✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नृत्य

K
Kavita Mahajan यांनी
Tue, 09/25/2012 - 12:33  ·  लेख
लेख
प्रेमात असलं की आपल्यासोबत आपल्या पावलांखालचा निर्जीव पाचोळादेखील नाचायला लागतो आणि आभाळातला चंद्र जणू फक्त आपल्यासाठीच प्रकाशतो आहे, असं वाटतं. (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
37264 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

छान

इरसाल
Tue, 09/25/2012 - 12:40 नवीन
मस्त आहे चित्र.

वॉव !!

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/25/2012 - 12:42 नवीन
मस्तच आले आहे चित्र. बगळ्याची पिसे मात्र अंमळ खुप झडल्यासारखी वाटत आहेत.

झीरो फिगर बगळा असावा.

नाना चेंगट
Tue, 09/25/2012 - 12:51 नवीन
झीरो फिगर बगळा असावा. आधुनिकोत्तर जीवनशैलीचा प्रभाव बगळ्यावर स्पष्टपणे पडला आहे.
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/25/2012 - 12:58 नवीन
>>झीरो फिगर बगळा असावा. आधुनिकोत्तर जीवनशैलीचा प्रभाव बगळ्यावर स्पष्टपणे पडला आहे. शक्यता नाकारता येत नाही. कदाचित, भावविभोर होऊन नृत्य करण्याच्या आनंदात बगळा आपल्या पिसांची देखील तमा बाळगत नाही हे सुचवायचे असावे असे वाटते.
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

सहमत आहे. अंगावरील कपड्यांची

नाना चेंगट
Tue, 09/25/2012 - 13:02 नवीन
सहमत आहे. अंगावरील कपड्यांची तमा न बाळगणे हे आधुनिकोत्तर जीवनशैलीचे एक वैशिष्ट मानल्यास ही कृती योग्य ठरते. त्याचबरोबर त्याला पूर्ण चंद्राची प्रतिक्षा आहे हे सुद्धा मोठ्या खुबीने दाखवले आहे. प्रेमी जनांसाठी पौर्णिमा आनंदाची असते आणि हा बगळा विरही आहे हे सुद्धा न सांगता तो एकटा आहे यावरुन दिसून येते. त्याबद्दल आपले काय विचार आहेत?
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/25/2012 - 13:28 नवीन
>>अंगावरील कपड्यांची तमा न बाळगणे हे आधुनिकोत्तर जीवनशैलीचे एक वैशिष्ट मानल्यास ही कृती योग्य ठरते. सहमत आहे. आधुनिकोत्तर जीवनशैलीत कपडेच नव्हे, तर संस्कार, श्रद्धा, धर्म, संस्कृती ह्यांची तमा बाळगणे देखील मुर्खपणाचेच लक्षण आहे. >>त्याचबरोबर त्याला पूर्ण चंद्राची प्रतिक्षा आहे हे सुद्धा मोठ्या खुबीने दाखवले आहे. प्रेमी जनांसाठी पौर्णिमा आनंदाची असते आणि हा बगळा विरही आहे हे सुद्धा न सांगता तो एकटा आहे यावरुन दिसून येते. त्याबद्दल आपले काय विचार आहेत? चित्रकाराच्या मनात नक्की काय आहे, हे समजणे महाकठिण काम आहे. आपण फक्त अंदाज लावू शकतो. मात्र 'प्रेमी जनांना पोर्णिमाच आनंदाची असते' ह्या वाक्यावरुन भाऊसाहेबांचा एक शेर आठवला :- शायर सूर्यास म्हणतो- भास्करा येते दया मला तुझी आधीमधी आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी? सूर्य उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते. संपादित.
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

शेराबद्दल वाहवा ! लाजवाब !!

नाना चेंगट
Tue, 09/25/2012 - 13:34 नवीन
शेराबद्दल वाहवा ! लाजवाब !!
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नानांशी शमत

मृत्युन्जय
Tue, 09/25/2012 - 15:23 नवीन
नानांशी शमत
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

पिसे

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 05:16 नवीन
>>> कदाचित, भावविभोर होऊन नृत्य करण्याच्या आनंदात बगळा आपल्या पिसांची देखील तमा बाळगत नाही हे सुचवायचे असावे असे वाटते. --- हा छंद जिवाला लावी पिसे? :)
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>-- हा छंद जिवाला लावी पिसे?

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/28/2012 - 16:37 नवीन
>>-- हा छंद जिवाला लावी पिसे? << पण इथे पिसे लावलेली नाही झडलेली दिसत आहेत.
↩ प्रतिसाद: नंदन

सुंदर आहे ..

गवि
Tue, 09/25/2012 - 12:57 नवीन
वैविध्यपूर्ण रचना सर्वांसमोर ठेवल्याबद्दल आभार. (कविता, चित्र, छायाचित्र्,संगीत, वादन इत्यादि). वेगवेगळ्या फॉर्मॅट्समधे व्यक्त होणं यात वेगळीच मजा आहे. इनफॅक्ट लेखनासोबतच संगीत या दृष्टीनेही कोणी इथे आपल्या गायन / वादनाचे ऑडिओ जोडले तर आनंद होईल.

सुंदर !

मनीषा
Tue, 09/25/2012 - 13:18 नवीन
काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे चित्र खूप छान आहे.

छान !

गणपा
Tue, 09/25/2012 - 13:22 नवीन
या प्रांतातल फार काही कळत अश्यातला भाग नाही त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवर टिपण्णी करण्याचे तज्ञांवर सोडतो. पण माझ्या डोळ्यांना भावलं हे चित्र.

गंपाशी शमत.

मृत्युन्जय
Tue, 09/25/2012 - 15:22 नवीन
गंपाशी शमत.
↩ प्रतिसाद: गणपा

सुंदर चित्र आहे.

प्रचेतस
Tue, 09/25/2012 - 13:28 नवीन
सुंदर चित्र आहे. पण चंद्र मात्र निळसर छटेत रंगवल्यामुळे बगळा चंद्रावर उभा असून पृथ्वीकडे बघत नृत्यमग्न झाला आहे असे भासते.

इऽग्रेट!

सहज
Tue, 09/25/2012 - 13:40 नवीन
. . सुरेख!! एक चारोळी सुचली बगळा बगळा नाही कावळा इग्रेट इग्रेट तूच बर ग्रेट! आता प्रेमात पडल्यावर 'कोणताही बगळा' धुंद होउन नृत्य करु लागतो. पहा एक ग्रेट व्हिडीओ - जब से हुई है मुहोब्बत!!

सहजराव चारोळी ग्रेटच.

गणपा
Tue, 09/25/2012 - 13:49 नवीन
सहजराव चारोळी ग्रेटच. पण तो इडो ही उच्च आहे. =)) पुनश्च्न आनंद घेतला.
↩ प्रतिसाद: सहज

बरे आहे

तर्री
Tue, 09/25/2012 - 14:16 नवीन
बगळ्याचे पाय करकट सारखे दिसत आहेत. चंद्र "बगळ्यावर " फोकस" मारून राहिला आहे असे दिसते आहे. बगळ्याचे पंख असे असतात का ? रारंग मारलेले साळींदर चे काटे वाटले. पाय / पंख पाहून बगळा नाचतो आहे असे वाटले तरी मान पाहून बगळा ध्यान मग्न आहे असे भासले. पंचनामा पुरे.

वरील चित्राततल्या पक्ष्याचा

मृगनयनी
Wed, 09/26/2012 - 14:27 नवीन
वरील चित्राततल्या पक्ष्याचा वरचा पोर्शन हा बगळ्यासारखा वाटतो.. तर खालचा पिसे आणि इतर पोर्शन हा पांढर्‍या मोरासारखा भासतो.. पांढरा मोर मी पूर्वी पेशवे पार्क'मध्ये पाहिलेला आहे. बाकी चंद्राचा आकार एकतर पौर्णिमेच्या चंद्रासारखा तरी हवा होता किन्वा मग प्रॉपर चन्द्रकोरीसारखा तरी हवा होता... वरील चन्द्राचा आकार भारतात पाहिल्याचे तरी आठवत नाही. चन्द्राचा बगळ्यावर पडलेला प्रकाश उत्तमरीत्या प्रदर्शित केलेला आहे.
↩ प्रतिसाद: तर्री

हम्म....

दादा कोंडके
Wed, 09/26/2012 - 15:53 नवीन
"वरील चन्द्राचा आकार भारतात पाहिल्याचे तरी आठवत नाही." आठवीच्या भुगोलाच्या पुस्तकावर असंच चंद्राचं चित्र पाहिल्याचं स्मरते. बाकी तो बगळ्याची बगळीशी प्रणय केल्यामुळे झटापटीत अंगावरची पिसं विस्कटलेली आहेत असं मला वाटतं. ;) थोडीशी फ्रेम एक्सपँड करून बगळीलासुद्धा दाखवल्यास उत्तम.
↩ प्रतिसाद: मृगनयनी

अहाहा, प्रतिसाद.

प्रभाकर पेठकर
Tue, 09/25/2012 - 15:04 नवीन
तैलचित्रापेक्षा वाचकांचे विश्लेषणात्मक कल्पनाविलासी प्रतिसादी नृत्य जास्त मनोरंजक, भावविभोर आणि नेत्रसुखद आहे.

+१

सुहास..
Tue, 09/25/2012 - 15:26 नवीन
पेठकरकाकांशी सहमत आहे !
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१० पेठकरकाका.

सस्नेह
Wed, 09/26/2012 - 14:19 नवीन
धागा उघडून निरखून 'छान आहे' म्हणून बंद करणार होते. सहज माऊस खाली घसरला अन प्रतिसाद दिसले. ग्रेट नृत्य पहायला (वाचायला ?) मिळाले.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चला पार्टटाईम बॉलर भेटला आणि

५० फक्त
Tue, 09/25/2012 - 15:21 नवीन
चला पार्टटाईम बॉलर भेटला आणि तो ही पॉवर प्ले मध्ये,

वाचनखूण साठवायला हवी.

कवितानागेश
Tue, 09/25/2012 - 15:49 नवीन
वाचनखूण साठवायला हवी. :)

लाजवाब..

डावखुरा
Wed, 09/26/2012 - 13:15 नवीन
.

कागदावर लावलेले रंग म्हणून

यकु
Wed, 09/26/2012 - 14:46 नवीन
कागदावर लावलेले रंग म्हणून चित्र ठिकच. पण कल्पना म्हणून त्यात जान वाटत नाही. का? कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - हे. पण चित्रात बगळा आहे. शिवाय बगळा प्रेमात चंद्राकडे बघून नाचतो असं कुठंही ऐकलेलं नाही. चकोर कसा असतो ते माहित नाही, किमान राजहंस जमून गेला असता, पण तो असला की मानससरोवर आलंच आणि भलत्या भानगडी. ( काल्पनिक ) यकु

फटाक्यांची माळ

स्पा
Wed, 09/26/2012 - 15:55 नवीन
मला असे जाणवत आहे कि. गावातल्या काही व्रात्य पोरांनी दिवाळीच्या दिवशी.. त्या बगळ्याच्या मागे फटाक्यांची माळ लावून त्याचा बाजार उठीवला आहे

ठ्ठॉ..

मृगनयनी
Wed, 09/26/2012 - 16:46 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) स्पावड्या.... धन्य आहेस तू! .. _/\_ एखाद्याला किती छळायचं रे!!!! ;) ;)
↩ प्रतिसाद: स्पा

काहीही काय..

किसन शिंदे
Wed, 09/26/2012 - 16:56 नवीन
>>>>गावातल्या काही व्रात्य पोरांनी दिवाळीच्या दिवशी.. त्या बगळ्याच्या मागे फटाक्यांची माळ लावून त्याचा बाजार उठीवला आहे जरा तर्कात बसणारे प्रतिसाद देत चला स्पाशेठ! दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवस असते मग त्या दिवसात असा चंद्र आकाशात दिसणे कसा शक्य आहे? उगाच आपलं काहितरी
↩ प्रतिसाद: स्पा

शक्तिमान

स्पा
Wed, 09/26/2012 - 16:58 नवीन
सोर्री शक्तिमान चूक झाली .. दिवाळी शब्द काढून टाका हवतर :)
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

देवदिवाळी

सूड
Wed, 09/26/2012 - 17:00 नवीन
त्याला देवदिवाळी म्हणायचं असेल कदाचित !! ;)
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

किसनदेवा

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/26/2012 - 17:21 नवीन
>>दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवस असते मग त्या दिवसात असा चंद्र आकाशात दिसणे कसा शक्य आहे? गावातल्या काही व्रात्य पोरांनी दिवाळीच्या दिवशी.. त्या बगळ्याच्या 'मागे' पेट्रोल लावून त्याचा बाजार उठीवला आहे. हा बदल कसा वाटतोय? :P
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

स्पावड्या कुणाची अशी थट्टा

पियुशा
Wed, 09/26/2012 - 16:31 नवीन
स्पावड्या कुणाची अशी थट्टा करु नये :) शाना मुग्गा आहेस ना तु ;)

तुम्हीच एक हव्या होत्या

५० फक्त
Wed, 09/26/2012 - 17:24 नवीन
तुम्हीच एक हव्या होत्या सटरेफिकिट द्यायला मा.स्पाजींच्या शहाणपणाचं, ती कसर देखील पुर्ण झाली. धन्यवाद. अवांतर - खरंतर मा.स्पाजी म्हणतात तसं होण्यापेक्षा तो बगळा उडता उडता चंद्राकडं पाहायच्या नादात विजेच्या तारात अडकला असेल अन त्याची पिसं जळाली असतील असं देखील झालेलं असेल. काय सांगता येत नाही.
↩ प्रतिसाद: पियुशा

पक्ष्यांना विजेच्या तारांचा

गणपा
Wed, 09/26/2012 - 17:50 नवीन
पक्ष्यांना विजेच्या तारांचा झटका लागतो ही नवी माहिती मिळाली. ;)
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चला काहितरी नविन झालं, अन

५० फक्त
Wed, 09/26/2012 - 22:54 नवीन
चला काहितरी नविन झालं, अन वाद नाही त्यावर उत्तम.
↩ प्रतिसाद: गणपा

बगळ्याच्या शेड्स छान वाटतायत.

सौरभ उप्स
Wed, 09/26/2012 - 16:44 नवीन
बगळ्याच्या शेड्स छान वाटतायत... मात्र वल्ली शी सहमत राव त्या चंद्रामुळे मजा जातेय सगळी, दोघांची रंगसंगती एकच असल्याने flat झालय चित्र, चंद्र जरा लांब आकाशात ढगानसमवेत फक्त अस्तित्वासाठी दाखवला असतात तर जरा डेप्थ आली असती अजून... अवांतर :- राव असे प्रतिसाद यायला लागले तर बगला पळून जाईल कि हो घाबरून... जरा त्याच्या मनाचा तरी विचार करा (खिक)

>>>>अवांतर :- राव असे

किसन शिंदे
Wed, 09/26/2012 - 17:00 नवीन
>>>>अवांतर :- राव असे प्रतिसाद यायला लागले तर बगला पळून जाईल कि हो घाबरून... जरा त्याच्या मनाचा तरी विचार करा (खिक) खर्रे??
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

@ सौरभ.. बहुधा त्या

मृगनयनी
Wed, 09/26/2012 - 22:47 नवीन
@ सौरभ.. बहुधा त्या चन्द्राच्या आकारावरून असे वाटते,की... चन्द्राला ग्रहण लागलेले असावे... आणि तो बगळासदृश पक्षी त्या चन्द्राला नुसत्या डोळ्यान्नी पाहत असल्याने त्या ग्रहणाचा परिणाम बगळ्यासद्र्रुश पक्ष्याच्या मागच्या सेन्सीटीव्ह पिसांवर झालेला असावा.. व त्याची काही पिसे झडली असावीत.. :)
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

अगदी खर्रे.....

सौरभ उप्स
Wed, 09/26/2012 - 17:03 नवीन
अगदी खर्रे.....

अतिपरिचयाद्

धनंजय
Wed, 09/26/2012 - 23:14 नवीन
अवज्ञा. नवमीपर्यंत चंद्राची नवलाई राहात नाही. आणि बगळे रंगीबेरंगी पाचोळा उडवण्यात धुंद होतात.

क्या बात है!

विसुनाना
गुरुवार, 09/27/2012 - 12:02 नवीन
अत्यंत मार्मिक प्रतिसाद. १०१% गुण... असे होते खरे.. अवांतर : मला हे चित्र चांगले वाटले..
↩ प्रतिसाद: धनंजय

बॅलेरिना

पैसा
Wed, 09/26/2012 - 23:25 नवीन
बगळयाला पाहून एखाद्या बॅलेरिनाची आठवण झाली. बगळ्याच्या हालचालीत तोच डौल आहे.

छान

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 05:19 नवीन
चित्र आवडले. मूनस्ट्रक ह्या शब्दाची आठवण करून देणारे.

'टॉम' चा कंगवा?

सर्वसाक्षी
गुरुवार, 09/27/2012 - 10:20 नवीन
बगळ्याची पीसे पाहता मला टॉम अँड जेरी मधल्या टॉम ची आठवण झाली. एका प्रसंगात टॉम कचर्‍याचा डबा ढांडूळत असता त्याला माशाचा सांगाडा सापडतो, टॉम तत्परतेने तो उचलतो व त्याचा कंगवा करुन भांग पाडतो.

@ मृगनयनी, मला अस काहीही वाटत

सौरभ उप्स
गुरुवार, 09/27/2012 - 11:18 नवीन
@ मृगनयनी, मला अस काहीही वाटत नाही त्या चित्राकडे बघताना, ती पीस उडताना दाखवली गेली आहेत कारण तो बगळा नाचतोय तर त्याची मोशन दिसावी म्हणून दाखवली असावीत अस माझा अंदाज आहे... ग्रहणाचा पिसांवर परिणाम झाला असेल अस काही नाही हो..... आणि चित्र अजून चांगल दिसावं म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात रिअल गोष्टी दाखवण्यापेक्षा अस मला वाटत, म्हणून मी काही गोष्टी सजेस्ट केल्या ... ग्रहण दाखवायचाच असेल तर ते पर्स्पेक्टिव मध्ये हि ग्रहणाचा चंद्र दाखवता येईल कि..

अप्रतिम!

साती
गुरुवार, 09/27/2012 - 11:26 नवीन
मस्तच आहे चित्र. रंगही छान आहे. तुम्हाला ते 'शीरसी मा लिख' माहित असेल असे वाटते. वरिल नकारार्थी प्रतिसादांना जास्त महत्त्व देवू नये. कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत. मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. ;)

हं!

श्रावण मोडक
गुरुवार, 09/27/2012 - 12:58 नवीन
>>मस्तच आहे चित्र. >>रंगही छान आहे. सहमत! >>तुम्हाला ते 'शीरसी मा लिख' माहित असेल असे वाटते. वरिल नकारार्थी प्रतिसादांना जास्त महत्त्व देवू नये. कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत. पुन्हा सहमत!! >>मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. आता मात्र असहमत!!!
↩ प्रतिसाद: साती

पाण्यात राहून.

साती
गुरुवार, 09/27/2012 - 23:08 नवीन
श्रा मो एकदम फॉर्ममध्ये हं! पाण्यात राहून माशांशी वैर वैगेरे वैगेरे! बाकी मी इथे बर्याच दिवसानी आल्याने महाजन बाईंनी इथल्या माशांचं काय बिघडवलंय ते मला माहिती नाही ;)
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा