Skip to main content

प्रणब दा - राष्ट्रपती पदावर ?

लेखक तर्री यांनी शुक्रवार, 15/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रणब मुखर्जीं ना यु.पी.ए. ने आपले राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले आहे. प्रणबदा हया पदास योग्य आहेतच आणि म्हणूनच त्यांचे (उमेदवारीसाठी) अभिनंदन. आजवर मनमोहन सरकारवर आलेल्या पेच प्रसंगातून बाहेर काढण्यात प्रणवदानी आपले कौशल्य दाखवले आहे. अर्थमंत्री म्हणूनही त्याचे काम ( ईतर मंत्र्यांच्या तुलनेत) निश्चित उजवे आहे. प्रणबदा ना राष्ट्रपती करण्यात सोनियांनी मान्यता दिली हे ही जरा विशेषच आहे. कोणीतरी सैपाकी , पाणक्याला त्या पदावर सोनियाबाई बसवणार असा कयास होता. पण बाईनी शहाणपणा दाखवला. (अर्थात राहुल बाबा ला ही पुढे चाल -कारण आता मनमोहन बाद) परंतु आता अर्थमंत्री कोण ? हा प्रश्न आहेच पण त्याही पेक्षा "शाहाणपण व अनुभवी" मोहरा बाजूला पडल्यावर आता सरकार "बुजागावाण्याचे" उरले आहे. सगळे चमचे उरले आहेत. देशाच्या दृष्टीने प्रणब -बाबू हया वेळी राष्ट्रपती पदापेक्षा मंत्रीमंडळात हवे होते असे मला वाटते. आपले काय मत ?

वाचने 5698
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

यदाकदाचीत पुढल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सरकार बनवायचा चान्स मिळाला (शक्यता बरीच आहे) तर राहुल बाबाच्या मार्गात कुठलीच धोंड नको.... अर्धवटराव

कारण. १. सरदार पटेल हे खरे लायक पंतप्रधान असून पण , त्यांना ते पद दिले नाही... २. चौथी नापास पण शिक्षणमंत्री होवू शकतो, असा कायदा आहे. ३. निवडणूकीला उभे रहायला कूठलीही शैक्षणिक पात्रता लागत नाही. तूरूंगात असलेली व्यक्ती पण निवडणूकीला उभे राहू शकते. ४. पगार वाढ करण्यासाठी हे सगळे खासदार आणि आमदार एकत्र येतात आणि राष्ट्रिय संकटाच्या वेळी मात्र मूग गिळून गप्प बसतात.आज भारतावर आर्थिक संकट आलेले आहे, तरी हे काही आपला पगार कमी करायला तयार नाहीत. मग, आपणच कशाला डोके-फोड करून घ्या. बरे मोरारजी होते , तेंव्हा पण माझ्या पोटाची खळगी माझी मीच भरत होतो आणि आता मनमोहन आला तरी माझे मीच प्रयत्न करत आहे... थोडक्यात कूणीही येवो , कुणीही राहो...आपल्या ह्या धाग्यांचा आणि जिलब्यांचा, भारतिय संसदेवर काहीही परीणाम होणार नाही.फार मजबूत आहे हो ही संसद. स्वतः घाम गाळून कमावलेला, चांगला कचकचीत डॉलर, ही खरी वैयक्तिक अर्थव्यवस्था.. तो कमवा आणि मस्त मजेत रहा.

काय फरक पडतो ? प्रणवदा असो वा अजुन कोणी ! प्रतिभा ताईंनी काय फायदा करुन दिला देशाला ? होलसेल मधे दौरे मात्र केले. त्यांनी ६० महिन्यात राज्यात ४० दौरे,आणि १०५ कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेही देशात अराजकता दिसुन येत आहे आणि मनमोहन सिंग यांच्या कडुन अपेक्षा ठेवणे म्हणजे मुंगीकडुन गुळाची ठेप उचलली जावी, अशी अपेक्षा करणे होईल ! ;) तसेही ते सोनिया बाईंच्या आज्ञे बाहेर नाहीत...आणि इतर पक्ष तंगडी ओढायला सदैव तत्पर असतातच ! देशात रस्ते नाहीत,पाण्यावाचुन लोक मरत आहेत (ज्या देशात इतक्या नद्या असुन जवळपास सर्वच प्रदुषण ग्रस्त आहेत). नद्याचे पाणी पिउन लोक प्राण गमावत आहेत ! अवैध रेती उपसा,खाणकाम करुन भ्रष्ट नेत्यांनी देश विकायला काढला आहे आणि आपल्या संरक्षण दलाकडे स्वतःच्याच देशाचे रक्षण करायला साधन सामुग्री नाही. अश्या खड्ड्यात गेलेल्या देशात कोणीही राष्ट्रपती झाला तरी तो कोणाचे कल्याण करणार आहे ? वाचकांसाठी लेख :- पुअर स्टँडर्ड

आपण विचार करून जर काही फरक पडत नसेल तर मी म्हण्तो लोकशाही हवी कशाला ? आपले हे ऊच्च विचार व वैयक्तिक चकचकित अर्थ व्यवसथा ह्या लोकानी ( पर्यानी आपण) केलेल्या घ्येय धोरणांवर अवलंबून आहे. ज्याचे त्याचे विचार. कोणाला जिलेबी दिसेल , कोणाला त्यावरची माशी , कोणाला काहीच दिसणार नाही. डोळे असले तरी दृष्टी असेलच असे नाही हेच खरे.

In reply to by तर्री

आपल्या हातून काही होणार आहे का? चला आपण आता मस्त सिनेमा बघु या. जूना आहे, सिंहासन नावाचा. १९७९ साली आला होता.येताय का? मी तो बघतो आणि आपला निळू फुले होवू नये म्हणून प्रयत्न करतो.... त्या निळू फूले सारखे वेडे होण्यापेक्षा, डोळ्यावर रेबॉनचा गॉगल लावून आंधळेपणाचे सोंग आणू या...

In reply to by तर्री

३ वाक्ये लक्षात ठेवा.. १. जे आपण स्वतः करू शकतो ते करा. २. जे तूम्ही करू शकत नाही ते करू नका. ३. कूठल्याही प्रसंगात तुम्ही जे करू शकाल तेच निवडा... राष्ट्रपती असो की माझ्या कं.तील प्रेसिडेंट, ते निवडण्याचा अधिकार जर मला नसेल, तर मी कशाला उगाच डोक्याला ताप करून घेवू? हे असेच सेंटी होवून वेडे होण्यापेक्षा , वेड पांघरलेले काय वाईट? माझ्या पाहण्यातील ९९% तेच करतात. एक उदाहरण देतो. जिथे " राम नाईक" (ही डिटेल्स बघा ... http://en.wikipedia.org/wiki/Ram_Naik)ह्यांचा पराभव करून, "गोविंदा" (ही डिटेल्स बघा .... http://en.wikipedia.org/wiki/Govinda_(actor)#Political_career) निवडून येतो.. तिथे आपण कशाला चिंता करायची? संवेदनाशील होणे, तब्येतीला हानीकारक आहे.

आयला ह्या राष्ट्रपतीला काय काम असतात? माजी राष्ट्रपतीची कामगीरी काय? मुळात लोकशाही म्हणजे काय? सध्या भारतातील राजकिय व सामजिक अवस्था बघुन, माझी खात्री आहे की आप्ल्या देशातील बहुतांश लोकांना ही लोकशाही काय असते हे माहित नाही.

In reply to by चिरोटा

घोडे लावणारा रेसमध्ये पळत नाही. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: राष्ट्र्पती पदावर घोडे लावायला संधी नसतेच , म्हणुन तर रड्तराउ घोड्यावर बसवत आहेत.... :)

In reply to by अविनाशकुलकर्णी

संसदेत असताना झोपा काढणे हा अदखलपात्र गुन्हा केव्हापासून झाला? तसे असते तर सद्य पंतप्रधानांची रटाळ"वाणी" सुसह्य कशी झाली असती?

धाग्याचा उद्देशच कळाला नाही. धागा पूर्णतः चुकीचा आहे. 'मिपाकरांना राष्ट्रपती कोण हवा आहे ?' असा धागा असायला हवा होता. सर्व पक्षांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, सिमी, रा. स्व. संघ, आय.एस.आय,अमेरीका, प्रणबदा, कलाम, संगमा इ. इ. सर्व सतत मिपा रिफ्रेश करून अशा धाग्याच्या येण्याची वाट पहात आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

" धाग्याचा उद्देशच कळाला नाही. धागा पूर्णतः चुकीचा आहे." पराशेट नुसता पहिला प्रश्न ठीक आहे किंवा नुसते दुसरे विधान ठीक होते. तुम्हाला उद्देश जर कळला नाही तर -" चुकी चा धागा " ? कमाल आहे ब्वा....

असो. सुधारणा करण्यात येईल.

In reply to by तर्री

मिपाकरांचा प्रणबदांच्या निवडीला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही पाठिंबा देण्यावरून एकमत होत नाहीये. http://timesofindia.indiatimes.com/india/BJP-core-group-to-meet-today-N…

शक्यतो एखाद्या आजार्‍याला राष्ट्रपती बनवावे... त्या शंकर दयाळ शर्मांचे गुडघे दुखायचे म्हणून फॉरेनचे दौरे कमी झाले...

शिवसेनाप्रमुखांचे निवेदन [दुवा मटाला जातो] वाचून एक भारतीय म्हणून आज माझे डोळे भरुन आले आहेत. :) जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे

आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधतो. मुळात हे राष्ट्रपतीपद सध्या इतके प्रतिष्ठेचे का झाले आहे ? उत्तर २०१४ च्या निवडणुकांमध्ये दडले आहे. दोन्ही आघाड्यांना एक गोष्ट साफ माहीत आहे की संपूर्ण बहुमत अशक्य आहे. तेव्हा घोडेबाजार तेजीत राहणार व अश्यावेळी राष्ट्रपती मोलाची कामगिरी बजाऊ शकतो. कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी पहिले पाचारण करणे व संकट विमोचानांची ह्या पदामागे नियुक्ती ह्या दृष्टीने मह्त्त्वाची ठरते व किंबहुना ह्यासाठी कलाम ह्या प्रकारापासून अलिप्त आहेत. मात्र ह्या गडबडीत सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता नवीन अर्थमंत्री कोण तो १४ पर्यत भारतीय अर्थव्यवस्था , आमच्या युरोझोन ची पडझड व अमेरिकन आर्थिक दोस्तांना कसा पार पडणार . मोटेंक सिंग आलुवायीया ह्या घडीला प्रबळ दावेदार आहेत. मागे त्यांचे नाव जवळजवळ नक्की होऊन अचानक मुखर्जी ह्यांची वर्णी कशी लागली ह्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी अमेरिकन सरकार व अमेरिकन भारतीय दूतावास ह्यांच्यात व्यनी करण्यात आले. इति आसंज , विकीलीक्स आघाडीचा आता पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण ? महात्वाकांशी प्रणवदा ह्यांची तर बोळवण करण्यात येत आहे. प्रणव ह्यांना हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लॉबी कार्यरत आहे ह्यात वाद नाही. ह्या मागील एक कारण म्हणजे मोंटेक सिंग ह्यांची अर्थाशात्रात पी एच डी व जागतिक बँकेतील अनुभव व भारताचे आर्थिक धोरण नव्याने बनविण्यात मनमोहन ह्यांचा उजवा हात असणारे मोंटेक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या हुशारी व अमोघ वतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. माझ्या मते भारताचे अर्थमंत्री हे पद कोण राजकारणी माणसाला न जाता ह्याच शेत्रातील सुयोग्य व्यक्ती च्या हातात जाणे हे भारताच्या व जगाच्या दृष्टीने योग्य आहे. आणि मुखर्जी ह्यांच्या राजकारणाचा अनुभव त्यांना राष्ट्रपती पदावर नक्कीच कमी येईल सध्या चीन विरुद्ध समुद्रात अमेरिकेने शीत युद्धाला सुरुवात केली आहे. चीन विरुद्ध व्हिएतनाम , मलेशिया , दक्षिण कोरिया व जपान उभे थकले असून अमेरिकेचा बिनीचा मोहरा त्याचा नैसर्गिक मित्र भारत ह्यात आघाडीवर आहे. अश्यावेळी भारताचे ह्या सर्व देशांची मैत्रीचे ,व्यापाराचे , संरक्षणाचे करार होत आहेत. व संबंध वाढत आहेत , म्यान मार सहित इतर शेजारील राष्ट्रांची सुद्धा असे करार होत आहे. अश्यावेळी ह्या राष्ट्रांना भेट देणे व त्यांच्या व्यापारी व इतर गटांना भेटणे हे राष्ट्रपती म्हणून प्रणव जास्त योग्य प्रकारे करू शकतील. अमेरीका जागतिक राजकारणात भारताने सक्रिय व अधिक मह्त्त्वाची भूमिका घ्यावी म्हणून कधीच पाठी लागला आहे. तेव्हा प्रतिभावान राष्ट्रपती पेक्षा प्रणव मुखर्जी कधीही योग्य त्यांचे बाळासाहेबांशी मैत्रीचे संबंध पाहता सत्ता बनविण्याच्या वेळी हि मैत्री लाभदायक ठरू शकते. पुढच्या निवडणुकीत मनसेला युतीत घ्यावे ह्या मुद्दयावर भाजपात कधी नव्हते मोदी व गडकरी ह्यांचे एकमत आहे. तेव्हा नवीन समीकरण ासाठी आम्ही सज्ज आहोत हा शिवसेनेचा इशारा आहे. किंवा मुखर्जी निवडून येणार ह्यांची खात्री असल्याने उगाच विरोध करण्यापेक्षा पाठिंबा देणे कधीही उत्तम हा विचार मागे असू शकतो.

निनाद : आपण सर्व बाजुनी विचार केलेला आहे. आज काल अमेरिकेची भारतीय राजकारणातील नस्ती उठाठेव वाढत चालली आहे. बाई काय मुंडी हलवतात.

In reply to by तर्री

हिलरी काकू मागच्या वेळी आल्या तेव्हा इराण कडून तेल विकत घेऊ नका. असा सूचना वजा सल्ला वजा धमकी देऊन गेल्या. अजून त्यांच्या किराणा मालाची दुकाने भारतात का उघडली जात नाही आहेत ह्या बद्दल ममता दीदींना जाब विचारयला गेला पण ममता दीदींचा आठवावे रूप ,आठवावा प्रताप पाहून त्या सुमडीत निघून गेल्या. व जात्ताना बंगाल मध्ये भरपूर अमेरिकन गुंतवणूक करायचे आश्वासन देऊन गेल्या.( आता हि गुंतवणूक किती व कधी येणार देव जाणे )