Skip to main content

हुस्ना.

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 17/07/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
४/५ दिवसांपुर्वी असच चॅनल बदलता बदलता एमटीव्ही वर गेलो असताना काही ओळी कानावर पडल्या आणी एक गायक वैविध्यपुर्ण हातवारे करत गाताना दिसला, त्या १०-१२ सेकंदाच्या अवधीत जे काही कानावर पडले त्याने मनमोहुन्,एक प्रकारे उद्विग्न करुन गेले. अधिक खोदकाम केले असता असे कळले की हा कोक स्टुडिओचा कार्यक्रम असुन गाणारी व्यक्ती ही पियुश मिश्रा आहे आणी ह्यानींच ह्या गाण्याची रचना व पुनर्लेखन केले आहे. वस्तुतः हे गाणे जावेद नावाच्या माणसाने फाळणीच्या वेळेस स्वतःच्या हुस्ना ह्या प्रेयसीच्या विरहापोटी लिहीले ज्यामधे त्याची तिला पुन्हा न भेटता येण्यामुळेची लाचारी व होणारे अगतिकतेचे दु:ख ह्याचा मिलाफ दिसुन येतो. आता ह्या गाण्याचा कोक स्टुडिओ साठीचा निर्माता हितेश सोनिक ह्याने १५ वर्षापुर्वी जेव्हा पियुश मिश्राला गाताना ऐकले होते तेव्हाच तो ह्यामधे पुर्वी कधी नव्हे इतका गुंतला. तर अशा ह्या गाण्यात पियुश ह्यानीं आता गिटार व इतर भारतीन वाद्यांचा सुयोग्य वापर करुन प्रेम विरहाने व्याकुळ युगुलाचे मनच उलगडुन दाखवले आहे. ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिकटिक करा. https://www.youtube.com/watch?v=4zTFzMPWGLs&feature=player_detailpage
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2956
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मी सुद्धा कधी नव्हे तो शनिवारी हा कार्यक्रम बघितला. गाणं मस्त जमून आलं आहे. पुन्हा ऐकण्याची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करता आहात. धन्यवाद. अमृत

माझं आवडतं गाणं.... मी फॉलो करतो कोक स्टुडिओ :) :) पियुश मिश्रा उत्तम गायक आहेचं, पण त्याहून उत्कृष्ट कवी आहे .....

मस्त आहे गाणे.. शिवरंजिनी राग आहे. काही ओळीम्मध्ये 'फिर भी मेरा मन प्यासा 'चे स्वर ऐकू येतील. ( मेरे नैना सावन भादो.. )

पियुश मिश्रा या माणसाला मि नोटिस केलं जेव्हा गुलाल पाहीला.... अतिशय अप्रतिम अदाकारी आणि डायलॉग डिलिव्हरी( बाकि चित्रपट काहि प्रमणात अर्ध्यात गणल्यासाखा कोणाला वाटु शकतो... :) ) आणि एक्टिंग येव्हढिच ओळख नाहि तर य चित्रपटाच म्युझिक आणि गीत लेखन देखिल याचंच आहे. सर्व गाणे अतिशय भन्नाट लिहले अहेत. आणि त्यात सिंगर सलेक्षन सुद्धा जब शहेर हमर सोता है-- पियुश स्वतः आणि स्वानंद किरकिरे हे गायक त्याचे बोल आंगवर काटा आणणारे अहेत. बिडा दुजि थालि का-- अहाहा रेखा भारद्वाज क्या बात (मुजरा आज कोणि गावा तर याच बाईने..) आणि आरंभ है प्रचंड हे परत स्वतःच्या भक्कम आवाजातले. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटातील 'अरे रुकजा रे बंदे' हे गित देखिल याच माण्साचे... असाच एक सुन्दर चित्रपट 'मकबुल' यातिल काके चा रोल... मुळातच हा अर्टीस्ट मला फार आवडतो म्हणुन हा घाट... आवंतरः- राग शिवरंजिनी हा राज कपूर साहेबांचा आवडता राग जाने कहा गये वो दिन, दोस्त दोस्त ना रहा, ओ बसंती पवन पागल वगेरे गाणे....

अनुरोध यांच्याशी १००% सहमत Some thing is special विथ पियुश मिश्रा . गुलाल मस्त एकदम

अनुरोध व जामोप्या यांच्याशी सहमत. जाने कहा गये वो दिन आणि मेरे नॆना सावन भादो या दोन्ही रचनांची हटकून आठवण येते.

लिंक दिल्या बाद्दल मनापसुन ध॑न्यवाद. अतिशय सुंदर संगीत, अन गुलाल हा सिनेमा पूर्ण बघितलेला नाही पण हा माणूस आठवतो, स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त.