साहित्य : मॅरिनेशन :
२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
२ चमचे आलं लसुण वाटण.
१ चमचा टॉमेटो पेस्ट.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल काश्मिरी तिखट.
एका लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.
१/२ ते ३/४ किलो चिकन.
ग्रेव्हीसाठी :
दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले.
१०-१२ काजू आणि बदाम भिजवून सोललेले.
१ मोठा चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा आलं-लसुण वाटण.
बटर / लोणी.
क्रिम.
कृती :
चिकनचे एक-दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे. स्वच्छ धुऊन मग त्यात मॅरिनेशनचे पदार्थ टाकुन किमान २ तास फ्रीज मध्ये मुरत ठेवावं.
एका कढईत थोड्या बटर वर कांदा आलं लसुण परतुन घ्यावं. कांदा परतल्यावर त्यात गरम मसाला लाल तिखट आणि चवी नुसार मीठ घालुन बाजुने तेल सुटे पर्यंत लहान आचेवर परतुन घ्यावं
मसाला गार झाल्यावर तो बदाम आणि काजू सोबत मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा.
चिकनचे काही तुकडे स्क्युअरमध्ये ओवून तव्यावर/ग्रीलवर वा ओव्हनमध्ये शि़जवून घ्यावे.
उरलेले चिकनचे तुकडे कढईत थोड्या बटरवर (मध्यम आचेवर) शिजवून घ्यावे.
अंदाजे १०-१५ मिनीटांनी चिकन शिजले की त्यात वर वाटलेला मसाला टाकुन गरज लागल्यास थोडं पाणी टाकावं. झाकण ठेऊन मध्यम आचेवर एक वाफ काढावी.
गरमा-गरम नान / रोटी / पराठ्यासोबत वाढताना वरून थोडं क्रिम टाकुन बटरचा छोटा गोळा सोडावा.
आणि हा तोंडी लावायला चि़कन टीक्का. :) (3D फोटुचा उलुसा प्रयत्न.)
भारीच शिस्तप्रिय बुवा कांद्याच्या चकत्या तुमच्या.तुपात सोडल्यावर सुद्धा कशा निमूटपणे एकामागे एक निपचित पडून राहिल्यात.(की बटर गरम करून थोडेसे थंड झाल्यावर ओळीने रचून ठेवल्या? की आधी रचून ठेवून नंतर लोणी गरम केले? )
पाकृ आणि प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच. म्हणजे मस्तच.
जा.जा.- चिकन श्रेड नाही करायचं का?
काही ठिकाणी चिकन श्रेड केलेलं असतं खरं. पण मी नाही केलं. आपल्या आवडी नुसार बदल केलत तरी चालतील. :)
(हॉटेल मध्ये ग्रेव्ही आणि चिकन वेग वेगळ शिजवतात. ऑर्डर आली की मग एकत्र गरम करुन देतात त्यामुळे चिकनला मसाला नीट लागावा म्हणुन चिकन श्रेड करतात. घरी करताना चिकन ग्रेव्हीतच शिजवल्याने चिकनला मसाला बर्यापैकी लागला आणि श्रेड कराय्ची गरज वाटली नाही.)
जा.जा. आधी बटर कढईत सोडलं, मग त्यात आलं-लसणाची पेस्ट टाकली आणी मग कापलेला कांदा जसाच्या तसा उचलुन (परतायच्या आत) फटु काढला. :)
मस्तं पाककृती.
हॉटेलच्या पाककृतीत रश्श्यात टोमॅटोचे प्रमाण अधिक असते. तसेच तळलेल्या कांद्याची पेस्ट वापरतात. टोमॅटो प्यूरे शिजल्यावर क्रिम टाकतात.
बटरवर परतुन शिजवलेल्या चिकनला बटर चिकन म्हणतात तर चिकनचे तुकडे सळईवर लावून भाजून शिजवल्यावर त्याला चिकिन टिक्का मसाला म्हणतात्.चिकन टिक्का मसाल्यात कसूरी मेथी सुद्धा वापरतात.
बटर चिकिनची चव क्रिमी असते आणि चिकन टिक्का मसालाची चव जरा मसालेदार असते.
हं!
दिल बटर बटर हो गया। अगर कोई इतनी खुबसुरती से पकाये, तो कोंबडी तो मनसे पकेगी । गणपाभाऽऽय रास्तेसे जपके चलो, मुर्गीया पिच्छु पड जायेगी, हमे भी पकाव करके ।
येती दिवाळी संपेपर्यंत श्री.श्री.श्री.१००८-२००९ बल्ल्वाचार्य ग.ण.पा. यांना मिपावर एक अक्षरही लिहीण्यास बंदी घालण्यात येत आहे.
सुचनेचे पालन व्हावे.
व अशा खतरनाक, तोंडाला आणी तोंदाला भरती आणणारे धागे बंद करावेत.
अन्यथा रोज निषेध व्यक्त करुन फेकुन मारला जाईल.
पहिली होती. तिकडे तंदुरी कोंबडी बघायला गेलो होतो. गम्पाभाऊ धन्यवाद! तुमच्या पाकृने आम्हीच काय आमचे दोस्तही लय खुश झाले. थोडे पेयपान झालेले असल्याने लकडी पुलावर तुम्हाला जाहीर आमंत्रण देण्यापर्यंतही काही दोस्त गेले.
आता पुढच्या विकांताला त्यांना मुर्ग माखनी खिलवल्यावर होणार्या परिणामांना तयार राहा इतकेच लिहितो :)
आहाहा..
पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या पुढच्या भारतभेटीत तो कांदा कापण्याचा क्लास तुझ्याकडे लावायचा आहे. लाजवाब.
आणि पाककृतीविषयी तो क्या केहने.. सिर्फ शेफ का नाम काफी है..
खूप दिवसां पासून शोधत होतो हि रेसिपी. इतक्या सहज पणे आणि सोप्पी करून सांगितलेली हि पाक कृती आवडली.
पुण्यात बाणेर मध्ये शीतल पॅलेस मध्ये एकदम झक्कास मिळते बटर चिकन. गेली ८ वर्षे टेस्ट बदलेली नाहीये.
चिकन बटर
कॉलेजात आमच्या प्रयोगशाळेत मी बिर्याणी असो किंवा एखादा केक करायचा असो, मी टिवल्या बावल्या करत वेळ काढायचो , टेस्टिंग साठी आलेल्या आमच्या वर्ग शिक्षिकेला शेजारच्या बाकावरील मित्राची रेसिपी बिनदिक्कत द्यायचो.
आता ही सचित्र पाककृती पहिली ( म्हणजे काही दिवस गणपा च्या पाककृती पाहत होती ) आणि आता इतक्या वर्षानंतर कधी नव्हे ते
पाऊले धरती , किचन ची वाट
अशी अवस्था झाली आहे.
धागा पाहिल्याची पोच.
खुपच सही... तोंपासु
ओय होय, ओय होय!!!
In reply to ओय होय, ओय होय!!! by एस
मास्यांच डिपार्ट्मेंट
In reply to मास्यांच डिपार्ट्मेंट by गणपा
आभारी आहे...
अश्या पाकृ देत राहिलास तर मी
In reply to अश्या पाकृ देत राहिलास तर मी by रेवती
वॉव!
In reply to वॉव! by स्वाती दिनेश
+१
In reply to +१ by गणपा
पनीर वापरून भाजी केली. छान
:)
In reply to :) by कच्ची कैरी
+१ सहमत
पाकृ आवडली.
पाकृ आवडली.
:)
भारीच
In reply to भारीच by राही
काही ठिकाणी चिकन श्रेड केलेलं
मस्त...
पाकॄ पाहून शाकाहार्-व्रताचा
गंपा+कोंबडी=मोक्ष.....!
बटर चिकन आणि चिकन टिक्का मसाला.
हं!
In reply to हं! by स्पंदना
+१
जबरी
तोपांसु
जाहीर सुचना
खा रे खा वर
क्लास!!
कूल...
लय भारी!
In reply to लय भारी! by पैसा
हुम्म्म
पहिला फोटो बघितल्यावर पुढच
आहाहा..
डोळ्यावर झापड असताना मूर्ख
In reply to डोळ्यावर झापड असताना मूर्ख by प्रकाश घाटपांडे
लैच.
सही है भिडू!
छे छे
चला... एक अजुन चिकण या मर्त्य
जबरी फोटो आणि कृती. या
धन्यवाद
गणप्या........शेवटी केलंच तू
In reply to गणप्या........शेवटी केलंच तू by जयवी
"तहे दिलसे शुक्रिया" मंजे कै
मस्त..खाव खाव ..............
बटर चिकन
चला पनीर आणायला पळतो
चिकन बटर
का माहीत नाही
मस्त पाककृति