✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं

म
मराठमोळा यांनी
Wed, 06/13/2012 - 21:07  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;) ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;) आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो. १. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात. २. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात. ३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार. ४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते. ५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अ‍ॅक्शन घेणार आहेत. अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच. बरं एमएनसी मधे काम करणारे.. १.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अ‍ॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्‍याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे. २. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय. आई-बाप, काका-मामा १. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो. २. मुलगी आयटीतली पाहिजे. ३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना) ईतर १. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का? २. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको.. ३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का? आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे? पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून.. आपला, मराठमोळा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22813 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

निनादराव,प्रतिसाद आवडला. तरी

मराठमोळा
Sat, 06/16/2012 - 05:20 नवीन
निनादराव, प्रतिसाद आवडला. तरी तो केवळ अनिवासींच्या बाबतीत होता असे म्हणतो.. धाग्यामधे केवळ अनिवासीच नव्हे तर एकुणातच जे जे ईंग्रजी ते ते उत्कृष्ट असते अशी जी धारणा आहे त्या अनुशंगाने येणार्‍या अनुभवांआबत लिहिले होते. भारतात ब्रँड क्रिएशन नाही मान्य आहे, आपल्याकडचे सगळेच ब्रँड हे पाश्चात्य देशांतील ब्रँडच्या मानाने कमी लेखले जातात. भारतीय माणूस भारतीय माणसला किंमत देताना आढळत नाही. वर बर्‍याच लोकांनी नाकारले असले तरी अशा लोकांची संख्या कमी होत असली तरी (?) सध्या खुप आहे. पेठकर काका म्हणतात तसे ईंग्रजी भाषेला इतक्या उच्चपदावर कुणी नेऊन बसवले हाही प्रश्नच आहे. कारण बहुतांश ठिकाणी आपण ईंग्रजी बोलणार्‍याला हाय-फाय समजतो. भारतात प्रॉब्लेम आहेत हेही मान्य आहे, पण मग तुमच्याकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहेच ना, बाहेर जाऊन पुन्हा भारताची बदनामी (कधी कधी खोटंनाटं सांगून) करण्याची काय गरज आहे? मागे मुंबईत असताना नेदलरलँड्स वरुन तिथल्या गव्हर्नमेंट्चे मोठे अधिकारी आयटी टीमला भेट द्यायला आणी अनुशंगाने भारत बघायला आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना विश्वास बसेना की मुंबईत ईतक्या मोठ्या बिल्डींग्/ईंफ्रास्ट्रक्चर आहे. त्यांच्या मते भारत म्हण्जे गरीब देश, आजही अंगावर झाडाची पाने गुंडाळणारा टाईप्स. या विचारांमागचं कारण म्हणजे तिथे स्थायीक असलेल्या भारतीयांची त्यांना भारताबद्दल सांगितलेली माहिती. जे लोकं भारतात आलेले नाहीत त्यांना अजुनही भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल गैरसमज आहेत कारण आपल्याच लोकांनी पुरवलेली चुकीची माहिती/ उडवलेली टर. इथे देखील काही भारतीय फिरंगांना अशी काय मस्त माहिती देतात भारताबद्दल की फिरंग भारतात कधीच जाणार नाही याची शपथच घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

धाग्याच्या शंभरीसाठी माझीही एक धाव

सुधीर
Sat, 06/16/2012 - 08:50 नवीन
माझ्या मते, ज्या काही लोकांमुळे तुम्हांस असं वाटतंय, त्यात त्यांचीही काही चूक नाही. बिचार्‍यांना परमेश्वराने द्वंद्वात्मक आघात सहन करण्याची पुरेशी ताकद दिली नसावी. एक चालतं बोलतं उदाहरण घ्या ना! दीक्षित-नेने बाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचा "अ‍ॅक्सेंट" काही बदलला नाही. जे लोक परदेशात दोन-तीन वर्षांहून अधिक काळ राहून आलेत ते तिची बाजू निदान समजू शकतात आणि ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीही परदेश पाहिला नाही त्यांचं तिच्या नावाने बोटं मोडणंही मी समजू शकतो. मी स्वत: अमेरिकेत दीड वर्ष वास्तव्य केलं, जाण्यापूर्वी अमेरिकेबद्दलचं मत प्रतिकूल होतं, अगदी राजकारणापासून ते संस्कृती पर्यंत, पहिले सहा महिने तुलना करण्यातच गेले. पुढचे सहा अमेरिका समजण्यात आणि त्यानंतरचे अमेरिकेच्या प्रेमात गेले. ज्या-ज्या गोष्टींबद्दल मत प्रतिकूल होतं, वा ज्या-ज्या गोष्टींचा तिरस्कार होता त्याची जागा प्रेमाने घेतली गेली. बहुतेकांच्या बाबतीत असंच होत असावं कारण त्यांचं तिथल्या मातीत मिसळून जाणं. भारतात परतल्यावर द्वंद्व उभंच ठाकलं! आतापर्यंत जे-जे चुकीचं समजत होतो ते अगदीच चुकीच नाही आणि जे-जे एकदम बरोबर समजत होतो ते सगळंच अगदी बरोबर नाही हे उलगडून चुकलं. अगदी खाद्य संस्कृती पासून ते व्यक्तिस्वातंत्र्यापर्यंत. पण लवकरच माझ्या सुदैवाने मला कळून चुकलं की जग विशाल आहे. परमेश्वर म्हणा, नाहीतर कुठलीशी शक्ती म्हणा, यांनी असा काही धागा विणलाय अशी काही माया उभी केलीए, की एका टोकाला एक तर दुसर्‍या टोकाला विरुद्ध गोष्टी आपापल्या ठिकाणी नांदताना दिसतात. ज्याला हे समजून चुकतं, जो हा विरोधाभासाचा आघात सहन करू शकतो, तो मग, ज्या आनंदाने इथल्या पुठपाथवरल्या भैय्याकडचं व्हेज सँ"ड"विच (ड चा पूर्ण उच्चार करून) खातो त्याच आनंदाने परदेशात व्हाईट कॅसल मधले हॅमबर्गर्स (बीफ), "सॅविचेस" खातो. नाहीतर तुम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट, तिथे अगदी ७-८ वर्ष राहून पण त्यांच्या खाद्यसंस्कृती म्हणा वा इतर काही गोष्टीवर म्हणा यावर नाकं मुरडणारी माणसं मी पाहिली आहेत. असो, असं फर्स्ट हेट अ‍ॅण्ड देन लव असं बर्‍याच बाबतीत होतं. वर कुणी तरी पुणं आणि पुण्याबाहेरलं जग अशी तुलना केली होती, अगदी तसंच, गिरणगाववाल्यांच, लालबागची चाळ संस्कृती आणि उपनगरातली फ्लॅट संस्कृती बाबत होताना दिसतं. बाकी दुसरं म्हणजे उगाचच भारतीय ब्रँडना कमी लेखणं, विंग्रजीला अतिमहत्त्व देणं वगरै वगरै..याला त्या व्यक्तीच ते अज्ञान आहे असं म्हणून सोडून द्यायचं.
  • Log in or register to post comments

बाळ्या न् कार्ट..!

प्रभाकर पेठकर
Sat, 06/16/2012 - 10:46 नवीन
पेठकर काका म्हणतात तसे ईंग्रजी भाषेला इतक्या उच्चपदावर कुणी नेऊन बसवले हाही प्रश्नच आहे. कारण बहुतांश ठिकाणी आपण ईंग्रजी बोलणार्‍याला हाय-फाय समजतो. अगदी मिपावरसुद्धा मराठीचा आग्रह धरणार्‍याला 'जुने खोंड', 'मागची पिढी' असे म्हणत, इतर भाषेतील शब्द अंगिकारूनच भाषा 'समृद्ध' होते अशा नवविचारांचे बाळकडू पाजले जाते. कधी कोणाच्या चुका दाखविल्याच तर लक्षात ठेऊन सूड उगविला जातो. आपल्या मातृभाषेलाच 'कार्ट' ठरवायला निघालेले काही जणं 'आपला देश' वगैरे व्यापक विचार काय करणार? त्यामुळे ह्याला आवर न बसता 'इंग्रजी बाळ्या आणि देशी कार्ट' ही वृत्ती वाढीस लागणारच.
  • Log in or register to post comments

हा घ्या १००वा.

शिल्पा ब
Sat, 06/16/2012 - 13:21 नवीन
हा घ्या १००वा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा