Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 11/27/2012 - 17:23
नुकतीच मटा मधली बातमी वाचली. सचिनचा एक निस्सीम चाहता म्हणून मनापासून वाईट वाटलं. परंतु कालाय तस्मै नमः...... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17372506.cms ही परिस्थिती आज न उद्या येणारच....तो एक खेळाडू म्हणून महान आहेच पण वयपरत्वे त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. निवृत्त होताना "का?" असे लोकांनी विचारले पाहिजे." का नाही? असे विचारेपर्यंत खेचायला नको....... एकदा असे ऐकले होते की सचिन २०२४ साली धोनी,गंभीर ह्यासारख्या "ज्येष्ठ" खेळाडूंच्या हस्ते वर्ल्ड कप मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार घेऊनच निवृत्त होणार आहे. अतिशयोक्ती सोडली तर तो खरच त्या दिशेने चालतोय असे वाटतंय. तसंही सतत कुठे न कुठे तरी टुकार सामने चालू असल्याने क्रिकेटचं अजीर्ण झालंय .....पहिल्या सारखी शान आणि चुरस राहिली नाही आता......त्याच्या समवयस्कांनी निवृत्ती घेतली किंवा घ्यावी तरी लागली.....सचिन,विचार कर रे बाबा !!
  • Log in or register to post comments
  • 16616 views

प्रतिक्रिया

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/28/2012 - 10:31

Permalink

तो बहुतेक पुजाराच्या हस्ते

तो बहुतेक पुजाराच्या हस्ते पुरस्कार घेउनच रिटायर होनार.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/28/2012 - 11:31

Permalink

आपण देवाविरुद्ध चकार काढणार नाही.....

मला वाटतं आपल्या भारतीय संघात दहाच खेळाडु खेळत आहेत, असे समजून क्रिकेट पाहात राहावे. सचिनला वाटतं तोपर्यंत खेळू द्यावे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 11/28/2012 - 14:40

In reply to आपण देवाविरुद्ध चकार काढणार नाही..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

का ???

का ???
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/28/2012 - 15:26

In reply to का ??? by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

आता का....

आता का ? गेल्या नऊ कसोटी सामन्यात सचिनला एकदाच पन्नास धावा करता आल्या आहेत. असतो एकेकाचा बॅडपॅच आणि बॅडपॅचमधून निघायला अजून दोनचार वर्ष जाऊ द्या असे चाहते म्हणुन म्हणालही पण, माझ्यासारखे तुम्ही जर सचिनचे चाहते असाल आणि सचिनची फलंदाजी पाहात असाल तर सचिनला आता धावा रेटत नाही,असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. इतके वर्ष खेळूनही त्याचा आत्मविश्वास आता डगमगायला लागला आहे की काय असे वाटायला लागले आहे. आता पुढच्या दोन सामन्यात सच्याकडून चुकुन ९०/९५ धावा निघाल्या किंवा शतक केले तर कुठे गेली ती सच्याला रिटायला व्हा किंवा ''हाय हाय '' म्हणनारी मंडळी असा जयघोष सुरु करता येईल. त्यापेक्षा, सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळु द्यावं कारण सच्या आपल्या क्रिकेटचा देव आहे. आणि दहाच खेळाडूंवर आपण विसंबून राहील्यामुळे सच्याने धावा केल्या काय आणि नाही केल्या काय, त्याच्याकडून आपण अपेक्षा करायच्या नाहीत. आपल्या आणि सच्याच्या सुदैवानं झाल्याच धावा तर आपण पुन्हा आहोतच इथे सच्याचं कौतुक करायला हाजीर. खरं म्हणजे, सच्यानं शंभर शतकांचा विक्रम केला तेव्हाच क्रिकेटला अलविदा म्हणायचा उत्तम चान्स होता. पण, हाय रे माझ्या कर्मा... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/28/2012 - 15:46

In reply to आता का.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हॅ हॅ हॅ

अहो प्रा. डॉ., इकडे लोक वर्षानुवर्षे साधी संपादकपदाची खुर्ची सोडायला तयार होत नाहीत. वरती 'आम्ही तर बॉ कधीच मालकांना आम्हाला काढा म्हणून सांगीतले आहे, पण ते काढतच नाहीत' असले उपकार ऐकवतात. मग त्या दर सामन्यामागे लाखात कमाई करणार्‍या सचीनला तरी का दोष द्या ?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 11/28/2012 - 16:00

In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार

Permalink

हा हा हा

हा हा हा सहमत आहे. त्याचे काय आहे परा शेट अहो चावडीवरती कुचाळक्या करायला कुणाला आवडत नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 11/28/2012 - 16:00

In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार

Permalink

अस्स्ल 'परा'कोटीतला प्रतिसाद.

=)) अस्स्ल 'परा'कोटीतला प्रतिसाद. बादवे : आज टोलनाका बंद काय रे ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/28/2012 - 16:11

In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार

Permalink

या... आलात मिरे वाटायला... स्वागत आहे.

मिसळपाववर आपलं पुन्हा स्वागत आहे. प्रा. डॉ., इकडे लोक वर्षानुवर्षे साधी संपादकपदाची खुर्ची सोडायला तयार होत नाहीत. वरती 'आम्ही तर बॉ कधीच मालकांना आम्हाला काढा म्हणून सांगीतले आहे, पण ते काढतच नाहीत' असले उपकार ऐकवतात. उपकार-बिपकार कधी कोणालाच ऐकवले नाही, तसा विचार येणेही शक्य नाही. बाकी, संपादक म्हणून मिळणार्‍या फॅसिलिटीचा मोह मात्र खूपच आहे, हेही लम्रपणे मान्य करतो. -दिलीप बिरुटे (सच्यासारखाच संपादकपदाचा मोह सुटत नसलेला)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 11/28/2012 - 16:14

In reply to या... आलात मिरे वाटायला... स्वागत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अर्रर्रर्र ते संपादक तुम्ही

अर्रर्रर्र ते संपादक तुम्ही आहात होय? ब्वार ब्वार ब्वार....
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/28/2012 - 16:36

In reply to या... आलात मिरे वाटायला... स्वागत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

ऑ ?

उपकार-बिपकार कधी कोणालाच ऐकवले नाही, तसा विचार येणेही शक्य नाही.
तुम्हाला कुठे काय बोलतोय मी प्रा. डॉ. ??
बाकी, संपादक म्हणून मिळणार्‍या फॅसिलिटीचा मोह मात्र खूपच आहे, हेही लम्रपणे मान्य करतो.
नो कॉमेंटस. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 11/28/2012 - 16:38

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

>>>तुम्हाला कुठे काय बोलतोय

>>>तुम्हाला कुठे काय बोलतोय मी प्रा. डॉ. ?? हॅ हॅ हॅ चोराच्या मनात चांदणं असतं हे ईसरलास जणू.. ;) चौपाटी लेख पाडाच जरा किस्सा कुर्सी का...
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 11/28/2012 - 17:36

In reply to >>>तुम्हाला कुठे काय बोलतोय by नाना चेंगट

Permalink

किती ते विषयांतर?!

किती ते विषयांतर?! इथे लोक सचिननी काय करावं याची चर्चा करतायत तर त्याला योग्य तो सल्ला द्यायचा सोडून तुम्ही लोक संपादकांचे प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार करायला निघालात. खोळंबलाय बिचारा सचिन. आधी त्याच्याकडे बघूयात बरं... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 11/28/2012 - 17:40

In reply to किती ते विषयांतर?! by कवितानागेश

Permalink

विषयांतर ???/

असे कसे म्हणता तुम्ही? अहो याच चर्चेच्या आधारावर सचिनने ठरवावे की त्याने काय करायला हवे ते.. लेकी बोले सुने लागे माहित असेलच त्याला ;) नसेल तर आता समजेल. तुम्ही मधेच असे अडवू नका बरे.... एक तर हल्ली आमच्या गप्पा कमी झाल्या आहेत.. त्यात तुम्ही असं ओरडता... !!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 11/28/2012 - 17:57

In reply to विषयांतर ???/ by नाना चेंगट

Permalink

काहीतरीच काय?लेकी बोले सुने

काहीतरीच काय? लेकी बोले सुने लागे माहित असेलच त्याला> इतका तो हळवा/हुश्शार असता तर....... :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/28/2012 - 18:06

In reply to काहीतरीच काय?लेकी बोले सुने by कवितानागेश

Permalink

तर..

इतका तो हळवा/हुश्शार असता तर.......
तर.. एखाद्या संस्थळावरती 'मदतनीस' झाला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 11/28/2012 - 18:11

In reply to तर.. by परिकथेतील राजकुमार

Permalink

सल्लागार म्हणून मिरवता पण

सल्लागार म्हणून मिरवता पण येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/28/2012 - 18:18

In reply to सल्लागार म्हणून मिरवता पण by नाना चेंगट

Permalink

अगदी अगदी..

आणि 'सल्लागाराचं काय करावं ?' असा काथ्या कुटण्याची पण सोय होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 11/28/2012 - 18:17

In reply to आता का.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नशीब देवाने एकच सचिन बनवला.

नशीब देवाने एकच सचिन बनवला. नाहीतर आज ५-६ खेळाडूच आहेत असे समजून खेळायला लागले असते. अवांतर :- माणसाला देव बनवू नये, माणूसच राहू द्यावे. नाहीतर असे प्रॉब्लेम होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/28/2012 - 19:22

In reply to नशीब देवाने एकच सचिन बनवला. by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

सहमत.

>>>> माणसाला देव बनवू नये, माणूसच राहू द्यावे. नाहीतर असे प्रॉब्लेम होतात. सहमत. बाकी, सच्याला अजून काही धोका नाही. राजीव शुक्ला नावाचं एक धंदेवाईक प्रकरण क्रिकेट नावाच्या धंद्यात आहे. खेळाडू ठरवतील केव्हा निवृत्त व्हायचं ते असं म्हणून '' सच्या खेळ रे बाबा अजून '' असा संदेश दिला आहे. आणि सच्या खेळपट्टीवर म्हणजे स्टँपसमोर दगडासारखा ढीम्म उभा राहीला तरी बॅटीला कटरकुटर लागून पाच पचंवीस धावा होतील,याच्यावर माझा अजून तरी ठाम विश्वास आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 11/29/2012 - 21:16

In reply to नशीब देवाने एकच सचिन बनवला. by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

१००% मान्य

माणसाला देव बनवू नये, माणूसच राहू द्यावे. नाहीतर असे प्रॉब्लेम होतात.
अगदी १००% मान्य. पण आपल्या चाहत्यांनी आपल्याला "देव" समजावे अशी सचिनची इच्छा/अपेक्षा नसेल कदाचित. पण "इंडियन मेन्टॅलिटी" मध्ये व्यक्तिपूजा, एखादा माणूस चांगला आहे असे वाटले की त्याला भगवंताचा अवतार समजणे अशा गोष्टी आहेतच त्याला सचिन तरी काय करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 11/28/2012 - 13:09

Permalink

असले फोटो माळ घालुन

असले फोटो माळ घालुन Image removed. त्याच्या घरी पाठवुन द्यायला सुरवात करा.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Wed, 11/28/2012 - 13:23

Permalink

काहीही करू नये

सचिनचे काय करावे?
काहीही करू नये.पण आपण मात्र क्रिकेटमध्ये वेळ व्यर्थ न घालवता इतर कामे करावी, हवे तर चित्रपट बघावेत, गाणी ऐकावी आणि अगदी काही नाही तर शांत झोप काढावी. काय म्हणता मंडळी?
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 11/28/2012 - 14:02

In reply to काहीही करू नये by क्लिंटन

Permalink

+१

अगदी...असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 11/28/2012 - 14:41

In reply to काहीही करू नये by क्लिंटन

Permalink

आपण मात्र क्रिकेटमध्ये वेळ

आपण मात्र क्रिकेटमध्ये वेळ व्यर्थ न घालवता इतर कामे करावी
१००+
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/28/2012 - 15:08

Permalink

सचिनने 'ईडन गार्डन्स'वर शतक ठोकून हा विषय "फट्कन" संपवावा!

सचिनने 'ईडन गार्डन्स'वर शतक ठोकून या विषयाला "फट्कन" तिलांजली द्यावी!
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/28/2012 - 15:16

In reply to सचिनने 'ईडन गार्डन्स'वर शतक ठोकून हा विषय "फट्कन" संपवावा! by सुधीर काळे

Permalink

म्हणजे एखाद्या राजकीय पार्टी

म्हणजे एखाद्या राजकीय पार्टी ने ग्रामपंचायतीची निवडणुक जिंकुन पानभर जाहीरात द्यावी ,अन नगरपलिकेत तोंडावर आपटावे तसे
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 11/28/2012 - 15:34

In reply to म्हणजे एखाद्या राजकीय पार्टी by श्री गावसेना प्रमुख

Permalink

@अन नगरपलिकेत तोंडावर आपटावे

@अन नगरपलिकेत तोंडावर आपटावे तसे>>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Fri, 11/30/2012 - 03:16

In reply to सचिनने 'ईडन गार्डन्स'वर शतक ठोकून हा विषय "फट्कन" संपवावा! by सुधीर काळे

Permalink

+१

सहमत! मराठी माणसांनी तरी यावेळी 'आपण तुच्छ नाही आहोत' हे दाखवून द्यावं आणि सचिनला पाठींबा द्यावा. या बातमी नुसार,
रिकी पॉंटिंग निवृत्त झाला, आता सचिन तेंडुलकर कधी निवृत्त होणार, अशी विचारणा क्रिकेट चाहते करीत असतानाच सचिन तेंडुलकरने त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले आहे व त्याने कोलकता कसोटीपूर्वीच्या ब्रेकदरम्यान सराव सुरू केला आहे.
याला म्हणतात जिगर. :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/28/2012 - 15:14

Permalink

हम्म्म

एखादे उखाण्याचे पुस्तक लिहावे किंवा माललेदारांकडे कांदा वैग्रे कापायची जबाबदारी घ्यावी. मामलेदारांच्या पन्ख्याचा एयर कन्डीशनर परा
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Wed, 11/28/2012 - 15:51

Permalink

राहू ल वक्र

सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी म्हणजे कॉंग्रेसचे सचिन तेंडूलकर असे विधान काही दिवसापूर्वी केले आहे. या विधानाचा परिणाम सचिनच्या फलंदाजीवर झाला असेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 11/28/2012 - 16:10

Permalink

घंटा.........................

घंटा.....................................................वाजवावी सिध्दीविनायकाच्या मंदीरात जाऊन.. चांगला फार्म येऊ दे म्हणून साकडे घालावे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Wed, 11/28/2012 - 16:11

Permalink

मुद्रणदोष

वर विषय मध्ये राहु ल वक्र असे लिहिले होते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 11/28/2012 - 17:44

Permalink

श्या !

श्या ! देवा॑ला रिटायर करायचे सोडुन सचिन चे काय मध्येच उपटलंत ... आधी देवाला मग सचिन ई.ई.ई.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 11/29/2012 - 17:50

Permalink

अहाहा. तब्येत खुश झाली.

अरेरे, गरुडाचे पंख गळाले ! मित्रहो, दै. सामनामधील शिरीष कणेकर यांचा लेख वाचला की नाही. मस्त हं.....!!! सुप्पर लाईक. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 11/29/2012 - 21:08

In reply to अहाहा. तब्येत खुश झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अल्टी लेख...

कणेकर हे कणेकर आहेत....... लेखाची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 10/12/2013 - 02:23

In reply to अहाहा. तब्येत खुश झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हा लेख द्वारकानाथ

हा लेख द्वारकानाथ सन्झगीरीन्चा आहे वाटत....
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Sun, 10/13/2013 - 13:33

In reply to अहाहा. तब्येत खुश झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हा घ्या लेख कणेकरांचा

तुम्ही दिलेली लिंक संझगिरींच्या लेखाची आहे कणेकरांच्या नव्हे. http://www.saamana.com/2013/August/29/Link/Main5.htm
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/13/2013 - 15:02

In reply to हा घ्या लेख कणेकरांचा by सुहासदवन

Permalink

मालक

लेख शिरीष कणेकरचाच होता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 11/29/2012 - 19:23

Permalink

देवाला रिटायर का करा?

देवाला रिटायर का करा?
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on गुरुवार, 11/29/2012 - 21:38

Permalink

रिटायर व्हावे

सचिनने आता आपली अजून मानहानी टाळन्यासाठी रिटायरच व्हावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 11/29/2012 - 23:19

Permalink

अभी तो मै जवान हूं

सचिन पुढचा वर्ल्डकपही खेळणार आहे अशी घोषणा त्याने नुकतीच केली होती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 11/30/2012 - 11:37

Permalink

व्वा...

रिकी पाँटींगचं काही तरी ठरलं सचिनचं काय ठरलं म्हणे ? रिकी पाँटींगची कॅप्टन्सी आणि त्याची फलंदाजी आवडायची. संघावर विजयाचं कितीही दडपण असू दे, शांतपणे चिंगम चघळणारा रिकी मला खूपच आवडायचा. पाँटींग शेठ, क्रिकेटचा जेव्हा जेव्हा विषय येईल तेव्हा तेव्हा तुमची आठवण क्रिकेट रसिकांना निश्चितच होइल. आज दैनिकामधे माझ्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे, पण ते मी इतर क्रिकेट सामन्यात तो लुप्त घेईल असे म्हणाल्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला आहे. क्रिकेट चाहत्याकडून तुमच्या दुस-या इनिंगला आमच्या भरभरुन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्तर्यामी on गुरुवार, 12/06/2012 - 15:17

Permalink

विचित्रपना फक्त....

सचिन ला खरच कळायला हवा....
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 10/10/2013 - 17:17

Permalink

अखेर निव्रुत्त.....

देवाने आजच जाहीर केली निव्रुत्ति........२०० वी कसोटी अखेरची........
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 10/10/2013 - 18:04

Permalink

सचिननं काय करावं ?

सचिननं काय करावं ?
ते आपण का सांगावं? तसेही तो रिटायर होणारच आहे आता. एका युगाचा अस्त होणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 10/10/2013 - 18:34

In reply to सचिननं काय करावं ? by बॅटमॅन

Permalink

एका युगाचा अस्त होणार.

येस्स... साला त्या सचिनने खेळणे बंद केले आणि आमचे पण क्रिकेट प्रेम आटले..त्याला निदान १२वा खेळाडू म्हणून तरी ठेवायला हवे होते..(टिपीकल मुंबईकर)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 10/10/2013 - 18:15

Permalink

सुटला

सुटला एकदाचा यांच्या जाचातून. धड खेळूही देत नाही आणि खेळू नकोही म्हणत नाहीत, असे झाले होते त्याचे.
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on गुरुवार, 10/10/2013 - 20:28

Permalink

.

काँग्रेसची खासदारकी करत जीवन जगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 10/11/2013 - 09:09

In reply to . by उद्दाम

Permalink

अर्धवट

अर्धवट ज्ञान असताना प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 10/11/2013 - 09:26

In reply to अर्धवट by कपिलमुनी

Permalink

.

यात अर्धवट काय आहे? तुम्ही ज्ञान द्यावे गुरुवर्य!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com