चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे )
रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली
या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे.
या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही :(
सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून
"कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्यांचा स्वभाव एकमेकांना कळावा म्हणून एका छानशा रिसॉर्ट मधे ठेवतात( त्यांच्या वर लक्ष ठेवायला आई - बाप पण
आहेत बरं का.) :B म्हणजे एकप्रकारे रिऍलीटी शो
मग त्यानंतर त्या पाच जोडयांचे एकमेकावरील आरोप प्रत्यारोप, एकमेकांचे विचार ,मधेच मुख्य हीरॉईन हीचं पूर्व प्रेम प्रकरण,
कुमारी-माता प्रकरण आणि या बाबतीत सगळ्यांचे तसेच त्यांच्या आई-बाबांचे थोर थोर विचार ऐकून आपल्या डोक्याचे उगाचच
कांदे-पोहे होतात ~X(
त्यामुळे ह्या चित्रपटाबद्द्ल मी माझं मत सांगेन की आपापल्या जबाबदारीवर " सनई चौघडे " बघायला जा ;) 8}
चित्रपटभर सुनीधी चौहान यांचे कांदे SSS पोहे SSS हे र्शीषक गीत सारखं सारखं ऐकून आपल्या कानाचे पडदे शाबूत राहील्याबद्द्ल
देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. :)
( वि. सु. आपली कोणाशी दुश्मनी असेल किंवा जुनी खुन्नस काढायची असेल तर त्यांना या चित्रपटाचे फुकट तिकीट द्या.) =))
वाचने
4674
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार त्रोटक
धन्यवाद
हेच म्हणतो..
In reply to धन्यवाद by आनंदयात्री
सविस्तर परिक्षण ...
What starts as a simple
In reply to सविस्तर परिक्षण ... by अभिरत भिरभि-या
सुनीधी चौहान यांचे र्शीषक गीत