोडीशी सरपंचगिरीही करावी लागते रे! :) मुक्तराव, काय तात्या, तुम्ही जितक्या मार्मिकतेने लिहीलेय तितके मिपाकरांनी रसिकतेने वाचून , विचक्षणपणे प्रश्नसुद्धा विचारलेत की नाही ! खरं आहे रे बाबा! मिपावाल्यांसमोर खूप सांभाळून लिहावे लागते! :) धन्याशेठ, पण कुमार गंधर्वांनी मार्दवासाठी तसा आवाज मुद्दामून लावला असेल. अगदी सहमत आहे... "ल्हानाहून ल्हान" असे म्हटल्यामुळे मात्र वयाचे लहानपण आणि त्याची गोडी जास्त अधोरेखित होते. मलाही ह्याच अर्थाने हा अभंग दिसला! ओगलेसाहेब, हे लईच भारी... आता उड जायेगा हंस अकेला ऐकवा आणि त्याबद्दल ही काही लिहा कधितरी नक्की प्रयत्न करीन. पण मूड लागायला हवा, ह्या अभंगाची तार लागायला हवी तरच ते जमेल. जबर्‍या आहे हे निर्गुणीभजन! असो, आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे पुनश्च एकदा आभार.... आपला, (तुकोबाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा