अरे संस्कार,संस्कार

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
24 Jun 2008 - 8:52 am

"अमेरिकेत प्रथमच येणाऱ्यानी आपले जूने संस्कार विसरूं नयेत, तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपली सुधारणा करून रहावं.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच पंचाईत करून घेतो.याची नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही."
असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.
मी त्याना म्हणालो,
" हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र आहे.संस्कार म्हटलंत तर "तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा"हेच इकडचे संस्कार आहेत"कसले संस्कार घेऊन बसलात?"
थोडसं नाराज होवून मला महणाले,
"सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का? अरे संसार संसार. तिने कसा तिच्या कवितेत उपदेश केला आहे तसा ह्या विषयावर तुम्ही एक कविता लिहा"
मी ती काविता अशी लिहिली.

अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!

अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!

अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!

अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!

अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!

अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

वैशाली हसमनीस's picture

24 Jun 2008 - 2:43 pm | वैशाली हसमनीस

परदेशात राहत असताना आपण दिलेला सल्ला योग्यच आहे.कविता आवड्ली.

II राजे II's picture

24 Jun 2008 - 2:52 pm | II राजे II (not verified)

मस्त जमली आहे कविता !!!
बस जे खटकले ते खाली आहे...

*******

अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये

हॉटडॉग व बर्गर ने संस्कार व संकृती कशी बिघडते हे समजवाल का पहील्यांदा ??? का खाऊ नये ?

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

श्रीकृष्ण सामंत's picture

24 Jun 2008 - 10:47 pm | श्रीकृष्ण सामंत

राजेसाहेब,
त्याचं असं आहे,प्रो.देसाई म्हणत,
"अहो हॉटडॉग डुकराच्या मांसाचा खिमा करून त्याची गोल नळी बनवून आणखी काही काही घालून चविष्ट होण्यासाठी बनवतात असं मी ऐकलंय.
तसंच बरगर हा गाईच्या मांसाचे लगदे-स्लाईसिस-काढून त्यात आणखीन काही घालून चविष्ट होण्यासाठी बनवतात.
असं मी ऐकलंय.
डुक्कर सोडाच पण गाय ही आपल दैवत असं आपण मानतो आपण भारतात गाईचं मांस कधी शिजवून खातो का? मग इकडे येवून ते मांस खाऊन अशी विटंबना नुकतेच तिकडून आलेले लोक कशी करून घेतात? तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा! पण आपल्या लहान लहान मुलांवर हे कसले खाण्याचे संस्कार हे आईवडील करूं देतात.आपला पिंड असलं मांस खाण्याचा नाही.कोलन कॅनसर सारखे रोग ह्या चार पायांच्या जनावरांच मांस खावून होतात हे ह्या इकडच्या लोकाना आता कळून आलं आहे.आपली फार जूनी संस्कृती आहे.गाई-म्हशीचं मांस आपण खातो का?
आता हा सगळा वादाचा प्रश्न आहे.संस्कार,संस्कृती सब झूट आहे.असं म्हणून लोक आपल्याला हवं ते करीत असतील त्याला काय करणार?माझा कवितेत विचार मांडा एव्हडंच"
राजेसाहेब,
बुद्धिबळा बद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे ते मला जरा विस्ताराने कळवलं तर बरं होईल

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

शितल's picture

24 Jun 2008 - 7:13 pm | शितल

छान विडबन जमले आहे.

विश्वजीत's picture

24 Jun 2008 - 9:00 pm | विश्वजीत

छान छान.

पक्या's picture

25 Jun 2008 - 8:35 am | पक्या

>>डुक्कर सोडाच पण गाय ही आपल दैवत असं आपण मानतो आपण भारतात गाईचं मांस कधी शिजवून खातो का? मग इकडे येवून ते मांस खाऊन अशी विटंबना नुकतेच तिकडून आलेले लोक कशी करून घेतात? तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा!

फक्त गायीतच का? माझ्या मते कोंबडी , डुक्कर ....सर्व प्राणीमात्रात देव वसलेला आहे. भगवंताचा पहिला अवतार तर मत्स्य होता. (वराह अवतार ही होताच की .) हे तत्व मानायचे असेल तर कुठलाच प्राणी खाऊ नये आणि नसेल मानायचे तर कुठलाही प्राणी खा. हा ज्याचा त्याचाच प्रश्न आहे.

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 11:13 am | विसोबा खेचर

अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये

वा! क्या बत है....