✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सम्राट भाउंस अनावृत्त पत्र

र
राजघराणं यांनी
Wed, 05/02/2012 - 16:11  ·  लेख
लेख
राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री सम्राटभाउ मोझे यांस, साष्टांग दंडवत, पत्र लिहिणेस कारण की, गेले काही दिवस आपली सुहास्य वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्‍यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली. दुसर्‍या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान. पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला. आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे. पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की खजिनामंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात. सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ? आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना. आपला क्रुपाभिलाशी, वैद्यबुवा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
21075 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

पराशेठ

राजघराणं
गुरुवार, 05/03/2012 - 12:50 नवीन
एकदा न्हवे तिनदा मागितली माफी. आता काय करू मी ? १) मी सरसकट पेशव्यांविषयी न बोलता; केवळ दुसर्या बाजीरावाविषयी बोलत होतो. २) आणी मी दुतोंडी साप का आहे ? ते क्रुपया सांगा. डॉ अभिराम दीक्षित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाटकशाळा बाळगुन आणी रमण्यामधे

इस्पिक राजा
गुरुवार, 05/03/2012 - 11:40 नवीन
नाटकशाळा बाळगुन आणी रमण्यामधे दक्षिणा वाटुन पुणे सांस्कृतिक राजधानी बनते असे तुम्हाला वाटते का *तर तर पेशवाई बुडवली हो त्या बाजीरावाने मस्तानीपायी. * एका शनिवारी शनिवारवाड्यासमोर एका सज्जन युवकाकडुन बाजीरावाची आईबहीण काढुन उद्धार होत असताना ऐकलेली ही थोर माहिती वाचुन कान तृप्त झालेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

एका शनिवारी शनिवारवाड्यासमोर

मृगनयनी
गुरुवार, 05/03/2012 - 13:31 नवीन
एका शनिवारी शनिवारवाड्यासमोर एका सज्जन युवकाकडुन बाजीरावाची आईबहीण काढुन उद्धार होत असताना ऐकलेली ही थोर माहिती वाचुन कान तृप्त झालेला.
ह्म्म.. म्हण्जे एकतर तो युवक 'सज्जन' नक्कीच्च नसणार! किन्वा मग "पेशव्यांचा शनवारवाडा" ओरिजिनल असून तो 'लाल महाला'पेक्षा बराच मोठा आहे.. हे सत्य बहुधा त्यास पचले नसावे! ;) किंवा मग तो युवक 'अफजलखान कबर संरक्षण समिती'चा आजीवन सदस्य असावा... त्यामुळे मस्तानी'सारखी मुस्लिम सुन्दरी एका तेजस्वी ब्राह्मणाला (पक्षी: पहिल्या बाजीरावांना) कशी काय वश झाली, याचा मत्सरयुक्त सल त्याच्या मनात असावा! ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा

मस्तानी मुसलमान नव्हती

सुकामेवा
Sun, 05/06/2012 - 15:03 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे ती मुसलमान नव्हती, राजा छत्रसाल या हिंदू राजाची मुलगी होती. तिची आई मुसलमान होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

खबरदार

राजघराणं
गुरुवार, 05/03/2012 - 17:06 नवीन
आमच्या भाउंना काय बोलायचा नाय हां !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मनसेचे

अँग्री बर्ड
Wed, 05/02/2012 - 16:45 नवीन
" मनसेचे दिवंगत आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्यानंतर राजकीय क्षेत्रात एक नवीन गोल्डमॅन उदयास येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं नावं आहे सम्राट मोझे....त्याच्या अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे हा साडे आठ किलो सोनं घालून राष्ट्रवादीच्या मुलाखाती करता हजर होता. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेचा सोन्याचा रेकॉर्डही त्याने ब्रेक केल्याचं सांगितलं जातं आहे. अंगावर दोन किलो सोनं असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं होतं. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक 13 मधून निवडणूक लढविणार आहे. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच असा विश्वास सम्राट मोझो यांनी व्यक्त केला आहे. आता या नव्या गोल्डमॅनला पुणे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तिकीट देणार का , याकडे सवांर्चं लक्ष लागलं आहे. " हे त्याने स्वतः टाकलेले फेसबुकचे स्टेटस वाचा.. मनपा निवडणुकीपूर्वी :D :D :D
  • Log in or register to post comments

बाकी

अँग्री बर्ड
Wed, 05/02/2012 - 16:50 नवीन
बाकी जरी विडंबन , खिल्ली इत्यादी जरी असले तरी राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न ह्या पदव्यांचा अपमान होऊ नये. त्या ज्यांच्यासाठी होत्या त्यांच्यासाठीच राहाव्यात . बाकी पेशवाईचा आणि ह्याचा ओढूनताणून संबंध जोडला नसता तरी चालले असते असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

एक मिनिट

राजघराणं
Wed, 05/02/2012 - 17:00 नवीन
ह्या पदव्या कोणासाठी राखीव होत्या ते कळेल का ? आणी (उत्तर) पेशवाईचा संबंध जुळवण्यासाठी - पुणे शहराचे वर्णन हे समकालीन पुस्तक वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

चोरट्यांनी देवाला चोरण्या

गणपा
Wed, 05/02/2012 - 17:04 नवीन
चोरट्यांनी देवाला चोरण्या पेक्षा यालाच उचलले असते तर इतरांनी उलट दुवाच दिला असता. ;)
  • Log in or register to post comments

चोरटा चोराला उचलत नसतो. एक

नाना चेंगट
Wed, 05/02/2012 - 18:25 नवीन
चोरटा चोराला उचलत नसतो. एक म्हण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

(No subject)

चिंतामणी
Wed, 05/02/2012 - 18:38 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

हे पहाच!!

श्रीरंग
Wed, 05/02/2012 - 18:36 नवीन
http://www.facebook.com/media/set/?set=a.163836267010015.38322.100001509280148&type=3 सम्राटभाऊंचा जयंती सोहळा!!
  • Log in or register to post comments

खहपलो आहे...

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/02/2012 - 19:06 नवीन
खहपलो आहे... Image removed.
  • Log in or register to post comments

बापरे! यांना आहे का कोणाची

रेवती
Wed, 05/02/2012 - 19:57 नवीन
बापरे! यांना आहे का कोणाची भिती? आम्हाला मेली अर्ध्या तोळ्याची साखळी घालून फिरताना जीव जाईल काय असं वाटतं.
  • Log in or register to post comments

>>आम्हाला मेली अर्ध्या

सूड
गुरुवार, 05/03/2012 - 13:49 नवीन
>>आम्हाला मेली अर्ध्या तोळ्याची साखळी घालून फिरताना जीव जाईल काय असं वाटतं. असं वाटणार्‍यांचे दागिने खरे असतात गं आज्जे. याचे १८ कॅरेटचे असले तरी फार. भावीण नाचत्ये म्हणून न्हावीण नाचलीच पाह्यजे अशी गत ह्यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

१८ कॅरेटचे असले तरी

रेवती
गुरुवार, 05/03/2012 - 19:36 नवीन
१८ कॅरेटचे असले तरी फार हात्तिच्या! म्हणजे इथेही कमी क्यारटाचा घोळ आहेच. काय नाय रे, यांचं सगळं चालून जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मस्त बखर!

पैसा
Wed, 05/02/2012 - 20:44 नवीन
वैद्यबुवांची बखर फार आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त लिहलय !

मदनबाण
गुरुवार, 05/03/2012 - 19:54 नवीन
मस्त लिहलय ! :) सुवर्णमयी (आयडी नाही हो)मोझे ला पाहण्याची परत एकदा इच्छा झाली ! ;) मग जालावर हा फोटु सापडला ! Image removed. बाकी केरळातल्या पोरीशी लगीन केल तर होलसेल मधे सोन गावतया ! कसं ? ते असं... Image removed. Image removed. छ्या लयं मोठा चानस घालवला म्या ! ;)
  • Log in or register to post comments

मदनबाण'जी... लयी

मृगनयनी
गुरुवार, 05/03/2012 - 20:04 नवीन
मदनबाण'जी... लयी भारी!!! सम्राट मोझे' यांचा फोटो, दागिने, स्पेशली हातातल्या बान्गड्या आणि पोटावर हात ठेवून बसण्याची स्टाईल ...एकन्दर चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स पाहून "डोहाळेजेवण" असल्याचा आभास होतोय!!! फक्त एका मुकुटाची कमी आहे! ;) खालच्या फोटोतल्या केरळी सुकुमारीं'ना टफ देताहेत सम्राट मोझे!!! बाकी मिसळपाव'वाल्यांचे साऊथ इन्डियन सुन्दर्‍यांकडे भारीच हो लक्ष!!! ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स

मदनबाण
गुरुवार, 05/03/2012 - 20:12 नवीन
चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स पाहून "डोहाळेजेवण" असल्याचा आभास होतोय!!! फक्त एका मुकुटाची कमी आहे! <पकाका मोड ऑन> हॅहॅहॅ हॅहॅहॅ<पकाका मोड ऑफ> ;) बाकी मिसळपाव'वाल्यांचे साऊथ इन्डियन सुन्दर्‍यांकडे भारीच हो लक्ष!!! खी खी खी ! सुंदर्‍यांकडे लक्ष द्यायच नाय तर कोनाच्याकडं लक्ष द्यायच ? ;) तसेही मिपाकरांना अनुष्का वहिनी ठावुकच आहेत म्हणा ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आपल्या 'सोन्यासारख्या

आशु जोग
Wed, 05/02/2012 - 23:30 नवीन
आपल्या 'सोन्यासारख्या माणसाचे' हे भाच्चे आहेत काय ?
  • Log in or register to post comments

वा वा वा

अमोल केळकर
गुरुवार, 05/03/2012 - 14:06 नवीन
सम्राट मोझे यांचे मोजे ही सोन्याचे आहेत का? नाही त्यांचे पाय दिसत नाहीत :) अमोल
  • Log in or register to post comments

वाटले नव्हते

इरसाल
गुरुवार, 05/03/2012 - 15:23 नवीन
की मोझेस भौंचा मार्ग इतका जिलेबी सारखा सरळ वळणाने जातो. बाकीचे भौ/तै धाग्याला द्रौपदीची साडी समजू र्‍हायले काय ?
  • Log in or register to post comments

अंडरकव्हर एजंट

फारएन्ड
गुरुवार, 05/03/2012 - 17:14 नवीन
सरकारी खर्चाचे सामान्य माणसाला न कळणारे असे काहीतरी गहन अर्थ दडलेले असतात. सरकार करते ते जसे सर्व योग्यच असते तसेच काही हे असावे. आपल्याला झेपत नाही म्हणून आपण टीका करतो. खात्रीशीर सूत्रांकडून समजते की हे सीबीआय चे अंडरकव्हर एजंट असून पुण्यात वाढत्या दागिनेचोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून डीकॉय दागिने घालून शहरभर (फ्लेक्सरूपे) वावरत आहेत. कोणी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला की लगेच सापडेल. मग लोकांना समजेल त्याची उपयुक्तता!!!
  • Log in or register to post comments

या धाग्यावरचा आवडलेला एकमेव

गणपा
गुरुवार, 05/03/2012 - 18:02 नवीन
या धाग्यावरचा आवडलेला एकमेव प्रतिसाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

हेहेहेहेहेहेहेहेह्हे

वेताळ
गुरुवार, 05/03/2012 - 20:08 नवीन
मजा आली वाचुन...........दुसर्‍यांची लफडी एकायला खुप मजा येते.
  • Log in or register to post comments

हे तर

निनाद
Fri, 05/04/2012 - 11:17 नवीन
हे तर चालते फिरते सोन्याचे दुकान वाटते आहे. पुण्यात काय सर्व्हिसेस तयार होतील काही सांगता येत नाही!
  • Log in or register to post comments

खरे आहे...

विकास
Sat, 05/05/2012 - 00:08 नवीन
खरे आहे... नाव सम्राटभाऊ, हाती सोन्याचा वाळा, गळी सोन्याच्या माळा... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

आज पुन्हा एकदा फोटो पाहून

यकु
Sat, 05/05/2012 - 00:17 नवीन
आज पुन्हा एकदा फोटो पाहून राजकुमारने बप्पी लाहिरीचे दागिने पाहून मारलेला डायलॉग आठवला - जानी, सिर्फ मंगलसूत्र की कमी है ! ;-) सम्राटभाऊंसमोर कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग मारावा आणि पळून यावे ;-)
  • Log in or register to post comments

कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग

रेवती
Sat, 05/05/2012 - 01:19 नवीन
कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग औरंगाबादकरही चालतात हे बोलायला........आणि सुचवणीही तिकडूनच आलीये म्हणताना त्यांनी बिन्धास्त जावे असे आम्ही सुचवतो.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

विनोद का मुद्रणदोष?

विकास
Sat, 05/05/2012 - 01:22 नवीन
पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना. विघ्नकर्त्या का विघ्नहर्ता?
  • Log in or register to post comments

समरत भाऊनी तिकिट मिलन्यसाठी

बालगंधर्व
Sat, 05/05/2012 - 21:01 नवीन
समरत भाऊनी तिकिट मिलन्यसाठी फत्क दागिन्याचे प्रदर्शन करावे. पन नन्तर निवडुम्न आल्यनन्तर ते सगळे दागिने दान करावेत गोर्गरीबाना. वाट्ल्यास त्याचे पैसे करून तो पैसा जन्तेसा/थी वापरावा. त्यमाध्येच पूर्ण देशाचे हित समावले गेले आहे.
  • Log in or register to post comments

चान चान.. चालुद्या..

गणामास्तर
Sun, 05/06/2012 - 12:19 नवीन
चान चान.. चालुद्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा