चला,उशिरा का होईना,भारत सरकारला एकदाची जाग आली आणि कसाब फासावर लटकला. पण हा खरंच भारताने दहशतवाद्यांना शिकवलेला धडा म्हणावे का? एक कसाब मारायला आपल्या देशाची ४ वर्षे आणि ४० कोटी रुपये खर्ची पडले. असे अनेक कसाब तिकडे पाकिस्तानात दिवसाला १०० पैदा होत आहेत. ते सगळे जर अंदाधुंद सुटले तर ते आपल्याला कितीला पडणार आहे ? आजच पेपरात कै मेजर संदीप उन्नीकृष्णन याच्या वडिलांचे विचार वाचले. ते म्हणतात की दहशतवादी कधीच धडा वगैरे शिकत नसतात. ज्यांचा धर्मच जिहाद आहे त्याला मरणाची भीती वाटतच नसते. आपल्या सहिष्णू सरकारकडे अजून ही अफजल गुरूच्या दयेचा अर्ज प्रलंबित आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे अफजल वाचला आणि अजमल कसाब मेला?
गेल्याच आठवडयात छ शि ट स्थानकात एका मित्राची वाट पाहण्यासाठी १ तास उभं राहण्याचा योग आला होता. सहज म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर सुरक्षा व्यवस्थेचे नेहमी प्रमाणे तीन तेरा वाजलेले होते. स्टेशन परिसरात पोलीस औषधालाही दिसले नाहीत. २-३ होमगार्ड हातात लाठी हे "अत्याधुनिक" शस्त्र घेऊन गस्त घालीत होते. लाखो माणसे स्टेशनात ये जा करत होती. कोणाचे कोणाकडे लक्ष नव्हते. समोर दिसणारी ट्रेन आपल्याला पकडायची आहे ह्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेले लोक सैरावैरा पळत होते. मेटल डिटेक्टर जणू स्टेशनाची शोभा वाढवायला लावल्यासारखे स्तब्ध उभे होते. एखादी घटना घडल्यावर त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आपल्या सरकारचा हात कोणी धरू शकत नाही. पण मुळात कुठल्याही घटनेला आमंत्रणच का द्यायचे? पुन्हा २६/११ ची पुनरावृत्ती घडणारच नाही कशावरून? का येते एवढी शिथिलता आपल्या यंत्रणेत?
आपण सतत आंतरराष्ट्रीय दबाव,अमेरिकेची दडपशाही ह्या कारणांमुळे बोटचेपेपणाचे धोरण अवलंबतो. अमेरिका आपले प्रश्न झटपट सोडवून मोकळी पण होते. ते आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाच्या तोंडाकडे बघत बसत नसतात. तेवढी ताकद आपल्यात पण आहे. परवाच माझ्या वाचनात आले कि भारताने कधीही कोणत्याही देशावर स्वतःहून आक्रमण केलेले नाही. हि बाब अभिमानास्पद म्हणावी की चिंताजनक?
इसापनीतीत वाचलेली एक सापाची कथा ह्याठिकाणी लागू पडते. तो साप अहिंसावादी होता म्हणून रस्त्याच्या कडेला पडून राहायचा. पण म्हणून मग हळू हळू रस्त्यावरची पोरं टोरं सुद्धा त्याची शेपूट धरून त्याला आपटू लागली.एका साधूने त्या सापाला कानमंत्र दिला की अरे असा तू मारून जाशील एक दिवस. तुला लोकांना चावायला आवडत नाही हे काबुल पण म्हणून निदान फुत्कार टाकून स्वसंरक्षण तरी करत जा म्हणजे मग तुझ्या कोणी वाटेला जाणार नाही आणि मग तुला हवे तसे आयुष्य जग. नेमका हाच धडा आपला देश का विसरतो?
वाचने
4268
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरक्षा
कसाब कसाब कसाब कसाब ..टीव्ही
?
परवाच माझ्या वाचनात आले कि
खरे आहे.
In reply to परवाच माझ्या वाचनात आले कि by ऋषिकेश
-१
In reply to खरे आहे. by कलंत्री
अनाकलनीय
काँग्रेस पक्ष हाच जबाबदारीने
In reply to अनाकलनीय by तिमा
असं कोण म्हणतो? सोनिया गांधी?
In reply to अनाकलनीय by तिमा
+१
त्या जबाबदारी ने वागणार्या कॉन्ग्रेस पक्शाची सुरळी करा आणि चुली
नीरक्षीरविवेक
अमेरिका आपले प्रश्न झटपट सोडवून मोकळी पण होते. ते आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाच्या तोंडाकडे बघत बसत नसतात.अहो, चाळीस कोटी तुम्हा आम्हाला खूप आहेत. देशासाठी महत्त्वाच्या घटनांसाठी हा काहीच नाही. अमेरिकेने दहशतवाद्यांना दहशत बसवल्याबद्दल कौतुक उफाळून येताना दिसतं. पण त्यांना ओसामा बिन लादेनला मारायचा खर्च किती आला माहीत आहे का? इराक आणि अफगाणिस्तान युद्धात मिळून ८०,००,०० कोटी रुपये. ऐशी लाख कोटी रुपये! http://costofwar.com/ एवढ्या पैशात किती शाळा, किती हॉस्पिटलं, किती रस्ते, किती नवीन उद्योगधंदे, किती नवीन पॉवर प्लॅंट्स होतील कल्पना आहे का? कोणीतरी श्रीमंत देशाने युद्धासाठी असला खर्च केला म्हणून आपण सुद्धा करायचा का? काहीतरीच आपलं. प्रत्येक गोष्टीविषयी फक्त तक्रार एके तक्रार करण्याऐवजी थोडा नीरक्षीरविवेक बाळगला तर बरं होईल...एखाद्या रडक्या पोराच्या
In reply to नीरक्षीरविवेक by राजेश घासकडवी
८० लाख कोटी खर्च करणे
In reply to नीरक्षीरविवेक by राजेश घासकडवी
http://www.miamiherald.com
In reply to ८० लाख कोटी खर्च करणे by मृत्युन्जय
हल्ले झाले होते, हल्ल्ले होत
आवरा...
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी !!
देश्याच्या नेतृत्वात किलिंग
In reply to आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी !! by माम्लेदारचा पन्खा
देश्याच्या नेतृत्वात किलिंग इंस्टीक्ट यावे अशी प्रामाणिक इच्छा आहे.!! नरेंद्र मोदी नमो नमः !!भांजे दुर्योधन...
छ शि ट स्थानकाची सुरक्षा यंत्रणा