बोगदा
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला
तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच
एकाबाजूने येणारा अन्
दुसर्याबाजुने जाणारा
.
मी बर्याचदा जाणार्या उजेडाकडे उभा राहतो
विरुद्ध दिशेला
.
येणार्या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल
नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय
बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही
न करकरता बिनविरोध चालू आहे
.
पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर
अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता
.
बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन्
डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड"
या दोघांना ओलांडून येणारा
अनुभवाची शाल पांघरलेला
"जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
२६/०६/२०१२
फार सुंदर
मुक्तक आवडलं
आवडली...
थोडा थोडा कळ्या
हो
क्या बात.
छान
मस्त लिहिले आहे ... बर्याच
बोगद्यापलिकडचा उजेड दिसायला