Skip to main content

शाही मशरुम मसाला

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 24/10/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य- साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी, ६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर कृती- बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या. टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या. १ कांदा उभा जरा जाडसर चिरा. सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या. पळीभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता. ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल.कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा घाला व परता. मघाचची कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. त्याला एक उकळी आणा. आता चिरलेले मशरुम्स घाला व शिजू द्या.खूप शिजवू नका, मशरुम्स मेण होता कामा नये.हेवी क्रिम घाला.मीठ व साखर घाला. कोथिंबिरीने सजवा. शाही मशरुम मसाला तयार आहे. नान/पराठा/रोटी बरोबर सर्व्ह करा. .

वाचने 38082
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

आहाहा! शाही मश्रुम जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून एखादा केकचा तुकडा मिळणार अश्या दिवास्वप्नात गुंगलो!

वा स्वाती ताई मस्तच... आज संध्याकाळचा हाच मेनु ठरवला होता मी.... आता तुझी पाकृ ट्राय करते... ;)

येक शेंका. बटन मश्रूम टीनमधले वापरले तर चालतील काय? फ्रेश नेहमी मिळतातच असे नाही. पराठा ही तेवढाच टेंप्टींग दिसतोय. त्याची पाकृ कुठाय?

शाही मश्रुम मसाला छानच :)

लै भारी रंग आलाय. काजू क्रीम घालून म्हणजे खराच शाही प्रकार आहे! मस्त! पराठ्याची पाकृ पण दिलीत तर छान होईल!

छान दिसते आहे पण मशरुमला ऑप्शन काय? ते आवडत नाही म्हणून!

मश्रुमची भाजी आपल्याला लयं म्हणजी लयं आवडते ! :) हापिसातल्या मित्रांबरोबर पार्टी-शार्टीला गेल्यावर मश्रुमची भाजी मागवतोच मागवतो. ( मश्रुम सूप प्रेमी) :)

माझी पोर मशरुमची भाजी मागवली म्हणजे नुसते मशरुम-मशरुम खावुन ग्रेव्ही राहु देते वर आणखी,औल चाहिए मछ्लुम. हे चालु असते.

पाकृ.आणि फोटो दोघही छान आहेत पण घरात मश्रूम कुणाला फारसे आवडत नाही म्हणुन मश्रुमवर फार काही प्रयोग करत येत नाही :( पण ही रेसेपी नक्कि ट्राय करुन बघेल

मश्रूमची भाजी मला आवडते. ही पण भाजी नक्की करून बघेन. पराठासुद्धा मस्त दिसतोय. त्याची पाकृ आधी दिली होती का? नसेल तर तीसुद्धा द्या.

मश्रूम मसाला मस्त दिसतो आहे. अशा प्रकारेही करून पाहिला पाहिजे. मश्रूम म्हणजे प्रथिनांचे भांडार. आठवड्यातून एकदा तरी खावेतच. पराठा रेडीमेड (फोजन) दिसतो आहे. (सबब, पाककृती नसावी).

In reply to by प्रभाकर पेठकर

पराठा रेडीमेड (फोजन) दिसतो आहे
मला फ्रोझन म्हणायचे आहे.

स्वाती, सानिका, मृणालिनी, रेवती, अनघा आपटे, अनन्न्या, नूतन, Pearl, स्नेहांकिता, पियुशा वगैरे वगैरे अन्नपूर्णादेवींना, दंडवत, दंडवत, दंडवत... अगदी अस्साच सैपाक करू शकणारी एखादी कन्यका आहे का पाहण्यात? नाही म्हणजे तुमच्या इतके नाही तरी चविष्ट जेवण बनवता आले पाहिजे. नाहीतर एक काम करा. ऑनलाईन क्लासेस घ्या. मी माझ्या सर्व भूपू व सांप्रत मैत्रिणींची नावनोंदणी करवून देतो. मग एक रिअलिटी शो करू. तुम्ही सगळ्या परीक्षिका. जी जिंकेल ती मलाही जिंकेल. काय? हेहेहेहेहे!!! जाऊ दे. स्वयंपाक करता आला पाहिजे ही अट ठेवली तर आजन्म ब्रह्मचारी राहायची पाळी येईल. लेकिन अपुन जब भी लग्न करेंगा तब हर झगडे के बाद मिपा खोलेंगा आउर आप मॅडम्स की पाकृ बायको को दिखायेंगा आउर बोलेंगा, "बघ, बघ जरा... याला म्हणतात स्वयंपाक! नाही तर तू!! तू केलेला हा पेरूचिक्कू वग्रै देशांचा नकाशा तू मला पोळी म्हणून खायला घालतेस?" आउर उसको गप्प करायेंगा. बस उसकू पेठकर काका आउर गणपा जैसे सर्स लोगोंकी पाकृ कभी नही दिखायेंगा. नाहीतर ती मला काकांच्या क्लासला पाठवायची... आणि आपल्या ह्या गंडाबंद शिष्याला शिकवता शिकवता काकांना वाटायचं कुठून झक मारली आणि मिपावर पाकृ टाकली... ;) ;)

In reply to by रेवती

दस्तुरखुद्द रेवतीताईंनी आम्हांला शिष्य करून घेतले आहे. बास्स्स्स... सुरुवात पोळीपासून करू. एकदा पोळीची रेसिपी टाका ना. (नाहीतर मला व्यनि करा. मी माझी पहिली पाकृ म्हणून इथे टाकून देतो. ;) बादवे, आमच्यासारख्या हौशेगवशे आणि नवशिक्या बल्लवविद्यार्थ्यांसाठी मिपावर नवीन शिकाऊपाकृविभाग सुरू करावा अशी मालकांना जोरदार शिफारस करत आहे...)

क्लास! श्या... त्रास आहे नुसता!