साहित्यः
१ किलो मटण
३ ते ४ टोमॅटो
४ कांदे
लसुण पाकळ्या ५-६
वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या.
हिंग अर्धा चमचा
हळद १ ते दिड चमचा
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
मिठ २ चमचे
२ मोठे बटाटे
२ ते ३ पळ्या तेल
पाककृती:
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.
तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.
बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.
टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.
आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.
शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.
नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.
ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.
परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.
रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.
कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.
वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)
ही अशी तयार मटणाची वाटी.

वाचने
11124
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला खुप सारे पाणी आले
हे तर अंडे घालून पण करता
घाल घाल , जमेल त्या पाकृ
ठसकेदार
सुपुर्ब
असेच म्हंतो!! काय फर्मास
In reply to सुपुर्ब by jaypal
छान
मसाला ३ चमचे = लाल तिखट
In reply to छान by सुनील
धन्यवाद!
In reply to मसाला ३ चमचे = लाल तिखट by कवितानागेश
नाय नाय
In reply to मसाला ३ चमचे = लाल तिखट by कवितानागेश
मसाला म्हणजे..
In reply to छान by सुनील
धन्यवाद!
In reply to मसाला म्हणजे.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तोंपासु
सुहास, इरसाल, नरेश, बेंटमेंट,
जबऱ्या.... !! +१ टू जयपाल
वाह.. झकास.. एवढ्या अस्सल
हाय कम्बख्त तुने पीही नही !!
In reply to वाह.. झकास.. एवढ्या अस्सल by गवि
अरे मी काय म्हणतो, शिजलेल्या
In reply to हाय कम्बख्त तुने पीही नही !! by विश्वनाथ मेहेंदळे
साधारणत: रस्सा असेल तेव्हाच
In reply to अरे मी काय म्हणतो, शिजलेल्या by गवि
किंवा पुढच्या सडाफटिंग
In reply to साधारणत: रस्सा असेल तेव्हाच by विश्वनाथ मेहेंदळे
एक वांगे एक्स्ट्रा नेऊ
In reply to किंवा पुढच्या सडाफटिंग by गवि
भला एकसे
In reply to एक वांगे एक्स्ट्रा नेऊ by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to भला एकसे by jaypal
झणझणीत!
हम्म्म
माझ्या अंदाजाप्रमाणे
होय, ते चिकनमध्ये बटाटा
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे by वेताळ
चिकन कस्सा असेल... त्यात वरून
In reply to होय, ते चिकनमध्ये बटाटा by बॅटमॅन
आमच्याकडेही बटाटे घालतात चिकन
झक्कास
फारच छान
मस्त दिसतंय पण
काजू टाकतात ना मटणात. छान
अमुक गोष्टीत तमुक टाकायचे या
In reply to काजू टाकतात ना मटणात. छान by जागु