साहित्य-
साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी,
६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल,
मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर
कृती-
बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या.
टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या.
१ कांदा उभा जरा जाडसर चिरा.
सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या.
पळीभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता. ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल.कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा घाला व परता. मघाचची कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. त्याला एक उकळी आणा. आता चिरलेले मशरुम्स घाला व शिजू द्या.खूप शिजवू नका, मशरुम्स मेण होता कामा नये.हेवी क्रिम घाला.मीठ व साखर घाला.
कोथिंबिरीने सजवा.
शाही मशरुम मसाला तयार आहे.
नान/पराठा/रोटी बरोबर सर्व्ह करा.

वाचने
38082
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
वा स्वाती ताई मस्तच... आज
येक शेंका.
छानच!
अहाहा!
(No subject)
यम्मी!
पाकृ मस्तच!फोटू भारी!
छान दिसते आहे.
मस्तच.
एकदम पाणी सुटल तोंडाला पाहुनच
मश्रुमची भाजी आपल्याला लयं
लै म्हंजे लै भारी
मस्त
मस्त!
चान चान आहे....
झकास.
फ्रोझन..
In reply to झकास. by प्रभाकर पेठकर
हात्तेचायला कस्लं भारी
दंडवत, दंडवत, दंडवत...
सोप्पय, तुम्हीच शिका स्वयंपाक
In reply to दंडवत, दंडवत, दंडवत... by एस
मला मोक्ष मिळाला...
In reply to सोप्पय, तुम्हीच शिका स्वयंपाक by रेवती
क्लास!
सिंपली सुपर्ब!