गुबगुबीत कुशन, गुलाबी रंग, आरसा..! :)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नुकतेच मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील एका लोकल गाडीमध्ये काही सुखावणारे बदल केले आहेत. सदर लोकलमधील दुसर्या वर्गातही आता कडक लाकडी बाके जाऊन छान छान मऊ मऊ कुशन असलेली बाकडे बसवली आहेत. आर्थिक परिस्थिती नसली तरी दुसर्या वर्गातील लोकांनाही पहिल्या वर्गातील लोकांप्रमाणे पार्श्वभाग असतो आणि कुशनवाल्या बाकड्यांमुळे तो सुखावू शकतो, हे रेल्वे व्यवस्थापनाला जाणवले हे फार बरे झाले.. :)
त्याचप्रमाणे महिलांच्या डब्यात आता आरसे बसवण्यात आले आहेत. निसर्गतःच महिलांना वारंवार आरशात बघून आपला चेहरा ठाकठीक करण्याची सवय असते, असा बहुधा रेल्वे व्यवस्थापनाचा कयास असावा आणि म्हणूनच रेल्वेने आता लोकलच्या महिलांच्या डब्यात आरसे बसवले असावेत... :)
यापुढे महिलांच्या डब्याचा रंग गुलाबी असणार आहे. या बाबतीत मात्र नेमकी गुलाबी रंगाची निवड करून मध्यरेल्वेच्या अधिकार्यांनी अंमळ रसिकता दाखवली आहे असे म्हणावे लागेल. मात्र त्या गुलाबी रंगाकडे आकर्षित होऊन महिलांच्या डब्यात घुसणार्या काही कंटकांच्या संख्येत वाढ होऊ नये अशी मात्र अपेक्षा आहे.. :)
असो..
मध्यरेल्वेने केलेले हे बदल स्वागतार्हच म्हणता येतील. लवकरच मुंबई उपनगरीय सर्व लोकल गाड्यांमध्ये हा बदल बघावयास मिळावा अशी अपेक्षा..
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
मुळात गुलाबी=बायकी हे
छानच प्रतिसाद, आभारी आहे..
हे स.स.करण अमेरिकन असावं.
हम्म अगदी शक्य आहे. एकदा
रेल्वे ने त्यांच्या
वाह !
प्रतिसाद Like करत आहे..
इणत्या का रे? तोच रे तोच
वा
(First आणि Second मध्ये काहीच
गुबगुबीत कुशन? म्हणजे त्याला