लक्ष लक्ष दिव्यांचा ..............

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जे न देखे रवी...
9 Nov 2012 - 10:14 pm

लक्ष लक्ष दिव्यांचा दिपत्कार घडविणारी दिवाळी,
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी दिवाळी,
मरगळलेल्या थकलेल्या मनाला उल्हासित करणारी दिवाळी,
वर्षभर कामात बुडालेल्या जीवांना सलग सुट्टी देणारी दिवाळी,
कामानिमित्त दूर दूर विखुरलेल्या पिलांना घरट्यात आणणारी दिवाळी,
धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज एकत्र आणणारी दिवाळी,
घनदाट अंधारया रात्रीतील अलौकिक दिपोत्सव म्हणजे दिवाळी,
*************************************************************************
अश्या ह्या अलौकिक दिवाळी/दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
अनिल तापकीर आणि परिवार

कविता