✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जुनी गोष्ट आहे.

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Fri, 05/04/2012 - 11:23  ·  लेख
लेख
जुनी गोष्ट आहे. कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती.. व लग्न हि ठरले होते तिचे. रात्री जेवण झाले की आम्ही लॉग राईडला जात असू .. दिवसभरातल्या गप्पा..पी.जे मजा यायची.. घरी जाताना कुठेतरी कॉफी असा कार्य क्रम असायचा.. मुलगी नव्या पिढीतली असल्याने सी.सी.डी वा तत्सम मध्ये कॉफी पिण्यास जाण्याचा आग्रह करीत असे.. मुळात मला कॉफी आवडत नाही..आम्ही चहा बाज.. त्यांतून जगातला सुंदर चहा फुगेवाडीच्या अशोक च्या टपरीवर मिळतो असे ठाम मत.. खर मला म्हणजे कॉफी शॉप ही नवी संस्कृती फारशी पसंत नाहि..नव्यास विरोध असे नाही पण कॉफीच्या कपाला अ‍ॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे मला पटत नाही..त्या मुळे मी ते टाळत असे.. असो. शेवटी कन्यच्या आग्रहा खातर आमची फौज सी.सी.डीला गेली.. मुलीचा व मैत्रिणीचा या ठिकाणी राबता असावा.कारण ऑर्डर घेणा~या मुलाने तिला ओळखीचे स्मित हास्य दिले. हिने व कन्याने कॉफी मागवली व मी चहा.. व आम्ही गप्पात रंगलो.. थोड्याच वेळात त्या युवकाने कॉफी व चहा सर्व्ह केला. चहा विदेशी पद्धतीने दिला होता म्हणजे चहा निराळा साखर व दूध निराळे.. मी पण चहाच्या बॅग्ज्स डीप डीप करत होतो...कपाला हात लावल्यावर मला कप गरम लागला नाही म्हणून मी चहात बोट बुडवले तर चहा अगदी कोमट व पिण्या योग्य नसल्याचे ध्यानात आले.. त्या मुळे मी त्या मुलास हाक मारली व चहा कोमट असल्याचे सांगितले. त्या वर त्याने "बहुतेक हीटर ची कॉइल गेली असेल..व दूध तर गरम आहे " असे सांगू लागला. मला त्या सबबी पटेनात..एक तर आमचे उभे आयुष्य कामगारा मधे गेलेले..किती अडचणी असल्या तरी त्या वर मात करीत जॉब अचूक झालाच पाहिजे अश्या "स्कूल ऑफ थॉट्स" मधून मी आलेला असल्याने मी त्याला सबबी न सांगणे..अडचणीवर मात करणे ग्राहक व सेवा यावर १-दीड मिनिटात सुनावले व जर चहा गरम होत नसेल तर हरकत नाही ऑर्डर कॅन्सल करा असे म्हणून विषय संपवला.. त्याने पण तो गार चहा उचलला व निघून गेला... तो गेल्यावर कन्या भडकली व म्हणाली.." पपा तुम्ही म्हणजे न..किती लेक्चर दिले त्याला... हे ऐकल्यावर आर्यपत्नी तरी कशी संधी सोडेल? कन्येच्या सुरात सुर मिसळतं तिची री ओढत त्या वदल्या "नाही तर काय..पपाला कुठे काय बोलावे समजतच नाही.. नुसते चहा गार आहे गरम करून आण इतके बोलायचे सोडून बसले लेक्चर देत.." त्या वर मी काहीच बोललो नाही..पण माझी प्रतिक्रिया खुप उत्स्फूर्त/प्रतिक्षिप्त होती..का कुणास ठाऊक सबबी सांगणारे डोक्यात जातात..थोडे शांत झाल्यावर मात्र मला हि पटले इतके बोलायची काही गरज नव्हती.. शेवटी दोघीची कॉफी पिणे संपल्यावर बिलाची वाट पाहतं बसलो.. मी हिला सांगितले तुम्ही बिल द्या तो पर्यंत मी कार इकडे आणतो..व चालू पडलो.. चार पाउले चाललो नसेल तेव्हढ्यात मुलीची हाक आली मागे वळून पाहिले तर त्या युवकाने चहा आणलेला होता.. मी परत फिरलो..चहा व्यवस्थित गरम होता.त्याला थ्यांक्स केले व चहा घेतला व बिल देऊन आम्ही बाहेर पडलो.मला खात्री होती की कामगारा ने मनात आणले की तो अडचणीवर मात करू शकतो..मात्र मनात नसेल तर ... पुढे कन्यचे लग्न झाले व ति सासरी गेली.त्या मुळे सारेच बंद झाले.. पुढे १-१.१/२ वर्षानंतर ति व जावई भारतात आले. एका दुपारी बहिणीची मुलगी पण राहायला आली होती..गप्पा मारताना एकदम सी.सी.डी ला जायचे ठरले. सी.सी.डी म्हटल्यावर हि व मुलगी माझ्याकडे बघून हसले व मलाही तो जुना प्रसंग आठवला. कपडे बदलून सारे तयार होत होतो तितक्यात हिने मुली समोर दादा गिरी करत मला दटावले व जावया समोर लेक्चर बाजी नको.चहा गार असेल तर मला सांगा मी व्यवस्था करते असा दम भरला. च्यायला..बायका कुठे कसे उट्टे काढतील याचा नेम नसतो. आम्ही सी.सी.डी च्या कॉफी शॉप मध्ये गेलो..५-५.३० चा सुमार असल्याने पॅटिओ मधे न बसता आत ए.सी त बसलो..मी मेनू कार्ड चाळत होतो.तेव्हढ्या मुलगी समोर उभ्या असलेल्या एक्सेकुटिव्ह लुक असलेल्या युवकाशी बोलत असल्याचे लक्षात आले..साधारण तो तिला हल्ली दिसत नाहीत व त्यावर ति सांगत होती की लग्न झाले असून भारतात नसते अश्या स्वरूपाचे बोलणे काना वर आले..त्याने पण माझ्या कडे बघून एक स्मित हास्य केले व मी पण परत फेड केली. ओळखींचा वाटत होता पण नेमका कोण लक्षात येईना. तो गेल्यावर कन्या म्हणाली पपा .ओळखला का याला? तुम्ही त्याला चहा गार दिला म्हणून लेक्चर दिले तो..आता हा या ब्रॅंच चा मॅनेजर आहे. मी बर म्हतले. आम्ही ऑर्डर दिली मी चहाच मागवला. चहा मात्र यावेळी चांगला गरम होता.. गप्पा टप्पा संपल्यावर बिल आले मी बिल चेक करून पैसे काढले तेव्हढ्यात तो युवक समोर आला व मला म्हणाला.. सर चहा मनासारखा गरम होता ना? मी ओळखले की तो युवक हि तो प्रसंग विसरलेला नाही.. हो मस्त मजा आली चहा पिताना.. मी त्याला हसत म्हटले. तुम्हाला आठवते का एकदा चहा गार होता म्हणून तुम्ही मला काही टिप्स दिल्या होत्या... संभाषण नेमके कुठल्या दिशेने जाणार न कळल्याने मी सावधपणे म्हटले ..हो चहा त्या वेळी फारच गार होता म्हणून जरा चिडलो पण होतो.. त्या वर तो हसत म्हणाला..पण सर त्या प्रसंगा नंतर व टिप्स मुळे मी मात्र बदललो..कामा कडे बघण्याचा माझा नजरीया बदलला. व मीजास्त इन्वॉल्व होऊन काम करू लागलो... माझ्यातला बदल म~नेजमेंटच्या पण लक्षात आला व काही महिन्या पूर्वीच मला प्रमोशन मिळाले व मी या ब्रांच्यचा इनचार्ज आहे.... ते ऐकून मला मात्र खूपं बरे वाटले.. अनेक कामगारांना मी शिकवले होते..नाठाळात बदल करून कामास उद्युक्त केले होते.. वा अभिनंदन ...असे म्हणून मी त्याच्या कडे बघून हसलो..व पैसे बिला जवळ ठेवले. पुढे तो म्हणाला.. सर मी आपणास एक विनंती करतो की आजची ट्रीट तुमच्या परिवारास माझ्या कडुन..कृपया पैसे देऊ नका..व ट्रीट कबुल करा.. मी पण काहि न बोलता त्याच्या विनंतीस मान देऊन पैसे खिशात ठेवले.. खूपं बरे वाटत होते.. जाताना त्याच्या पाठी वर एक कौतुकाची थाप मारत कीप इट अप असे म्हणत बाहेर पडलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज

प्रतिक्रिया द्या
10557 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

आपले ते 'किस्से' दुसर्‍याच्या

गणपा
Fri, 05/04/2012 - 18:43 नवीन
आपले ते 'किस्से' दुसर्‍याच्या त्या 'कहाण्या' असेच कायसे आठवले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हलकेच

तिमा
Sun, 05/06/2012 - 10:17 नवीन
प्रतिक्रिया हलकेच घ्यायच्या असतात, हे तुमच्या स्मायलीवरुन समजले. तसेच ते इतरांनाही समजावे ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बरोबर केल

कर्ण
Fri, 05/04/2012 - 19:17 नवीन
छान केले .. तेंव्हाच्या तेंव्हा टोकला पाहिजे.
  • Log in or register to post comments

टोकला पाहिजे ? म्हणजे काय

मराठे
Sat, 05/05/2012 - 00:26 नवीन
टोकला पाहिजे ? म्हणजे काय बॉ? "तो बघ कसा घुरतोय मला" याच पठडीतलं वाक्य वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्ण

आवडला लेख!

फारएन्ड
Fri, 05/04/2012 - 19:18 नवीन
"ये बच्चा जिंदगीभर जुते पॉलिश नही करेगा" आठवले :)
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Sat, 05/05/2012 - 14:24 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments

किस्सा ठीक वाटला

शुचि
Sun, 05/06/2012 - 05:50 नवीन
मी चहात बोट बुडवले तर चहा अगदी कोमट व पिण्या योग्य नसल्याचे ध्यानात आले..
एकच प्रामाणिक शंका आहे - तुम्ही बोट बुडवलेला चहा त्याने फेकला की तुम्हाला दिला की अन्य कोणाला दिला.
  • Log in or register to post comments

शुचिजी, असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारु नयेत

संजय क्षीरसागर
Sun, 05/06/2012 - 07:56 नवीन
त्यापेक्षा सीसीडी सारख्या ठिकाणी, चहात बोट बुडवून, तो एकाच वेळी पिण्यास योग्य - म्हणजे गार कि गरम, गोड कि अगोड, कितपत उकळलेला वगैरे गोष्टींचा माग काढण्याचं लेखकाचं धारिष्ट्य पहावं शिवाय चित्रदर्शी आणि सर्वस्पर्शी लेखनाचा नमुना म्हणून लेखाचा आनंद घ्यावा चित्रदर्शी म्हणजे एकाच वेळी स्वतःची सांपत्तिक स्थिती (तुम्ही बिल द्या तो पर्यंत मी कार इकडे आणतो), कुटुंबातील व्यक्तींच्या माहिती, त्यांची शैक्षणिक आहर्ता (कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती), त्यांची अभिरुचि (पण कॉफीच्या कपाला अ‍ॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे), स्वतःचा दिनक्रम (रात्री जेवण झाले की आम्ही लाँग राईडला जात असू ), स्वतःची विचारप्रणाली ("स्कूल ऑफ थॉट्स"), नोकरीतील हुद्दा (एक तर आमचे उभे आयुष्य कामगारा मधे गेलेले), इतकेच नव्हे तर जामातांचे वास्तव्य (पुढे १-१.१/२ वर्षानंतर ति व जावई भारतात आले), जाताजाता वाचकांना मार्गदर्शन (उन्हाच्या वेळी पॅटिओ मधे न बसता आत ए.सी त बसावे) आणि शेवटी स्वतःचे कर्तृत्व ( अनेक कामगारांना मी शिकवले होते..नाठाळात बदल करून कामास उद्युक्त केले होते)! हे सर्व लेखकानं मोठ्या खुबीनं केलंय, आणि सर्वस्पर्शी म्हणजे वाचकांना स्पर्शानुभूती देणं (मी चहात बोट बुडवले तर चहा अगदी कोमट !) ही कमाल पाहावी आणि नुसते `ठिक वाटला' असे मोघम प्रतिसाद एखादे वेळी लेखकास हतोत्साह करू शकतात याचीही दखल घ्यावी शिवाय लेखाचा मतितार्थ बघता `तुम्ही बोट बुडवलेला चहा त्याने फेकला की तुम्हाला दिला की अन्य कोणाला दिला?' यापेक्षा ..` की तुम्ही बोट बुडवलेला चहा त्यानी कृतकृत्य होऊन स्वतःच प्राशन केला?' असा प्रश्न योग्य ठरला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

बोट

चिरोटा
Sun, 05/06/2012 - 08:15 नवीन
बोट बुडवलेला चहा त्याने दुसर्‍या कुणालातरी दिला असणार. म्हणूनच मॅनेजर केला त्याला दीड वर्षात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

-

नितिन थत्ते
Sun, 05/06/2012 - 12:35 नवीन
हा प्रतिसाद आवडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एकदम असेच म्हणतो. मलाही

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/06/2012 - 19:30 नवीन
एकदम असेच म्हणतो. मलाही अजिबात आवडला नाही. पूर्वग्रहदुषित वाटला (नसेलही कदाचित, पण वाटला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अजुन एक किस्सा लिहित आहे..

अविनाशकुलकर्णी
Sun, 05/06/2012 - 10:36 नवीन
अजुन एक किस्सा लिहित आहे..
  • Log in or register to post comments

अरे देवा ! आता कशात बोट

नाना चेंगट
Sun, 05/06/2012 - 11:58 नवीन
अरे देवा ! आता कशात बोट घातलंत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

नान्या...

कुंदन
Sun, 05/06/2012 - 16:30 नवीन
आच्र्ट नान्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

असा प्रकार घरात केला तर पुन्हा कधीही चहा मिळणार नाही

संजय क्षीरसागर
Sun, 05/06/2012 - 16:47 नवीन
हे निव्वळ अनुमानानं सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

उत्तम

सहज
Sun, 05/06/2012 - 11:58 नवीन
हा लेख आवडला. पेपर, नियतकालिकांमध्ये छापून यावा असा लेख आहे [बहुदा सीसीडीचा थेट नामोल्लेख टाळून].. अविनाशकुलकर्णी यांनी आपल्या इतर धाग्यांनी जी प्रतिमा निर्माण केली आहे त्याला छेद देणारा लेख. अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा