हर देशीही तू, हर वेशीही तू

नरेंद्र गोळे जे न देखे रवी...
हर देशीही तू, हर वेशीही तू रूपात हरेक, असशी परी तू तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी खेळांतही तू, मेळांतही तू सागरी उठशी, मेघांतूनी तू पर्जन्य होशी, जल होऊन तू मग निर्झर, ओढा, नदी होशी प्रकार अनेक, जलाशय तू घडला मातीतुनी, अणुरेणू रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू पर्वत कधी, विशाल तरूही तू कौतूक तुझे, सत्‌ एकची तू दाविशी दिव्य, जरी हे तू गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू तुकड्या सांगे, परका न कुणी एकच सगळे जण, मी आणि तू
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

1 टिप्पण्या 1,076 दृश्ये

Comments