स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी!
निस्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे!
ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले..
माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे..
संतांस काय जाते नीती जपा म्हणाया..
नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे
धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी..
आता मिजास माझी.. तुमची वरात आहे..
--
चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना?
आमीष हाडकाचे.. अन् मी सुखात आहे!
राघव
वाचने
1721
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
राघव साहेब, कविता लय भारि आहे.
वा बुवा वा!
In reply to राघव साहेब, कविता लय भारि आहे. by निश
(No subject)
पहिल कडव थोड वेगळ होत का पहा,
ह्हे ह्हे ह्हे....
छान
ह्म्म