वृत- भुजंगप्रयात
मात्रा- लगागा लगागा लगागा लगागा
नभी चांदण्याची जुनी साथ होती
उशाला कधीची उभी रात होती
जळे जीव कोणी उदासीत येथे
पुकारीत कोणा निशा गात होती
कुणाला कसा सांग आता विसावा
उसासून दु:खे हळू गात होती
मला भासले अंत ना या क्षणाला
पहाटेस ही रोजची रीत होती
कुठे अंत आता अशी रात ओली
पिवोनी उजेडास जागीत होती
क्षणामागुती धावती जीव सारे
इथे शेवटाची सुरुवात होती
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5351
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठे अंत
तेच..
धन्यवाद फुलवाताई...
In reply to तेच.. by पद्मश्री चित्रे
कविता
खास नाही!
वाह
छान
धन्यवाद
छान
पुलेशु... म्
अरे हो की!
In reply to पुलेशु... म् by यशोधरा
चांगली
रचना
खूप सुंदर!