1

मुर्ग माखनी (बटर चिकन)

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
28 Oct 2012 - 12:33 am

.

साहित्य :

मॅरिनेशन :

.

२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
२ चमचे आलं लसुण वाटण.
१ चमचा टॉमेटो पेस्ट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल काश्मिरी तिखट.
एका लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.

.
१/२ ते ३/४ किलो चिकन.

ग्रेव्हीसाठी :

.

दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले.
१०-१२ काजू आणि बदाम भिजवून सोललेले.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा आलं-लसुण वाटण.
बटर / लोणी.
क्रिम.

कृती :

..

चिकनचे एक-दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे. स्वच्छ धुऊन मग त्यात मॅरिनेशनचे पदार्थ टाकुन किमान २ तास फ्रीज मध्ये मुरत ठेवावं.

..

एका कढईत थोड्या बटर वर कांदा आलं लसुण परतुन घ्यावं. कांदा परतल्यावर त्यात गरम मसाला लाल तिखट आणि चवी नुसार मीठ घालुन बाजुने तेल सुटे पर्यंत लहान आचेवर परतुन घ्यावं

.

मसाला गार झाल्यावर तो बदाम आणि काजू सोबत मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा.

..

चिकनचे काही तुकडे स्क्युअरमध्ये ओवून तव्यावर/ग्रीलवर वा ओव्हनमध्ये शि़जवून घ्यावे.

.

उरलेले चिकनचे तुकडे कढईत थोड्या बटरवर (मध्यम आचेवर) शिजवून घ्यावे.

..

अंदाजे १०-१५ मिनीटांनी चिकन शिजले की त्यात वर वाटलेला मसाला टाकुन गरज लागल्यास थोडं पाणी टाकावं. झाकण ठेऊन मध्यम आचेवर एक वाफ काढावी.

.

गरमा-गरम नान / रोटी / पराठ्यासोबत वाढताना वरून थोडं क्रिम टाकुन बटरचा छोटा गोळा सोडावा.

आणि हा तोंडी लावायला चि़कन टीक्का. :) (3D फोटुचा उलुसा प्रयत्न.)
.

प्रतिक्रिया

प्रास's picture

28 Oct 2012 - 1:00 am | प्रास

धागा पाहिल्याची पोच.

Mrunalini's picture

28 Oct 2012 - 1:06 am | Mrunalini

खुपच सही... तोंपासु :)

एस's picture

28 Oct 2012 - 1:42 am | एस

उद्या एक कोंबडं स्वाहा होणार...

बादवे, नदीच्या माशांची एखादी पाकृ टाकाल काय?

मास्यांच डिपार्ट्मेंट जागुतैकडे आहे.
अट्टल मासे खाऊ असलो तरी माझ्याइथे फार लिमिटेड मासे मिळतात, गोड्या पाण्याचे तर नाहीच.

एस's picture

28 Oct 2012 - 11:46 pm | एस

जागुतै, वाचताय ना ? :) रच्याकने, लहानपणी खूप हादडलेत नदीचे मासे. गेले ते दिवस, गेले ते मासे... राहिले ते प्रदूषण...

अश्या पाकृ देत राहिलास तर मी चिकनाहारी होईन.
फोटू, पाकृ भारी.
ही पाकृ चिकन न घालता करता येईल का?

स्वाती दिनेश's picture

28 Oct 2012 - 11:57 am | स्वाती दिनेश

फटू,क्लासच रे..
रेवती, चिकन ऐवजी पनीर किवा बटन मशरुम्स घाल. ग्रेव्ही मसाला तोच ठेव.

गणपा's picture

28 Oct 2012 - 12:28 pm | गणपा

रेवती, चिकन ऐवजी पनीर किवा बटन मशरुम्स घाल. ग्रेव्ही मसाला तोच ठेव.

ऐसाईच बोल्ताय.

पनीर वापरून भाजी केली. छान झाली होती.

कच्ची कैरी's picture

28 Oct 2012 - 7:48 am | कच्ची कैरी

दिल गार्डन गार्डन हो गया !!!!! मस्त !

जाई.'s picture

28 Oct 2012 - 1:45 pm | जाई.

+१

सहमत

दीपा माने's picture

28 Oct 2012 - 8:09 am | दीपा माने

सोप्या रीतीने लिहील्याने करण्याचा उत्साह आलाय.

दीपा माने's picture

28 Oct 2012 - 8:09 am | दीपा माने

सोप्या रीतीने लिहील्याने करण्याचा उत्साह आलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2012 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त......!!!

राही's picture

28 Oct 2012 - 11:57 am | राही

भारीच शिस्तप्रिय बुवा कांद्याच्या चकत्या तुमच्या.तुपात सोडल्यावर सुद्धा कशा निमूटपणे एकामागे एक निपचित पडून राहिल्यात.(की बटर गरम करून थोडेसे थंड झाल्यावर ओळीने रचून ठेवल्या? की आधी रचून ठेवून नंतर लोणी गरम केले? )
पाकृ आणि प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच. म्हणजे मस्तच.
जा.जा.- चिकन श्रेड नाही करायचं का?

काही ठिकाणी चिकन श्रेड केलेलं असतं खरं. पण मी नाही केलं. आपल्या आवडी नुसार बदल केलत तरी चालतील. :)
(हॉटेल मध्ये ग्रेव्ही आणि चिकन वेग वेगळ शिजवतात. ऑर्डर आली की मग एकत्र गरम करुन देतात त्यामुळे चिकनला मसाला नीट लागावा म्हणुन चिकन श्रेड करतात. घरी करताना चिकन ग्रेव्हीतच शिजवल्याने चिकनला मसाला बर्‍यापैकी लागला आणि श्रेड कराय्ची गरज वाटली नाही.)

जा.जा. आधी बटर कढईत सोडलं, मग त्यात आलं-लसणाची पेस्ट टाकली आणी मग कापलेला कांदा जसाच्या तसा उचलुन (परतायच्या आत) फटु काढला. :)

ज्ञानराम's picture

28 Oct 2012 - 12:13 pm | ज्ञानराम

तोंपासू....

पाकॄ पाहून शाकाहार्-व्रताचा अंत पाहिला जात आहे.
बाकी सादरीकरणात दिसून आलेली टापटीप अन सुबक नेटकेपणा आम्हा गृहिणींनाही लाजवणारा आहे !

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2012 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा

गंपा+कोंबडी=मोक्ष.....! (कोंबडीला/खाणार्‍याला-दोघांनाही ;) )

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2012 - 1:16 am | प्रभाकर पेठकर

मस्तं पाककृती.

हॉटेलच्या पाककृतीत रश्श्यात टोमॅटोचे प्रमाण अधिक असते. तसेच तळलेल्या कांद्याची पेस्ट वापरतात. टोमॅटो प्यूरे शिजल्यावर क्रिम टाकतात.

बटरवर परतुन शिजवलेल्या चिकनला बटर चिकन म्हणतात तर चिकनचे तुकडे सळईवर लावून भाजून शिजवल्यावर त्याला चिकिन टिक्का मसाला म्हणतात्.चिकन टिक्का मसाल्यात कसूरी मेथी सुद्धा वापरतात.

बटर चिकिनची चव क्रिमी असते आणि चिकन टिक्का मसालाची चव जरा मसालेदार असते.

स्पंदना's picture

29 Oct 2012 - 8:12 am | स्पंदना

हं!

दिल बटर बटर हो गया। अगर कोई इतनी खुबसुरती से पकाये, तो कोंबडी तो मनसे पकेगी । गणपाभाऽऽय रास्तेसे जपके चलो, मुर्गीया पिच्छु पड जायेगी, हमे भी पकाव करके ।

प्रशांत's picture

29 Oct 2012 - 10:53 am | प्रशांत

+१

मी_आहे_ना's picture

29 Oct 2012 - 10:02 am | मी_आहे_ना

जबरी प्रेझेंटेशन! लाजवाब!!!

Prasik's picture

29 Oct 2012 - 11:49 am | Prasik

Hungry Kya? Yes!

इरसाल's picture

29 Oct 2012 - 2:12 pm | इरसाल

येती दिवाळी संपेपर्यंत श्री.श्री.श्री.१००८-२००९ बल्ल्वाचार्य ग.ण.पा. यांना मिपावर एक अक्षरही लिहीण्यास बंदी घालण्यात येत आहे.
सुचनेचे पालन व्हावे.
व अशा खतरनाक, तोंडाला आणी तोंदाला भरती आणणारे धागे बंद करावेत.
अन्यथा रोज निषेध व्यक्त करुन फेकुन मारला जाईल.

इष्टुर फाकडा's picture

29 Oct 2012 - 3:44 pm | इष्टुर फाकडा

पहिली होती. तिकडे तंदुरी कोंबडी बघायला गेलो होतो. गम्पाभाऊ धन्यवाद! तुमच्या पाकृने आम्हीच काय आमचे दोस्तही लय खुश झाले. थोडे पेयपान झालेले असल्याने लकडी पुलावर तुम्हाला जाहीर आमंत्रण देण्यापर्यंतही काही दोस्त गेले.
आता पुढच्या विकांताला त्यांना मुर्ग माखनी खिलवल्यावर होणार्या परिणामांना तयार राहा इतकेच लिहितो :)

स्मिता.'s picture

29 Oct 2012 - 4:21 pm | स्मिता.

अशक्य टेम्टिंग दिसतंय बटर चिकन. शेव्टचे फोटो बघून खरंच समोर ठेवल्यासारखं वाटतंय. मात्र मला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो म्हणजे कापलेल्या कांद्याचा!

भोसले.अतुल's picture

29 Oct 2012 - 5:22 pm | भोसले.अतुल

सहि आहे.. :)

पैसा's picture

29 Oct 2012 - 8:50 pm | पैसा

एक कोडं आहे. फटु काढताना कसले -बसले हात क्यामेर्‍याला न लावता फटु काढायला कसे काय जमते ब्वॉ!

इरसाल's picture

30 Oct 2012 - 11:05 am | इरसाल

त्यानेही सध्या एक फोटो ग्राफरीण ठेवलीय म्हणे !!!!

पहिला फोटो बघितल्यावर पुढच काही वाचावसं वाटलाच नाही, आत्ता पराठा घेऊन जेवावसं वाटतंय

गवि's picture

30 Oct 2012 - 12:22 pm | गवि

आहाहा..

पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या पुढच्या भारतभेटीत तो कांदा कापण्याचा क्लास तुझ्याकडे लावायचा आहे. लाजवाब.

आणि पाककृतीविषयी तो क्या केहने.. सिर्फ शेफ का नाम काफी है..

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2012 - 2:51 pm | प्रकाश घाटपांडे

डोळ्यावर झापड असताना मूर्ख मागनी बटर चिकन असे वाचले.

गणपा's picture

30 Oct 2012 - 2:53 pm | गणपा

=)) लैच.

वामन देशमुख's picture

31 Oct 2012 - 3:31 pm | वामन देशमुख

सही है भिडू!

विसुनाना's picture

31 Oct 2012 - 3:57 pm | विसुनाना

या पदार्थात कोंब्डीऐवजी पनीरफिनीर किंवा मश्रूमफिश्रूम घालण्याची कल्पनाही सहन होत नाही. ;)

चला... एक अजुन चिकण या मर्त्य जगातुन सुटले एकदाचे ! ;)

जयवी's picture

3 Nov 2012 - 1:32 pm | जयवी

जबरी फोटो आणि कृती. या विकांताला करावंच म्हणतेय कारण तोंडाला सुटलेलं पाणी आवरताच येत नाहीये :)
जियो :)

पाटलांचा मह्या's picture

4 Nov 2012 - 12:11 am | पाटलांचा मह्या

खूप दिवसां पासून शोधत होतो हि रेसिपी. इतक्या सहज पणे आणि सोप्पी करून सांगितलेली हि पाक कृती आवडली.
पुण्यात बाणेर मध्ये शीतल पॅलेस मध्ये एकदम झक्कास मिळते बटर चिकन. गेली ८ वर्षे टेस्ट बदलेली नाहीये.

गणप्या........शेवटी केलंच तू शिकवलेलं चिकन. फेसबुकावर फोटु सुद्धा टाकलाय.
अर्थात तुझ्या चिकन सारखा रंग मात्र आला नाही.
तहे दिल से शुक्रिया :)

"तहे दिलसे शुक्रिया" मंजे कै हो तै?

अविनाशकुलकर्णी's picture

21 Nov 2012 - 8:22 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त..खाव खाव ..................सुटलि

POONAM AMOL PAWAR's picture

23 Nov 2012 - 2:04 pm | POONAM AMOL PAWAR

खुपच टेस्टी

ऋषिकेश's picture

23 Nov 2012 - 3:21 pm | ऋषिकेश

चला पनीर आणायला पळतो :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Nov 2012 - 12:46 am | निनाद मुक्काम प...

चिकन बटर
कॉलेजात आमच्या प्रयोगशाळेत मी बिर्याणी असो किंवा एखादा केक करायचा असो, मी टिवल्या बावल्या करत वेळ काढायचो , टेस्टिंग साठी आलेल्या आमच्या वर्ग शिक्षिकेला शेजारच्या बाकावरील मित्राची रेसिपी बिनदिक्कत द्यायचो.
आता ही सचित्र पाककृती पहिली ( म्हणजे काही दिवस गणपा च्या पाककृती पाहत होती ) आणि आता इतक्या वर्षानंतर कधी नव्हे ते
पाऊले धरती , किचन ची वाट
अशी अवस्था झाली आहे.

आनन्दा's picture

24 Nov 2012 - 7:46 pm | आनन्दा

पण मी सारखे हे "मूर्ख माखनी" च वाचतोय.
बाकी सामिष खात नसल्यामुळे मत देण्यास असमर्थ.

रॉजरमूर's picture

26 Apr 2014 - 6:05 pm | रॉजरमूर

छान पाककृती आणि त्याहीपेक्षा सादरीकरण तर अप्रतिम