Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 11/27/2012 - 17:23
नुकतीच मटा मधली बातमी वाचली. सचिनचा एक निस्सीम चाहता म्हणून मनापासून वाईट वाटलं. परंतु कालाय तस्मै नमः...... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17372506.cms ही परिस्थिती आज न उद्या येणारच....तो एक खेळाडू म्हणून महान आहेच पण वयपरत्वे त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. निवृत्त होताना "का?" असे लोकांनी विचारले पाहिजे." का नाही? असे विचारेपर्यंत खेचायला नको....... एकदा असे ऐकले होते की सचिन २०२४ साली धोनी,गंभीर ह्यासारख्या "ज्येष्ठ" खेळाडूंच्या हस्ते वर्ल्ड कप मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार घेऊनच निवृत्त होणार आहे. अतिशयोक्ती सोडली तर तो खरच त्या दिशेने चालतोय असे वाटतंय. तसंही सतत कुठे न कुठे तरी टुकार सामने चालू असल्याने क्रिकेटचं अजीर्ण झालंय .....पहिल्या सारखी शान आणि चुरस राहिली नाही आता......त्याच्या समवयस्कांनी निवृत्ती घेतली किंवा घ्यावी तरी लागली.....सचिन,विचार कर रे बाबा !!
  • Log in or register to post comments
  • 16616 views

प्रतिक्रिया

Submitted by उद्दाम on Fri, 10/11/2013 - 09:27

In reply to . by उद्दाम

Permalink

.

सचिनमुनीनी काय करावे असे आपणास वाटते, तेही लिहावे. आपला नम्र उद्दाममुनी
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 10/11/2013 - 10:12

In reply to . by उद्दाम

Permalink

तेंडूलकर

सचिन हा काँग्रेसचा अधिकृत खासदार नाहिये .. राष्ट्रपती कला , साहित्य , शिक्षण, समाजसेवा, खेळ यांमधून राज्यसभेवर खासदार नियुक्त करू शकतात (बहुधा १२ खासदार) .. त्यामुळे सचिनची निवड काँग्रेसने नाही तर त्याच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेने आणि योगदानामुळे राष्ट्रपती नी केली आहे .. "काँग्रेसची खासदारकी " हेच ते अर्धवट ज्ञान
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 10/11/2013 - 10:17

In reply to तेंडूलकर by कपिलमुनी

Permalink

खिक्

खिक् सुनील (मुनी)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 10/11/2013 - 10:26

In reply to खिक् by सुनील

Permalink

उर्वरीत प्रतिक्रिया

(हास्याचा भर ओसरल्यावर आता ही उर्वरीत प्रतिक्रिया) राष्ट्रपती कुणाचीही "आपणहून" निवड करीत नसतात. निवडलेल्या व्यक्तींची यादी सरकारकडूनच राष्ट्रपतींकडे जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 10/11/2013 - 11:49

In reply to तेंडूलकर by कपिलमुनी

Permalink

.

त्याची आताची खासदारकी काँग्रेसची नाही. पण ती 'काँग्रेसने' नॉमिनेट केलेली होती. हे आपणास माहीत असेलच. कोणत्याही पक्षात नसलेल्या माणसाला खासदारकी मिळाली, तर कालांतराने त्याला कोणत्याही पक्षात प्रवेश करायची मुभा असते. त्यामुळे यापुढील जीवन 'काँग्रेसची खासदारकी करत त्याने आयुष्य कंठावे' असे म्या म्ह्टले, तर यात माझे काय चुकले?
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 10/11/2013 - 12:00

In reply to . by उद्दाम

Permalink

.

सचिनने काँग्रेसात रीतसर प्रवेश करावा, अन मग ती काँग्रेसची खासदारकी भोगत आयुष्य कंठावे, असे मला सुचवायचे आहे. कपिलमुनी, वाक्याचा अर्थ समजून मग लेबलं लावावीत, न्हायतर उगाचच 'मुनी बदनाम हुआ, डार्लिंग तेरे लिये' असे व्हायची वेळ यायची. :)
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिन्कर on Fri, 10/11/2013 - 12:14

In reply to तेंडूलकर by कपिलमुनी

Permalink

राष्ट्रपती आरपीआयचे आहेत का

राष्ट्रपती आरपीआयचे आहेत का काँग्रेसचे.? ते देशाचे आहेत असे' पुस्तकी उत्तर देऊ नका. :-P :-P
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 10/11/2013 - 09:36

In reply to . by उद्दाम

Permalink

खासदार

सचिन गेल्यावर्षी (२०१२) काँग्रेसचा राज्यसभेतील खासदार झाला. अजून ५ वर्षे अजून तो त्या पदावर राहील. पुढे काय? बादवे, "मी आता काय करावे" असा सल्ला सचिनने मिपाकरांकडे कधी मागितला होता काय? (की मिपाकरच आपले चालले सल्ले द्यायला!) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 10/11/2013 - 05:50

Permalink

सचिन ने आता काय करावे

सचिन ने आता काय करावे सर्वात प्रथम अर्जुन नैय्या क्रिकेट विश्वात कशी पार पडेल ह्या बाबत व्यवस्थित फिल्डिंग लावली रोहन च्या डोक्यात निळी टोपी आली तेव्हा कुठे सुनील चा जीव भांड्यात पडला होता
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 10/11/2013 - 09:44

Permalink

सचिन ...एक उघडे पुस्तक एक गूढ

क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे.त्यात रेकॉर्डस करणे याचा मूळ खेळाशी संबंध नाही,मूळ खेळाचा खेळण्याचा आनंद खेळडूना, खेळ पहाण्याचा आनंद प्रेक्षकाना व हार वा जीतचा फैसला असे त्याचे खरे स्वरूप आहे. कोण कोणत्या परिस्थेतीत कसा खेळला व त्या खेळामुळे खेळाचा रंगच पालटला का यावर खेळाडूची महानता ठरते. या निकषांवर सचिन बेस्ट ऑफ ऑल टाईम क्रिकेटर ठरत नाही एवढेच नव्हे तर त्याच्या समकालीन खेळातही तो उच्च ठरत नाही. पण खेळाडू म्हणून त्याचा विचार करण्याची पद्धत, मेहनत, माणूस म्हणून त्याने स्वतः चीच केलेली जडणघडण अलौकिकच आहे. त्याचे क्रिकेटच्या खेळावर जितके प्रेम आहे तितकेच त्याच्यावर लोकानी प्रेम केले याची त्याला पूर्णपणे जाणीव आहे. त्याला मिळालेला अमाप पैसा ही काळाने दिलेली देणगी आहे.खेळाचे स्वरूप त्याला पक्के माहीत असल्याने आपण कदाचित परत पूर्णपणे फॉर्मात येउ शकतो असे वाटत राहिल्याने त्याने निवृती घ्यायला वेळ लावला असेल ही. त्याला काही व्यावसायिक बंधने ही कारणीभूत झाली असतील. सचिन तेडूलकर ही एक महान गाथा आहे यात शंकाच नाही पण खेळ हा खेळाडूपेक्षा मोठा असतो. सचिन नाही म्हणून क्रिकेटची लोकप्रियता काही कमी होणार नाही. कारण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे संघात कामगिरी करण्याची जास्तीत जास्त शक्यता जेवढी क्रिकेटच्या खेळात आहे तेवढी ती इतर कोणत्याही खेळात खचितच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 10/11/2013 - 20:21

Permalink

...

पिळगावकरांच्या सचिनचं काय करायचं !
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Sat, 10/12/2013 - 01:50

In reply to ... by आशु जोग

Permalink

विग काढून घ्यायचा. स्वतःहून

विग काढून घ्यायचा. स्वतःहून लपून बसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/13/2013 - 15:11

Permalink

सचिन आभार रे....!

सचिन निवृत्त झाला, हे एकदाचं बरं झालं. हल्ली, कसली बोगस ब्याटींग करायचा मुझसे तो देखा नही जाता था. शेवटच्या दोन कसोट्यात एकदा त्याला डोळे भरुन पाहुन घेतो. आपण त्याच्या वयाबरोबर वाढलो आणि आमच्या वेळी सच्या काय खेळायचा, हे सांगायला आम्ही मोकळे. आता तो तो कॉमेट्री करेल की, क्रिकेट खेळाडुच्या निवड पॅनलमधे येईल. मला वाटतं क्रिकेटमधे जास्तीत जास्त पैसे जिथे असतील तेच सच्या निवडेल असं वाटतं. पण, निवडू द्या. आपल्याला काय त्याचं. नाय का...? आपण त्याने दिलेल्या आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घेत राहू. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com