टप टप टप...
पाऊस थांबून खरं तर बराच वेळ झाला
घराचे छत अजूनही गळतेय
टप टप टप...
---------------
तुला निरोप देऊन परतलो
तसाचं बसून आहे बराच वेळ
चंद्राने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली
टिपूर चांदणे पसरत गेले
ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक
पण एक आवाज कानात घुमतोय
टप टप टप...
--------------
बाजुच्या खोलीतला तुझा वावर तसा अजुनही तस्साचं
बुद्धीचे मनाशी वाद सुरु झाले
एक म्हणे तु नाहीस, अन् एक तु आहेस..
खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस..
टप टप टप...
--------------
तुझा आवाज घरभर दाटून राहीलाय
कोपर्या-तल्या उदबत्तीच्या सुवासासारखा
जाणवतोय.. पण हातात सापडत नाहीये
तेवढ्यात तुझ्या आवाजाला छेद देऊन
खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस..
टप टप टप...
--------------
हे वेदनेचे सत्र थांबवायला हवं
अनाहूतपणे कानावर हात ठेवले
एवढ्यात त्या मफलरचा स्पर्श
किती प्रेमाने विणले होतेस तू..
कितीही अडवलं तरी काही थेंब पडलेच
गहिर्याण डोहातल्या पाण्यावर
टप टप टप...
--------------
आजकाल आकाशात चंद्र अवतरला तरच
हे घर उजेडाचे अस्तर पांघरतं
नाहीतर आहेच..
खिडकीच्या काचेवर तोच पाऊस..
टप टप टप...
--------------
खुप सन्नाट्टा होता त्या रात्री
ना कुठेही आवाज, ना कुणाची चाहूल
खुप शांत वाटत होते त्या रात्री
कुठून तरी एक टिटवी त्या शांततेला
एक मोठ्ठी भेग पाडून गेली
संवेदनेला जाग आली
चंद्र खाडीच्या पाण्याला ओढतो
तसा परत तुझ्या खोलीकडे ओढला गेलो
पावले त्या खिडकीकडे वळली
किती रात्री त्याच चंद्राला न्याहाळत गेल्या
अनवधानाने खिडकी उघडली
तर
बाहेरच्या टाकीवर परत एकदा तोच पाऊस
टप टप टप...
--------------
घराचे गळकं छत
आकाशातला चंद्र
डोळ्यातले चांदणे
खिडकीच्या काचेवरचा पाऊस
अन्
तुझे डोळे..
सग्गळं सग्गळं
...
टप टप टप...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०६\०७\२०१२)
खूपच छान.
रम्यगूढार्द्रोदास कविता...
कविता आवडली "हातातला तुझ्झा
सुंदर रचना
छान.
नावावरुन बालकविता असेल असे
कविता मस्त .
छान लिहिली आहे कविता..:)
अवडला
छान. मुक्तक आवडलं.
छान.
टप-टप-टप...
मुक्तक आवडलं.