मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टोमॅटोच्या रश्यातील मटण

जागु · · पाककृती
साहित्यः १ किलो मटण ३ ते ४ टोमॅटो ४ कांदे लसुण पाकळ्या ५-६ वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या. हिंग अर्धा चमचा हळद १ ते दिड चमचा मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता) गरम मसाला १ चमचा मिठ २ चमचे २ मोठे बटाटे २ ते ३ पळ्या तेल Image removed. Image removed. पाककृती: मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा. Image removed. तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या. Image removed. बटाट्याच्या मोठ्या फोडी करा. Image removed. टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या. Image removed. आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा. Image removed. शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या. Image removed. नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा. Image removed. ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका. Image removed. परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा. Image removed. रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते. Image removed. कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा. वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:) Image removed. ही अशी तयार मटणाची वाटी. Image removed.

वाचन 11104 प्रतिक्रिया 0