४/५ दिवसांपुर्वी असच चॅनल बदलता बदलता एमटीव्ही वर गेलो असताना काही ओळी कानावर पडल्या आणी एक गायक वैविध्यपुर्ण हातवारे करत गाताना दिसला, त्या १०-१२ सेकंदाच्या अवधीत जे काही कानावर पडले त्याने मनमोहुन्,एक प्रकारे उद्विग्न करुन गेले.
अधिक खोदकाम केले असता असे कळले की हा कोक स्टुडिओचा कार्यक्रम असुन गाणारी व्यक्ती ही पियुश मिश्रा आहे आणी ह्यानींच ह्या गाण्याची रचना व पुनर्लेखन केले आहे.
वस्तुतः हे गाणे जावेद नावाच्या माणसाने फाळणीच्या वेळेस स्वतःच्या हुस्ना ह्या प्रेयसीच्या विरहापोटी लिहीले ज्यामधे त्याची तिला पुन्हा न भेटता येण्यामुळेची लाचारी व होणारे अगतिकतेचे दु:ख ह्याचा मिलाफ दिसुन येतो.
आता ह्या गाण्याचा कोक स्टुडिओ साठीचा निर्माता हितेश सोनिक ह्याने १५ वर्षापुर्वी जेव्हा पियुश मिश्राला गाताना ऐकले होते तेव्हाच तो ह्यामधे पुर्वी कधी नव्हे इतका गुंतला.
तर अशा ह्या गाण्यात पियुश ह्यानीं आता गिटार व इतर भारतीन वाद्यांचा सुयोग्य वापर करुन प्रेम विरहाने व्याकुळ युगुलाचे मनच उलगडुन दाखवले आहे.
ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिकटिक करा.
https://www.youtube.com/watch?v=4zTFzMPWGLs&feature=player_detailpage
वाचने
2956
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
योगायोग
माझं आवडतं गाणं.... मी फॉलो
मस्त आहे गाणे.. शिवरंजिनी
पियुश मिश्रा
१००% सहमत
अनुरोध व जामोप्या यांच्याशी
इरसाल धन्यवाद...