आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - ३) (समाप्त)

Primary tabs

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
20 Jul 2012 - 2:50 am

आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - १)
आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - २)

>>>२६ मे २००६ ला आर्सेलरने "सेव्हरस्टाल" बरोबर मर्जर ची घोषणा केली.
मित्तल स्टील साठी हा मोठा धक्का होता. इतके सारे प्रयत्न वाया गेल्यामुळे सगळेच जण सुन्न झाले. मित्तल स्टील ला पुढे अंधार दिसत होता.
चार महिने सर्व शक्तीनीशी लढलेल्या लढाईत त्यांच्या समोर दुसरेच कोणीतरी जिंकत होते...

स्वतः लक्ष्मी मित्तल, आदित्य, या डील वर काम करणारा 'कोअर ग्रूप', विविध क्षेत्रातले सल्लागार आणि तज्ञ सगळेच जण निराश झाले. नक्की कोणत्या गोष्टीमुळे अचानक सगळ्या गोष्टी बदलल्या याचा विचार सुरू झाला. या डीलसाठी वेगवेगळ्या कामात गुंतलेले व देशोदेशी विखुरलेले सगळे मॅनेजर्स एकत्र आले आणि अत्यंत वाईट मनस्थितीत मीटींग सुरू झाली..

आर्सेलरमध्येही त्याच वेळी एक भव्य मीटींग सुरू झाली. 'सेव्हरस्टाल' चा सर्वेसर्वा अलेक्सी मॉरडॅशॉव पहिल्यांदाच आर्सेलर च्या मीटींगमध्ये सहभागी होत होता. आर्सेलर मॅनेजमेंट सगळ्यांना धन्यवाद देत होते, आभार मानत होते. आपले अस्तीत्व जपल्याच्या, स्वत:चे नाव शाबूत ठेवल्याच्या आणि एक होस्टाईल बीड परतावून लावल्याच्या आनंदात सर्वजण मश्गूल झाले होते. स्वतःची पाठ थोपटून घेण्याची स्पर्धा सुरू झाली.

'आर्सेलर सेव्हरस्टाल' फ्रेंडली मर्जर ची इत्यंभूत माहिती मिळताच मित्तल स्टील आणि शेअरहोल्डर्स हादरून गेले. मित्तल स्टीलने दिलेली ऑफर सर्वच पातळ्यांवर सेव्हरस्टाल पेक्षा वरचढ होती तरीही आर्सेलरने सेव्हरस्टाल बरोबर हात मिळवावेत हे कुणालाच पटले नव्हते.
सेव्हरस्टाल बरोबरची डील आर्सेलरला कधीही फायदेशीर ठरणार नव्हती.

मित्तल आणि टीम याच क्षणाची वाट बघत होते.

इन्व्हेस्ट्मेंट बँकर्स, कम्युनीकेशन टीम, PR टीम सगळे जण कामाला लागले.
'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील आणि 'मित्तल आर्सेलर' डील मधला फरक, त्याचे स्टील उद्योग आणि युरोपीयन मार्केटवर होणारे दूरगामी परीणाम सगळीकडे झळकू लागले. आर्सेलरच्या इन्व्हेस्टर्स आणि शेअरहोल्डर्सचे फोन खणखणू लागले, मोबाईल गुणगुणू लागले आणि मेलबॉक्स भरून वाहू लागले. संपर्काचे एकही साधन शिल्लक न ठेवता मित्तल स्टीलचे वेगवेगळे टीम मेंबर्स बेगुमानपणे व अत्यंत सावधपणे हे सगळे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी मांडत होते. मित्तल स्टीलच्या बाजूने शेअरहोल्डर्सचे पारडे झुकू लागले.
ज्यांचे आर्सेलरमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत अशा काही खास शेअरहोल्डर्सना लक्ष्मी मित्तल स्वत: भेटून परिस्थीती विषद करत होते व त्यांचे मत मित्तल स्टीलच्या बाजूने वळवून घेत होते.
केवळ ४ ते ५ दिवसातच आर्सेलरच्या ३० % ते ३५ % शेअरहोल्डर्सना आपल्याकडे वळवून घेण्यात मित्तल स्टील यशस्वी झाले आणि आर्सेलर मॅनेजमेंट च्या पायाखालची जमीन सरकू लागली.

या सर्व घडामोडींवर युरोपीयन कमीशनर्स व रेग्यूलेटर्स खूप बारकाईने लक्ष ठेवून होते. विविध उद्योगांमध्ये युरोपचे रशीयावर असलेले अवलंबीत्व त्यांच्या चिंतेचा विषय होता. त्यात स्टील उद्योगाची भर पडू देणे युरोपीयन उद्योगांना परवडणारे नव्हते.

यादरम्यान मित्तल स्टीलच्या ऑफरला युरोपीयन कमीशनर्सनी हिरवा झेंडा दाखवला आणि मित्तल टीमचे मनोधैर्य आणखी उंचावले.

या परिस्थीतीत शेवटचा वार केला भारतीय सरकारने.
फेब्रुवारी २००६ मध्ये ज्यावेळी फ्रेंच राष्ट्रपती जॅक शिराक भारतभेटीवर आले होते त्यावेळी मित्तलनी होस्टाईल बीड ची घोषणा करून जवळ जवळ महिना होत आला होता. 'भारतीयत्वाच्या' मुद्द्यावरून युरोपीयन देशांचा या डीलला असलेल्या विरोध आणि पक्षपातीपणा विरूध्द भारतीय पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने निषेध नोंदवला होता..
तोच धागा पकडून भारताच्या वाणिज्य मंत्र्यांनी (कमल नाथ) 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील वर आणि त्यावर असलेली युरोपीयन देशांची दुटप्पी भूमीका यावर कडक शब्दात ताशेरे ओढले, वर्णभेदाचा निषेध म्हणून अप्रत्यक्षपणे "कॉमर्स वॉर" ची घोषणा केली.

तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून आर्सेलर मॅनेजमेंटने आपले मत रेटून नेत 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील वर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला.
आर्सेलरचे शेअरहोल्डर्स, कामगार संघटना, इन्व्हेस्टर्स (ज्यामध्ये व्यक्तींबरोबर कांही देशांचाही समावेश होता) आणि ते सर्व देश ज्यांचा आर्सेलरच्या डोक्यावर हात होता त्यांना हा निर्णय पटणे शक्यच नव्हते.
'शेअरहोल्डर्स चे हित जपले जात नाहीये' या कारणाने शेअरहोल्डर्सच्या प्रतिनिधींनी आर्सेलर मॅनेजमेंटला खडसावले.
युरोपीयन कमीशन ने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आणि आर्सेलरवर बरेच निर्बंध लादले.
कामगार संघटनाही मित्तल स्टीलच्या बाजूने उभ्या राहिल्या.
या दरम्यान झालेल्या एका ' आर्सेलर शेअरहोल्डर्स मीट' मध्ये विक्रमी संख्येने शेअरहोल्डर्स उपस्थीत राहिले व 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डीलच्या विरोधात मतदान करून मित्तल स्टीलचे पारडे आणखी जड केले.

परिस्थितीची अचूक जाण असलेल्या लक्ष्मी मित्तनी आपली ऑफर आणखी वाढवली व ३३.७ बिलीयन डॉलर्स पर्यंत नेवून ठेवली (त्यावेळचे १,५२,००० कोटी रूपये). कंपनीतला मित्तल कुटूंबाचा हिस्सा ४५%च्या खाली घेतला आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची संख्या १८ पर्यंत वाढवून त्यापैकी फक्त ६ जागा स्वतःकडे ठेवल्या.

या ऑफरला नकार देण्यासाठी आर्सेलर मॅनजमेंटला कारण सापडणे शक्यच नव्हते.

मित्तल स्टीलकडून सतत पाच महिने अव्याहतपणे काम करणार्‍या ३०० लोकांच्या टीमच्या प्रयत्नांना यश आले व २५ जून २००६ ला जगातली पहिल्या १००+ मिलीयन टन उत्पादन करणार्‍या "आर्सेलर मित्तल " ची घोषणा झाली.

जगातली सर्वात मोठी स्टील कंपनी.. जागतीक स्टील उत्पादनात व १०% वाटा असणारी 'आर्सेलरमित्तल' दुसर्‍या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तिपटीने मोठी होती यावरून या कंपनीचा अवाका लक्षात यावा.

विजयी क्षण.


लक्ष्मी मित्तल - जोसेफ किंच (आर्सेलर चेअरमन) - आदित्य मित्तल

विजयी हास्य

सद्यस्थिती -

२००८ च्या मंदीमुळे आर्सेलरमित्तलचे उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी झाले पण २००९ नंतर मार्केटबरोबर तेही सावरत आहे.

स्टील उत्पादन - मिलीयन टन मध्ये

२००७ - ११६.४ MT
२००८ - १०३.३ MT
२००९ - ७७.५ MT
२०१० - ९८.२ MT
२०११ - ९७.२ MT

२०११फॅक्ट फाईल

Revenue..............-....US$ 93.973 Billion
Operating Income....-....US$ 04.898 Billion
Profit..................-....US$ 02.263 Billion
Total Assets..........-....US$ 121.88 billion
Total Equity..........-....US$ 56.690 billion
Employees...........-....261,000

'आर्सेलरमित्तल' ला जोरदार पर्याय उभा करण्यात चीन यशस्वी झाला आहे. जगातल्या ३० मोठ्या स्टील कंपन्यांच्या यादीत चीनच्या १० कंपन्या असून त्यांचे एकत्रीत उत्पादन ३०० मिलीयन टन च्या जवळपास आहे.

३० जून २०१० ला युरोपीयन कमीशन ने १७ स्टील कंपन्याना "Price Fixing Scandal" साठी ५१८ मिलीयन युरो इतका प्रचंड दंड ठोठावला. इथेही 'आर्सेलरमित्तल' आघाडीवर होते, 'आर्सेलरमित्तल' ला सर्वात जास्त दंड सहन करावा लागला. :-)

भारतीय स्टील उद्योगातील 'आर्सेलरमित्तल'चा सहभाग हा एक वादग्रस्त विषय आहे, बरेच मोठे प्रकल्प, बरीच वर्षे लालफितीत अडकले आहेत - पण ती चर्चा इथे नको.

*************** संदर्भ ***************

विकीपीडीया
इंटरनॅशनल स्टील स्टॅटिस्टीक ब्यूरो
२००६ च्या दरम्यान प्रसिध्द झालेली व जालावर उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे
http://strat.in
कोल्ड स्टील च्या संदर्भाने मिळालेली माहिती आणि जालावरची असंख्य पाने.

**********************************

समाजअर्थव्यवहारराजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

सुकामेवा's picture

20 Jul 2012 - 3:14 am | सुकामेवा

वा लेख माला छान झाली पण फार लवकर हात अखडता घेतला असे वाटते
बा़की विविध विषयाना हात घालुन त्याचे लेखन करायचे हे काम चांगले आहे.

नविन विषयाच्या प्रतीक्षेत

गणामास्तर's picture

20 Jul 2012 - 11:30 am | गणामास्तर

असेचं म्हणतो.
आता कोल्ड स्टील वाचायलाचं हवी.

अर्धवटराव's picture

20 Jul 2012 - 3:23 am | अर्धवटराव

युद्धकथांप्रमाणेच या औद्योगीक साम्राज्यांच्या कथा देखील सुरस रचुन पेश केल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद :)

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

20 Jul 2012 - 6:17 am | शिल्पा ब

आजच कोल्ड स्टील वाचायला घेतलीये.

बरीच आटोपती घेतलीस रे, कारण कळाले नाही, असो. एका चांगल्या वादग्रस्त विषयाला हात तरी घातलास, हे ही नसे थोडके.

कॉपीराईट चे लफडे नको राव.

पहिल्या भागासारखे पुढचे पांच भाग लिहिणार होतो, पण नंतर फक्त महत्त्वाच्या घटना टिपायच्या ठरवल्या.

किसन शिंदे's picture

20 Jul 2012 - 8:42 am | किसन शिंदे

एवढ्यातच संपवलीस!! :O मला वाटलं चांगले १०-१२ भाग होतील या मालिकेचे.

असो. एक चांगला विषय निवडून तो अतिशय सुलभ सोप्या पध्दतीने इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.! :)

रणजित चितळे's picture

20 Jul 2012 - 9:11 am | रणजित चितळे

फारच छान मजा आली वाचून

प्यारे१'s picture

20 Jul 2012 - 9:44 am | प्यारे१

संप(व)लं?????????
बरं.
आम्ही कोल्ड स्टील वाचून भागवून घेऊ.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2012 - 10:55 am | मृत्युन्जय

वा लेखमाला तर छानच झाली.

या परिस्थीतीत शेवटचा वार केला भारतीय सरकारने.

पण मला वाटते हे चुकीचे आहे. भारताने स्वतःची भूमिका पहिल्या महिन्यातच मांडली होती. सेव्हरस्टाल ची एण्ट्री होण्याच्या आधी.

बादवे मला काही गोष्टी कळाल्या नाहित त्या तु समजावुन सांगशील अशी आशा आहे:

१. मित्तल स्टील अर्सेलरपेक्षा मोठी होती शिवाय त्यात मित्तलचे शेयर्स जवळजवळ ८०% होते. अश्या परिस्थितीत नव्या कंपनीत मात्र मित्तलने ४५% शेयर्स फक्त घेतले. यात त्याचा फायदा काय?

२. मित्तल शेठ मला वाटते पहिली काही वर्षे तर नविन कंपनीचे चेयरमन पण नव्हते. शिवाय नविन कंपनीत त्याचे डायरेक्टर्स केवळ ३३.३३% आहेत. १८ पैक्क्की ६. म्हणजे त्यांनी जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा पुर्ण अधिकार गमावला आनि जी कंपनी उदयास आली त्याच्यात त्यांचे अधिकार केवळ ३३.३३% राहिले. यात त्यांचा फायदा काय?

३. मित्तलनी अखेरीस अर्सेलर ची बोली मूळ किंमतीपेक्षा माझ्या अंदाजाने दुप्पटीने लावली. एवढे करुनही सर्व शेयर्स मिळाले नाहित. मग त्यांचा फायदा काय?

अर्सेलर मित्तल आजघडील जगातील सर्वात मोठी कंपनी असेलही पण यात मित्तलचा स्वतःचा फायदा काय?

निश's picture

20 Jul 2012 - 1:42 pm | निश

मृत्युन्जय साहेब,

तुमच्या शंकेंची उत्तर मी खालिल प्रमाणे देत आहे.

१) फार मोठ्या उलाढालीच्या अपेक्षेने व दुरगामी विचार करता मित्तलानी त्यांचा स्टेक कमी केला असला तरी नविन अर्सेलर मित्तल मध्ये त्यांचा स्टेक हा नं १ स्टेक हा त्यांचाच असल्यामुळे कंपनीची मालकी त्यांच्याच कडे राहणार आहे. जरी स्टेक कमी जरी केला असला तरी दोन्ही कंपनींच्या ऐकत्र येण्यांमुळे त्यांच्या कंपनी उलाढालीत दुपटीने वाढ झाली असती पण मंदी मुळे त्या मंदीचा फटका त्याना बसला पण आता ते सावरतील त्यातुन त्याना त्याचा फायदा होईलच.
ह्या ऐकत्रीकरणानंतर त्यांची उलाढाल अफाट वाढल्या मुळे त्यांची स्टील बाजारावर पकड मजबुत झाली.
२) शिवाय नविन कंपनीत त्याचे डायरेक्टर्स केवळ ३३.३३% आहेत. १८ पैक्क्की ६ जरी असले तरी ३३.३३% मत + कंपनीत १ नं चा स्टेक ह्या त्यांच्या कडे मजबुत बाबी आहेत. उरलेले १२ लोक हे काही सगळे अर्सेलरचे नाही आहेत. बाहेरचे लोक पण आहेत.

३) सगळे शेयर जरी नाही मिळाले तरी त्याना बाजाराचा ताबा किंवा अर्सेलरची बाजारपेठ पण मिळाली. जर त्याना आज अर्सेलरची ऐव्हढी कंपनी स्थापन करायची असती नविन बांधायची असती तर त्यात ३ ते ४ साल गेल असते व त्याना नविन कंपनी बांधायला अर्सेलरला दिलेल्या बोलीच्या कितीतरी पटीने अधिक रक्कम गुंतवावी लागली असती. परत त्याना अर्सेलर ची टेकनोलोजी व मनुष्यबळ हे रेडीमेड मिळाले.

भारी बे मोदका. मस्त लिहिलंयस!

आत्मशून्य's picture

20 Jul 2012 - 11:40 am | आत्मशून्य

अरे कॉपीराइटसाठी समस्त मिपाकर सल्लगार मंडळ सोबत असताना चिंता ती कसली फक्त अनुवाद टाळायचा होता माहीती न्हवे. असो, विषयाची निवड अप्रतिमच. मित्तल मिपाकर असते तर एका काथ्याकुटात अर्सेलर मर्ज करता आली असती... नाही का ;) ?
@मृत्युन्जय रोचक विचार.

चिगो's picture

20 Jul 2012 - 5:01 pm | चिगो

मित्तल मिपाकर असते तर एका काथ्याकुटात अर्सेलर मर्ज करता आली असती... नाही का ?

सहमत.. नुसता काकु टाकलाय हे कळल्याबरोबर आर्सेलरवाले नाक मुठीत दाबून शरण आले असते.. ;-)

मस्त, वेगळी लेखमाला, मोदक.. आवडली...

स्मिता.'s picture

20 Jul 2012 - 2:22 pm | स्मिता.

लेखमाला वाचायला सुरस वाटत होती, पण पटकन संपवली.

मस्त, थोडक्यात पण व्यवस्थित मांडलंस. लोकांनी कधी संपवणार असं विचारण्याऐवजी का संपवली हे विचारणं ही लिखाण उत्तम झाल्याची पावती आहे असं मला वाटतं. नाहीतर सव्वीस-सत्तावीस भागांची क्रमशः डायरी लिहीणारे महाभाग कमी नाहीत.

जोशी 'ले''s picture

20 Jul 2012 - 7:20 pm | जोशी 'ले'

+ सहमत , पण विषयाचा अवाका पहाता अजुन दोनेक भाग असते तर अजुन मजा आली असति

कवटी's picture

20 Jul 2012 - 5:03 pm | कवटी

लवकर आटोपती घेतली राव!

मालिका पटकन संपली असे वाटले तरी आवडली.
चांगले लिहिले आहेस.

सुनील's picture

20 Jul 2012 - 7:07 pm | सुनील

हा भाग पटकन संपवल्यासारखा वाटला. बाकी लेखमाला आवडली.

मस्त लेखमाला.

तरीही आर्सेलरने सेव्हरस्टाल बरोबर हात मिळवावेत हे कुणालाच पटले नव्हते.
सेव्हरस्टाल बरोबरची डील आर्सेलरला कधीही फायदेशीर ठरणार नव्हती.

सेव्हरस्टालचं पुढं काय झालं?
शेयरहोल्डर्सच्या दबावामुळे ते सेव्हरस्टाल - आर्सेलर डील रद्द झालं का सेव्हरस्टाल पण आर्सेलरबरोबरच मित्तलच्या साम्राज्याचा हिस्सा बनली?

पैसा's picture

20 Jul 2012 - 8:28 pm | पैसा

सुरस आणि चमत्कारिक! खरंच.

आंबोळी's picture

20 Jul 2012 - 10:17 pm | आंबोळी

तिन्ही भाग खुपच सुंदर झालेत.
लवकर गुंडाळल्याची चुटपुट आहेच पण अगदीच परिक्रमा केली नाहीत त्याचा आनंदही आहे.
तरीही आजून एखाद्दुसरा भाग चालला असता.

लॉरी टांगटूंगकर's picture

20 Jul 2012 - 11:53 pm | लॉरी टांगटूंगकर

बेष्ट रे मोदक !!!!!!!!!!लिहीत रहा!!!!!!!

अभिज्ञ's picture

21 Jul 2012 - 3:40 pm | अभिज्ञ

तीनही भाग छान झाले आहेत.

वाचायला मजा आली.

अभिज्ञ.

इरसाल's picture

21 Jul 2012 - 4:55 pm | इरसाल

तीनही भाग उत्क्रुष्ट झालेत.तुम्ही फार छान लिहीले आहे.

अवांतर : भाग लहान झालाय, लवकर आटोपली, पटकन संपवलीत वाल्यांसाठी ---मागील किती महिन्यात कळफळा बडवला आहे ?

राजेश घासकडवी's picture

22 Jul 2012 - 7:29 am | राजेश घासकडवी

तीनही लेख थोडे वेगवान, पण खिळवून ठेवणारे झालेले आहेत.

एकंदरीत स्वतंत्र अस्तित्व जपणं हे मॅनेजमेंटचं ध्येय होतं, तर कंपनी मित्तलबरोबर मर्ज करणं हे भागधारकांच्या हिताचं होतं. मित्तलनाही इतक्या मोठ्या कंपनीशी स्पर्धा करत रहाण्याऐवजी त्यांना आपल्यात सामील करणं फायद्याचं होतं. या नाट्याचं चित्रण छान झालं आहे.

एक प्रश्न : या सगळ्यानंतर एकंदरीत ग्राहकाचा फायदा झाला का? भारताचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदा झाला का? (व्हायलाच हवा असं नाही, पण प्रश्न पडला एवढंच)

मोदक's picture

24 Jul 2012 - 12:24 am | मोदक

>>>या सगळ्यानंतर एकंदरीत ग्राहकाचा फायदा झाला का?

नजीकच्या भविष्यकाळात उत्तर मिळेल, केवळ ५ / १० वर्षात या प्रश्नाचे उत्तर शोधणे थोडे घाईघाईचे वाटते..

>>>भारताचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदा झाला का? (व्हायलाच हवा असं नाही, पण प्रश्न पडला एवढंच)

"भारताला फायदा करून घ्यायचा आहे का?" हा प्रश्न पडावा इतकी बिकट परिस्थीती आहे.
७ / ८ राज्यात आर्सेलरमित्तलचे प्लँट घोषीत झाले.. पंतप्रधानांनी आश्वासने दिली.. केंद्रसरकारने मदत करायचे आश्वासन दिले. इतकेच झाले. केवळ आश्वासने मिळत आहेत हे पाहून (वैतागून) मित्तल पुन्हा भारताबाहेर पडले आहेत.. :-(

सहज's picture

22 Jul 2012 - 8:41 am | सहज

मुळ पुस्तकाची सोपी सुटसुटीत ओळख करुन देणारी लेखमाला आवडली. पुस्तकावर आधारीत ४५ मिनिटाचा माहितीपट असतो तशी रोचक!!

धन्यवाद.

सायली ब्रह्मे's picture

22 Jul 2012 - 9:16 am | सायली ब्रह्मे

लेख आवडले. चांगले लिहिले आहेस.

मस्त. इतरांच्या 'लवकर संपवली' या तक्रारीला +१.

एका वेगळ्या विषयावरची यशस्वी लेखमाला.
तपशीलांवरून लेखकाचा अभ्यास दिसून येतो. थोडे वर्णन अन तपशील वाढवल्यास लढत आणखी रंगतदार बनवता येईल.
छान !

अक्षया's picture

24 Jul 2012 - 11:13 am | अक्षया

छानच लिहीले आहेस..:)
लिखाण शैली चांगली आहे..

मोदक's picture

25 Jul 2012 - 12:11 am | मोदक

वाचक आणि प्रतिसादकांचे धन्यवाद. :-)

क्या बात है !!

लेख माला आवरती घेतली असली तरी, वेगळ्या विषयावर धाडसी लेखन केलेस ....अजुन येवु देत जा !!